मायबोली गणेशोत्सव २००८ स्पर्धा निकाल

Submitted by संयोजक on 28 September, 2008 - 23:05

नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातल्या स्पर्धांना भरघोस दाद तसेच प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्व मायबोलीकरांचे संयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार!
गणेशोत्सवात घेतलेल्या सर्व स्पर्धांचे निकाल खाली जाहीर करत आहोत. पाककृती स्पर्धा वगळता सर्व स्पर्धांचे निकाल जनमत चाचणीने लावले आहेत.
पाककृती स्पर्धेसाठी परीक्षकांनी निकाल दिला. वेळात वेळ काढुन परीक्षक म्हणुन पाककृती स्पर्धेसाठी काम केल्याबद्दल दिनेशव्हीएस, ललिताएस आणि आर्च या मायबोलीकरांचे गणेशोत्सव संयोजकांतर्फे शतशः आभार.

गणेशोत्सव स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे :

व्यंगचित्रचारोळी क्र. १ विजेता : साजिरा

फॉर्म गेल्यावरची टीम इंडिया
पवारांनी अश्शी कामाला लावली..
धोनीला नांगर, युवराज मळणीला
अन दिपिका उखळापाशी आली!!

व्यंगचित्रचारोळी क्र. २ विजेती : अश्विनी

चल, प्रार्थना करू
त्या दयाघनापाशी
दगडाला लाभो हलकेपणा
अन् फुग्याला वजनाच्या राशी

व्यंगचित्रचारोळी क्र. ३ यात अश्विनी_के आणि इंद्रधनुष्य या दोघांना सारखीच मते मिळाली त्यामुळे २ विजेते निवडण्यात आले आहेत.

पोट माझं केव्हाच भरलं
तुही दमलीस आराम कर गं आई,
माऊला देऊन टाक माझा खाऊ
शाणं बाळ मी तुझं झोपेन न ऐकता अंगाई.
- अश्विनी_के

फिल्मीणीच्या बुकामागे बाळ झोपला गं बाई
माऊ बसली पुढ्यात चोरट्याच लक्षण बाई
आज माझ्या कार्ट्याच पोटं का गं भरत नाही...
- इंद्रधनुष्य

व्यंगचित्रचारोळी क्र. ४ विजेता : सेनापती

एकात एक पाच रिंग
हातात घेउन बघतोय भिंग
भारताच्या विजयाचे शिंग
ऐकेल का हो यंदा बिजिंग?

नावगुंफण स्पर्धा क्र. १ विजेती: दीपांजली

दीपिका:
रणबीर च्या कंबरेला टॉवेल चं कव्हर
युवराज चं नाव घेते,धोनीची लव्हर !

युवराज
धोनी आहे बुजरा
रणबीर आहे बायकी
दिपिका ला मिळवायची
माझीच आहे लायकी !

नावगुंफण स्पर्धा क्र. २ विजेता : साजिरा

सैफू-
चिपाडात चिपाड उसाचं
अन फुलात फुल कारल्याचं
कसंही असो, नशीबच माझं, म्हणून-
कौतूकच करतो करीनाचं!!
--
करीना
सँडल नवी अन पर्फ्यूम नवा बाई
पर्स नवी माझी, नेकलेस नवा
पिंटूशी फुगडी झाली बाई आता
झिम्म्यासाठी जुना सैफूच हवा!!

नावगुंफण स्पर्धा क्र. ३ विजेता : अरुण

लालू:
स्वतंत्र भारताचे पुढारी आम्ही
आम्हाला भीती कशाची
राबडी सोबत असताना
कशांस तमा राष्ट्रगीताची ?

राबडी:
स्वर आले दुरुनी
अर्थ कळेना कधीपासूनी
लालू कडून आज्ञा नाही
मग का उठावे एका गाण्यासाठी ?

नावगुंफण स्पर्धा क्र. ४ यात जागोमोहनप्यारे आणि सत्यजित_एम या दोघांना सारखीच मते मिळाली त्यामुळे २ विजेते निवडण्यात आले आहेत.

जया :
बॉन्गॉलची गुड्डी मी
भरते लखनौचा 'द्रोण'
हिन्दीला विरोध करणारा
हा राज ठाकरे कोण ?

राज :
मर्दमराठयां मिरवण्या
इथे मुम्बइचे आंगण
'जया' अंगी भैय्यापण
तया यातना कठीण..
- जागोमोहनप्यारे

जया:
भले पोसले मुंबईने मला
तिनेच दिली सारी रया
खाल्या मिठला जगली तर
तर मी कसली भय्या..?

राज
'जया' अंगी मोठेपण
खोटी ठरते येथे म्हण
शिकवा हिला शहाणपण
नाहीतर फिरेल ही वणवण
- सत्यजित_एम

कथालेखनस्पर्धा (सुरुवात आमची, कथा तुमची) - सुरुवात क्र.१ विजेती : सिंड्रेला

सिंड्रेला यांनी हुब्या जागी पळपळ आन गंगीची चंगळ ही कथा लिहीली.

प्रवासवर्णन स्पर्धा विजेता : चाफ्फा

चाफ्फा यांनी आम्ही ट्रेकिंग करतो (म्हणे)! हे प्रवासवर्णन लिहीले.

प्रकाशचित्र स्पर्धा विजेती : मैत्रेयी

मैत्रेयी यांनी || नभे व्यापिले सर्व सॄष्टीस आहे | रघूनायका ऊपमा ते न साहे || हे शिर्षक असलेले प्रकाशचित्र टाकले होते. या स्पर्धेचा निकाल लावतांना ज्या प्रकाशचित्रांना कमीत कमी ५ लोकांनी मानांकन दिले आहे अश्याच प्रकाशचित्रांचा विचार केला गेला आणि त्यांचेच सरासरी गुण निकाल लावण्यासाठी मोजले गेले.

पाककला स्पर्धा विजेते :

प्रथम क्र. पाककृती : मिश्र धान्यांचा उपमा - कल्पना_०५३
द्वितीय क्र. पाककृती : मिश्र धान्य क्लब सँडविच - सिंड्रेला
तृतीय क्र. पाककृती : ज्वारीचे नुडल्स - पिल्लु_छोटा

सर्व परीक्षकांनी या स्पर्धेत गुण देतांना प्रत्येक पाककृतीतील पोषणमुल्य, स्पर्धा विभागातील योग्यता, चव, लिहीण्याची पद्धत आणि इतर अश्या ५ निकषांवर वर आधारीत त्या पाककृतीचे मुल्यमापन केले.

सर्व विजेत्यांचे मायबोली परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. परत एकदा सर्व मायबोलीकरांचे गणेशोत्सव संयोजक मंडळातर्फे आभार. पुढच्या वर्षी परत भेटूच :).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन!

सर्व विजेत्या आणि सहभागी स्पर्धकान्चे व मतदारान्चे हार्दीक अभिनन्दन! Happy
सन्योजकान्चे आभार! Happy
(कन्जुषपणे एकेकच नम्बर का काढला म्हणे? Proud DDD
जिथे शक्य हे तिथे किमान दोन किन्वा तीन "विजेते-उपविजेते" तरी काढायला हवे होते ना!
तरी बर, "उत्तेजनार्थची" कल्पना अजुन मला सुचली नाहीये! )
...;
आपला, लिम्बुटिम्बु

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धांमध्ये भाग घेणार्‍यांचे अभिनंदन!

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

सर्वांचे अभिनंदन रे मित्रांनो. (माझ्यासकट :फिदी:)
सर्व मतदारांचे हार्दिक आभार मानून माझे दोन शब्द संपवतो. Happy

सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन! साजिर्‍यातुझ्यासकट रे Happy
आणि स्पर्धांमध्ये भाग घेणार्‍यांचेसुद्धा अभिनंदन (माझ्यासकट :))!
सर्व संयोजकांचे मनापासुन आभार! खुपच चांगला झाला यंदाचा गणेशोत्सव!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पारीजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल पण लयलुट करायची ती सुगंधाचीच!

सर्व विजेत्यांचे अभिनंदन Happy

    ***
    Life : The most virulent STD

    सर्वांचे (विजेत्यांचे - माझ्यासकट, भाग घेणार्‍यांचे, मते देणार्‍यांचे) अभिनंदन.

    सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!

    जल्लां काय समदी मंडळी सोताचीच पाठ थोपटून घेत आहेत... Happy

    अभिनन्दन आणि आभार... Happy

    सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
    ==================
    श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
    क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

    विजेत्यांचं आणि भाग घेणार्‍यांचं - दोघांचही अभिनंदन.. गणेशोत्सव खरंच दणकुन झाला.. संयोजक, मनःपुर्वक आभार...

    अरे व्वा...... सगळ्या विजेत्यांचं , भाग घेणार्‍यांचं आणि संयोजकांचं मनापासून अभिनंदन Happy

    सर्वं विजेत्यांचे, सर्वं भाग घेणार्‍यांचे, मतं देणार्‍यांचे, विजेते ठरवणार्‍यांचे, संयोजकांचे, सर्वांचे अभिनंदन.... Happy

    सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन Happy

    सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन !!! आणि मतदात्यांना (पेट्या/खोके पोचले ना व्यवस्थीत ;)) तसेच संयोजकांना धन्यवाद Happy

    सर्वांचे अभिनंदन..

    गणपती बाप्पा मोरया..
    पुढच्या वर्षी लवकर या..!

    सर्वांच अभिनंदन!, जिंकल्याबद्दल, भाग घेतल्याबद्दल, बघितल्याबद्दल, वाचल्याबद्दल, मत दिल्याबद्दल, संयोजन केल्याबद्दल, साईट available केल्याबद्दल आणि इथे आल्याबद्दल. Happy

    धन्यवाद बर का Happy आणि सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!

    जे कोणी हे वाचताय त्या सगळ्यांच अभिनंदन Happy

    सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन .

    द्वितीय क्र. पाककृती : मिश्र धान्य क्लब सँडविच - सिंड्रेला >>>>

    ह्या लिन्क वर गेले असता 'तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही.' असा मेसेज येतो.

    http://www.maayboli.com/node/3280/by_subject/310 इथेही ही पाककृती दिसत नाही . असे कसे काय?

    धन्यवाद, आणि इतर विजेत्यांचे व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन.

    उमा२७
    तुम्हाला बहुदा मायबोली गणेशोत्सव या गृपचे सदस्यत्व घ्यावे लागेल म्हणजे मग तुम्हाला तो पाककृतीचा दूवा दिसेल. डाव्या बाजुला 'सामील व्हा' असा दूवा दिसेल त्यावर टीचकी मारुन या गृपचे सदस्य होता येईल.

    सर्व विजेत्यांचे तसेच सर्व स्पर्धकांचे भाग घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

    -------------------------------------------------------------------------------------------------------
    I'm not dumb. I just have a command of thoroughly useless information
    - Calvin & Hobbs

    अगदी अगदी आर्च..
    सर्वांच अभिनंदन!, जिंकल्याबद्दल, भाग घेतल्याबद्दल, बघितल्याबद्दल, वाचल्याबद्दल, मत दिल्याबद्दल, संयोजन केल्याबद्दल, साईट available केल्याबद्दल आणि इथे आल्याबद्दल. ... Happy

    सर्व विजेत्यांचे अभिनन्दन Happy
    संयोजक गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला.
    तुमच्या कार्याबद्दल धन्यवाद Happy

    अभिनंदन... अभिनंदन... अभिनंदन...सगळ्यांचेच...

    आणि विजेत्यांसाठी...खास हर्दीक अभिनंदन....

    मस्त मज्जा आली...हुरेरेय...

    गणपती बाप्पा मोरया..
    पुढच्या वर्षी लवकर या..!

    तुषार

    सर्व विजेत्यांचे खास खास अभिनंदन......! अभिनंदन!!अभिनंदन!!!

    Pages