काल सकाळपासून धावपळ , घरी खूप पाहुणे आलेले. मामेबहीणीला बघायला मुलगा येणार होता म्हणून सकाळपासून घरात आवराआवर चाललेली. खालच्याच फ्लॅटमधे मावसभाऊ राहतो त्याची दीड वर्षाची मुलगी सुखी रडते आहे म्हणून बघायला गेलो तर स्नेहलने,तिच्या आईने सांगितले की रात्री थोडा ताप आला होता म्हणून तिची झोप झाली नाही त्यामुळे किरकिरत आहे. घरात पाहूणे , कामवालीची दांडी , सुखीची रडारड , म्हणून माझी बायको व स्नेहल दोघीही वैतागून गेलेल्या सकाळी सकाळीच.
दहाच्या सुमारास त्या पाहुण्यांचा फोन आला की आम्हाला अॅड्रेस सापडत नाहीये , मग त्यांना आणायला गेलो, ते जिथे थांबले होते तिकडे. तेंव्हा घरात शांतता होती, सुखी झोपली आहे अशी खात्री करुन मी बाहेर गेलो. पाहुणे आले, त्यांना चहा देत असताना स्नेहलची किंचाळी ऐकू आली भावजी, सुखी कसं करतेय बघा ना ..... मी हातातलं सगळं टाकून खालच्या फ्लॅटमधे धाव घेतली. तिच्या हातातून सुखीला घेतले तर माझ्या पायाखालची जमिनच सरकली..... पूर्ण शरीर पांढरे फटक पडलेले तिचे, ओठ काळे-निळे झालेले, अंग टाकून देत होती, थंडगार शरीर सगळे , अंगावर काटा येतोय ते आठवूनच... मी सचिन कुठे आहे असे विचारले तर तो घरात वेड्यासारखा फिरायला लागला होता, गाडीची चावी शोधत.प्रसंगावधान राखून तसेच पळत गेलो खाली, पार्कींगमधे मामांची गाडी होतीच , स्नेहलपण आली सोबत, तसेच जवळच्या डॉ. कदमांकडे गेलो , ते सुखीचे रेग्युलर डॉ. होते. गाडीत स्नेहलने जेंव्हा कृत्रिम श्वास दिला तेंव्हा तिच्या घशातून आवाज आला तेंव्हा मी थोऽऽडा रीलॅक्स झालो, तिचे हाय,पाय , पोट चोळले, रविवार असूनही डॉ. कदम तिथे भेटले हे आमचे नशीब. त्यांनी विचारपूस चालु केली , हे कसे झाले ? मला सांगता येइना म्हणून स्नेहलला बोलावले तर तिला रडूच आवरेना.... पाळण्यात झोपवले होते तिला, हा पाळणा त्यांनी गावाहून आणलेला, लाकडी ! त्याच्या एका साईडच्या पट्ट्या निघालेल्या होत्या त्याच जागेतून सुखी झोपीत घसरत आली होती !! तिचे मानेपर्यंतचे शरीर बाहेर आले व मान अडकून पडली व गळ्याला फास लागला
दहाच मिनिटापुर्वी स्नेहल ती उठली का हे बघण्यासाठी बेडरुममधे गेली होती. तेंव्हा सगळे व्यवस्थित होते. डॉ.ना लक्षात आले. त्यांनी लगेच दुसर्या हॉस्पीटलला हलवले. तिकडे तिला वेंटिलेटर वर ठेवले होते. परत तिथून के.इ.एम ला घेऊन जाण्यास सांगितले. तिकडचे डॉ. ४८ तास आम्ही काहीच सांगू शकत नाही असे म्हणतायेत
तिचे हात पाय हलवतेय ती पण शुद्धीवर आली नाहीये.. सुखीचं व्यवस्थित होईल ना हो ? सुखी मला परत मम्मी म्हणेल ना हो ? ह्या स्नेहलच्या प्रश्नांवर काय उत्तर द्यावे हे ही कळत नाहीये .... कितीसा धीर देणार तिला जिथे आमचाच धिर सुटत चाललाय ? मावशीने इथे आल्यावर 'काही होणार नाही तुझ्या सुखाडला 'असं म्हणून तिने बळजबरी ऑफीसला पाठवले. ती खूप स्ट्राँग आहे. पण माझं मन मानत नाही.
तिला हॉस्पीटलला नेताना सगळे आठवून खुप रडू येत होते, मी खाली खेळताना खिडकितून 'काक्का' अशा सारख्या हाका मारायची, सुखे गप्प बस म्हणेपर्यंत, तिलाही माझ्यासोबत बॅडमिंटन खेळायचं असायचं. 'काकाचं पिल्लू कुठाय ? म्हटलं की ती स्वत:च्या छातीवर हात मारायची ... हे सगळं आठवून अजूनच वाईट वाटत होते. पण ते फक्त मनात ठेवून सचिन-स्नेहलला सांभाळणे , धीर देणे हे खूप आवश्यक होते. काल आमची अख्खी सोसायटी हळहळली. लोक संध्याकाळपर्यंत बाहेरच होते. सगळे तिच्यासाठी आपापल्या देवाकडे प्रार्थना करतायेत कालपासून.
सुखीचं सगळं व्यवस्थित होइल ना ? प्लीज लोकहो , तिच्यासाठी प्रार्थना करा.
होइल नीट सगळं... काळजी नको
होइल नीट सगळं... काळजी नको करुस्...त्याना.. आधाराची गरज आहे...
परमेश्वरा! आज तुझ्या मदतीची
परमेश्वरा! आज तुझ्या मदतीची सख्त गरज आहे. प्लीज.
सगळ्या आई-बाबा लोकांच्यावतीने पदर पसरलाय तुझ्यापुढे.
दीपू! धीर सोडू नकोस.
दिपड्या, गजाननाला काळजी
दिपड्या,
गजाननाला काळजी बाबा!
ओह, छातीत चर्र झाले वाचताना,
ओह, छातीत चर्र झाले वाचताना, अन्गावर काटा आला अगदी!


श्श्याऽऽ, बालारिष्ट
पण होईल बरी
ओम् त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि
ओम् त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्द्धनम्
उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्
सगंळ ठिक होईल.. आम्हिपण या
सगंळ ठिक होईल..
आम्हिपण या परिस्थितितून गेलो आहे, काळजी हि वाटतेच.. पण धीर सोडू नका.
देवा रे! होईल सगळे
देवा रे!
होईल सगळे व्यवस्थित. नक्की.
होईल सगळं ठीक दिप्या. आता
होईल सगळं ठीक दिप्या. आता डॉक्टरांच्या हातात आहे ना ती ! वेळेवर उपचार मिळालेत तिला. छोटं बाळ आहे ते, ऑक्सिजन न मिळाल्याने जे काही झालं असेल ते आता रिकव्हर होईल. कुणीही धीर सोडू नका.
नक्कि बर्या होतील
नक्कि बर्या होतील दोघीपण्.देवाजवळ हीच प्रार्थना.
सगंळ ठिक होईल. दोघींनाही
सगंळ ठिक होईल.
दोघींनाही सुखरुप ठेवा, हीच देवाजवळ प्रार्थना.
दिपु, काळजी नको. सगळ ठीक
दिपु, काळजी नको. सगळ ठीक होईल. लहान मुल लवकर रिकव्हर होतात. २ दिवसात तुझ्या मागे पळायला लागेल बघ सुखी. नावच सुखदा आहे मग ती सुखच देणार. तिच्या आईची पण तब्येत लेकीला बघुन सुधारेल. तुम्ही धीर सोडु नका. आम्ही देवाची प्रार्थना करतोच आहोत.
"जय गणेश"
दिप वाचुन कससंच झालं. बर
दिप
वाचुन कससंच झालं. बर झालं वेळेवर उपचार झाले. सगळं ठिक होईल.
दीप, कळव बाबा प्रगती. काळजी
दीप, कळव बाबा प्रगती. काळजी करू नकोस. बाप्पा सर्व ठीक करेल.
दिप्याच्या समस प्रमाणे बच्चु
दिप्याच्या समस प्रमाणे बच्चु ६०% रिकव्हर झालेय. म्हणजे प्रगती आहे
दीप्याचा समस "६०% रिकव्हर
दीप्याचा समस
"६०% रिकव्हर झालीये रे"
बीबी उघड्तानाच कसे तरी होत
बीबी उघड्तानाच कसे तरी होत होते. रिकवरी आहे ना. चला.
६०% प्रगती आहे हे वाचून बरे
६०% प्रगती आहे हे वाचून बरे वाटले. अशीच प्रगती होऊन, छोटी अगदी ठणठणीत बरी होऊदेत!
लवकरच छान पुर्वीसारखी होईल
लवकरच छान पुर्वीसारखी होईल सुखदा!
सुखीला लवकरच बरं वाटु देत.
सुखीला लवकरच बरं वाटु देत. डॉक्टर्स, तुम्ही सगळे आहातच.
सुखी ला लवकर बरं वाटो ही
सुखी ला लवकर बरं वाटो ही बाप्पाकडे प्रार्थना.
देव तिला लवकर बरं करो अन उदंड
देव तिला लवकर बरं करो अन उदंड सुदॄढ आयुष्य देवो .
आमाच्या प्रार्थनेत ती आहे.
आमाच्या प्रार्थनेत ती आहे. प्रार्थनेत खुपच शक्ति असते, सगळेच प्रार्थना करा.
काळजी घ्या, - हे सर्व वाचतांना, माझ्या डोळ्यांना तर इथे ऑफिस मधे धाराच लागलेल्या, काहि कळत नव्हते काय करावे, कृष्णा (हे करुनासिंधु, दिनबंधु, जगप्तते, गोपेशा, गोपीकाकांता, राधाकांता)- सर्व व्यवस्थित कर ते बाबा.
६०% रिकवरी वाचुन इतके बरे
६०% रिकवरी वाचुन इतके बरे वाटले.. मी हे वाचत असतानाच सुखी पुर्ण रिकवर झाली असेल हीच आशा करतेय..
डीप्या.. टेन्शन नको घेउ.. आल
डीप्या.. टेन्शन नको घेउ.. आल इज वेल !!
लवकर बरी होउदे छोटी.
लवकर बर वाटु दे 'सुखदा'ला.
लवकर बर वाटु दे 'सुखदा'ला.
सुखीला लवकरच बरं वाटु दे...
सुखीला लवकरच बरं वाटु दे...
सुखीला लवकरच बरं वाटु
सुखीला लवकरच बरं वाटु दे...लवकरच छान पुर्वीसारखी होईल सुखदा! होईल सगळे व्यवस्थित.
दिप्याच्या योगिताला आलेल्या
दिप्याच्या योगिताला आलेल्या समसनुसार sukhi is almost out of danger
Sukhi baby, get well soon.
Sukhi baby, get well soon. Lots of love.
नक्की करेन प्रार्थना!
नक्की करेन प्रार्थना!
Pages