काल सकाळपासून धावपळ , घरी खूप पाहुणे आलेले. मामेबहीणीला बघायला मुलगा येणार होता म्हणून सकाळपासून घरात आवराआवर चाललेली. खालच्याच फ्लॅटमधे मावसभाऊ राहतो त्याची दीड वर्षाची मुलगी सुखी रडते आहे म्हणून बघायला गेलो तर स्नेहलने,तिच्या आईने सांगितले की रात्री थोडा ताप आला होता म्हणून तिची झोप झाली नाही त्यामुळे किरकिरत आहे. घरात पाहूणे , कामवालीची दांडी , सुखीची रडारड , म्हणून माझी बायको व स्नेहल दोघीही वैतागून गेलेल्या सकाळी सकाळीच.
दहाच्या सुमारास त्या पाहुण्यांचा फोन आला की आम्हाला अॅड्रेस सापडत नाहीये , मग त्यांना आणायला गेलो, ते जिथे थांबले होते तिकडे. तेंव्हा घरात शांतता होती, सुखी झोपली आहे अशी खात्री करुन मी बाहेर गेलो. पाहुणे आले, त्यांना चहा देत असताना स्नेहलची किंचाळी ऐकू आली
भावजी, सुखी कसं करतेय बघा ना ..... मी हातातलं सगळं टाकून खालच्या फ्लॅटमधे धाव घेतली. तिच्या हातातून सुखीला घेतले तर माझ्या पायाखालची जमिनच सरकली..... पूर्ण शरीर पांढरे फटक पडलेले तिचे, ओठ काळे-निळे झालेले, अंग टाकून देत होती, थंडगार शरीर सगळे , अंगावर काटा येतोय ते आठवूनच... मी सचिन कुठे आहे असे विचारले तर तो घरात वेड्यासारखा फिरायला लागला होता, गाडीची चावी शोधत.प्रसंगावधान राखून तसेच पळत गेलो खाली, पार्कींगमधे मामांची गाडी होतीच , स्नेहलपण आली सोबत, तसेच जवळच्या डॉ. कदमांकडे गेलो , ते सुखीचे रेग्युलर डॉ. होते. गाडीत स्नेहलने जेंव्हा कृत्रिम श्वास दिला तेंव्हा तिच्या घशातून आवाज आला तेंव्हा मी थोऽऽडा रीलॅक्स झालो, तिचे हाय,पाय , पोट चोळले, रविवार असूनही डॉ. कदम तिथे भेटले हे आमचे नशीब. त्यांनी विचारपूस चालु केली , हे कसे झाले ? मला सांगता येइना म्हणून स्नेहलला बोलावले तर तिला रडूच आवरेना.... पाळण्यात झोपवले होते तिला, हा पाळणा त्यांनी गावाहून आणलेला, लाकडी ! त्याच्या एका साईडच्या पट्ट्या निघालेल्या होत्या त्याच जागेतून सुखी झोपीत घसरत आली होती !! तिचे मानेपर्यंतचे शरीर बाहेर आले व मान अडकून पडली व गळ्याला फास लागला
दहाच मिनिटापुर्वी स्नेहल ती उठली का हे बघण्यासाठी बेडरुममधे गेली होती. तेंव्हा सगळे व्यवस्थित होते. डॉ.ना लक्षात आले. त्यांनी लगेच दुसर्या हॉस्पीटलला हलवले. तिकडे तिला वेंटिलेटर वर ठेवले होते. परत तिथून के.इ.एम ला घेऊन जाण्यास सांगितले. तिकडचे डॉ. ४८ तास आम्ही काहीच सांगू शकत नाही असे म्हणतायेत
तिचे हात पाय हलवतेय ती पण शुद्धीवर आली नाहीये.. सुखीचं व्यवस्थित होईल ना हो ? सुखी मला परत मम्मी म्हणेल ना हो ? ह्या स्नेहलच्या प्रश्नांवर काय उत्तर द्यावे हे ही कळत नाहीये .... कितीसा धीर देणार तिला जिथे आमचाच धिर सुटत चाललाय ? मावशीने इथे आल्यावर 'काही होणार नाही तुझ्या सुखाडला 'असं म्हणून तिने बळजबरी ऑफीसला पाठवले. ती खूप स्ट्राँग आहे. पण माझं मन मानत नाही.
तिला हॉस्पीटलला नेताना सगळे आठवून खुप रडू येत होते, मी खाली खेळताना खिडकितून 'काक्का' अशा सारख्या हाका मारायची, सुखे गप्प बस म्हणेपर्यंत, तिलाही माझ्यासोबत बॅडमिंटन खेळायचं असायचं. 'काकाचं पिल्लू कुठाय ? म्हटलं की ती स्वत:च्या छातीवर हात मारायची ... हे सगळं आठवून अजूनच वाईट वाटत होते. पण ते फक्त मनात ठेवून सचिन-स्नेहलला सांभाळणे , धीर देणे हे खूप आवश्यक होते. काल आमची अख्खी सोसायटी हळहळली. लोक संध्याकाळपर्यंत बाहेरच होते. सगळे तिच्यासाठी आपापल्या देवाकडे प्रार्थना करतायेत कालपासून.
सुखीचं सगळं व्यवस्थित होइल ना ? प्लीज लोकहो , तिच्यासाठी प्रार्थना करा.
कसलं गोड पिल्लू आहे. देव
कसलं गोड पिल्लू आहे.
देव उदंड आयुष्य देवो तिला.
कपाळाची/कानाची ठेवण वगैरे ---
कपाळाची/कानाची ठेवण वगैरे --- पोरगी नशिबवान आहे
पण वैधृती योग/विष्टी करण/अन्य ग्रहयोग वगैरे काही आहे का बघुन घे रे दिप्या!
दोन भुवयातील अन्तर मला आतून अस्वस्थ करतय.
तो जप केला/करवुन घेतला ते फार चान्गल झाल! सुचविणार्या माबोकरणीचे सार्वजनिक आभार. तसेच मन्दार जोशीने देखिल इथे मन्त्र टाकला, त्याचेही आभार
[किमान काही जणान्कडून तरी या निमित्ताकरता तो वाचला गेला असेल व ते वाचन देखिल "प्रार्थनेच" समाविष्ट झाल्यात जमा]
सुखीला उदंड आणि निरोगी
सुखीला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ..
कसली गोड आहे..
मस्त रे दीप्या आता पुढे
मस्त रे दीप्या
आता पुढे काळजी घ्या.
दिप्या खरच खूप बर वाटल बातमी
दिप्या खरच खूप बर वाटल बातमी ऐकुन
जाम गोड आहे पिल्लु, काळजी घ्या
देवाचे लाख लाख आभार दिप्या
देवाचे लाख लाख आभार
दिप्या काळजी नको... नित्य नामस्मरण सुरू ठेवा...
खूप बरं वाटलं गोड आहे
खूप बरं वाटलं
गोड आहे पिल्लू.
महामृत्युंजय मंत्र, डॉक्टरांचे प्रयास आणि घरच्यांची समयसूचकता
अग आई गं ....आज वाचलं मी हे
अग आई गं ....आज वाचलं मी हे सगळं ! चला देवाची कृपा....देव उदंड आयुष्य देवो पिल्लाला!
दिप्स...पेशंटच्या आजुबाजुला असल्यावर सारखं 'रामरक्षा स्तोत्र' म्हणायचं किंवा नाडीवर 'दत्तबावन्नी' !
फरक पडतो लगेच!
खुप बरं वाटलं. तिला खुप खुप
खुप बरं वाटलं. तिला खुप खुप शुभेच्छा , खुप मोठी हो ! नावाप्रमाणे सुखी हो
सॉलिड गोड पिल्लू
सॉलिड गोड पिल्लू
खूप बरे वाटले वाचुन.गोड आहे
खूप बरे वाटले वाचुन.गोड आहे पिल्लु. तिला उदंड आयुष्य लाभो.
किती गोड आहे रे हि दिप्या!
किती गोड आहे रे हि दिप्या!
खुप खुप बरे वाट्ले वाचुन! रात्री यो चा समस आला तेव्हा कुठे मन थार्यावर आल, नाहि तर कशात लक्षच लागत नव्हत!
काळ आला होता पण वेळ आली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती, डिप्या.
देवाचे लक्ष लक्ष आभार
गोड पिल्लाची गोड बातमी, बरं
गोड पिल्लाची गोड बातमी, बरं वाटलं. काळजी घ्या अजून काही काळ.
आत्ताच सुखीच्या बाबांचा फोन
आत्ताच सुखीच्या बाबांचा फोन आला होता , सुखी पूर्ण शुद्धीवर आली आहे , वेंटिलेटर काढलं आहे आता. सगळ्यांना ओळखलं तिने. तिचा बाबा हे रडतच सांगत होता.... तुम्ही सगळ्यांचे अजून एकदा आभार मानायला सांगितलेत त्याने...
दिप्स, आजंच हा लेख वाचला...
दिप्स, आजंच हा लेख वाचला... प्रतिसाद पण २ पानं वाचून सोडून दिला... पुढे काय वाचायला मिळेल याचा अंदाज नव्हता आणि तयारी ही नव्हती...
पण ती ठिक आहे हे इतरत्र कळल्यावर ताबडतोब इथे आले.
तसा लेख वाचून मी मनोमन प्रार्थना केलीच होती..
खूप बरं झालं ती सुखरूप आहे हे ऐकल्यावर....
गोड पिल्लू आहे अगदी! देव तिला
गोड पिल्लू आहे अगदी! देव तिला उदंड आयुष्य देवो!! काल तुमचं पोस्ट वाचल्यावर डोळ्यात पाणी आलं होतं अगदी. पण आज ती सुखरूप आहे हे वाचल्यावर जीव भांड्यात पडला. सर्वांच्या प्रार्थना व सदिच्छा फळाला आल्या.
वाह! परमेश्वराचे शतशः
वाह! परमेश्वराचे शतशः आभार!
खरंच भिती वाटत होती आज हा बीबी वाचायला येताना. दिप्या पिल्लू खूप गोड आहे दृष्ट काढा. रोज शक्य झालं तर रामरक्षा म्हणा निदान काही दिवस तरी. नेहेमीच म्हणलीत तर उत्तम.
(No subject)
खरच खुप गोड आहे पिल्लु फोटो
खरच खुप गोड आहे पिल्लु
फोटो पाहुन पाणी आल डोळ्यात
किति त्रास झाला असेल तिला
ही केस तशी खूपच सिरियस
ही केस तशी खूपच सिरियस होती.
लौकर लक्षात आले हे तत्कालिक दुर्घटनेपासून वाचण्यास कारण ठरले.
मात्र नन्तरही, मानेला ताण बसून तसेच श्वास कोन्डल्यामुळे होणार्या अन्तर्गत दुखापतीन्ची शक्यता जास्त होती. यामधे मेन्दूला अपुरा रक्तपुरवठा-त्यापासुनच्या अनेकविध स्वरुपाच्या कमतरता निर्माण होणे, इथपासुन ते मज्जारज्जूला इजा पोचून पान्गळेपण इथवर अनेक शक्यता होत्या.
पोरीच अन आईबापान्च नशिब थोर, पूर्वपुण्याई गाठीशी म्हणून पोरगी वाचली असच म्हणाव लागेल, नाही?
Khupach bare vatale Sukhee
Khupach bare vatale Sukhee baree asalyache vachun. Tila udand ayushyaa labho. iPod varun marathee typing hot nahiye:( kshamasv. Konee konee iPod varun maa bo var lihit asalyaas please mala vi pu madhye lihaa.
खरंच आनंद झाला वाचून की सुखी
खरंच आनंद झाला वाचून की सुखी बरी झाली.
हा प्रसंग वाचुन आई मला सारख सांगायची ते आठवल की "बाळा ला नेहमी नजरे समोरच ठेवायचे अगदी गाढ झोपल असेल तरी."
चांगलं होईल सगळं.
चांगलं होईल सगळं.
काल वाचल्यावर जीव टांगणीला
काल वाचल्यावर जीव टांगणीला लागलेला. बरं वाटलं आज वाचून.
अरेच्चा,मला का नाही दिसत फोटो
अरेच्चा,मला का नाही दिसत फोटो की काढुन टाकलाय? चांगली बातमी.
आत्ता इथे लिहायला सुचतय. बीबी
आत्ता इथे लिहायला सुचतय. बीबी उघडला की अक्षरशः धडधड चालू व्हायची.
दिप्या, सुखीवरचा योग टळला. नशीबवान आहे मुलगी!! आता यापुढे तिचं सर्वच चांगले होत राहिल. काळजी नको.
लिंबुने लिहिलेय ती भिती मलाही
लिंबुने लिहिलेय ती भिती मलाही वाटत होती...
म्हणुन इथे यायलाही घाबरत होते.
इतकी गोड बेबी.. देव तिला कायम असेच हसत ठेवो...
फार छान बातमी आहे.. मला का
फार छान बातमी आहे..
मला का नाहि फोटो दिसत नाहि
चला बरं वाटलं वाचुन. हुश्श!
चला बरं वाटलं वाचुन. हुश्श! फोटो गोड आहेत. हे हसु असच राहो.
Pages