चिप्स, डिप्स, अ‍ॅपेटायझर्स

Submitted by क्ष... on 18 June, 2010 - 13:30

लहानसहान पार्ट्या, गेटटुगेदरसाठी बरेचदा अ‍ॅपेटायझर्स ची सोय करावी लागते. तेच ते सालसा, ग्वाकमोले खाउन करुन पण कंटाळा येतो. तुम्ही वेगवेगळे काही डिप्स अ‍ॅपेटायझर्स करत असाल तर त्याच्या रेसिपी योग्य जागी टाकुन इथे लिंक्स द्या फक्त.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आपली कैरीची डाळ डिप म्हणून वापरते जेव्हा शक्य असेल तेव्हा पीटा चिप्स बरोबर.

सालसा विकत आणण्याऐवजी घरी वेगवेगळे बनवते.

माझी एक मैत्रिण पावभाजी पण करते डीप म्हणून किंवा ब्रुशेटा सारखे ब्रेड स्लाईसवर ठेवुन.

हमस आणि त्याचे व्हर्जन्स रोस्टेड पेप्पर हमस इ.

शोनुने ग्रीक दही, शेपू वगैरे घालून एक रेसिपी दिली होती. ते फिलिंग डिप म्हणून वापरता येइल असे आपले मला वाटते. पण दही असल्याने मी त्याच्या वाटी जात नाही.

एकदा तांबड्या भोपळ्याचे रायते फार सरबरीत झाले म्हणून मी पिटा चिप्स आणि ते रायते खाल्ले होते. मला आवडले. पण पाहुण्यांसाठी ते काँबी ठेवायची हिम्मत नाही केली.

आंबा किंवा अननस घालून साल्सा,
चिमिचुरी सॉस अन ब्रेड
रोस्टेड रेड पेपर्स अन ब्रेड
हमस अन पीटा ब्रेड
चिमिचुरी घालून ग्वाकमोले
लाल वाईन आटवून त्यात बटर मिसळून वाइन बटर.
बेसिल, रोझमेरि इत्यादी घालून हर्ब बटर

चिझ आणि क्रॅकर्स जर अ‍ॅपेटायझर म्हणून ठेवायचे असतील तर कुठले चीझ कुठले क्रॅकर्स आणायचे सांगाल का प्लीज?

पावभाजी डिप म्हणून? अरे बापरे! उत्साही दिसतीये... एवढे कष्ट घेऊन फक्त डिप? Happy

मॅश केलेल्या अ‍ॅव्होकॅडो मध्ये दही, ठेचलेला लसूण आणि मीठ घालून पण छान डिप होतो.

कॅन्ड सार्डीन्सचे हलक्या हाताने तुकडे करायचे. त्यात लाल शॅलटसच्या पातळ गोल चकत्या, बारीक चिरलेली कोथिंबीर अन लिंबाचा रस हलक्या हाताने मिक्स करायचा. पाहिजे तर दोन थेंब हॉट सॉस. अन हे मिश्रण बागेतच्या पातळ स्लाइसेस वर घालून सर्व्ह करायचे.

स्मोकड गूडा, स्मोकड इडाम, साधं गूडा, इडाम, याचे चौकोनी तुकडे, द्राक्षे , ऑलिव्हस, कॉर्निशॉन्स ( बारक्या खारवलेल्या काकड्या ) यांचे प्लॅटर करावे.

ताजं मॉझ्झरेलाचे स्लाइसेस, रोमा टोमाटॉचे स्लाइसेस अन एकेक पान बेसिलचे असे आलटून पालटून लावायचे गोल. त्यावर चांगले ऑऑ , मीठ ( जरासेच) अन मिरपुड शिंपडावे.

कॅन किंवा बाटली मधले आर्टिचोक्स, रोस्टेड रेड पेपर्स, छोटे चेरी टॉमेटो मिक्स करून ऑऑ + बाल्सामिक व्हिनेगर घालून सर्व्ह करावे.

भरपूर रसवाल्या बफेलो विंग्ज अन त्या सोबत क्रस्टी इटालियन ब्रेडच्या स्लाइसेस.

ग्रिल केलेले अस्परॅगस प्रोझुटो मधे गुंडाळून सर्व्ह करावे . व्हेज लोकांकरता रोस्टेड रेड पेपर च्या लांब स्ट्रिप्स कापून त्या दोन -तीन अस्परॅगस भोवती गुंडाळून सर्व्ह करता येईल.

टूथपिक वर प्रोसेस्ड चीज क्युब्स, चेरि (बिया काढ्लेलि), पाईनअ‍ॅपल क्युब्स
तात्झिकि सॉस with baked lays - Sour Cream & Onion Flavored Potato Crisps

मेधा काय सही आहेत सगळे डीप्स..मस्तच! मी आपले नेहमीचे अवाकेडो, सालसा करायचे, आता हे प्रकार करेन एक एक Happy