डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

झक्की अहो तुम्हाला पहायला तर एवढी सगळी मंडळी एवढा सगळा द्राविडी प्राणायाम करून डिसी ला येतायेत, तुम्हीच नाही म्हणुन कसं चालेल......

मी येणारे -सध्या तरी एकटीच.
अति उत्तरेकडच्या लोकांना आदल्या दिवशी किंवा नंतरच्या दिवशी ( किंवा दोन्ही वेळा ) माझ्या घरी रहायचे निमंत्रण. माझ्या गाडी मी सोडून अजून चार जण मावतील.

लालू , काही तयारी करून आणायची असेल तर सांग.
कोणाला पुस्तकं हवी असतील तर सांगा.
मला गेल्या वीस वर्षातील मराठी गाणी हवी आहेत

मी येणार आहे. एकटाच. पण परत जाताना दुकटा जाण्याचा प्रयत्न करणार आहे. कुणितरी माझ्याबरोबर जायला तयार होईल अशी आशा बाळगून आहे. हे प्रत्यक्षात येऊ शकले तर "दोनाचे चार हात झाले", असे होणारे हे पहिलेच जीटिजी असेल. Happy
@मेधा, अरेरे ! मी अति दक्षिणेकडून येत असल्याने तुमचे निमंत्रण स्वीकारता येणार नाही.

झक्कीन्ना काय झाल मधेच? कस्ल अपरिहार्य कारण? कारणासहित या म्हणाव - कारणाला एकटे सोडू नका! हाय काय अन नाय काय त्यात Happy
अरे किती किती स्मायलीज मिळाल्या या बीबीवर, सर्वान्ना धन्यवाद Happy

ईSSSहूSSS
मी येतेय..
मृण्मयी (१ मोठी )
सिंडी (२ मोठे + १ लहान)
पग्या (२ मोठे)
वैद्यबुवा
राहूल (२ मोठे + २ लहान)
मैत्रेयी (२ मोठे + २ लहान)
सायो (२ मोठे + २ लहान)
अमृता (२ मोठे + १ लहान)
परदेसाई (१)
फचिन (१)
माणूस (२ मोठे)
अंजली (२ मोठे + १ लहान)
पूर्वा (२ मोठे+१ लहान)
पन्ना (२ मोठे + १ लहान)
प्रीति (१)
स्वाती आंबोळे (१)
सीमा (१)
असामी (१)
चमन (१)
मधुरिमा उर्फ सुमॉ (हम दो, हमारे दो)
अनिलभाई (१)
ज्ञाती (२ मोठे, १ लहान (माझी ६ महिन्याची लेक)
मो (२ मोठे + १ लहान)
मिनी (२ मोठे )
झक्की (१ मोठे)
सशल(१)
अजय(१)
भावना(१)
मेधा(१)
नानबा(२)

-- रुनी च्या सुचनेवरून सुधारून! Wink

लालू, तयारी जोरदार चालली आहे :).
हे मात्र खरय, अमेरिकेतल्या विविध राज्यांमधून फक्त झक्कींना बघायला लोक येणार आहेत. Proud

मात्र खरय, अमेरिकेतल्या विविध राज्यांमधून फक्त झक्कींना बघायला लोक येणार आहेत. Lol
मो मला झक्कींना बघायला म्हणजे आपण सगळे बैठकीत बसलोय आणि झक्की स्वयंपाक घरातून कांदेपोह्याच्या दीश ट्रेमध्ये सांभाळून आणताहेत असेल दृश्य डोळ्यासमोर आले

लालू आरसे स्वच्छ नाही केलेस तरी चालतील. तसे पण लोक झक्कींनाच बघणार Wink

शिट्टीकर पिलान के मुताबिक दुपारी १२ वाजेच्या आत पोचतील. आमच्या बरोबर तीन (लहान) मुले असल्याने इतर काही आणता येणार नाही.

अजय(१)
भावना(१) >>>> अजय एकटे येणार म्हणतात ना ?

मो मला झक्कींना बघायला म्हणजे आपण सगळे बैठकीत बसलोय आणि झक्की स्वयंपाक घरातून कांदेपोह्याच्या दीश ट्रेमध्ये सांभाळून आणताहेत असेल दृश्य डोळ्यासमोर आले >> Lol

ए नानबा तिकडे तुझा आयडी टाक यादीत शिरीष नावाने कोण ओळखणार तुला. बाकी प्रोजेक्ट चांगलाच गंडवलेला दिसतोय तुम्ही Proud

>> भावना(१) >>>> अजय एकटे येणार म्हणतात ना ?

ती परतणार्‍यांची लिस्ट आहे बहुतेक. Proud

आमच्या बरोबर तीन (लहान) मुले असल्याने इतर काही आणता येणार नाही. >>> ' भल्या पहाटे निघायच असल्याने ' हे वाक्य पण घाल ग.

अरे माणूस आणि बाई(माणूस) येणार आहेत की नाही? इथे दिसलेच नाहीत ते.

हुश्श.. जरा चहा घ्यावा, फार काम झाले...smiley-eatdrink059.gif

नानबा पण येणार.. वा वा..

ही घ्या सां.का. यादी...
१. लिखित स्वरूपातले स्वागतगीत (सादरकर्ती : सशल)
१. वेग-"वेगळ्या" रेसिप्यांची प्रात्यक्षिके (नानबा )
२. थायरॉईड आणि तत्सम समस्यांची कारणे व परीणाम आणि ती टाळण्यासाठी करता येण्याजोगे "ऑरगॅनीक" उपाय ह्यावर परीसंवाद ( मुख्य संयोजक : नानबा सहसंयोजक : मो)
३. अवतार तसेच इतर चित्रपटांमधली ह्युमॅनीटी ह्यावर भावनेच्या भरात केलेली जुगलबंदी (सहभागी : नानबा, फचिन)
४. कुठल्याही कामात "सेंटरींग" ला असलेले महत्त्व दाखवून देणारे प्रात्यक्षिक (रूनी)
५. सुतारपक्षाच्या त्रासावरचे रामबाण उपाय : दरतासाला ५/५ मिनीटांची व्याख्यानमाला (सादरकर्ते : अजय)
६. पथनाट्य : "प्रत्येक यशस्वी मुख्य संयोजकाच्या मागे एक कंपू असतो" (सादरकर्त्या : पन्ना, लालू, स्वाती_आंबोळे पाहूण्या कलाकार: शोनू, रूनी पडद्याआडून मदत : विनय देसाई, मृण्मयी, अ‍ॅडम प्रायोजक : अजय, समिर)

अजून अ‍ॅड करा... Proud

सगळ्यात शेवटी लालूकडून येडचॅप लोकांना ३५ डॉ. बक्षीस आणि अ‍ॅवटारची सिडी मुफ्त... पुढच्या गटगला यायचं हं अशी आग्रहयुक्त धमकी. Proud

>> "प्रत्येक यशस्वी मुख्य संयोजकाच्या मागे एक कंपू असतो"
अरे हे पथनाट्याचं नाव आहे की अख्खं स्क्रिप्ट? Proud

सायो Lol

Pages