बाहेरचे खाणेपिणे आणि त्यातून विषबाधा!!!!

Submitted by हर्ट on 26 March, 2010 - 13:13

हल्ली see-through kitchen ही एक नवीन पद्धत निर्माण झाली आहे. पण फारचं कमी अशा restaurant/shops मधे ही पद्धत पहायला मिळते. यामागे उद्देश हा की तिथे तयार होणारे पदार्थ हे मुलभूत स्वच्छता पाळतात. मागिल शुक्रवारी माझ्या एका कलीगचा सख्खा भाऊ अन्नातून विषबाधा झाल्यामुळे दगावला. पुण्यात कुठेतरी त्यानी भेळ खाल्ली आणि घरी येऊन पोट जे दुखायला लागले, उलट्या व्हायल्या लागल्यात की काही तासातचं तो गेला. ती बातमी ऐकून मला जरा काळजी वाटते आहे. कारण हल्ली बरेच जण बाहेरच्या चटकमटक पदार्थाकडे पाहून ते चाखून पाहतात आणि त्याची खूप जाहिरात पण करतात. junk food खाणे, चॅट पदार्थावरचं जगणे यांचे प्रमाण वाढते आहे. बाहेरचे पदार्थ खाताना तुम्ही कितीपत ते पदार्थ पाहून खाता? काय हमी की ते आतून चांगले असतील? अशा आणि विषबाधेशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप आधी सकाळ मधे लेख आला होता,की हातगाडीवरची भेळ कशी , कुठे तयार होते...तो लेख जो कोणि वाचला असेल, त्यांनी भेळ खाणे सोदून दिले असेल...

आम्ही शक्यतो रस्त्यावरचे ( हातगाडी किंवा स्टॉल वरचे ) पदार्थ खात नाही. बाहेर खायचेच असेल तर चांगल्या ( नेहमीच्या माहित असलेल्या ) हॉटेलात जाउनच खातो. अर्थात अशा होटेल मधेही किचन कितपत स्वच्छ असते कल्पना नाही. परंतु अत्ताअपर्यंत तरी काही वाईट अनुभव आलेला नाही.
तसेही आता 'वजनाचा' problem निर्माण झाल्याने बाहेरचे खाणेही खुप कमी झालेय Happy

शक्यतो सारखं सारखं बाहेरचं खाउ नयेच. पण मी खायचच नाही असं करत नाही... पोटाला थोडं ट्रेनिंग!! जिथे १० लोकं खातात तिथेच मी ११ वा...
अति खाउ नये, अगदी डोळे झाकुन कुठलंही खाउ नये हे आहेच. शिवाय प्रत्येकाच्या प्रतिकारशक्तिवर अवलंबुन आहे. फाजील धाडस करु नये.
माझ्या डॉ. नी एकदा सांगितलेलं, उसाचा रस प्यायचाच असेल तर निदान बर्फ न घालता प्या... (का ते कळलंच असेल!)

शक्यतो सारखं सारखं बाहेरचं खाउ नयेच. पण मी खायचच नाही असं करत नाही... <<
खाऊच नये हे शक्यही नसतं दरवेळेला.
किती डबे घेऊन बाहेर पडणार आणि एवढे डबे करणार कोण?

>> किती डबे घेऊन बाहेर पडणार आणि एवढे डबे करणार कोण?
हो नं... मला "बाहेरचं" म्हणजे घराबाहेरचं म्हणयचं नसुन हॉटेलच्याही बाहेरचं म्हणजे रस्त्यावरचं/अरबट-चरबट/टाळता येण्याजोगं असं म्हणायचं होतं... आता कोणी प्रत्येक हॉटेलाकडे संशयानी बघायला सुरवात केली तर त्याला 'काहीतरी' होणारचं!

पण हॉटेलमध्येपण असतोच की निष्काळजीपणा... एकदा माझ्या मैत्रिणीनी सांगितले - अगदी macdonald सारख्या ठिकाणी सुध्दा गर्दीच्या वेळी शिळे अन्न वापरले जाते.., ती trainee म्हणून तिथे काम करत होती..

आता कोणी प्रत्येक हॉटेलाकडे संशयानी बघायला सुरवात केली तर त्याला 'काहीतरी' होणारचं!<<
भित्यापाठी ब्रह्मराक्षस अशी एक म्हण आहे ती आठवावी... कुठल्याही हॉटेलच्या भटारखान्यात कधीही जाऊ नये. परत तिथे खायची इच्छा होणार नाही.

चटकमटक, भेळ, पाणीपुरीसारखे पदार्थ बाहेर खाताना डोळे खरच पूर्ण उघडे ठेवायलाच हवेत. पण तसे ते ठेवले तर परत आयुष्यात बर्‍याच ठिकाणी आपण जाऊच शकत नाही.माझ्याकडे हॉटेल्सच्या अस्वच्छतेचे भरपूर किस्से आहेत.
* डिस्क्लेमर- ज्यांचे जेवण अजून व्हायचे असेल त्यांनी हे वाचू नये.

पार्ल्यातल्या अतीफेमस शर्मा कडे एकदा रात्री खूप उशिरा, गर्दी जेव्हा अगदीच ओसरलेली असते त्यावेळी आम्ही गेलो होतो. कधीनव्हे ते त्या दुकानात सामसुम म्हणून आम्ही खुशीत बाकड्यावर बसलो आणि आमच्यासमोर ठेवलेल्या चुरमुर्‍याच्या पोत्यातून एका गलेलठ्ठ उंदराने बाहेर उडी मारली होती. बहुतेक तो आता गर्दी नाहीय या समजुतीतून त्याचे आश्रयस्थान सोडून हवा खायला बाहेर पडला असावा. आम्ही पुन्हा कधीही शर्माकडे जाऊच शकलो नाही.
पार्ल्याच्याच क्रन्चीमन्ची नावाच्या दीनानाथजवळच्या रेस्टॉरन्टमधे एकदा माझ्यासोबत असलेल्या मैत्रीणीच्या लहान मुलाला शू लागली म्हणून आम्ही दोघी त्यांचा भटारखाना ओलांडून एका वेटरने दाखवलेल्या रस्त्याने जात असताना त्यांच्या भटारखान्याची अवस्था बघून उलटी आली. किचन प्लॅटफॉर्मशेजारच्या एका उथळ जागेवर चक्क ड्रेनेजचा पाईप फुटल्यासारखे घाणेरडे वास येणारे पाणी साठले होते आणि त्यात 'विसळलेल्या' प्लेट्स ठेवलेल्या होत्या. त्याच्याच बाजूच्या चिकट जमिनीवर सॅलड कापले जात होते.
युनायटेड इंक्ससमोरच्या 'अंबिका' मधे मिळणारा सामोसा फार फेमस आहे. एकदा सामोशाच्या पट्ट्या ज्या जमिनीवर ठेऊन लाटल्या जात होत्या त्या जमिनीवरुन पायात चपला घातलेला त्यांचा पोर्‍या चालत गेला आमच्यासमोर.
ठक्कर स्वीट्स मधे पूर्वी बाहेरच गरमागरम गुलाबजाम तळून द्यायचे. एकदा दुपारी दीड वाजता तळण बंद असताना कुतुहलाने काऊंटरमागे ठेवलेल्या त्यांच्या कढईकडे पाह्यला डोकावले. एक माणूस बैठ्या स्टुलावर बसून बुंदी पाडतात तशा झार्‍याने काहीतरी काढत, ढवळत होता. मी अजून निरखून पाहिले तर त्या झार्‍यावर अडकलेला काळसर थर पाकात पडलेल्या माश्यांचा होता. ठक्करमधेच बाहेर मोठमोठ्या बरण्यांत लोणची भरलेली असायची. एका शेवटच्या बरणीत तळाला असलेल्या मोठ्या लाल मिरच्यांच्या लोणच्यावर काहीतरी हलत होते म्हणून मी त्यातल्या लाकडी डावेने ते वर उचलले तेव्हा ते कसले तरी लांबट किडे होते. ठक्कर स्वीट्सची तक्रार मी स्वतः अन्न औषध प्रदुषण विरोधी खात्याकडे ग्राहक पंचायतीकडून पत्ता घेऊन लेखी केली होती. काहीही झाले नाही. पाठपुरावा करायला मला वेळ नव्हता.

ही पार्ल्यातली उदाहरणे झाली. अंधेरीच्या मिठाईवाल्यांची, गटारावरच्या फळीवर उकडलेले बटाटे ठेऊन सॅन्डविचेस विकणार्‍यांची, आणि काही अजून हॉटेल्सच्या किचन्सचीही माझ्याकडे शेकडो उदाहरणे आहेत. बेस्ट फुड मिळणार्‍या हॉटेल्सचे जसे कॉलम्स असतात तसाच होटेल हायजिनवर कॉलम चालवण्याचा माझा खूप दिवसांपासून विचार आहे. कोणी माझ्या या इच्छेला प्रतिसाद देत नाहीये ते वेगळं.

शर्मिलाने लिहिली आहे, तशीच स्थिती सर्वत्र असते. माझ्या एका मैत्रिणीच्या घरातून पूर्वी 'गंधर्व'चा भटारखाना दिसायचा. गेल्या आठ वर्षांत मी 'गंधर्व'ची पायरीही चढलेलो नाही.
अशीच अजून काही ठिकाणं -

१. कलकत्ता डायनिंग हॉल.
२. ममता स्वीट्स (जं.म. रोड)
३. पेरुगेटाजवळची अनेक मांसाहारी हॉटेलं. 'गोपी'मध्ये काही महिन्यांपूर्वी मी गेलो होतो. तिथल्या वेटरने आमच्या शेजारच्या टेबलवर भाकरी वाढण्यापूर्वी मस्तपैकी (स्वतःच्या) नाकात बोट घातलं. आम्ही ऑर्डर रद्द करून उठून आलो. 'शांभवी'ही अतिशय अस्वच्छ आहे. माझ्या मित्राला एकदा तिथल्या चिकन करीमध्ये कापडाचा तुकडा सापडला होता.
४. जं. म. रोडवरचं चायना गार्डन.
५. दुचाकी पूल आणि चतु:शृंगीजवळची चौपाटी. तिथे अक्षरशः रस्त्यावर बसून भाज्या चिरतात.

चायना गार्दन मध्ये माझ्या बिर्याणीत काचेचा तुकडा सापडला होता. मी मालकाला दाखवला त्याने जणू काही घडलेच नाही असे दाखवून तो तुकडा घेऊन फेकून दिला आणि पुन्हा बिर्याणीच सगळे बिलही घेतले...

ठाण्याच्या टीपटॉपमधे रसमलाईत बारीक केस होते. त्याच्या मॅनेजरला वाटी नेऊन दाखवली तर तो शहाणा म्हणतो होतं असं तर काय फाईव्हस्टार हॉटेलातही होतच की कधी कधी. पूर्वी सद्गगुरू होतं तिथे आता एक कोणतंतरी नमस्कारम का काय झालय. त्यांच्याकडच्या शेवपुरीत प्लास्टीकचा तुकडा होता. वेटरला बोलावून दाखवला तर दुसरी आणतो म्हणाला आणि सर्व्हिंग काऊंटरमागे नेऊन हाताने काढून परत तिच प्लेट आणली.
मागे एका जर्नालिस्टने युट्यूबवर दादरच्या भाजी मार्केटधली लिबे ते भाजीवाले कसे चाळणीत ठेऊन मागच्या नाल्यातल्या पाण्यात थोड्याथोड्या वेळाने बुडवून आणत असतात त्याचा व्हिडिओ टाकला होता.

माझा नवरा प्रचंड वैतागतो मी हॉटेलात जाउन या अशा गोष्टींकडे मुद्दाम बघते म्हणून. तो म्हणतो एक तर दुर्लक्ष कर नाहीतर जाऊ नकोस. मी दोन्ही करत नाही. उलट असे अनुभव आलेल्या जागांबद्दल शक्य तितक्यांना मुद्दाम सांगून माझ्यामते 'समाजसेवा' करण्याचा प्रयत्न करत राहते Proud

एक मान्य करायला हवं की गेल्या चारपाच वर्षांत जी काही नव्याने सॅन्डविच पार्लर्स, फास्ट्फुड जॉइन्ट्स किंवा रेस्टॉरन्ट्स उघडलीत त्यांच्यात खूप, वाखाणण्याजोगी स्वच्छत असते. पार्ल्याचंच वर्मा टेलरच्य लाइनमधलं अन्नपूर्णा सॅन्डविच आणि ज्यूस सेन्टर- अगदी लखलखीत. डोळे झाकून खावं किंवा पार्सल मागवावं. गोडबोलेंच्या इथला पाणीपुरीवाला हातात ग्लोव्ह्ज घालून पुर्‍या भरताना पाहून मला गहिवरुन आले. एल्कोच्या इथले जॉइन्ट्सही आता लखलखीत झालेत. अ‍ॅप्रन्स वगैरेही चक्क. बहुतेक मॉल्समधल्या फूडकोर्टसची स्पर्धा त्यांना भारी पडत असावी. (स्वच्छ रेस्टॉरन्ट्सबद्दलही आवर्जून सांगणं ही सुद्धा एक 'समाजसेवाच' आहे. Proud )

अज्ञानात सुख अस्तं म्हणतात ते काही खोटं नाही. एकदा का किचनमध्ये काय प्रकार चालतात हे बघितलं की पुन्हा बाहेर खावंसं वाटणार नाही.

ज्यांना बाहेर खाण्याविषयी, तेथील स्वच्छता, अन्नपदार्थांची गुणवत्ता इत्यादींविषयी फार धाकधूक वाटते त्यांनी सरळ पॅकबंद अन्नाचा किंवा ताज्या फळांचा पर्याय स्वीकारावा.
पॅकबंद म्हणजे अर्थात घरगुती पॅकिंगचे नव्हे तर मान्यताप्राप्त पॅक्ड अन्न. त्यात अगदी स्नॅक्स, स्वीट्स, खारे पदार्थ, ज्यूसेस वगैरे वगैरे येतात. घेताना अर्थात कंपनीचा लोगो/ ब्रँड नेम, मॅन्यु डेट, एक्स्पा. डेट पाहून घ्यावे.

किंवा बाहेर फळे विकत घेऊन ती स्वच्छ धुवून खावीत.

हॉटेलमध्ये गेल्यास तेथील किचन एरिया तुमच्या नजरेच्या टप्प्यात येत असेल तर उत्तम! अन्यथा पदार्थाची चव आणि रूप बरे असल्यास बाकी विचार न करता खावे! Wink किंवा सुरक्षित पर्याय निवडावेत, ज्यात कमीत कमी 'धोका' असेल. [तसा कोणताच पर्याय नसतो म्हणा!] माझा जेवायच्या वेळी आवडता सुरक्षित पर्याय दाल-राईस. इतर वेळी सुरक्षित पर्याय म्हणजे इडली, डोसा इ. किंवा ब्रेड बटर! पण एकदा बाहेर खायचे ठरवले की त्यात रिस्क फॅक्टर हा येतोच!

पेयांमध्ये शक्यतो उकळी पेये (चहा, कॉफी) प्यावीत. शीत पेये नैसर्गिक तरी [नारळपाणी] किंवा टेट्रा पॅक वाली घ्यावीत.

<< स्वच्छ रेस्टॉरन्ट्सबद्दलही आवर्जून सांगणं ही सुद्धा एक 'समाजसेवाच' आहे >> हो हो नक्कीच. please पुण्यातल्या अशा हॉटेल ची माहिती असेल तर जरुर द्या.

अरे काय चाललय... काही गरज आहे का एवढे संदर्भ द्यायची... सगळ्यांना थोडीफार कल्पना असतेच याची. ज्यांना झेपतं / पटतं ते खातात... नाहीतर नाही.
जाउदे... तुमचं चालुद्या... टाटा... बाय बाय!

सॅम Happy काय आहे नां जोपर्यंत असे प्रकार सोडून दिले जातात, चालायचंच म्हणून गृहित धरले जातात तोपर्यंत ते तसेच होत रहातात. पैसे मोजून एखाद्या ठिकाणी आपण कधी गरज म्हणून, कधी हौस म्हणून पोट भरायला जातो ती जागा किमान स्वच्छ असावी हा एक ग्राहक म्हणून आपला हक्क असतो. भारतात याची पुरेशी काय, अजिबातच जाणीव ना खाद्यपदार्थ विकणार्‍यांना ना ते खाणार्‍यांना. असं कां करायचं आपण? झेपण्या, न झेपण्याचा प्रश्न नाहीये हा. आज मला फक्त आवड म्हणून मी रेस्टॉरन्ट किंवा हातगडीवर खायला जाईन आणि ते स्वच्छ नाही म्हणून पुन्हा जाणार नाही पण एखाद्याला इलाजच नाही म्हणून तिथे जाणं भाग असेल तर त्याला किमान पैशांत निदान स्वच्छता तरी मिळायला हवी नां? इतकं चवींचं वैविध्य आहे आपल्या देशात तर त्यांचा निर्धास्तपणे आस्वाद घेता यायलाच हवा आपल्याला. तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्या तुम्ही हे वाचायचे असे काही पण असं लिहिल्याने एक जागरुकता येते मनात हे नक्की.
ओ अ‍ॅन्ड एम, पाथफाईंडर आणि इंडियन कन्झ्युमर सोसायटी यांच्या सर्व्हेमधे भारतीय ग्राहक हा आपले 'हक्क आणि जबाबदार्‍या' या दोन्हीबाबतीत इतर जागतिक ग्राहकांच्या तुलनेत फार खालच्या क्रमांकावर आहे हे दिसून येते आणि याचा गैरफायदा आजच्या ग्लोबलायझेशनमधे अनेक नामवंत कंपन्याही भारतात आपले हातपाय पसरवताना घेत आहेत. यामागे हीच 'चालायचच' ची भावना कारणीभूत आहे. तयार खाद्यपदार्थ, रेस्टॉरन्ट्स यांच्याबाबतीत आपण थोडी तरी जास्त जागरुकता दाखवायलाच हवी आहे.

हम्म!

पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत वगैरे थोडीफार सावधानता अवश्य बाळगावी, बाकी काय खायचं असेल ते बिनधास्त खावं.. होणार्‍या गोष्टी टळत नाहीत..

तात्या.

इथे कुठेतरी तो खादाडीचा बी बी होता. त्यात विविध ठिकाणी मिळनार्‍या खाद्यपदार्थांचे लाळ गाळीत वर्णन केले होते. पण कुणीही हो हो तिथले किचन फार स्वच्छ होते असे म्हटलेले नाही.किम्बहुना ही बाब कोणालाही विचारात घ्यावीशी वाटलेली नाही. त्यानी बहुधा 'पुलं'चा खाद्य जीवनमधला सल्ला शिरोधार्य मानला असावा. पुल म्हणालेत. अशा ठिकाणी खाताना स्वच्छतेचे इंद्रिय जरा आवरावे लाग्ते.(अधिक तपशीलासाठी भेटा अगर लिहा ट.बे.) या सगळ्या ठिकाणी अतिशय धोकादायक प्रकार म्हणजे रिसायकल्ड केलेले तेल. बर्‍याच ठिकाणी बेकरीत जनावरांची चरबी तळण्यासाठी वापरली जाते. दृष्टीआड सृष्टी. मुदपाकातल्या सेवकांच्या आरोग्याविषयी काय ल्याहावे?वतुम्ही स्वच्छतेबद्दल विचारलेत तर तो म्हणणार घ्यायचे तर घ्या नाहीतर...(व्हा बाजूला, तुमच्या पेक्षा अधिक मूर्ख मागे लायनीत उभे आहेत.). पोटभरीसाठी सर्वात उत्तम म्हनजे केळी.

केळी, पेरु, संत्री, मोसंबी, सफरचंदे ही भारतात (व पुण्या-मुंबईत) बहुतेक सर्व मौसमात मिळणारी फळे; भाजलेल्या शेंगा - कणीस इत्यादी; शहाळ्याची मलई हे प्रकार भूकही भागवतात व स्वच्छतेचा बागुलबुवा आपल्याला छळत नाही. [ ज्यांना हे पर्याय नको असतील त्यांना माझा फुकटचा सल्ला Wink : सरळ ब्रेड/ बिस्किटे/ टोस्ट/ खारी इ. चा पुडा विकत घ्या, चहा/ कॉफी मागवा आणि आपली भूक शांत करा.... किंवा मग हॉटेलाच्या असुरक्षित पर्यायाला सामोरे जा!]

बाकी कोणत्या हॉटेल/ रेस्टॉरंट/ बेकरी/ खानवळीत चांगले - स्वच्छ - आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित अन्न मिळते हे बघायचे ठरवले तर मग बाहेर खाणेच नको! अशी ठिकाणे अतिशय दुर्मिळ आहेत. [असल्यास मलापण सांगा] अपुर्‍या जागा, अस्वच्छ परिसर, आरोग्याच्या किमान सुविधांचा अभाव, मनुष्यबळाच्या आरोग्याविषयीची बेफिकिरी ह्या तर ठायी ठायी दिसून येणार्‍या. शिवाय एखाद्या ठिकाणची गुणवत्ता चांगली आहे हे कळले तरी तशी रोज ती टिकायला हवी, आणि आपण तिथे गेल्यावर तर हवीच हवी! शाकाहारी रेस्टॉरंट्सचे एक वेळ ठीक आहे, पण मांसाहारी रेस्टॉरंटस विषयी न बोललेलेच उत्तम! शहाण्याने तेथील मुदपाकखान्यात अगर कोठीघरात, मोरीत डोकावूच नये.

पुण्यात चाचा हलवाईचे रविवार पेठेत (भाजी मंडईजवळ) हलवाई दुकान + हॉटेल आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी मी तिथे दोन -तीनदा गेले होते. आपल्या समोर जर जिलबी/ गुलाबजाम तळून मिळत असतील, उत्ताप्पे - डोसे बनवले जात असतील तर त्या खाद्यपदार्थाविषयी मिळणारी खात्री मी तिथे अनुभवली होती.

पुण्यातल्या स्वीकार हॉटेलमधे आंबलेले पदार्थ देतात. ते नजरेस आणून दिले तर मग्रूरी असते. आजूबाजूच्या चार टेबलांपर्यंत भाजीचा आंबुस वास पसरलेला असला तरी ही भाजी आंबलेली आहे हे मानायला ते तयार नसतात आणि त्याचे पैसे मात्र वाजवून घेतात.

हा माझा सर्वसामान्य ठोकताळा आहे : जेवढे हॉटेल जुने, स्टाफ जुना, रंगरंगोटी जुनी तेवढी अस्वच्छतेला जास्त संधी. अर्थात हा काही योग्य निकष नव्हे. पण पर्यायाने नव्या रेस्टॉरंटस मध्ये तुलनेने स्वच्छता बरी असते. पदार्थांच्या गुणवत्तेविषयी मात्र काही सांगता येत नाही!

ब्रेड जर whole-meal/whole-wheat/multi-grain/fruit-bread असेल तर मी ती घेतो. त्यातही ब्रेड जर त्याच दिवशी बनवलेली असेल तर मला ती घ्यावीशी वाटते. हल्ली ब्रेडचे पाकिट तीन ते चार दिवस टिकते असे ते लिहितात पण मला इतकी शिळी ब्रेड खाविशी वाटत नाही आणि ती तब्येतीला कितपत चांगली राहिल हा एक प्रश्न सतावीत असतो. शिवाय ब्रेडमधे असलेला मैदा, त्यातील ग्लुटेन यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होऊ शकते. खारी चहात बुडवून खायला छान लागत पण खारीतील तेल/तूप चहावर तरंगताना पाहून मग किती हा तवंग चहावर असे उद्गार निघतात.

बेकरी जन्य पदार्थात फायबर अजिबात्च नसतात. शिवाय तळायला काय वापरलेय हेफक्त ब्रम्हदेवाला माहीत. मुम्बैतला एक प्रसिद्ध हलवाइ त्याची मिठाई धारावीतील झोपडपट्टीतील शेडमध्ये बनवून घेतो....

अरेरे....मी ही शक्यता गृहितच धरली नव्हती! बरोबर आहे, जर कोणते तेल, तूप वापरले आहे, कोठे बनवले आहे वगैरे माहित नसेल तर मग बेकरी नकोच! इथे हिंदुस्तान बेकरी, ग्रीन बेकरी इत्यादींची एवढी सवय झाली आहे की इतर बेकर्‍यांमधील अवस्था चटकन ध्यानीच येत नाही. पण हॉटेलातल्या अदृश्य भटारखान्यातील अदृश्य परिस्थितीवर आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता बेकरी ठीक असेल तर पर्याय बरा वाटतो! Happy

सरळ ब्रेड/ बिस्किटे/ टोस्ट/ खारी इ. चा पुडा विकत घ्या, चहा/ कॉफी मागवा आणि आपली भूक शांत करा
>> एक किस्सा सांगते.. मला टाईपतानाही ऑ होतय... Sad
एकदा एक कळकट्ट माणूस समोरनं आला... कळकट्ट म्हणजे अशक्य कळकट्ट.. त्यानं काखेत पाव मारलेले - बहुतेक कुठल्यातरी वडापावच्या गाड्यावर डिलिव्हर करायला चाल्लेला! Sad Sad Sad

मी तरी अजून स्वच्छ भटारखाना असलेलं हॉटेल पाहिलेलं नाही पुण्यात..
तो 'अ वेड्न्सडे' मधला नसरुद्दिन चा डायलॉग आठवतो "हा आख्खा देशच 'चलता है' तत्वावर चाल्लाय' ह्या अर्थाचा...

ठक्कर स्वीट्सची तक्रार मी स्वतः अन्न औषध प्रदुषण विरोधी खात्याकडे ग्राहक पंचायतीकडून पत्ता घेऊन लेखी केली होती. >>>> शर्मिला खुप चांगल काम करताय तुम्ही , माझ्या मते प्रत्येकानेच हे केलं पाहीजे तर थोडाफार फरक नक्की पडु शकेल .एक जण जेव्हा तक्रार करतो तेव्हा कदाचीत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाईल पण जेव्हा १०० जण तक्रार करतील तेव्हा मात्र त्यांना दखल घेणं भागच पडेल.

अन्न औषध प्रदुषण विरोधी खात्याकडे तक्रार देताना जर आपण ती सप्रमाण [फोटोसहित] देऊ शकलो तर अधिक उत्तम!
महाराष्ट्रातील त्यांचे सम्पर्क पत्ते, फोन व ईमेल : http://www.fda-mah.com/contactus.aspx

Pages