तू गेलायस वाटत नाही कधीच,
देवघराच्या तुळईला टेकून उभा हसतोस आजही,
पोरगं मोठ्ठ झालं म्हणत.
देवीच्या आरजात,
गुरवांच्या गोंगाटातही ऐकतो
तुझा स्वर...
"बाय, सोमजाय, महालक्ष्मी..." म्हणत
काळीज चिरत नेणारा..
आजही चार घास तुझ्या नावाचे काढते ती काकविळ भरून...
आणि मी निरखतो कावळे तुझ्या चेहर्याचा शोध घेत...
वेडा पाडा ही मुका भासतो,
तुझा रख-रखीत हात न फिरल्याने.
आणि ती...
ती तर टच्च हिरव्या शिरा जोपासते,
पांढर कपाळावर.
तिच्या आयुष्याची लालिमाच पुसलीये
बोटभर कुंकू नसण्याने...
उजळ माथ्याने फिरणारी ती
पांढरफटक कपाळ दाखवते,
खोल अर्थहीन डोळ्यांसोबत...
आटल्या विहारीसारख्या.
जड होऊन निरोप घेतो,
घराचा, दाराचा, कण-कण मातीचा...
मग तिच्या पायाला हात लावला की
सरावाची किण-किणहि ऐकू येत नाही...
दचकतो, क्षणभर...
रडू कोसळतं...
तिच्या मिठित शिरून लहान व्हावं वाटतं...
पण नाहीच;
एव्हाना तिचा थरथरता हात
पदर घेऊन पुसतो माझा कढ...
आणि मी वळतो,
तूच दिलेल्या पोटासाठी!!
मयूरेश चव्हाण, जेजुरी, पुणे.
३१.०५.१०, १९.३०.
आरजात ,काकविळ हे शब्द
आरजात ,काकविळ हे शब्द पहिल्यांदाच वाचले.
चटका लावून गेली कविता.
सगळे सा॑गतात म्हणून नाही !
सगळे सा॑गतात म्हणून नाही ! खरच आवडीली कविता !
धन्यवाद.
धन्यवाद.
देवघराच्या तुळईला टेकून उभा
देवघराच्या तुळईला टेकून उभा हसतोस आजही...
पोरगं मोठ्ठं झालं म्हणत
इथेच जिंकलस रे भाउ. पूर्ण कविताच मस्त उतरली आहे. सही. खरच चटका लावून गेली कविता
निवडक १०. नो डाऊट! कितीदा
निवडक १०.
नो डाऊट!
कितीदा वाचली तरी तितकीच आर्त..
धन्यवाद, धन्यवाद,धन्यवाद,
धन्यवाद, धन्यवाद,धन्यवाद, प्रत्येकाचे अगदी मनापासुन...धन्यवाद.
ऋयाम, निवडक १० मधे निवडल्याबद्दल खरेच आभारी.
ही कविता खरेतर माझी खरीखूरी भावना, वडिल गेल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी अशी शब्दबद्ध झाली यातच समाधान.
बरेचदा खुपशा भावना शब्दांत मांडणे अवघड होउन जाते, 'शब्द आणि मी' दोघेहि दोघांच्या मर्यादा पुरेपुर जाणुन निशब्द होतात. पण कधीतरी अशा भावना पाझरल्या कि ती कलाकृती ऋयाम म्हणतात तसेच आर्त होउन जाते...
मग त्यात माझे असणे नाममात्र... कारण हि देणगिच त्या अदृश्य शक्तीची.
मग पु.ले.शु. ला अर्थ नाही.
मात्र एक खरे ह्याच भावनेने लिहत राहीन, अगदी खरेपणाने...!!
धन्यवाद!
एव्हाना तिचा थरथरता हात पदर
एव्हाना तिचा थरथरता हात
पदर घेऊन पुसतो माझा कढ...
आणि मी वळतो,
तूच दिलेल्या पोटासाठी!!
मयुरेश, खुपच छान !
सुरेख कविता !
सुरेख कविता !
धन्यवाद!!
धन्यवाद!!
<<आजही चार घास तुझ्या नावाचे
<<आजही चार घास तुझ्या नावाचे काढते ती काकविळ भरून...
आणि मी निरखतो कावळे तुझ्या चेहरयाचा शोध घेत...<<< अगदी अगदी...
माझ्याही निवडक १० त!
माझ्याही निवडक १० त! मयुरेश,
माझ्याही निवडक १० त!
मयुरेश, ही तुझ्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे.
पु.ले.शु.
काळजापर्यंत भिडली.
काळजापर्यंत भिडली.
मग तिच्या पायाला हात लावला
मग तिच्या पायाला हात लावला की
सरावाची किण-किणहि ऐकू येत नाही...>>>> जबरी कविता.
आतपर्यंत भिडली.
आतपर्यंत भिडली.
मनाला चटका लावते ही कविता....
मनाला चटका लावते ही कविता.... डोळ्यांसमोर चित्र उभे ठाकते आणि घशात आपसूक एक आवंढा दाटतो!
फार छान शब्दात मांडली आहे
फार छान शब्दात मांडली आहे कविता. अगदी नेमक्या भावना उतरल्या आहेत ..........
धन्स...
धन्स...
अप्रतीम कविता
अप्रतीम कविता
सुरेख कविता.. कविता विभागातली
सुरेख कविता.. कविता विभागातली चक्कर सार्थकी लागली
मी थोडंसं सुचवू का?
त्या दुसर्या वाक्यात उभा नंतर एक स्वल्पविराम टाकाल का?
नाहीच.. नंतर तुम्ही वापरलेलं चिन्ह : हे बदलायला हवंय असं वाटलं. माझं व्याकरण खूप चांगलं नाही त्यामुळे कदाचित तुम्हीच ठरवू शकाल.
मला खाली लिहीलेल्या शब्दांचे अर्थ नाही कळलेत
आरजात? - आरज?
काकविळ
पाडा
आरजात, आरज : देवाकडे
आरजात, आरज : देवाकडे मागीतलेले गार्हाणे/नवस लावणे ई.
काकविळ : पिंड किंवा मृत आत्म्याला दाखवलेला/दिलेला नैवेद्य.
पाडा : गाईचं वासरू (नर)
पाडी : गाईचं वासरू (मादी)
हे सर्व प्रमुख्याने कोकणात वापरले जाणारे शब्द.
धन्यवाद!!!
कविता भिडली
कविता भिडली
धन्स.
धन्स.
अप्रतिम... शब्दच
अप्रतिम...
शब्दच नाहीत...
गहिवर आणणारी कविता...
......
......
गणेश भुते, आपला मनापासुन
गणेश भुते, आपला मनापासुन आभारी आहे.
आणि,
मालक(संदीप) आपल्याच श्रेष्ठ सोबतीत असताना सुचले होते हे शब्द.
आपलेहि आभार!!
छान. भिडणारी. मला माझी 'बाबा
छान. भिडणारी. मला माझी 'बाबा आहेत ना' आठवली. मित्रा, 'हृदयातले हृदयी घातले' अशी अवस्था झालीय वाचून. असेच मनापासून लिहीत रहा.
(पुणेरी) अशक्य आहे, मयुरेश
(पुणेरी) अशक्य आहे, मयुरेश
काय बोलावं सुचत नाहीये
खूप सुंदर कविता.
Harshalc आणि उमेश कोठीकर
Harshalc आणि उमेश कोठीकर आपला आभारी आहे.
धन्यवाद!!
अरे काय रे हे. काळीज पिळवटून
अरे काय रे हे. काळीज पिळवटून टाकलेस. बाकी काही उरलेच नाही म्हणायला.
वडिलांच्या जाण्याचे दु:ख
वडिलांच्या जाण्याचे दु:ख इतक्या समर्थपणे उतरलंय की शब्द्च सुचत नाहीत तुमच्या कवितेचं कौतुक करायला.
Pages