तू गेलायस वाटत नाही कधीच,
देवघराच्या तुळईला टेकून उभा हसतोस आजही,
पोरगं मोठ्ठ झालं म्हणत.
देवीच्या आरजात,
गुरवांच्या गोंगाटातही ऐकतो
तुझा स्वर...
"बाय, सोमजाय, महालक्ष्मी..." म्हणत
काळीज चिरत नेणारा..
आजही चार घास तुझ्या नावाचे काढते ती काकविळ भरून...
आणि मी निरखतो कावळे तुझ्या चेहर्याचा शोध घेत...
वेडा पाडा ही मुका भासतो,
तुझा रख-रखीत हात न फिरल्याने.
आणि ती...
ती तर टच्च हिरव्या शिरा जोपासते,
पांढर कपाळावर.
तिच्या आयुष्याची लालिमाच पुसलीये
बोटभर कुंकू नसण्याने...
उजळ माथ्याने फिरणारी ती
पांढरफटक कपाळ दाखवते,
खोल अर्थहीन डोळ्यांसोबत...
आटल्या विहारीसारख्या.
जड होऊन निरोप घेतो,
घराचा, दाराचा, कण-कण मातीचा...
मग तिच्या पायाला हात लावला की
सरावाची किण-किणहि ऐकू येत नाही...
दचकतो, क्षणभर...
रडू कोसळतं...
तिच्या मिठित शिरून लहान व्हावं वाटतं...
पण नाहीच;
एव्हाना तिचा थरथरता हात
पदर घेऊन पुसतो माझा कढ...
आणि मी वळतो,
तूच दिलेल्या पोटासाठी!!
मयूरेश चव्हाण, जेजुरी, पुणे.
३१.०५.१०, १९.३०.
जया एम, मेघाराजन, आपला आभारी
जया एम, मेघाराजन,
आपला आभारी आहे.
ट्च्च हिरव्या शिरा पांढरं
ट्च्च हिरव्या शिरा
पांढरं फ्टक कपाळ
अंगावर येते कविता.
जबरदस्त आहे
संध्या धन्यवाद!
संध्या धन्यवाद!
अप्रतिम !! अतिशय परिणामकारक
अप्रतिम !! अतिशय परिणामकारक !! डोळ्यात पाणीच आलं........!!
निवडक १० मधे माझ्या.
बाप... निवडक १० मधे माझ्याही.
बाप...
निवडक १० मधे माझ्याही.
अप्रतिम.. खरच......
अप्रतिम..
खरच......
काय हे, रडवलंत...
काय हे, रडवलंत...
छान लिहलेस.
छान लिहलेस.
पुन्हा वाचली. तितकीच आर्त!
पुन्हा वाचली.
तितकीच आर्त!
अप्रतिम कविता. फार उशिरा
अप्रतिम कविता.
फार उशिरा वाचायला मिळाली.
http://www.maayboli.com/node/17333
काय बोलु???????????
काय बोलु???????????
धन्यवाद!
धन्यवाद!
नावाप्रमाणेच बाप कविता
नावाप्रमाणेच बाप कविता आहे....
बाप....
बाप....
बाप- खास कविता. मानलं बुआ
बाप- खास कविता. मानलं बुआ आपल्याला, काय दु:ख पकडलय शब्दांत आपण.
सलाम!
सार्यांचा मनापासुन आभारी
सार्यांचा मनापासुन आभारी आहे!
बाबा...
बाबा...
विमनस्क.
विमनस्क.
!!!!!!
!!!!!!
खूप आवडली...
खूप आवडली...
खूप आवडली >>मग तिच्या पायाला
खूप आवडली
>>मग तिच्या पायाला हात लावला की
सरावाची किण-किणहि ऐकू येत नाही >> या दोन ओळी तर काळजाला भिडल्या.
....
....
खुप छान लिहिलय ......
खुप छान लिहिलय ......
!!!!!!!!
!!!!!!!!
मनापासुन आभार सर्वांचे!
मनापासुन आभार सर्वांचे!
ग्रेट!!!!! कितीदा वाचायची?
ग्रेट!!!!!
कितीदा वाचायची? तितकिच आर्त.
नि:शब्द!
नि:शब्द!
आभार!
आभार!
असे लिहीतोस की, मुर्तीमंत
असे लिहीतोस की, मुर्तीमंत धैर्यालाही रडायला येईल..
खुप छान!!!
खुप छान!!!
Pages