ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस - २०१०

Submitted by पराग on 15 January, 2010 - 22:15

जिंकून जिंकून जिंकणार कोण ?

ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस स्पर्धा येत्या सोमवारी म्हणजे १८ तारखेला सुरु होत्ये. हा लेखनाचा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी. (टेनीस बद्दलची इतर चर्चा टेनीसच्या पानावर करता येईल.)
जस्टीनी हेनीनचे ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन होत असल्याने तिच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तसेल नदाल, फेडरर, नोल, विल्यम्स भगिनी, मरे, शारापोवा, डेल-पोर्टो, क्लाइज्टर्स, यांकोविच, आयवानोविच, आपल्या बाई, पेस, भुपती अश्या नेहमीच्या यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीवरही सगळ्यांचे लक्ष असेलच.

तेव्हा टेनीसप्रेमींनो सुरु व्हा.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्सोंगा एक तर टफ मॅच खेळुन आला होता. त्यात समोर फेडी. मग काय त्याने कच आणि हाय दोन्ही खाऊन धीर सोडला Wink खूपच एकतर्फी झाला सामना. They need a bigger net to catch the shark Wink

सहज जिंकला की फेडी.. मलापण वाटलं होतं त्सोंगा ४ सेटर तरी खेळवेल म्हणून Happy

आता मर्‍याला हरवलं पाहिजे...

मला इंटरेस्ट नाही...इच्छुकांनी लाभ घ्यावा...
>>
मला इंटरेस्ट आहे... मी तर तिला म्हणणार की लग्न झाल्यावर तू टेनिस तर खेळच, पण जरा जिंकून पैसे कमवून आण. म्हणजे मग मी कामधंदा सोडून घरी आराम करतो मस्त... Lol

सँटी, तिचा शॉपिंग, व्हेकेशन्सचा खर्च इतका आहे की तुलाच नोकरी करावी लागेल रोजीरोटीसाठी Wink

रच्याकने, इशानला सानियामामी म्हणायला शिकवते आजपासून Proud

आयला.. ह्या वेळी इव्हिनिंग सेशन ला ठेवली का फायनल ? गेल्या वेळ पर्यंत रात्री ९ ET ला असायची..
ठिके पण उठून बघायची शनिवारच आहे.. हाकानाका. Happy

फेडी फायनलमधे!!! हुर्ये!!!

पग्या मेन्स फायनल का बघणार नाही म्हणे? मी तर दोन्ही फायनल बघणारच. विकेंडला दुपारी पडी टाकायला निमित्त सुध्दा मिळेल त्याने Wink

फचिनमामा, लगे रहो Proud

मेन्स फायनल मधे मी दोघांच्याही बाजूने नाही... विमेन्स मधे दोघींच्याही बाजूने आहे.. Happy
हेनीन जिंकावी असं वाटतं आहेच.. पण सेरेनाच्या गेल्या दोन मॅचेस पाहून ती जिंकली तरी आनंदच होईल..
मेन्स मधे कोणीही जिंकलं तरी नो फरक आणि नो सुखदु:ख.. त्यामुळे नंतर हायलाईट्स बघेन.. अर्थात असं आता म्हणतोय.. कदाचित उठून बघेनही पूर्ण मॅच.. Happy

रच्याकने.. सध्या सेरेनाची बारोग्राफी 'ऑन द लाईन' वाचतोय.. सुरुवात तरी चांगलीये...
झालं की मीवापु मधे लिहितो डिटेल्स...

गेल्या वर्षी दोन्ही फायनल्स मी पहाटे उठुन बघितल्या होत्या (असे मला आठवतेय) Happy

बर मी आणि पन्ना तुला कॉकॉ करु मेन्स फायनल सुरु झाल्यावर Proud

रच्याकने.. सध्या सेरेनाची बारोग्राफी 'ऑन द लाईन' वाचतोय..>> सेम पिंच, मी पण वाचतेय.. संपत आलयं.. ओपन पण वाचलं. खूपच प्रामाणिक वाटलं मला.
सँप्रासच लायनीत आहे.

शॅरापोव्हाची फायनल दोन्ही वेळा संध्याकाळी होती... ते नक्की.. मागच्या वर्षी मेन्स फायनल मी पुण्याला पाहिली होती.. जी तिथल्या २ ला वगैरे पाहिली होती..

पहील्याच गेम पासून मस्त सुरवात झालीये! जस्टीन चांगलेच प्रेशर टाकतेय सरेनावर!

आणि जस्टीनचा एक वाइल्ड गेम.. ३-१ सेरेना

बस्के, फक्त आपण दोघी बघतोय?
सिंडे, पग्या, फचिन, मयुरेश उठा...

मी आहे मी आहे :).. पहिला सेट सेरेनाने घेतलाय.. दुसरा सेट हेनीन जिंकली.. आता तिसर्‍या सेटमध्ये खरी धमाल. चला लावा अंदाज.. कोण जिंकेल? माझ्या मते जस्टीन Happy

सेरेना जवळ जवळ हरलेल्या मॅच घशात घालण्यात पटाईत आहे. त्यामुळे हेनिनसाठी फिंगर्स क्रॉस्ड Happy

आता शेवटचे दोन गेम काय खेळली हेनिन. मस्त.

सेट ऑल!!! सही!!!

जस्टीन जिंकावी अशी खूप इच्छा आहे. पण समहाऊ सेरेना जिंकेल असं वाटतय.. बाई बिग पॉईंटस खेळण्यात पटाईत आहेत. तिचा सर्विस गेम कसा होतो त्यावर अवलंबून आहे बरच..

सेरेना जवळ जवळ हरलेल्या मॅच घशात घालण्यात पटाईत आहे..>>> खरय.. पण तरी गट फीलिंग आहे की जस्टीन जिद्दीच्या जोरावर मारेल मॅच... Happy

Pages