अजून सुरुवात होत नाही....!!!!

Submitted by kaaryashaaLaa on 18 September, 2008 - 13:12

मित्रांनो,

असं समजू नका की आम्ही इथे नुसते व्याकरणाचे रुक्ष पाठ देतोय. कार्यशाळेचा उद्देश व्याकरणाचे पंडित तयार करणं हा नाहीच आहे.
आपल्याला शिकायचंय ते सगळ्या अंगांनी गझलचा आनंद घ्यायला, आणि सहज गझल लिहायला.

उदाहरण-२ मधे म्हटलं ना, गझलची भाषाच मुळी साधीसोपी, आपल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारल्यासारखी असते.

म्हणजे बघा हं, ऑफिसला उशीरा पोचण्याची रोज नवीन निमित्तं कशी सांगतो आपण?

सात वाजून गेले, तरीही
का गजर आज झालाच नाही?

इथे मी पाव लोणी खाउनी कंटाळलो आहे
शिरा, पोहे हवे आहेत, पण करणे जमत नाही!

सांबार तेच आहे
ताजे मुळीच नाही!

काम मी करतो किती! हा जॉब म्हणजे खेळ नाही!!
जेवण्याची वेळ झाली, जेवण्या पण वेळ नाही!!

आज येतानाच पंक्चर कार झाली
पण सुदैवाने इजा काहीच नाही!

दूध आणायचे विसरलो मी
खैर माझी घरी अता नाही!

किती वेळ वाट पाहिली मी - सुचेल आता.. सुचेल काही..
कधी गझल व्हायची पुरी ही? अजून सुरुवात होत नाही!!!

तुम्हालाही या शेवटच्या शेर सारखं वाटत नाही ना?
सुचेल हो. 'नाही' ने संपणारी कित्ती वाक्य बोलतो आपण दिवसातून! Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

आयटी, सुचतंय तसं लिहायला तर घे. नीट करू आपण.
अगदी नाही वृत्तबद्ध सुचलं तरी हरकत नाही. आम्ही कशाला आहोत? Happy

==
भावनांचा मांडला बाजार नाही
शब्द माझा एवढा लाचार नाही
shama1_0.jpg

स्वाती कायतरी कळेल असं म्हण बरं.. नुसतं टिंब काय..?
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

करा कितीही काम पण संपणार नाही
मरा कितीही जन्म पण पुरणार नाही
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

.

अश्विनी,

शक्यतो आपण अपूर्ण / असंस्कारित गझल / शेर इथे लिहूया नको.
जे लिहीता आहात ते मेलमधे पाठवाल का?
इथून कृपया डीलीट करा हे पोस्ट.

शेर व्याकरणात बसतो आहे, म्हणजे सुरुवात तर छान झाली. Happy

==
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
shama1_0.jpg

सॉरी. डिलीट केलंय.

छे छे, सॉरी वगैरे काय! Happy
पण सगळेच इथे लिहायला लागले तर त्याचा ट्रॅक ठेवणं आम्हालाही कठीण जाईल ना?

==
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
shama1_0.jpg

एक शंका- उ:शाप मधला उ: गुरु आहे ना? २२१?

हो. Happy

==
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
shama1_0.jpg

सध्या मला काहीच सुचत नाही
इकडे बघायला ही फुरसत नाही
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

हिमांशु,
वीकांत येतोय. तेव्हा लिहा बघू. Happy

==
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
shama1_0.jpg

जे अर्धमूर्ध सुचतयं ते पॉलीशींगसाठी ईथे टाकाव का नाही?

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

मधुरा, ते मेलने पाठव ना संयोजकांना..

मधुरा ... शैलजाने तुम्हाला एकदम योग्य सल्ला दिला आहे... कृपया इथे नका टाकू.. आम्हाला मेल करा...

==
छप्पराला दोष मी द्यावा कशाला?
भिंत आहे, पण तिचा आधार नाही
shama1_0.jpg

अजूनही खरंच सुरुवात होत नाही!
लिहायला जमेलसे वाटत नाही Sad

पहिली ओळ सुचते. ती भन्नाट वगैरे वाटते, मग दुसरी ओळ जी असते ती कधी म्हणजे कधीच पहिल्या ओळीच्या मीटरमधे बसत नाही! Uhoh मग जी काही शब्दांशी झटापट की ज्याचं नाव ते! यात मला मुळात काय लिहायचं होतं हेच विसरून जाते मी Lol
म्हटलं ना, मार्गदर्शकांनाच जास्त काम आहे! Happy
पण तुम्ही खूपच मनापासून आमचा धीर वाढवताय, प्रोत्साहन देताय, याचाही खूप आधार वाटतो Happy
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!

अगदी माझ्या मनातलं लिहिलंस पूनम!! भुगा पडला एव्हांच!
पुढे काय ह्याचा, अंदाज येत नाही!!

२न्ही ओळींत २८ मात्रा असण हा क्रायटेरीया चालतो का?
मग पुढे येणार्‍रा चारही शेरांतही २८सचं मात्रा यायला हव्या का?
मी जे लिहलयं त्याबद्दल मला जराही खात्री नाहीये. तर ते मी मेल कराव का?

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

अहो, खरोखर असेच life झालेय सध्या म्हणून आता इथे गझलेत हात पाय मारून बघतेय म्हणजे खरेच काहीतरी बदल होइल. मग रोज काय तेच ते जगायचे अशी खंत नाही Happy

(काहीतरी जमलेय असे वाटते खरे? मला घ्याल का हो गझल शाळेत्(हे कार्याशाळाध्यक्षाना उद्देशून)). Happy
आता कळले नी काढून टाकले.

manuswini,

तुमचे नाव नोंदवून घेतले आहे. तुमचा ई-मेल ID कळवावा ही विनंती.

धन्यवाद,
संयोजक समिती
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
shama1_0.jpgkaaryashaalaa08@maayboli.com

नक्की कुठले दोन शेर काढावे ते कळले नाही, जरा सांगाल का?

मग मी वरच्या पत्त्यावर पाठवू का? माझा इमेल कुठे पाठवू?

धन्यवाद manuswini,

तुमची मेल मिळाली आहे. Happy

==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
shama1_0.jpgkaaryashaalaa08@maayboli.com

कार्यशाळा,
माझा मेल मिळाला का? (गजलचा मेल)
मराठी गजल .. बाप रे पहिलाच प्रयत्न केलाय.. चुकल्यास समजवा..

कार्याशाळाध्यक्ष,
अच्छा मिळाली का मेल?(मी आतापर्यन्त मेल मिळाला असेच बरोबर समजत होते) असो.
धन्यवाद अश्या ढ विद्यार्थनीला सामावून घेतले म्हणून. Happy

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
कधी आवडे चकली, कधी आवडे चिवडा
करंजी मात्र मी कधीच खात नाही

लाडू आवडे मात्र, ते कीतीही खा
बेदाणा हा त्यात आवडत नाही

वजन घटावे असा, रोज फक्त विचार असतो
अश्या ह्या खादाडीमुळे अजून सुरवात होत नाही.....!!!

चेतना तुमची मेल मिळाली आहे.. लवकरच आम्ही तुमच्याशी संपर्क साधू

==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
shama1_0.jpgkaaryashaalaa08@maayboli.com

माझ्या मेलची काहीतरी गडबड होतेय. मी ईथे टयपूनच याहूत पेस्ट केलेली. मी खुप उत्सुकतेनी निकाल बघावा तसा मेलबॉक्स चेक करायला गेले.
आता परत मेल केलाय.

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

नाही नाही म्हणतात त्यालाच गझल म्हणतात काय
कधी तरी रडता रडता एक गझल हसेल काय

माझी मिळाली का मेल?

अश्विनी,

मेल मिळाली आहे.
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
shama1_0.jpgkaaryashaalaa08@maayboli.com

Pages