Submitted by हर्ट on 26 March, 2010 - 13:13
हल्ली see-through kitchen ही एक नवीन पद्धत निर्माण झाली आहे. पण फारचं कमी अशा restaurant/shops मधे ही पद्धत पहायला मिळते. यामागे उद्देश हा की तिथे तयार होणारे पदार्थ हे मुलभूत स्वच्छता पाळतात. मागिल शुक्रवारी माझ्या एका कलीगचा सख्खा भाऊ अन्नातून विषबाधा झाल्यामुळे दगावला. पुण्यात कुठेतरी त्यानी भेळ खाल्ली आणि घरी येऊन पोट जे दुखायला लागले, उलट्या व्हायल्या लागल्यात की काही तासातचं तो गेला. ती बातमी ऐकून मला जरा काळजी वाटते आहे. कारण हल्ली बरेच जण बाहेरच्या चटकमटक पदार्थाकडे पाहून ते चाखून पाहतात आणि त्याची खूप जाहिरात पण करतात. junk food खाणे, चॅट पदार्थावरचं जगणे यांचे प्रमाण वाढते आहे. बाहेरचे पदार्थ खाताना तुम्ही कितीपत ते पदार्थ पाहून खाता? काय हमी की ते आतून चांगले असतील? अशा आणि विषबाधेशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्यावेळी भारतवारी मधे उलट
ह्यावेळी भारतवारी मधे उलट अनुभव आला. घराशेजारचा गणेश भेळवाला चक्क चमच्याने पाणी पुरीत घालून पाणी पुरी करत होता. आणि पाणी पण फिल्टरच होतं म्ह़णे..
ह्यावेळी १०-१२ वेळा पाणीपुरी खाल्ली पण ती मजा नाही आली. नेक्स्ट टाईम त्या मडक्यात हात बुचकळून पाणीपुरी करून देतात असा पाणीपुरीवाला शोधला पाहिजे. :p
आमच्या COEP च्या मुलीन्च्या
आमच्या COEP च्या मुलीन्च्या मेस मधे एकदा एक भज्यामधे २५ पैश्याचे नाणे निघाले होते
असे ७-८ भजे खाल्ले असते तर एक वेळचा चहा आला असता..:हाहा:
फूड पॉयझनिन्ग मुळे डेंजर रोग
फूड पॉयझनिन्ग मुळे डेंजर रोग होतात. कावीळ मुख्यत्वे. एक प्रॉड्क्ट आहे हँड सॅनिटायझर ते तसेच डिस्पोझेबल ग्लोवज घाउक प्रमाणात स्वयंपाक करणार्यांनी वापरले पाहिजेत.
बाप रे! धक्का बसला वाचून
बाप रे!
धक्का बसला वाचून सगळं.
निव्वळ घरी करण्याच्या कंटाळ्यापायी आपण बाहेर भरमसाठ पैसे घालून अनारोगी खाणी-पिणी विकत घेतो.. त्यापेक्षा चक्क घरी हरकामी बाई ठेवून तिच्याकडून हवं ते काम करून घ्या, आरोग्यापायी आरोग्य ही राहिल आणि तिला पगार देऊन तिच्या पोटापाण्याची सोय केल्याचं पुण्य ही देव पदरात घालेल.
बी सारखा मला ही आता माझा अभिमान वगैरे वाटायला लागलाय. शेवटी आपण इतके कष्ट करतो का? पोटासाठीच ना? मग बाहेर खाऊन पोटासाठीच इतका धोका निर्माण करायचा?
हे सगळं वाचूनही मला बाहेर
हे सगळं वाचूनही मला बाहेर खाण्याशिवाय पर्याय नाही हे माझ्या लक्षात आलं.
शूटचं प्री-प्रॉड. चालू असताना मला मुंबईभर हिंडावं लागतं खरेदी करत. अश्या वेळेला मी दिवसभरासाठी किती डबे भरून घेऊन जाऊ शकते याला मर्यादा आहे कारण डब्यांचच ओझं झालं तर मी बाकी खरेदीचं ओझं उचलूच शकणार नाही. तसंही खांदा-मानेचे विकार अस्तित्वात आहेतच. तसेच घरातली भाजी अश्या उन्हातून फिरताना आंबू शकतेच.
शूटच्या काळात ७ च्या शिफ्टचा माझा कॉल टाइम ६ चा असतो. मला घरातून ५- ५:३० ला निघावे लागते. कधी डबा करणार? दिवसा शूटच्या इथलंच जेवण जेवावं लागतं. आणि मुंबईमधे शूटचं जेवण भयाण असतं. पॅकअप अगदी लवकर म्हणजे ७ ला झालं संध्याकाळी तरी पुढची आवरसावर आणि उद्याची तयारी करून मला निघायला किमान ९ होतात. घरी पोचायला किमान १०. जेवढं शूट उशीरा संपेल त्याच्यापुढे ३ तास किमान घरी पोचायला. शूटवरची पळापळ एवढी असते की ५ ला निघायचं तर ३ ला उठून डबा इत्यादी करणं हे अशक्य आहे.
बाकी सध्या लोकेशनच बाहेरगावी असल्यामुळे अर्ध्याहून अधिक वेळ तिथेच. तिकडे किती आणि काय तहानलाडू/ भूकलाडू बांधून नेणार? ८-१० दिवसांसाठी? आणि ६-७ माणसांसाठी? शक्य नाहीये. बाहेरगावी शूट असताना केटरर शिवाय पर्यायही नसतो.
सांगायचा मुद्दा इतकाच की बाहेरचं न खायला, बाहेरचं टाळायला, तो आरोग्याचा फायदा मिळवायला आणि त्याचा अभिमान वाटून घ्यायला सगळ्यांनाच आवडेल पण सगळ्यांनाच शक्य नसतं. आणि आमच्यासारखे जे भूक धरवत नाही, अति भुकेने चक्कर येऊन पडू शकतात अश्यांसाठी तर अजिबातच नाही.
नीधप, तुला संपर्कातून मेल
नीधप, तुला संपर्कातून मेल केलीये. प्लीज बघशील का?
आस्वपू नाही जमू शकत?
आस्वपू नाही जमू शकत?
नीधप- अनुमोदन. शेवटी आपली
नीधप- अनुमोदन. शेवटी आपली प्रकृती सांभाळून आपल्याला जमेल ते करावे. सर्वांनाच सारखे नियम लागु होत नाहीत. (तरीही मुंबईत सकाळी ५ वाजताही स्वैंपाकाला बाई मिळु शकते तो पर्याय सुचवेन. वेळ लागतो, मुलाखती वगैरे घ्याव्या लागतात, कधीही सोडून जाऊ शकतात, तरीही पुरेसे प्रयत्न केल्यास मिळु शकतात. किंवा आपल्या बरोबर राहणारी बाईही मिळु शकते. त्याबरोबरच वेगवेगळ्या कटकटी फुकट मिळतात, पण lesser evil ज्याचे त्याने ठरवावे. :-))
आणि तरीही इथल्या पोस्ट वाचून काही अंशी माझे मतपरिवर्तन झाले आहे. बाहेर खाणे पूर्णपणे वगैरे मी टाळणार नाही तरी नक्की काय क्रायटेरिया पहावे याचा नजरिया मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. रस्त्यावर काहीही खाऊ शकते याचा अभिमान होता तो टायफॉईड ने बोंबलला.
बाकी तत्व म्हणुन काहीही अंगीकारलं, की आपली लवचिकता कमी होत जाते ही काळ्या दगडावरची रेघ. तरीही तत्वनिष्ठा म्हणुनही काही असतंच. आपण आपल्या सवयींचे गुलाम असतो आणि आपल्यामुळे दुस-यांना किती त्रास द्यावा हे माझ्या तत्वात बसत नाही. मी शनिवारी खडेमिठच खाते, हातसडीचाच तांदुळ हवा वगैरे गोष्टी.
सकस, शक्यतोवर ऑरगॅनिक हे शेवटी रिलेटीव्ह आहे नाहीतर आपल्यापुरते पिकवुन खावे हे उत्तम. ते कितपत शक्य आहे यावर संशोधन व्हावे खरंच. 
नी कळतात तुझ्या अडचणी.. खरंच
नी कळतात तुझ्या अडचणी..
खरंच तुला पर्याय नाहीये. पण जमेल तेव्हा बाहेरचं खाणं टाळ.. नक्की! 
आणि हाडाचा शाकाहारी असणे ही
आणि हाडाचा शाकाहारी असणे ही देखील एक फार मोठी अडचण
माझी तर ८०% उपजिविका ही फळांमार्फेतच होते. अधूनमधून मी मल्टी-वायटॅमिन्सच्या गोळ्या घेतो. पण रोज रोज नाही. माझी प्रतिकारशक्ती उत्तम आहे. मी दोन तीन दिवस फक्त पाणी वगैरे पिऊन जरी दिवस काढले तरी मला घेरी वगैरे येत नाही. काहीच फरक पडत नाही. फक्त वजन उतरत आहे हे कळतं. आपलचं शरीर आपल्याला हलक हलक वाटतं. फुलपँट ढिले होतात. पट्ट्याचे छिंद्र आणखीन वाढवून घ्यावे लागलात
हातातलं घड्याळ निसटून पडतं. शेवटी घड्याळ घालणेच सोडून दिले
.... पण काहीही असो शरिरात जंक असं काही जात नाही याचे समाधान वाटते. मी प्रत्येक वर्षी माझ्या शारिरिक चाचण्या करुन घेतो. इतके कमी खाऊन माझे हिमोग्लोबीन १५.५ आहे आणि LDL कमी आहे तर HDL जास्त आहे यातच काय ते मी मिळवले. याचा अर्थ I am on right track
आणि जसा वेळ मिळेल तो वेळ मी योगाभ्यासाला देतो त्यामुळे माझी तब्येत बरी राहते 
नी, गूड पोस्ट... इथे
नी, गूड पोस्ट...
इथे उन्हाळ्यात तर डब्यात आणलेली भाजी ४ तासांच्या वर टिकतच नाही. फार काळजी घेऊन भाज्या कराव्या लागतात.
घरी भाजी केली तरी ती कुठे, कशी पिकवलीये त्याचा काहीच भरवसा नसतो. मुंबईत लोकलने प्रवास करणारे लोक माझं हे वाक्य समजू शकतील.
फळंसुद्धा बाहेर घेतली तरी ती ताजी, रसरशीत दिसण्यासाठी त्यात घातक रंगद्रव्य टोचली असण्याची शक्यता असते. बिस्किटचे पुडे घेतले तरी ते ज्या फॅक्टरीत बनवले आहेत तिथल्या भटारखान्याची काय स्थिती असते कोणास ठाऊक
जरी ब्रॅन्डेड गोष्टी घेतल्या तरी असे छोटे छोटे पुडे मुख्य फॅक्टरीत बनवले जात नाहीत, ते जॉबवर्कर्सकडून तयार करून घेतले जातात.
बाहेर खाताना आवश्यक ती काळजी प्रत्येक जण घेतोच. त्यामुळे दृष्टीआड सृष्टी करणं हेच सगळ्यात उत्तम.
दक्षे.. हो खरंय... रैने,
दक्षे.. हो खरंय...
रैने, सध्या बाईला ट्रेन करायलाही वेळ नाहीये गं त्यामुळे ती सगळी डोकेदुखी मी हे शूट संपलं की विकत घेणारे.
बाकी हातसडीचे किंवा अनपॉलिश्ड तांदूळ, ऑर्गॅनिक गूळ, बरचसं कच्चं खाणं, भरपूर पाणी पिणं आणि कुठेही गेल्यावर निर्लज्जपणे टॉयलेटची चौकशी करून जाऊन येणं हे आपले तु. म्ह. त्या. त्या. उपाय.
>>मी दोन तीन दिवस फक्त पाणी वगैरे पिऊन जरी दिवस काढले तरी मला घेरी वगैरे येत नाही.<<
हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर असते. ज्यांची मुळात पित्त प्रकृती असते त्यांना भूक धरवत नाही, वेळच्यावेळेला खावंच लागतं. तसेच दोन तीन दिवस केवळ पाणी पिऊन रहाणे हे धातूक्षय करणारे ठरू शकते. परिणामी मेटाबॉलिझम बोंबलतो.
>>घरी भाजी केली तरी ती कुठे, कशी पिकवलीये त्याचा काहीच भरवसा नसतो. मुंबईत लोकलने प्रवास करणारे लोक माझं हे वाक्य समजू शकतील.<<
खरंय मंजे.. पण केवळ सांडपाण्यावर किंवा तत्सम biodegradable वस्तूंवर पिकवलेली भाजी नीट धुवून घेतली असेल तर काही प्रश्न नसतो इति माझी एक डॉक्टर मैत्रिण. अर्थात रेल्वेलाइनच्या बाजूला पिकवलेल्या भाजीत सांडपाणी, मानवी व प्राणीय विसर्ग, मेलेले छोटे प्राणी (हे सगळं उत्तम कम्पोस्ट याखाली येतं) या सगळ्या गोष्टींबरोबरच कुठली कुठली केमिकल्स मिसळलेली असू शकतील याची खात्री देता येत नाही. आजूबाजूला छोटे छोटे झोपडी उद्योग चालू असतात (dying, मोल्डिंग...) त्या उद्योगातली सगळी inorganic आणि घातक रसायनेही त्या भाज्यांना मिळालेली असतात त्यामुळे ती भाजी शिजवून खाणे हा स्वतःच्या पोटावर अत्याचार असू शकतो.
या बाहेर च्या पदार्थंमधे
या बाहेर च्या पदार्थंमधे 'दुधा'ची हे गणना होउ शकेल का ? हल्ली दुधात भेसळीच्या इतक्या बातम्या येतात की लहान मुलांना दुध देण्यापेक्षा न देणे फायद्याचे ठरेल की काय असे वाटतेय
>>मी दोन तीन दिवस फक्त पाणी
>>मी दोन तीन दिवस फक्त पाणी वगैरे पिऊन जरी दिवस काढले तरी मला घेरी वगैरे येत नाही. >> बी हे अतिशय घातक आहे, टाळा... आत्ता काही नाही वाटत, पण त्याचे दुष्परिणाम अंतर्गत शरिरावर होतात.... जे नंतर कळतात.
दक्षिणा, काढू शकतो असे
दक्षिणा, काढू शकतो असे म्हंटले.. तसे होतेच असे नाही. वर्षातून कधीतरी एखाद वेळी तशी वेळ येतेच. निरंकार उपवास म्हणून वेळ निभवून न्यायची. तुम्ही स्त्रिया नाही का नवरात्रात ९ दिवस उपवास करता
पुरुषांनी केले तर लगेच जाचता 
http://www.ivillage.com/tomat
http://www.ivillage.com/tomatoes-2/108868#content हे ही बघा.
हातमोजे घालून पदार्थ
हातमोजे घालून पदार्थ हाताळण्याला तर काडीचाही अर्थ नाही. (ISO2009 सर्टिफिकेशनवाल्या) हलदीरामकडे समोसे घेतले. समोसे डब्यात भरणार्या कार्ट्यानं हातमोज्यासगट कचाकचा टोपीखाली खाजवलं आणि समोश्यांना हात लावला. मॅनेजरला तक्रार केली तर 'हातमोजे बदलून भरून द्यायला लावतो' असं सांगितलं.
मामी, ती लिस्ट पाहिल्यावर
मामी, ती लिस्ट पाहिल्यावर काही उरतच नाहीये
मृ, याईक्स
मृ, याईक्स
मी शाकाहारी आहे. एकदा आम्ही
मी शाकाहारी आहे. एकदा आम्ही होटेलमधे भेळ खायला गेलो होतो. मी फुशारकी मारत होतो की मी शुध्द शाकाहारी आहे आणी कान्दा लसूण पण खात नाही. आणी भेळेचा पहिला घास घेतला आणी त्यात मेलेले झुरळ निघाले. आहे की नाही जम्माडी जम्मत !
अरे आता काही खायचे च की नाही
अरे आता काही खायचे च की नाही
मी आज दोन्ही वेळेस व्हीटीसमोरील आराम मध्ये स्नॅक्स खाल्ले . मायबोलीची आठवण टाळून
चला परत खेड्याकडे , आपला
चला परत खेड्याकडे , आपला भाजीपाला , अन्नधान्य आपणच नजरेसमोर हवा तसा पिकवा आणि हेल्दी खा हेल्दी रहा
वदनी कवळ घेता नाम घ्या श्री
वदनी कवळ घेता


नाम घ्या श्री हरीचे
सहज हवन होते
नाम घेता फुकाचे
जीवन करी जिवित्वा
अन्न हे पूर्णब्रह्म
उदरभरण नोहे
जाणिजे यज्ञकर्म
बोला पुन्डलिक वरदा
हारी विठ्ठल!
मी सहसा पोरान्ना बिसलरी पाण्याची वा घरातील "फिल्टर्ड्" पाण्याची सवय लागूच दिली नाही! ओढ्याचे/ विहिरीचे/ गडावरिल टाक्यातील्/ नळाचे वगैरे पाणी जे जसे मिळेस तसे पचवायची सवय लावली! स्वतःही लावुन घेतली! येऊनजाउन, तुरटी तेवढी फिरवतो घरातिल पाण्यात गरज भासते तेव्हा!
शक्यतो आम्ही हॉटेलमधे जातच नाही, वेळ येत नाही अन परवडतही नाही, पण रस्त्यावरच्या ठराविक गाड्यान्वर भेळ्/पाणीपुरी रगडाप्याटीस वगैरे दाबुन हाणतो! किम्बहुना असे काही हाणले नाही तर तब्येत बिघडेल की काय असे वाटते.
खूप पूर्वी घरात हाच अस्वच्छतेचा विषय निघाला होता, तेव्हा त्यान्ना सावरकरान्चे तुरुन्गवासातले उदाहरण दिले होते! त्यान्ना गोम वगैरे भाजीत सापडायच्या! एकदा मलाही कोथिम्बीरीच्या गड्डीत वीतभर लाम्ब गोम सापडली होती
कोणे एके काळी, केटरर कडे काम केलेले असल्याने, चार तास मोडून चार माणसान्चा स्वयम्पाक बनविणार्या घरगुती स्वयम्पाकघरातील अन शेकडो माणसान्चा स्वयम्पाक तेवढ्याच वेळेत बनविणार्या भटारखान्यातील फरक फार जवळून माहित आहे. शिवाय लिम्बीच्या गावाकडे नवचण्डीच्या निमित्ताने शेसव्वशे माणसान्चा स्वयम्पाक करायचा अनुभवही असल्याने घाउक स्वयम्पाक करताना कशी गोची होत अस्ते ते पुरेपुर माहित आहे.!
त्यामुळेच, आत्ता भूक लागलि हेना? समोर उपलब्ध काय आहे? झेपणारे का तब्येतीला? हो का? मग हाणा बाकी विचार न करता! असे आमचे धोरण!
येऊनजाउन प्रवासात मात्र पाण्याचि काळजी घेतो, लिम्बीदेखिल काशीयात्रेला गेली होती, त्यान्चा स्वयम्पाकी बरोबर असायचा, तिने आख्ख्या प्रवासात कुठेही बाहेर काही खाल्ले नाही, ही गोष्ट पाच वर्षान्पूर्वीची, म्हणजे धाकटी केवळ ३ रीत अस्ताना ती घेऊन्गेली होती!
शेवटी काय आहे? वर कुणीतरि म्हणले तसे, प्रतिकारशक्ती मजबुत करा!
औरंगाबादच्या आंबेडकर
औरंगाबादच्या आंबेडकर विद्यापिठात गेस्टहाउसमधे राह्यले होते २ दिवस. व्हिआयपी सूट म्हणून दिलेल्या रूममधे स्वच्छता ऑप्शनला टाकलेली होतीच. ते वेगळ्या बीबीवर सांगेन.
पण जेवणव्यवस्था तिथेच केलेली होती माझी. पोचल्या पोचल्या रात्रीच्या जेवणातच पहिली झलक मिळाली. ताटे आधीच्याचे जेवण झाल्यावर नुसती विसळून आणल्यासारखी वाटत होती. पाणी मागितल्यावर टेबलावरचा कुणीतरी वापरलेला स्टीलचा पेला माझ्यापुढे आपटून एका उघड्या जगमधून पाणी ओतले. मी चंगळवादी संस्कृतीला शरण जाऊन जेवताना माझ्याकडची बिसलरीच प्यायली. सकाळी मी भटारखाना बघण्याची चूक केली. नंतर चहा नाश्ता करताना मला तेच दिसत होतं. त्या दिवशीचा नाश्ता नीट पार पडला पण दुसर्या दिवशी सकाळी नाश्त्याला मला दिलेल्या पोह्यावर स्पेशल गार्निश म्हणून तळलेलं झुरळ दिलं होतं. तिथल्या माणसाला सांगितलं असतं तर त्यानं नक्कीच ते झुरळ काढून तेच पोहे वेगळ्या प्लेटमधून आणून दिले असते त्यामुळे माझ्या मनात शंका येत राह्यलीच असती. मग त्यापेक्षा आपणच ते सत्कृत्य केलेले काय वाईट असं म्हणून मी सरळ ते झुरळ माझ्या हाताने बाहेर काढून ठेवलं आणि अजून झुरळ तर नाही ना असं बघून बाकी पोहे खाऊन टाकले. भूक लागलेली होती, दुसरा काही ऑप्शन नव्हता, पुढे ४० जणांच्या वर्गासमोर सलग २ तास लेक्चर होतं त्यामुळे उपाशीपोटी जाणं शक्य नव्हतं, माझ्या लेक्चरसाठी मला घ्यायला विभागातून कुणीतरी येणार होते त्याच्या आत मी तयार असणं गरजेचं होतं... इत्यादी कारणांस्तव सगळी किळस बाजूला टाकून मी ते पोहे खाऊन टाकले. वर चहाही प्यायला.
आजारी बिजारी नाही ना पडलीस,
आजारी बिजारी नाही ना पडलीस, मग झालं तर
नीधपच्या ह्या किस्स्यावरून
नीधपच्या ह्या किस्स्यावरून रूना लैला चा किस्सा आठवला तो तिने एकदा मुलाखतीत सा>न्गितला होता. तिला विचारले होते गाण्याच्या प्रोग्रामबद्दल काही विशेष आठवणी आहेत का? तिने सांगितले' एकदा स्टेजवर गाणे चालले होते. गाणे अगदी क्रेसेन्डोला आलेले. (रूना म्हटल्यावर त्यात आश्चर्य काय?) तेवढ्या तोंड उघडून ओळ म्हणताना श्वास ओढताना एक माशी घशात गेली . आता काय करायचे? अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकन्द काही सुचेना. शेवटी ती माशी तशीच गिळून टाकली आणि ओळ आणि गाणे पूर्ण केले
आजारी बिजारी नाही ना पडलीस,
आजारी बिजारी नाही ना पडलीस, मग झालं तर <<<
यग्जॅक्टली!!
त्या माणसाने कसली बोटं बुडवून
त्या माणसाने कसली बोटं बुडवून झुरळ काढलं असतं हा प्रश्न आहेच.
मुळात कसल्या हातांनी पोहे
मुळात कसल्या हातांनी पोहे केले होते, किती वर्षं न घासलेल्या कढईत.... फोडणीत घुसण्याइतकी झुरळं फिरत असलेल्या जागेत मिसळणाच्या वस्तूंमधे, पोह्यांमधे जाळी इत्यादी असणारच...
आंबोळे बाई लिस्ट करायला बसलं तर तेव्हाचे रिअॅक्शन म्हणून मी आत्ता आजारी पडेन...
बरोब्बर मला तेच म्हणायचे आहे.
बरोब्बर मला तेच म्हणायचे आहे. किती आणि कशी काळजी घेत बसणार. स्वतःची immunity वाढवावी आणि जे समोर आहे ते एंजोय कराव. आता भेळ आणि पाणीपुरी घरात करून तशी गाडीवाला करतो तशी होणार आहे का? पुण्यात शालघर समोर एक लस्सीवाला आहे. त्याच्याकडची लस्सी, ताक अप्रतीम .. दुकान अस्वच्छ .. फार विचार केला तर अशा गोष्टींना कायमच मुकाव लागेल. त्यापेक्षा मी बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करणे पत्करेन.
Pages