बाहेरचे खाणेपिणे आणि त्यातून विषबाधा!!!!

Submitted by हर्ट on 26 March, 2010 - 13:13

हल्ली see-through kitchen ही एक नवीन पद्धत निर्माण झाली आहे. पण फारचं कमी अशा restaurant/shops मधे ही पद्धत पहायला मिळते. यामागे उद्देश हा की तिथे तयार होणारे पदार्थ हे मुलभूत स्वच्छता पाळतात. मागिल शुक्रवारी माझ्या एका कलीगचा सख्खा भाऊ अन्नातून विषबाधा झाल्यामुळे दगावला. पुण्यात कुठेतरी त्यानी भेळ खाल्ली आणि घरी येऊन पोट जे दुखायला लागले, उलट्या व्हायल्या लागल्यात की काही तासातचं तो गेला. ती बातमी ऐकून मला जरा काळजी वाटते आहे. कारण हल्ली बरेच जण बाहेरच्या चटकमटक पदार्थाकडे पाहून ते चाखून पाहतात आणि त्याची खूप जाहिरात पण करतात. junk food खाणे, चॅट पदार्थावरचं जगणे यांचे प्रमाण वाढते आहे. बाहेरचे पदार्थ खाताना तुम्ही कितीपत ते पदार्थ पाहून खाता? काय हमी की ते आतून चांगले असतील? अशा आणि विषबाधेशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे अनुभव वाचून एकदम यॉक!! झालं. Sad किती वाईट अनुभव. मला सुदैवाने हॉटेलातलं चालत नाही आणि हौस ही नाही. मी सकाळी उठून खाणं करून ढिगभर डबे वाहून आणते ऑफिसला... भेळ वगैरे मला मनापासून आवडते, शक्यतो समोरासमोर कालवून दिलेली भेळ खाताना काही वाटत नाही.
कर्वे नगरात मनिषा भेळ मिळते, तिथे भेळेच्या दुकानाच्या मानाने बरीच स्वच्छता पाळतात. गरजूंनी एकदा जरूर अनुभव घ्यावा. हॉटेलात मी कधीही भेळ खात नाही.. न जाणो आधी एखाद्याने खाऊन उष्टी टाकलेली भेळ आपल्या प्लेट मध्ये टाकली तर आपल्याला कळणार सुद्धा नाही.. Sad

'गेल्या कित्येक वर्षात होटेलमधलं त्यांनी काहीही खाल्ल नाही, आणि घरी देखील संध्याकाळी ६ नंतर कधिही ,काही खाल्ल नाही ' ...अशे शेकडो लोक मी पहिले आहेत ,वयाच्या सत्तरीत देखिल हे लोक तरुण वाटतात ..! बदलत्या काळात्,जीवनशैलीत हे जरी अवघड वाटत असल तरी या लोकांच्या सयंमाला,त्यागाला मला "सलाम" करु वाटतो, त्यातला १/३ सयंम जरी आम्ही बाळगु शकलो तर ....!

आजकाल बर्‍याच पेपरमध्ये होटेलची बातमीवजा जाहीरात येते,त्यात फोटोपण असतात.
तसेच शर्मिलाने म्हंटल्याप्रमाणे हायजिनवर sponsered column नाही का लिहिता येणार? Indian medical association किंवा एखाद्या समाजसेवी गटा/संस्थेकडुन sponsership मिळवुन?

बाहेरच्या खाण्यातून फक्त विषबाधाच होते असं नाही पण आरोग्याच्या बर्‍याच इतर नसलेल्या तक्रारी उद्भवू शकतात. घरी आपण जे अन्नं शिजवतो ते साधं, पौष्टीक आणि सात्विक असतं. त्या उलट हॉटेलात बनवल्या जाणार्‍या पदार्थांना चमचमीत, चटकदार बनवण्यासाठी त्यांच्यात कधी योग्य तर कधी अयोग्य बदल केले जातात. उदा. भात फडफडीत किंवा मोकळा शिजलाय असं दिसण्यासाठी त्यात सोडा पेरला जातो, भात फुलुन येतो पण त्याचा आपल्या पोटाला त्रास होतो, अपाण घरच्या भातात कधी सोडा घालतो का? नाही.

हॉटेलात भाजी, सॅलड जे आणलं जातं ते घाऊक प्रमाणात आणलं जातं. कधी कधी पावभाजीत कुजलेल्या, सडक्या भाज्या ही घातल्या जातात. मसाला, तेल, बटर या मध्ये सहज लपून जातात त्या.. हेच नव्हे तर कित्येक हॉटेलात वेगवेगळ्या गिरण्यांमधून गोळा केलेल्या पीठांच्या रोट्या मिळतात. कढया, पातेली वापरलेल्या प्लेटस कधी धुतल्या असतील देवच जाणे. Sad काल वापरून उरलेल्या तेलातच आज परत परत तळणं केलं जातं....

घरी करायला थोडे कष्ट पडतात पण अरोग्य राखायचं असेल तर ते केलंच पाहिजे. आमच्या ऑफिसात १०,००० स्के.फू. ची दोन मोठी कँटिनं आहेत, ३ वेन्डर्स आहेत, अमूल, कॅफे कॉफी डे सगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. मी चूकून कधी तिथे खात नाही... घरूनच अगदी भात का होईना करून नेते.

वरचं सगळं वाचून मला सध्या तरी बाहेर खायची काही इच्छा नाही. भारतात यायला वेळ आहे, त्या आधी हा बीबी वाचायचा नाही असं ठरवलंय. Wink
मागे एकदा चायनीजच्या गाडीवर बनवणार्‍या माणसाला भाज्या चिरताना पाहिलं होतं. पातीच्या कांद्याची मोठी जुडी त्याने घेतली. धुतलेली नव्हती हे सांगायला नकोच. तशीच फराफरा कापली. बाकीच्या भाज्यांचीही तीच गत.

गंमत म्हणजे बटाटेवडे तळलेल्या तेलातच साबुदाणा वडे तळतात आणि आपण ते साबुदाणा वडा चटणी उपवासाला मिटक्या मारत खातो....ज्याचा त्याचा देवधर्म म्हणत'...! त्याऐवजी कधी पुण्यात उपवासाच्या दिवशी शॉपिंगला जायचा प्रसंग आलाच तर एनर्जी मिल्क किंवा सरळ फळे घ्यावीत...केळं सगळ्यात उत्तम.. थंड आणि जड दोन्हीही...तेवढाच पोटाला आधार!

याव्यतिरिक्त चायनीजवाल्यांकडे मी स्वतः पाहिलय...व्हेज आणी नॉनव्हेज एकाच कढईत बनवतात! आम्हां व्हेजवाल्यांची पंचाईत अशा वेळेस! Sad
बेकरीचे पदार्थही काही हायजिनीक नसतात.... भिका-यांकडुन नाममात्र दाम देऊन घेतलेल्या शिळ्या पोळ्या भाकरींचा लगदा करुन तोच टाकतात पाव/टोस्टच्या कणकेत... हे साधे बेकरीवाले ! कधी बेकरीच्या मागे डोकावुन पाहिलं तर याक! कळकट ट्रे....तवे आणि आंबुस वास!

आमच्या ऑफिसच्याखालीच एक लाकडी घाण्यातला ऊसाचा रस मिळतो. सर्वात कमी धोकादायक (आरोग्याच्या द्रुष्टीने) म्हणुन त्याच्याकडे रस घेतला. पैसे देइपर्यंत त्याने खालच्या बादलीत एकदा बुडवुन जागेवरपण ठेवला. तेव्हापासुन कधी त्याच्याकडे जायची वेळ आलीच तर माझा ग्लास घेउनच खाली जाते. बाहेर काही खायची वेळ आली तर शक्यतो फ्रुट प्लेट अथवा डोसा.

सायो
भारतातल्याच नाही तर इथल्यापण बर्‍याच रेस्टॉरंट्सची अवस्था वेगळी नाहीये. कदाचीत कायद्याच्या भितीने थोडीफार बरी परिस्थीती असेलही नाही असे नाही, पण डोळे झाकून खावे अशी परिस्थीती नक्कीच नाही.
मला असे २-३ तरी लोक माहित आहेत की ज्यांनी शिकतांना वेटरचे काम केले होते. त्यानंतर ते हॉटेलमध्ये खायला जाणं टाळतातच.

केवळ अस्वच्छ आहे म्हणून विषबाधा होईल असे नाही. अनेक ईतरही कारणे असू शकतात. माझ्या ओळखीचे एक जण पंचतारांकीत हॉटेलात काम करतात. तर एकदा गप्पा गप्पात ते सांगत होते की वेटर्सची मर्जी खूप सांभाळावी लागते कारण समजा मॅनेजमेंटने किंवा गेस्टने एखाद्या वेटरला झापले तर त्याचा राग तो सर्व करत असलेल्या डिश मधे थुंकून किंवा मुद्दाम केस वगैरे टाकून काढू शकतो! ( तेव्हा या पुढे अन्नात केस आला तर आपले आधी वेटरशी वाजले होते का याचाही विचार करा :फिदी:)

@arc : << आजकाल बर्‍याच पेपरमध्ये होटेलची बातमीवजा जाहीरात येते,त्यात फोटोपण असतात.
तसेच शर्मिलाने म्हंटल्याप्रमाणे हायजिनवर sponsered column नाही का लिहिता येणार? Indian medical association किंवा एखाद्या समाजसेवी गटा/संस्थेकडुन sponsership मिळवुन>>

ती बातमीवजा जाहिरात असते, त्यामुळे खरं तर त्यांनी आपल्या स्वच्छतेच्या मापदंडाविषयी लिहायला हरकत नाही. उलट त्यामुळे त्यांची गिर्‍हाईके वाढतील. स्पॉन्सर्ड स्तंभलेखात फक्त स्वच्छतेविषयीची चर्चा कितपत लोकप्रिय होईल ते माहित नाही....परन्तु नेहमीच्याच खवय्येगिरी सदरात 'मेन्यू', 'सर्व्हिस', 'सजावट', किमती बरोबर 'स्वच्छता' ह्या निकषावर त्यांना एक-दोन-तीन तारे दिलेले काही मासिकांच्या स्तंभांमध्ये वाचलेत मी.... अर्थात तो दर्जा कायम टिकायला हवा.....

स्वच्छता कुठली पण? टेबले वगैरे सगळे चकचकीत असते पण व्हाट अबाउट किचन अ‍ॅन्ड इन्साईड , वाश प्लेस ई.

स्वच्छता.... भटारखाना, मोरी इत्यादी बहुधा ह्या मासिकांच्या स्वच्छता निकषांत येत नसावेत Wink पण तिथे म्हणे बर्‍याच ठिकाणी एन्ट्रीही नसते.... मग गुप्तहेरासारखे जायचे ढँ ट ढँ.....

माझ्या ओळखीचे एक जण पंचतारांकीत हॉटेलात काम करतात. तर एकदा गप्पा गप्पात ते सांगत होते की वेटर्सची मर्जी खूप सांभाळावी लागते कारण समजा मॅनेजमेंटने किंवा गेस्टने एखाद्या वेटरला झापले तर त्याचा राग तो सर्व करत असलेल्या डिश मधे थुंकून किंवा मुद्दाम केस वगैरे टाकून काढू शकतो!
>> ह्म.. एका हॉटेल मॅनेजमेंट वाल्या मित्रानं सांगितलेलं.
बाहेर खाण्याच्या संदर्भात ३ गोष्टी लक्षात ठेवा:
१. शक्य असेल तर फ्लाईट मधे कधीही खावू नका
२. कुठल्याही हॉटेलात त्या दिवशीच 'स्पेशल' जे असेल ते कधीही घेवू नका
३. वेटर शी कधीही वाद घालू नका.. (तो म्हणाला, बिलिव्ह मी, दे कॅन गो टू एनी लेव्हल.. एनी लेव्हल यु कान्ट एव्हन इमॅजिन!)

सायो , पण आपण जर दुसर्‍याच्या कर्माची फळं नकळत चाखत असु तर काय करणार Uhoh
हह सगळ्यांच बाहेर जेवायला जाण बंद करणार वाटतयं Proud

हॉटेल/ केटरर च्या भातात सोडा घालतात तो फुलावा मग थोड्या तांदुळात पोट भरावे. केटररच्या भातात कधी अळ्या वगैरे पण असतात.

कट फ्रूट्स जे रस्त्यावर मिळतात त्यात उन्हा मुळे व रस्त्यावरील वातावरणामुळे बॅक्टेरिया ची ग्रोथ होउ शकते. रोड्वरील फळे सुद्धा उन्हामुळे अगदी पिकून जातात.

इ. कोलाय साल्मोनेला व बोट्युलिनम हे खास बॅक्टेरिया आहेत. जे फूड पॉयझनिन्ग करतात.
http://en.wikipedia.org/wiki/Food_poisoning

बंगाली मिठाई/ रसमलाइ पण धोकादायक असते. रन्स काढायला लागू शकतात.
प्रॉन्स/ शिंपले पण अगदी फ्रेश नसतील तर सरळ परत करावे. पैसे गेले तरी बेहत्तर.
फूड कलर लावलेले चिकन शिळे असू शकते. आम्ही १९८९ मध्ये एका तेलगु रिच म्यान ने पंच तारांकित होटेल काढले होते त्याचे जाहिरातीचे काम करायला गेलो होतो. नव्या बांधलेल्या लॉबीत अतिशय घाणेरडा वास येत होता. नंतर कळले कि त्याने सप्लायरचे पेमेन्ट थकविल्या मुळे सप्लायरने सर्व मेलेले चिकन्स लॉबीत आणून ठेवले होते. ते हाटेल लगेचच बंद पड्ले व आता तिथे केअर हास्पिट्ल आहे.

फ्रीज मधील पदार्थ ही काही दिवसांनी खराब होतातच. चव/ वास बघून ते टाकून द्यावेत. व उपमा करावा फ्रेश. http://www.wisegeek.com/how-long-will-meat-stay-fresh-in-the-refrigerato...

ओला नारळ घातलेले पदार्थ बाहेर ठेवल्यास खराब होतात. जास्त करून भारतीय उन्हाळ्यात. ते लगेच संपवावे.

पाणी/ बर्फ बाहेरचे अतिशय वाईट. त्रास होउ शकतो. बर्फाचा तर काय सोर्स असेल कोण जाणे.

http://en.wikipedia.org/wiki/Waterborne_diseases

घरी बनविलेले ताजे लगेच खावे हे बेस्ट आपल्या माबो संस्कारांप्रमाणे. माबो जॉइन केल्यावर माझे बाहेर खाणे कमी झाले आहे. येथील पदार्थ करून खावेत हे बेस्ट.

ही घे कारणं श्री:
१. शक्य असेल तर फ्लाईट मधे कधीही खावू नका
>> मित्र म्हणतो मोस्ट डेंजरस फूड - बर्‍याचदा गरम केलेलं आणि पुन्हा फ्रीज केलेलं असतं
२. कुठल्याही हॉटेलात त्या दिवशीच 'स्पेशल' जे असेल ते कधीही घेवू नका
>> बहुतेकदा हे एक्स्पायर व्हायच्या व्हर्जवर असतं.. म्हणून संपवायचच अशी गरज निर्माण झालेली असते
३. वेटर शी कधीही वाद घालू नका..
>>तो म्हणाला, बिलिव्ह मी, दे कॅन गो टू एनी लेव्हल.. एनी लेव्हल यु कान्ट एव्हन इमॅजिन!

घरचं सकस अन्नच बेस्ट - आपण जीवनसत्व, प्रोटीन्स, कार्बज हे सगळं रोजच्या (घरच्या) जेवणात बॅलन्स करू शकतो!

पूर्वी म्हणे कोरडा शिधा बांधून जायचे यात्रेला, प्रवासाला.... तहानलाडू, भूकलाडू (असं म्हटलं तरी मला भूक लागते, का ते अजून नाही कळलं!)..... दशम्या, सातूचं पीठ वगैरे वगैरे! आणि बाहेरचं जेवण म्हणजे 'वनभोजन'.... आपलं पिकनिक हो! घरातूनच चार पदार्थ घ्या बांधून आणि खावा ते निसर्गाच्या सान्निध्यात.... नाहीतर तिथेच शेकोटी/ चूल पेटवा आणि शिजवा.... हा हा हा! मी कल्पना करून बघत आहे, बाहेर शहरात हिंडताना अशी रस्त्यावर चूल पेटवून अन्न शिजवायची!
त्यापेक्षा घरून डबा उत्तम! Happy

वा! छान वाटलं खरचं इतकी माहिती वाचून !!!! मी आजवर बाहेरचे टाळत आलो त्याचा सार्थ अभिमान वाटतो आहे Happy आता आणखीनचं टाळेल Happy

हे सगळे रेस्टॉरंट्सचे झाले. भारतात कधी होस्टेलला राहिला आहात का? मेसचे जेवण जेवला असालच Happy ते अनुभव म्हणजे अजुन एका वेगळ्या बीबीचा विषय होऊ शकतो तरी एक-दोन किस्से इथेच -

मेसमधे भाजी विकत आणण्यासाठी मेसवाले लोक शक्यतो दिवसाच्या शेवटी जातात उरलेला सुरलेला, कुजका, नासका माल कमी भावात आणतात.
पामतेल वगैरे घातक तेले कमी पैशात आणतात.
एका मेसवाल्याला पोरांनी कोणत्यातरी झाडाचा पाला ओरबाडुन पोती भरताना पाहिले आणि त्याचा पाठलाग करुन भाजी करताना पकडले.
कम्युनीटी मेस करुन विद्यार्थी स्वतः सामान आणुन करतात पण ते किती महाग पडते ते त्यातुन जो गेलाय त्यालाच कळते.
ज्वारी-गव्हाची गिरणीत पडलेली/सांडलेली/मारलेली पिठे कमी पैशात गोळा करुन आणणे आणि विद्यार्थ्यांना पोळ्या करुन वाढल्याचे पुण्य मिळवणे.

हे जर लहान लहान मेसवाले करु शकतात तर मग मोठ्या हॉटेल्सचे विचारायलाच नको.
बायदवे , पोळ्या, पुर्‍या, ब्रेडची पिठे पायाने तिंबतात हे पण माहिती असेलच Happy

>> ब्रेडची पिठे पायाने तिंबतात हे पण माहिती असेलच

पूर्वी ऐकलं होतं हे. पण आता मशीनवर नाही होत?

अग मोठ्या बेकरीवाले करतही असतील पण लहान मॉम्स-पॉप्स स्टाईल दुकानदार मशीन वापरत नसतील असे वाटतेय.

मेसचे जेवण जेवला असालच >> त्यातल्यात्यात कॉलेजचीच मेस असली कि विचरु नका!!!

आमच्या कॉलेज कँटीनचा मेन आचारी (टोपणनाव : बच्चन) जेंव्हा आठवडाभर आंघोळ न करुन बटाटावडे बनवत असे, तेंव्हा कँटीनमधे फुल्ल गर्दी...कारण वडे खुपच टेस्टी व्हायचे.

Pages