वाढीव नंबराचा चष्मा...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आधीचा चष्मा

वासंतिक बाफ जसा पेटून उठला तसे शिट्टीकरही उत्साहात आले. जस-जसा गटगचा दिवस जवळ येत होता तसा हा उत्साह वाढत होता. इतका की त्या उत्साहाच्या भरात एका शिट्टीकरणीने गटगला येणे रद्द केले, पुर्‍या उडुन गेल्या आणि नंतर सामान गाडीत टाकताना आदल्या दिवशी आणलेल्या आमच्या ग्रॉसरीतल्या कांदे-बटाट्याच्या पिशव्या सुद्धा गाडीत भरल्या गेल्या.

तर आमचं गटग शुक्रवारी दुपारी साडे-चार वाजता टप्प्याटप्प्याने (कंपुकंपुने :फिदी:) सुरु झालं. पन्नाकडे \चहा सुद्धा घेण्यात वेळ न दडवता आम्ही बॅग्स गाडीत लोटल्या आणि प्रस्थान ठेवले. आमच्या इतकीच घाई मि. पन्ना आणि मा. पन्ना ह्यांना झाली असावी. कारण मा. पन्ना बॅग उचलण्याच्या बहाण्याने खाली येऊन आम्ही नक्की गेलो ह्याची खात्री करायला आला होता (बाबांनी पाठवला बहुतेक :फिदी:). एरवी ट्रॅफिक लागल्यावर वैताग होतो, त्यादिवशी मात्र ट्रॅफिक वाहतय की थांबतय ह्याचं काहीही सोयर सुतक नव्हतं अशा गप्पा सुरु होत्या. तेव्हाच एक मायबोलीकर ही एका बाराकरणीची जुळी बहिण असल्याचा शोध लागला. मधेच एकदा चमनचा फोन आला. त्याबरोबर पन्नाने 'तुला उद्या रात्री नऊ वजेपर्यंतची मुदत आहे. तू सांग नाहीतर मी सांगते' असे म्हंटले. ह्याने नोकरी तर नुकतीच बदलली आहे त्यामुळे हा नक्की छोकरीचा मामला आहे हा अंदाज लावणे फार कठीण नव्हते. तरी त्याला बोलायची संधी का सोडा म्हणून मी, 'मैने तुम्हे भाई माना...मेरा बेटा तुम्हे मामा केहता है और तुमने मुझे ही मामा बनानेका घाट डाला है ? येह न्याय नही अन्याय है..." असं म्हणून घेतलं. पण चमनच्या फोनमधून इश्शच्या स्मायल्यांशिवाय दुसरे काही आले नाही.

रात्रीच्या जेवणात शिट्टीकरांसाठी पुरणाची पोळी, कटाची आमटी, पापड-कुरडया, भजी, बटाट्याची भाजी, कोशिंबीर असा बेत ठेवला होता. म्हणून आम्ही स्टॉप अँड शॉपमधे थांबून पावभाजीसाठी पाव विकत घेतले आणि संध्याकाळी सात वाजता एकदाच्या घरी पोचलो. घरी जरा स्थिरस्थावर होऊन कटाची आमटी, पापड-कुरडया, भजी, बटाट्याची भाजी, कोशिंबीर सगळं करेपर्यंत विशाल, अमृता-किरण-जुई, सचिन सगळे आले. जेवणाची वेळ झालीच होती. म्हणून पन्नाकाकू (ठम्माकाकू र्‍हाइम होतय ना ?) सुगरणबाईंच्या सल्ल्याने पुरणपोळ्या डॉमिनोज मधुन मागवाव्यात असे ठरले. एकीकडे चमनकडून चमीची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. एक वेळ एखाद्या उंदराकडून तो वाघ आहे हे कबूल करुन घेणे सोप्पे पण चमनकडून त्याचे लग्न ठरले आहे हे कबूल करुन घेणे फार अवघड आहे. तो लाजतो, कुठेतरी बघून एकटाच हसतो, येता-जाता इश्शच्या स्मायल्या सोडतो, आपल्या आस-पास कुणी नाही असे बघून फोनवर खुसुर-फुसुर बोलतो पण कबूल करत नाही. बरं झालं हा विशिष्ठ धर्माचा नाहीये नाहीतर कबूल न केल्यामुळे ह्याचे लग्नच झाले नसते. शेवटी आम्ही इतर नेहेमीच्या यशस्वी आयड्या आणि बाफंवर चर्चा (आमच्या चर्चेला गॉसिप म्हणू नये ~हुक्मावर्नं) करायला घेतल्या. संध्याकाळी सात वाजता सुरु झालेल्या गप्पा पहाटे तीन वाजता संपल्या (पन्ना त्यानंतरही बडबडत होती म्हणे) आणि पुन्हा पहाटे साडे चारला सुरु झाल्या.

सकाळी आम्ही सगळे भराभरा तयार झालो (आंघोळी तर करायच्या नव्हत्याच) पण फचिन आणि चमन ह्या टीनएजर्सनी आवरायला फार वेळ घेतला त्यामुळे साडे-चार वाजता उठुन सुद्धा साडे-सात वाजता गाडी लोड झाली. गणपती बाप्पाचा जयजयकार करुन आणि एका गावातल्या डुकरांचं चांगभलंच्या घोषणा देत मंडळी एकदाची निघाली. आठेक वाजता बाराकरांना फोन केला तर ते अर्ध्या तासात लालूकडे पोचणार होते म्हणे (तारेत असतात का ?). गाडीत बरीच खादाडी सुरु होती. पन्नाने आणलेले लाडू खासच. चमनने ते लाडू त्याच्या लग्नाचे म्हणून वाटले (एकदाचं कबूल केलं आणि गंगेत घोडं न्हायलं). लाडू पन्नाने केले होते म्हणून आम्ही पन्नाचे(च) अभिनंदन केले. पुढचा बराच वेळ अधिक मौलिक माहिती मिळवण्यात गेला. चमनची चमी (ठम्माकाकूंच्या ठाण्याची असल्याने तिला खरं तर ठमी म्हणायला हवे) ठाण्याची असल्याने त्याला ऑफिशिअली पन्नाचा जावई ठरवण्यात आला. एका ब्रेकनंतर आमची वाटचाल पुन्हा सुरु झाली. एव्हाना सर्व रंजक, मनोरंजक, वाचक, वेचक, पाचक, जाचक, खोचक विषय चोथा झाले होते. मग आम्ही गेम्स खेळायला सुरुवात केली. डम्ब शेराड्स खेळताना नेमकच चमनवर राज्य आलं की 'ठमी माझी लाडी', 'नवसाची बायको' आणि फचिनवर राज्य आलं की 'शोधु कुठे तुला', '...गुढग्याला बाशिंग' वगैरे चित्रपट येत होते. अशा प्रकारे मजल दरमजल करत बरोब्बर बारा वाजता लालूकडे पोचलो (खरं तर आम्ही आधीच पोचलो होतो पण बाराकरांच्या भ्रमाचा भोपळा का फोडा असा सुज्ञ विचार करुन कोपर्‍यावर थांबलो होतो). तिथे बाराकरांचं आधीच 'वाजले की बारा...जाऊद्या घरी' सुरु झालं होतं. शिट्टीहुन आलेल्या तीन सप्त-सुंदर्‍या बघून झक्कींना भरुन आलं (अमृताने आदल्या दिवशी चिंच चटणी पेडिक्युअर केलं होतं त्याचा परिणाम).

सगळे जण बेसमेंटमधे आहेत असे कळले म्हणून आम्ही खाली उतरत होतो तर बाराकर आता "म्हशींत म्हैस कुणाची...बाराची" अशा घोषणा देत होते. त्यांच्या बशीत नक्की कोण आले आहे असा उपस्थितांना प्रश्न पडला. श्री. लालुंनी रंपा वाटप सुरु केले होते. (त्यामुळे) तिथे खूप कलकलाट होता, कोण कुणाशी काय बोलतय ह्याची टोटल लागणे जरा अवघड होते. पण निंदेस घेतलेले विषय आलटुन-पालटुन तेच होते त्यामुळे कुठल्याही कळपात घुसून काहीही बोललं तरी मंडळी हसत होती. (कारण) एव्हाना श्री. लालुंनी रंपा वाटपाची अनेक आवर्तनं यशस्वीरित्या पूर्ण केली होती. मी आणि अमृतासारख्या वरण-भात लोकांसाठी व्हर्जिन मार्गारिटा होती. तिथेच एका कंपूत मी नाहीये असं समजून अंजली ह्यांनी मला भ मे घोषीत करायचा प्रयत्न केला. पण मी त्यांच्या समोरच उभी असल्याचे त्यांना कुणीतरी लक्षात आणून दिल्यावर मी ह्या पदास पात्र नसल्याची त्यांना जाणीव झाली. मात्र मेकप करताना याची डोळां बघितलं असल्याने मी ह्या पुरस्कारासाठी पन्नाला उमेदवार घोषीत केलं आणि इतर सर्वांनी 'एक'मताने पन्नाला भ मे निवडलं. ह्या दरम्यान घडलेल्या घटना आणि घडामोडी इथे आणि इथे आणि इथे सविस्तर वाचायला मिळतील.

लालूच्या घरी केलेला कल्लोळ कमी की काय म्हणून रात्री हाटेलात पुन्हा मैफिल जमली. वाचा पोटाला ब्रँडी लावुन बुद्धासारख्या हसणार्‍या बाथ टबमधल्या बेडकाची कथा. वास्तुशास्त्राच्या तासात बेडरुममधे आरसा लावू नये असे झाराने सांगितले. त्यावर श्री. मिनी ह्यांनी कुठुनतरी प्रकाश आत आला तर काय होइल ह्याचे विवेचन सुरु केले. पण अ‍ॅडमिनदादांच्या घरात प्रकाश (तेच ते थुत्तरहूड) कसा काय येणार हे मला (झोपेत असल्यामुळे) कळेना. सगळ्यांनाच झोप अनावर झाल्यावर नाइलाजाने मैफल आवरली.

दुसर्‍या दिवशी पुन्हा एकदा नाष्टा-गटग करुन, गळाभेटी घेऊन मंडळी चारी दिशांना पांगली. आम्ही लाँग वूड गार्डनमधे मांजर बघायला जाणार होतो. सगळ्या रस्त्याने लाँगच लाँग वूड लागले पण गार्डन काही येइना. वाटेत सगळ्यांना भूक लागली म्हणून पन्नाने पिशवीत हात घातला तर आळीपाळीने कांदा, बटाटा आणि संत्र आले. प्रत्येकवेळेस पन्ना प्रामाणीकपणे हा नाही माझा खाऊ असे म्हणत होती. ह्या प्रामाणीकपणाबद्दल आम्ही लालूने सायोसाठी दिलेला चिवडा तिला बक्षिस दिला. शेवटी एकदाचे ते लाँग वूड गार्डन आले. तिथले सुंदर ट्युलिप्स बघून फार प्रसन्न वाटले. इतरही खूप छान छान प्रकार आहेत फुलांचे. निघताना पाठमोरी का होइना मांजर दिसली आणि मी झोपेत/तारेत लाँगवूडात मांजर आहे हे सांगत नव्हते हे सिद्ध झाले.

घरी पोचल्यावर अमृता आणि पन्नाने लवकरात लवकर फोटो पाठवायचे आश्वासन दिले तेव्हा आपण पण कॅमेरा बरोबर घेतला होता असे माझ्या लक्षात आले. मग शोधाशोधी सुरु झाली. सचिनमामाने कारण नसताना खूप वेळा कॅमेरा त्याच्याकडे नाहीच असे छातीठोकपणे सांगितल्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडेच फिरली आणि त्याच्या बॅगेची झडती घेण्यात आली. अशा प्रकारे माझा कॅमेरा लांबवण्याचा मामाचा प्लॅन मी यशस्वीरित्या हाणून पाडला व माझा कॅमेरा स्वत:कडेच ठेऊन घ्यायचा त्याचा प्लॅन अयशस्वी झाला. ह्याची शिक्षा म्हणून त्याच्याकडून घर आवरुन घेतले आणि मगच त्याला जाऊ दिले. ते सुद्धा (बाराकरांची लागण झाल्यासारखा) तो 'वाजले की बारा...' गायला लागतो की काय अशा भितीने बाराच्या आतच (हाकलले). त्याच्या पाठोपाठ चमन पण निघाला आणि गटगची सांगता झाली.

...दुसर्‍या दिवशी सकाळी बाहेर बघितले तर जाणवले वसंता आपल्याबरोबरच आला की. अंगणातले झाड अर्धवट उमललेल्या कळ्यांनी डच्च बहरले होते !!!

त. टि. _ह्या संपूर्ण प्रवासात डरायविंगची जबाबदारी चमन, किरण आणि नितेश ह्यांनी आमच्या 'अरे हळु चालव रे बाबा', 'अरे थांब थांब थांब', 'चला...चला', 'उशीर झाला तरी हरकत नाही पण १२ च्या आत पोचायचे आहे', 'घाई है..जल्दि एक्झिट लेलो', 'आवाज वाढवा पण थोडा कमीच ठेवा', 'गाणं बदला नाही तर तुम्ही तरी गा' अशा १०१ सुचनांकडे दुर्लक्ष करत सांभाळली.
_पँट्री ठमाकाकुंच्या ताब्यात होती ते सांगायला हवे ?

प्रकार: 

मस्त एकदम झकास झालाय वृतांत... Rofl
नशिब तोंडात जायच्या आधी ते कांदे बटाटे सापडले. Lol

म्हशींत म्हैस कुणाची... << असं तुम्हाला बघून म्हणाले? कमाल आहे.. Happy

शिंडे --- तू भमे ठरलीस शेवटी? अरेरे Happy

एका कंपूत मी नाहीये असं समजून अंजली ह्यांनी मला भ मे घोषीत करायचा प्रयत्न केला.>>> Lol
ए नाही गं, मला वाटलं तू मागे उभी आहेस म्हणून :डोमा:, मला असं म्हणायचं होतं की भ. मे. या आद्य संज्ञेची आद्य जननी तू आहेस.

वाढीव नंबराचा चष्मा... बदलून >> किती वेळा चष्मा बदलणार.. Happy
.
.
मी त्या पदास पात्र नाही>>
मला असं म्हणायचं होतं की भ. मे. या आद्य संज्ञेची आद्य जननी तू आहेस.>> थोडक्यात तु पात्र आहेस.. Lol

बाराकरांची लागण झाल्यासारखा << त्याने तर वैतागून बस पण बदलली (जुनी असली तरी चालेल म्हणाला)...
शिंडे तू जननी आहेस. मग एक काय , दोन काय?

आठेक वाजता बाराकरांना फोन केला तर ते अर्ध्या तासात लालूकडे पोचणार होते म्हणे (तारेत असतात का ?)>>>>>> अरे तारेत नाही आम्ही कमीत कमीत गाडीत तरी होतो, तुमच्या सारखे नहाणीघरात नाही. Proud

और ये लगा सिक्सर!!!! Lol

जबरी ग सिंडे! Lol (मग मला (न केलेला)भ.मे म्हण किंवा अगदी काकू म्हण!! ) Lol

उंदराकडून तो वाघ आहे हे कबूल करुन घेणे सोप्पे पण चमनकडून त्याचे लग्न ठरले आहे हे कबूल करुन घेणे फार अवघड आहे. >>>> अगदी अगदी. सिंडीच्या भावाने लय भाव खाल्ला!!

बाराकर आता "म्हशींत म्हैस कुणाची...बाराची" अशा घोषणा देत होते.>> Rofl
खरतर बाराकरांच्या स्वागतपर घोषणांनी अगदी गलबलून आलं Wink सगळे बाराकर जातीनं पुढे आले हो स्वागताला!! वैद्यबुवा तर 'आले आले शिट्टीकर्स आले, सुरू करा आता गटग' असंही म्हणाले Proud

Lol

>> बरं झालं हा विशिष्ठ धर्माचा नाहीये नाहीतर कबूल न केल्यामुळे ह्याचे लग्नच झाले नसते. Lol

(बाराकरांवरील कॉमेन्ट्स शिट्टीकरांच्या कलेक्टिव्ह न्यूनगंडातून आलेल्या असल्यामुळे उदार मनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. :P)

>पुरणपोळ्या डॉमिनोज मधुन
>कबूल न केल्यामुळे ह्याचे लग्नच झाले नसते.
>डुकरांचं चांगभलंच्या
>(आंघोळी तर करायच्या नव्हत्याच)
>तीन सप्त-सुंदर्‍या
आणि बरंच काही.. Proud

Pages