अजून सुरुवात होत नाही....!!!!

Submitted by kaaryashaaLaa on 18 September, 2008 - 13:12

मित्रांनो,

असं समजू नका की आम्ही इथे नुसते व्याकरणाचे रुक्ष पाठ देतोय. कार्यशाळेचा उद्देश व्याकरणाचे पंडित तयार करणं हा नाहीच आहे.
आपल्याला शिकायचंय ते सगळ्या अंगांनी गझलचा आनंद घ्यायला, आणि सहज गझल लिहायला.

उदाहरण-२ मधे म्हटलं ना, गझलची भाषाच मुळी साधीसोपी, आपल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारल्यासारखी असते.

म्हणजे बघा हं, ऑफिसला उशीरा पोचण्याची रोज नवीन निमित्तं कशी सांगतो आपण?

सात वाजून गेले, तरीही
का गजर आज झालाच नाही?

इथे मी पाव लोणी खाउनी कंटाळलो आहे
शिरा, पोहे हवे आहेत, पण करणे जमत नाही!

सांबार तेच आहे
ताजे मुळीच नाही!

काम मी करतो किती! हा जॉब म्हणजे खेळ नाही!!
जेवण्याची वेळ झाली, जेवण्या पण वेळ नाही!!

आज येतानाच पंक्चर कार झाली
पण सुदैवाने इजा काहीच नाही!

दूध आणायचे विसरलो मी
खैर माझी घरी अता नाही!

किती वेळ वाट पाहिली मी - सुचेल आता.. सुचेल काही..
कधी गझल व्हायची पुरी ही? अजून सुरुवात होत नाही!!!

तुम्हालाही या शेवटच्या शेर सारखं वाटत नाही ना?
सुचेल हो. 'नाही' ने संपणारी कित्ती वाक्य बोलतो आपण दिवसातून! Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी मिळाली का मेल?
काल रात्रीच पाठ्वलीय.

******************************************
आई नावाची वाटे देवालाही नवलाई
विठ्ठ्लही पंढरीचा म्हण्तो स्वतःला विठाई.

मधुरा, मेल मिळाली आहे. लवकरच उत्तर पाठवू तुम्हाला.
==
जन्मत: मृत्यूस मी पत्ता दिलेला
आजही मी लावलेले दार नाही
shama1_0.jpgkaaryashaalaa08@maayboli.com

Pages