पाककृतीत वापरले जाणारे साखरेचे वेगवेगळे प्रकार

Submitted by साधना on 20 February, 2010 - 12:07

ओटमील कुकीज करुन पाहाव्यात म्हणुन ओट्स घ्यायला अपना बाजारात गेले तर तिथेच बाजुला एक चॉकलेटी रंगाच्या साखरेचे पॅकेट दिसले. नाव पाहिले तर blue bird's demerara sugar लिहिलेले. मी पहिल्यांदाच पाहिली. to be used for caramelised items, dark cookies, cakes and butter scotch pies असे लिहिलेय. हिलाच ब्राऊन शुगर म्हणतात काय? दिसायला पांढ-या साखरेसारखीच, पण थोडा चिकटपणा आहे. पण महाग आहे, २४ रुपयांना फक्त २०० ग्रॅम.

अजुन थोडी शोधाशोध केल्यावर castor sugar म्हणुन अजुन एक प्रकार पाहिला. रंगाने पांढरी पण नेहमीच्या साखरेची जरा जाडसर पुड केल्यासारखी वाटली. तीही २६ रुपयांना २०० ग्रॅम...

आयसिंग साखर पण पाहिली. ती अर्थात ओळखीची होती.

तर आता ह्या वेगवेगळ्या साखरेतला फरक कोण सांगेल काय? मी कृतीत ब्राउन शुगर लिहिलेले असले तरी सरळ नेहमीचीच साखर वापरते. पण आज ती डेमेरारा पाहुन मला वाटले २४ रुपयाची २०० ग्रॅम घेण्यापेक्षा सरळ साधी साखर तव्यावर २-३ मिनिटे पसरुन ठेवली तरी ब्राऊन शुगर तयार होईल. माझा हा अंदाज चुक की बरोबर?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना
इथे बघ http://whatscookingamerica.net/Information/SugarTypes.htm
इथे वेगवेगळे साखरेचे प्रकार आणि त्याचे उपयोग थोडक्यात दिलेले आहेत.
तू जर नेहमीची पांढरी साखर तव्यावर भाजली तर तिची ब्राऊन शुगर होणार नाही तर फक्त शुगर 'ब्राऊन' होइल....जरा अजून जास्त केली तर मात्र कॅरामल नक्की होईल. Happy

डेमेरारा शुगर बर्‍याच कॉफी शॉप मध्ये मिळते. खमंग लागते. पूर्वी आपल्याकडे गुळी साखर म्हणत तीच बहुतेक. एक लिक्विड ग्लुकोज सिरप पण मिळते. डेमेरारा वापरल्याने सुन्दर रंग येतो.

खांडसरी नावाची एक पिवळसर साखर असते, ती कुठली मग? ती एका ऑरगॅनिक उत्पादनांच्या दुकानातही पाहिली आत्ताच. ती कशात वापरतात, माहीत आहे का?
आणि रुनी, ब्राउन झालेली शुगर आणि ब्राउन शुगर यांत काय फरक असतो नेमका?

मेघना
माझ्यामते खांडसरी हा साखरेचा प्रकार ब्राऊन शुगर प्रकारात मोडेल.
आपली नेहमीची पांढरी (Refined) साखर बनवतांना जी प्रक्रीया केली जाते त्याच्या आधीची एक पायरी म्हणजे ब्राऊन शुगर असावी. त्यातली सगळी मळी काढलेली नसते. जसा अगदी काळपट गूळ (कमी प्रक्रिया) आणि मग जास्त प्रक्रिया करून (Refined) मिळवलेला पिवळसर गूळ. तसच साखरेच आहे.
साधी पांढरी साखर तव्यावर गरम केली तर ती जळेल आणि ब्राऊन होईल.
काही जण वाटीभर पांढर्‍या साखरेत १ चमचा molasses/sorghum syrup घालतात घरी ब्राऊन शुगर बनवायला.
पांढर्‍या साखरेपेक्षा कमी प्रक्रिया केलेली ब्राऊन शुगर तब्येतीला चांगली (किंवा कमी हानीकारक) असे म्हणतात. नेहमीच्या साखरेसारखीच ब्राऊन शुगर सगळीकडे वापरायला हरकत नाही. बेकींगसाठी मी नेहमी वापरते साध्या साखरेऐवजी.
साखर बनवतांना 1st crystallization, 2nd crystallization, 3rd crystallization अश्या ज्या वेगवेगळ्या पायर्‍या असतात त्या त्या वेळी जी साखर बनते ती वेगवेगळ्या नावानी प्रसिद्ध आहे. जसे डीमेरारा - 1st crystallization, मस्कोवादो - 3rd crystallization इ.इ.
हे सगळ नेट वर वाचून मिळवलेले ज्ञान आहे ह्यात कदाचित काही चूक असेलही.

साखरेचा विषय निघाला आहे म्हणून विचारते..
खोकला असला तर खडिसाखर खायला सांगतात, आपली नेहमीची साखर आणि खडिसाखर यात काय फरक आहे?

मला वाटतं कि साधी साखर आणि खडीसाखर ह्यात दाण्याच्या आकारापेक्षा जास्त काही फरक नाही.खडीसाखर विरघळायला जास्त वेळ लागतो म्हणून खाकल्याची ढास थांबायला खडीसाखर खायला सांगत असावेत.