Submitted by पराग on 15 January, 2010 - 22:15
जिंकून जिंकून जिंकणार कोण ?
ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस स्पर्धा येत्या सोमवारी म्हणजे १८ तारखेला सुरु होत्ये. हा लेखनाचा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी. (टेनीस बद्दलची इतर चर्चा टेनीसच्या पानावर करता येईल.)
जस्टीनी हेनीनचे ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन होत असल्याने तिच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तसेल नदाल, फेडरर, नोल, विल्यम्स भगिनी, मरे, शारापोवा, डेल-पोर्टो, क्लाइज्टर्स, यांकोविच, आयवानोविच, आपल्या बाई, पेस, भुपती अश्या नेहमीच्या यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीवरही सगळ्यांचे लक्ष असेलच.
तेव्हा टेनीसप्रेमींनो सुरु व्हा.. 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हुर्रे.. फेडी सहज जिंकला की..
हुर्रे.. फेडी सहज जिंकला की.. मला वाटलं होतं त्सोंगा टफ देईल...
त्सोंगा एक तर टफ मॅच खेळुन
त्सोंगा एक तर टफ मॅच खेळुन आला होता. त्यात समोर फेडी. मग काय त्याने कच आणि हाय दोन्ही खाऊन धीर सोडला
खूपच एकतर्फी झाला सामना. They need a bigger net to catch the shark 
सहज जिंकला की फेडी.. मलापण
सहज जिंकला की फेडी.. मलापण वाटलं होतं त्सोंगा ४ सेटर तरी खेळवेल म्हणून
आता मर्याला हरवलं पाहिजे...
मला इंटरेस्ट नाही...इच्छुकांनी लाभ घ्यावा...
>>
मला इंटरेस्ट आहे... मी तर तिला म्हणणार की लग्न झाल्यावर तू टेनिस तर खेळच, पण जरा जिंकून पैसे कमवून आण. म्हणजे मग मी कामधंदा सोडून घरी आराम करतो मस्त...
फचिन..
फचिन..
सँटी, तिचा शॉपिंग,
सँटी, तिचा शॉपिंग, व्हेकेशन्सचा खर्च इतका आहे की तुलाच नोकरी करावी लागेल रोजीरोटीसाठी
रच्याकने, इशानला सानियामामी म्हणायला शिकवते आजपासून
हम्म्म्म.. आजची फायनल बघायची
हम्म्म्म..
आजची फायनल बघायची आहे.. उद्याचं माहित नाही..
शनिवारी पहाटे साडे तीन वाजता
शनिवारी पहाटे साडे तीन वाजता सुरु होतेय ना फायनल ?
आयला.. ह्या वेळी इव्हिनिंग
आयला.. ह्या वेळी इव्हिनिंग सेशन ला ठेवली का फायनल ? गेल्या वेळ पर्यंत रात्री ९ ET ला असायची..
ठिके पण उठून बघायची शनिवारच आहे.. हाकानाका.
फेडी फायनलमधे!!!
फेडी फायनलमधे!!! हुर्ये!!!
पग्या मेन्स फायनल का बघणार नाही म्हणे? मी तर दोन्ही फायनल बघणारच. विकेंडला दुपारी पडी टाकायला निमित्त सुध्दा मिळेल त्याने
फचिनमामा, लगे रहो
मेन्स फायनल मधे मी
मेन्स फायनल मधे मी दोघांच्याही बाजूने नाही... विमेन्स मधे दोघींच्याही बाजूने आहे..
हेनीन जिंकावी असं वाटतं आहेच.. पण सेरेनाच्या गेल्या दोन मॅचेस पाहून ती जिंकली तरी आनंदच होईल..
मेन्स मधे कोणीही जिंकलं तरी नो फरक आणि नो सुखदु:ख.. त्यामुळे नंतर हायलाईट्स बघेन.. अर्थात असं आता म्हणतोय.. कदाचित उठून बघेनही पूर्ण मॅच..
रच्याकने.. सध्या सेरेनाची बारोग्राफी 'ऑन द लाईन' वाचतोय.. सुरुवात तरी चांगलीये...
झालं की मीवापु मधे लिहितो डिटेल्स...
गेल्या वर्षी दोन्ही फायनल्स
गेल्या वर्षी दोन्ही फायनल्स मी पहाटे उठुन बघितल्या होत्या (असे मला आठवतेय)
बर मी आणि पन्ना तुला कॉकॉ करु मेन्स फायनल सुरु झाल्यावर
सिंडे, नको
सिंडे, नको
रच्याकने.. सध्या सेरेनाची
रच्याकने.. सध्या सेरेनाची बारोग्राफी 'ऑन द लाईन' वाचतोय..>> सेम पिंच, मी पण वाचतेय.. संपत आलयं.. ओपन पण वाचलं. खूपच प्रामाणिक वाटलं मला.
सँप्रासच लायनीत आहे.
शॅरापोव्हाची फायनल दोन्ही
शॅरापोव्हाची फायनल दोन्ही वेळा संध्याकाळी होती... ते नक्की.. मागच्या वर्षी मेन्स फायनल मी पुण्याला पाहिली होती.. जी तिथल्या २ ला वगैरे पाहिली होती..
फायनल बघायला कोण कोण बसलय?
फायनल बघायला कोण कोण बसलय?
आम्ही बघतोय !
आम्ही बघतोय !
पहील्याच गेम पासून मस्त
पहील्याच गेम पासून मस्त सुरवात झालीये! जस्टीन चांगलेच प्रेशर टाकतेय सरेनावर!
आणि जस्टीनचा एक वाइल्ड गेम.. ३-१ सेरेना
बस्के, फक्त आपण दोघी बघतोय?
सिंडे, पग्या, फचिन, मयुरेश उठा...
मी दुसर्या सेटपासून बघतेय
मी दुसर्या सेटपासून बघतेय गं.
मी आहे मी आहे .. पहिला सेट
मी आहे मी आहे :).. पहिला सेट सेरेनाने घेतलाय.. दुसरा सेट हेनीन जिंकली.. आता तिसर्या सेटमध्ये खरी धमाल. चला लावा अंदाज.. कोण जिंकेल? माझ्या मते जस्टीन
सेरेना जवळ जवळ हरलेल्या मॅच
सेरेना जवळ जवळ हरलेल्या मॅच घशात घालण्यात पटाईत आहे. त्यामुळे हेनिनसाठी फिंगर्स क्रॉस्ड
आता शेवटचे दोन गेम काय खेळली हेनिन. मस्त.
सेट ऑल!!! सही!!! जस्टीन
सेट ऑल!!! सही!!!
जस्टीन जिंकावी अशी खूप इच्छा आहे. पण समहाऊ सेरेना जिंकेल असं वाटतय.. बाई बिग पॉईंटस खेळण्यात पटाईत आहेत. तिचा सर्विस गेम कसा होतो त्यावर अवलंबून आहे बरच..
सेरेना जवळ जवळ हरलेल्या मॅच
सेरेना जवळ जवळ हरलेल्या मॅच घशात घालण्यात पटाईत आहे..>>> खरय.. पण तरी गट फीलिंग आहे की जस्टीन जिद्दीच्या जोरावर मारेल मॅच...
जस्टिन पण जून बॉर्न आहे. काही
जस्टिन पण जून बॉर्न आहे. काही म्हणा जूनमधे जन्मलेले ग्रेटच असतात हां
मयुरेश, आमेन
तिसर्या सेटमध्ये दोघीही
तिसर्या सेटमध्ये दोघीही १-१.. हा सेटही टफ होणार .
ओह नो.... ब्रेक.. कमऑन
ओह नो.... ब्रेक..
कमऑन जस्टीन...
कम ऑन जस्टीन...
कम ऑन जस्टीन...
मला जस्टीन जिंकावी वाटतेय, पण
मला जस्टीन जिंकावी वाटतेय, पण अनफोर्सड एरर्स यडपटासारख्या आहेत तिच्या!
बघु !
सेरेना जिंकेल असं उगीच वाटतंय.
मनीष,केला बदल २-२..कमॉन
मनीष,केला बदल
२-२..कमॉन जस्टीन
ब्रेक बॅक... २-२
ब्रेक बॅक... २-२
(No subject)
Pages