ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस - २०१०

Submitted by पराग on 15 January, 2010 - 22:15

जिंकून जिंकून जिंकणार कोण ?

ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस स्पर्धा येत्या सोमवारी म्हणजे १८ तारखेला सुरु होत्ये. हा लेखनाचा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी. (टेनीस बद्दलची इतर चर्चा टेनीसच्या पानावर करता येईल.)
जस्टीनी हेनीनचे ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन होत असल्याने तिच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तसेल नदाल, फेडरर, नोल, विल्यम्स भगिनी, मरे, शारापोवा, डेल-पोर्टो, क्लाइज्टर्स, यांकोविच, आयवानोविच, आपल्या बाई, पेस, भुपती अश्या नेहमीच्या यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीवरही सगळ्यांचे लक्ष असेलच.

तेव्हा टेनीसप्रेमींनो सुरु व्हा.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५=२ सेरेना..

जस्टीनचे सगळे डबल फॉल्ट्स अगदी मोक्याच्या वेळेस झालेत. आणि ज्या ज्या गेम मधे हे फॉल्टस झालेत ते ते गेम सेरेना ने ब्रेक केलेत..

श्या.. हरली जस्टीन :(. तिसर्‍या सेटमध्ये वाटली तितकी टफ नाही देऊ शकली सेरेनाला..सेरेना मस्त खेळली...सेरेनाने पुन्हा एकदा सिध्द केलं शी इज द बेस्ट... Happy

उद्या पुन्हा एक मस्त फायनल.. फेडी आणि मरे.. ऑल द बेस्ट फेडी.. Happy

जस्टिनची फर्स्ट सर्व चांगली नव्हती आज. ६ डबल फॉल्ट्स बाकी स्टॅटस् सारखेच आहेत दोघींचे.

अभिनंदन सेरेना !!! गूड रन जस्टिन !!!

उद्या मरे जिंकला तर हे दोघे विनर्सच्या बॉल डान्सला फारच विजोड दिसतील Proud

सेरेना, अभिनंदन Happy

जस्टीनची ही दुसरी टूर्नामेंट आहे फक्त. वेल डन जस्टीन.

रच्याकने, विनर्स बॉल डान्स फक्त विंबल्डनला असतो.

हो माहितीये. पीजे होता गं तो. स्टेफी ग्राफ एकदा तिचा खास ड्रेस आला नाही म्हणुन बॉल डान्सला गेली नव्हती. मेन्स विनर बहुतेक सॅम्प्रास होता. ती बहुतेक सॅम्प्रासबरोबर डान्स करण्याच्या भितीने गेली नसावी Wink

अरे वा बरेच जण होते की... आम्ही पण बघितली अगदी पहिल्यापासून... Happy जस्टीन दुसरा सेट भारी खेळली.. पहिल्यात सेरेनाने मोक्याच्या वेळी ब्रेक मिळवला अगदी...

सेरेनाच अभिनंदन... व्हेरी वेल डिसर्विंग Happy

दुसरा पण घेतला की रे... जिंकतील ते असं दिसतंय. Happy
पेस आणि ब्लॅक ह्यांचा रँक १ आहे.. पेसचे नाव बघून आनंद झाला Happy

मिक्स्ड डबल्स ३ च सेटची असते का मॅच? माहितच नव्हतं मला..

असो. मेन्स फायनल... स्पर्धेतील क्लायमॅक्स मॅच सुरू झालेली आहे .. Happy

पन्ना एकदम बरोबर !

>>फचिन काय मरेला सपोर्ट करतोय का ?
फचिन. जेवला नाहीस काय? "मरेला" का मग?

मी आणि मरेला सपोर्ट करणार?... कभ्भी नहीं.. मी गेल्या स्पर्धेच्यावेळी त्याला नाही नाही ते बोललो होतो. आठवा जरा.. Proud
अहो मी फेडररचा चाहता आहे.. Happy

मर्‍या नेहमीसारखं किरकोळीत हरणार असं दिसतंय..
फेडेक्सची सर्व्हिस रॉक्स.. गरज असेल तेव्हा उत्तम सर्व्हिस करून गेम घेतो तो खरंच..

४-५ फेडेक्स !! बक् अप फेडेक्स !!

>>मर्‍या नेहमीसारखं किरकोळीत हरणार असं दिसतंय..
होय. २० ब्रिटीश फोटोग्राफर्सना पोझेस द्यायला ह्या सेटमध्ये जरा जोर लावेल. पण गुडघा दुखतोय सांगेल पोस्टमॅच प्रेझेंटेशनमध्ये. Proud

Pages