बोलगाणी

Submitted by संयोजक on 25 January, 2010 - 15:45
bolgani.jpg

वरील मजकूर आहे छोट्या मायबोलीकर "क्रिती" च्या सुंदर हस्ताक्षरात आणि हे बडबडगीत आहे "इरा"च्या आवाजात.

ही स्पर्धा एकाच वयोगटात घेण्यात येणार आहे: वय वर्षे २ ते ५

स्पर्धेसाठी प्रवेशिका marathibhasha at maayboli.com वर पाठवावी. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयामधे Marathi Bhasha : Bolgani असे नमूद करावे.

स्पर्धेसाठी माध्यम: व्हिडीओ, ऑडिओ

साहित्य पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०

अधिक माहितीसाठी संयोजक समितीशी marathibhasha at maayboli.com इथे संपर्क साधावा अथवा ह्याच पानावर आपला प्रश्न विचारावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच स्पर्धा आहे. ज्या मायबोलीकरांची पोरं या गटात येत नाहीत त्यांनी नात्यातल्या, मैत्र-मैत्रिणींच्या मुलांच्या आवाजातल्या प्रवेशपत्रिका पाठवल्या तर चालतील का?

जाहिरात सुंदरच! क्रितीचं अक्षर वळणदार आहे! Happy इराच्या आवाजातलं बडबडगीत फास्टफॉरवर्ड केल्यासारखं ऐकू येतंय. Sad (की माझ्याच कंप्युटरची भानगड आहे?)

फायरफॉक्स्मधून ऐकलं. कसलं गोड म्हंटलंय 'टकबक टकबक घोडोबा'..!

फारच मस्त कल्पना आहे ! लाडोबाने काय गोड म्हटलंय बडबडगीत. जाहिरात अगदी वळणदार अक्षरांत वाचायला मिळाली त्याची गंमत वाटली.
आमच्याकडून प्रवेशिका नक्की पाठवणार.

आम्ही पण पाठवणार प्रवेशिका Happy

फक्त ती ऑडियो फाईल कशी पाठवायची त्याबद्दल कोणीतरी मला मार्गदर्शन करा. मी मोबाईल रेकॉर्ड करेन. मग ती फाईल मेलमधून अॅटाच करून पाठवता येईल का? हा बी प्रश्न असू शकेल पण माझा नाईलाज आहे. Happy

भ्या Sad फक्त २-४ वयोगट आहे

असो आम्हाला ऐकायला मिळतील का सगळी बोलगाणी?

शुभेच्छा सगळ्या बालगोपाळांना Happy

कविता, मोठ्या मुलांसाठी निबंध स्पर्धा आहेत. अधिक माहितीसाठी इथे पहा.

मंजु, ऑडिओ फाइल ई-पत्रासोबत जोडुन marathibhasha at maayboli.com वर पाठवावी. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयामधे Marathi Bhasha : Bolgani असे नमूद करावे.

साहित्य पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०

अरे वा !!! छान आहे पोस्टर.
पोरीला तयार केला पाहिजे गाण्यासाठी.
एरवी अखंड तोंड चालू असतं. पण कॅमेरा समोर असला की तोंडाला कुलुप. Sad

वयोगट २ ते ४ ? च्क्च्क्च्क्च्क आधी सांगायला पाहिजे होत राव...

राहुल, अरे रेकॉर्ड करव मग गाण तिच्याकडुन.

असुदे, आधीच तर सांगितलय Happy
वर संयोजकांनी लिहीलय ते वाचा आणि मोठी मुल असतील तर इवलेसे रोप ला भेट द्या

स्वरा, प्रवेशिका पाठवण्यासाठी कुठल्याही गृपचे सदस्यत्व घेण्याची गरज नाही. Happy

स्पर्धेसाठी प्रवेशिका marathibhasha@maayboli.com वर पाठवावी. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयामधे Marathi Bhasha : Bolgani असे नमूद करावे.

आपल्या पाल्याचे वय पाच वर्षांपेक्षा कमी असल्यास तो/ती ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र आहे.

प्रीति, वरील नियमाप्रमाणे राम बोलगाणी स्पर्धेत भाग घेऊ शकतो.

सुनिधी, माफ करा, मुलीचे सध्याचे वय पाच किंवा अधिक असल्यास प्रवेशिका स्वीकारता येणार नाही.

धन्यवाद संयोजक!! ... खुप उत्सुक आहे बोबडे बोल ऐकायला.. जास्तीतजास्त लोकांनी ह्यात भाग घ्यावा अशी मीच विनंती करते. Happy

वरच्या क्लिप मधे आहे तसे लहानमुलां बरोबर मधे मोठ्यांचा आवाज आला तर चालणार आहेत का (म्हणजे पुढच्या शब्दाचा क्लू देण्यासाठी... ) Happy

संयोजक, जर वयोमर्यादा पाच वर्षापर्यंत केली असेल, तर वर स्पर्धेच्या घोषणेतही (हेडरमध्ये) तसा बदल करावा ही विनंती.

खूपचं सुंदर उपक्रम करताहात तुम्ही सर्व! अगदी मनापासून खूप खूप आनंद झाला हे सर्व वाचून आणि ऐकून. लहान मुलांमधे केवढी पॉझिटीव्ह ऐनर्जी असते हे लग्गेच कळले. मला जमतील तेवढ्या बालकविता-गाणी मी गोळा करुन तुम्हाला पाठवेन.

मला काही प्रश्न आहेत:
१) माझी भाची कल्याणी, ४ वर्षाची होत आली आहे. तिला या स्पर्धेत सहभागी होता येईल का?
२) वयोमर्यादा थोडी वाढवून मिळेल का? म्हणजे बाकीच्या भाच्यांना पण यात सहभागी करता येईल.
३) गाणी म्हणवून घेताना आई किंवा बाबा यांनी मधे जर थोडे शब्द सांगितलेत मुलांना तर चालतील का? कधी कधी मुलं अडखळतात.. पुढे जात नाहीत म्हणून त्यावर हा उपाय.
४) गाणे जर मराठी किंवा ईंग्रजी किंवा हिन्दी किंवा इतर कुठल्याही भाषेतील चालेल का?

धन्यवाद आणि शुभेच्छा!

बी,
१. वयोमर्यादा २ ते ५ करण्यात आली आहे त्यामुळे तुमची भाची नक्कीच भाग घेउ शकते.
२.५ वर्षांवरील मुलांसाठी 'इवलेसे रोप' स्पर्धा आहे. मोठी मुले तिथे भाग घेउ शकतात.
http://www.maayboli.com/node/13619
३.हो, चालेल.
४.मराठी भाषा स्पर्धे साठी गाणे मराठीतच असलेले उत्तम. Happy

हे आज बघितलं मी.
काय मस्त म्हटलय इरानी. Happy क्रितीचं अक्षर पण छानय. आवडली जाहिरात.
आयामला नाही घेता येणार यावेळी भाग. पुढच्या वर्षी नक्की. Happy
भाग घेणार्‍या सगळ्या पिल्लांना शुभेच्छा. Happy

इरा ला माझ्याकडुन एक गोग्गोड किच्चा! 'घोडोबा मस्त म्हंटलय.
क्रिती सुरेख लिहीलय.

एरवी अखंड तोंड चालू असतं. पण कॅमेरा समोर असला की तोंडाला कुलुप.>>>> आमच्याकडेपण असंच आहे. Happy
जरा नेट लावुन तयार करायला हवं. मुड असला तर बरं म्हणेल तो असं वाटतय.

सयोजक समिती,
मी कालच माझ्या मुलीच्या,सनिकाच्या अवाजातील एक बडबडगीत पाठवलय्.ते मिळाले का?
त्यात मी तिच वय नमूद करायला विसरलेय. ती साडे तीन वर्षाची (३.६ वर्षे) आहे.परत ई-पत्र पाठवायला हवय का?
तसदी बद्दल क्षमस्व....
तोषवी.

Pages