बनाना अँड अलमंड टी लोफ

Submitted by रूनी पॉटर on 9 July, 2008 - 13:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१०० ग्रॅम (४ oz) बटर (फ्रीज मधुन काढुन ठेवुन मऊ करुन घेतलेले किंवा १०-१५ सेकंद मायक्रोवेव्ह केलेले)
१४० ग्रॅम (साडे ५ oz) मस्कोवादो साखर (मस्कोवादो नसेल तर साधी/डार्क ब्राउन/लाईट ब्राउन या पैकी साखर चालेल)
२ अंडी (नीट फेटुन घेतलेली)
१०० (४ oz) ग्रॅम बदामाचे तुकडे (जाडसर भरडलेले)
२ पिकलेली केळी (बारीक कुस्करुन)
२ टी स्पुन दुध (हो ते टी स्पुनच आहे)
पाव किलो (८ oz) केकचे तयार पीठ १-२ वेळा चाळुन घेवुन (सेल्फ रायझींग पीठ)

क्रमवार पाककृती: 

कृतीसाठी लागणारा वेळः
पुर्व तयारी : १५-२० मिनीट
ओव्हन मध्ये शिजवण्यास : ५५-६० मिनीट

कृती:
१. ओव्हन आधी १८० C ला (साधारण ३६०F) गरम करुन घ्या. फॅन ओव्हन असेल तर १६० C ला गरम करुन घ्या.
२. लोफ बनवण्यासाठी जे भांडे वापरणार असाल त्याला बटर चा हात लावुन घ्या. या साठी १kg किंवा २lb वाला ब्रेड टीन असेल तर उत्तम, नसेल तर नेहमीचे ओव्हन मध्ये चालणारे भांडे वापरावे.
३. एक मोठ्या भांड्यात मऊ केलेले बटर घेवुन त्या मध्ये साखर मिसळावी. त्यानंतर (च) त्यात फेटलेले अंडे मिसळावे.
४. साधारण एक चतुर्थांश बदाम बाजुला काढुन ठेवुन उरलेले सगळे वरील मिश्रणात घालुन हलक्या हाताने हलवावे.
५. त्यानंतर वरील मिश्रणात कुस्करलेले केळे आणि दुध मिसळावे.
६. आता सगळे पीठ त्यात हळु हळु मिसळुन मिश्रण एकजीव करावे. पीठ मिसळतांना फोल्डींग पद्धत वापरावी.
७. तयार झालेले मिश्रण हलक्या हाताने केक/ब्रेड बनवण्याची भांड्यात ओतावे आणि त्यावर मघा बाजुला काढुन ठेवलेले बदाम पसरावेत.
८. हे भांडे गरम झालेल्या ओव्हन मध्ये बेक करायला ठेवावे. साधारण ५५-६० मि. बेक केल्यावर सुईने
किंवा टुथपिक ने लोफला टोचुन बघावे, जर सुईला काहीही पीठ लागले नसेल तर लोफ तयार झाला असे समजावे. नसेल तर अजुन ५-७ मि. बेक करावा.
९. बेक झालेला लोफ ओव्हन बाहेर काढुन १० मि. निवु द्यावा आणि मगच भांड्याच्या बाहेर काढुन थंड व्हायला ठेवावा.

वाढणी/प्रमाण: 
या लोफचे मोठे असे ११/१२ तुकडे होतात. प्रत्येक तुकड्यात साधारण २६५ कॅलरीज, प्रोटीन्स ४ ग्रॅम, कार्बोहायड्रेट ३३ ग्रॅम, फॅट १४ ग्रॅम असतात.
अधिक टिपा: 

१. सेल्फ रायझींग पीठ नसेल तर १०० ग्रॅम मैदा + एक ते दीड टी स्पुन बेकींग पावडर + अर्धा टी स्पुन मीठ या प्रमाणात साहित्य मिसळुन
लागेल तेवढे पीठ तयार करुन चाळुन घ्यावे.
२. Whole Foods मध्ये मस्कोवादो साखर मिळते.
३. हा लोफ प्लास्टीक बॅग मध्ये हवाबंद करुन फ्रीज मध्ये साधारण दोन अडीच महिन्या पर्यंत टीकु शकतो. त्यामुळे प्रवासासाठी, मुलांसाठी, दुपारच्या चहासाठी किंवा इतर वेळीही बराच आधी करुन ठेवता येईल.
४. या पाककृतीत अंडे असले तरी ती एग रीप्लेसमेंट पावडर वापरुन पण करता येते म्हणुन शाकाहारी प्रकारात टाकलीये. फक्त एग रीप्लेसमेंट पावडरने केक जरा कमी फुगतो Happy

माहितीचा स्रोत: 
BBC Cookbook.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करुन बघायला पहिजे..माझ्या पिल्लाला आवडेल असे वाटतेय Happy

मागच्या वेळी हा लोफ केला तेव्हा लगेच खाल्ला होता त्यामुळे त्याचा फोटो नव्हता टाकता आला. यावेळी ओव्हन मधुन काढला की लगेच आधी फोटो काढला. Happy

BananaTealoaf.jpg

रूपाली
मस्त दिसतोय. मीही करून पाहिला. उत्तम झाला.

वजनी औंस हे आणि वर रुनीने लिहिलेलं वेगळं असतं का? मला कधीच हे OZ प्रकराण झेपत नाही. मी सऱ gram/cup वापरते.

आर्च, गुड क्वेश्चन .. ब्रिटीश पुस्तकातनं रेसिपी आहे म्हणून नसतील इकडच्यासारखी मापं ..

रेसिपी छान वाटतेय .. बघु या जमतेय का .. Happy

मी लिहीलेले औंस हे अमेरीकेतले OZ वाले औंस आहेत आणि त्याचेच ग्रॅम मध्ये किती वजन होईल हे लिहीलय. माझ्याकडे आयकियातून आणलेले किचन स्केल आहे त्यामुळे मी वजन करूनच सामान घेते दर वेळी केक साठी. मिनीने दिलेले कन्व्हर्टर बरोबर असावेत माझ्यामते (पण ते द्रव पदार्थाचे औंस आहे ना पण घन पदार्थांचे औंस वेगळे असतात ना, ते जरा बघायला लागेल मला एकदा थोडे R&D करून). पूर्वा सापडले की मी लिहीते कपाच्या मापात किती होते ते.
ज्ञाती मी गूळ वापरून केलेली नाहीय ही कृती पण तू करून बघीतलीस तर इथे लिही केक कसा झाला ते. कदाचित आपल्याकडचा गूळ इथल्या साखरेपेक्षा जास्त गोड असतो त्यामुळे केक थोडा जास्त गोडसर होवू शकेल.