अभिनव बिंद्राला बक्षिस योग्य वाटते का?

Submitted by हिम्सकूल on 12 August, 2008 - 07:32

अभिनव बिंद्राला महाराष्ट्र राज्य आणि पुणे महानगर पालिकेनी जाहिर केलेली बक्षिसे योग्य वाटतात का?

अभिनव बिंद्राला महाराष्ट्र शासनाने १० लाख तर पुणे महानगर पालिकेने ५ लाख असे बक्षिस जाहिर केले आहे.. ह्या बद्दल तुमचे मत काय आहे..
अभिनव बिंद्रा हा भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिंपिक विजेता आहे हे पूर्णतः मान्य..
भारत सरकार.. पंजाब राज्य सरकार.. किंवा चंदीगड महानगर पालिका ह्यांनी त्याला बक्षिस जाहिर केले तर त्यात काहीच वावगे ठरणार नाही...
पण मग इथे महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगर पालिका ह्यांचा काय संबंध...
अभिनव बिंद्रा हा स्वतः एका कंपनीचा ceo आहे .. तसेच तो एका नामांकित संस्थेचा MBA देखिल आहे.. आणि त्याच्या घरी स्वतःची शूटिंग रेंज आहे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तरी ते फारस पटलेल नाहीये. आज शासनाला खेळाची इतकी आस्था आहे तर होतकरु खेळाडुंना पुढे आणायला हवे. मग जिंकल्यानंतर बक्षिस वाटा.

अभिनव बिंद्रा करोडपती असेलही, पण त्याने केलेली कामगिरी आजपर्यंत कोणालाही जमलेली नाहिय आणि त्याने त्यासाठी तसेच कष्टही उपसलेत. घरी शुटींग रेंज ठेवणे परवडणारे हजारो मिळतिल इथे. पण त्यापैकी क्रिकेट सोडुन इतर खेळांचा विचार मनात आणणारे किती? आणि हे सगळे त्याने स्वतःचे पैसे वापरुन केले आहे. शासन किती मदत करते ते वेळोवेळी क्रिकेटव्यतिरीक्त इतर खेळांडुंनि दिलेल्या मुलाखतीत दिसतेच.

मी तर म्हणेल त्याला ५ पिढ्या पुरेल इतका पैसा दिला पाहिजे.

अर्थात महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगर पालिका ह्यांचा तसा संबंध नाहिय पण जिथे फक्त क्रिकेटलाच डोक्यावर घेऊन नाचतात तिथे दुस-या खेळांमधे आंतरराष्ट्रिय स्तरावर कामगिरी केली तर किमानपक्षी थोडेफार पैसे मिळतात हे बाकिच्या खेळांत रुची / गती असलेल्या गरिबांना कळू देत ना.... निदान त्या आशेने तरी लोक इतर खेळांकडे पाहतील.

शिवाय, सामान्य कुवतीच्या आणि आधीच करोडपती झालेल्या क्रिकेटरांना जर कोट्यावधी रुपये सहज मिळताहेत तर असामान्य कर्तृत्व दाखवलेल्या अभिनवला का नये मिळू? शेवटी सगळा पैसा सामान्य जनतेचाच आहे. कधीतरी चांगल्या हातीसुध्धा पडू दे की.

कोणी म्हणेल, सतत क्रिकेटशीच तुलना कशाला, तर त्याचे उत्तर फक्त तोच एक खेळ आपल्याकडे मानाने खेळला जातो म्हणुन. बाकिच्या खेळांना जर मान असता तर हॉकीत झाली ती नामुष्की झाली नसती.

साधना

महाराष्ट्र सरकारने इनाम जाहिर करणे म्हणजे केवळ दिखाऊपणाच आहे. हेच पैसे त्यांनी महाराष्ट्रातल्या नेमबाजांच्या सोयीसुविधांसाठी, सरावासाठी, चांगल्या प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून दिले असते तर तो खर्‍या अर्थाने अभिनव बिंद्राचा सत्कार ठरला असता.
पण आता खरी कसोटी अभिनवचीच आहे. ह्या सगळ्या बक्षीसाच्या रकमेचा तो कसा विनियोग करतो ते पाहायचे. त्याला आणि त्याच्या सहकारी खेळाडूंना काही मिळवण्यासाठी झगडावे लागले तसे पुढच्या पिढीला झगडावे लागू नये असे काही त्याने केले पाहिजे असे मला वाटते.

पुणे पालिकेनं दिलेल्या ५ लाखांमागे खरा शोध घेत गेल्यास या गोष्टीला पवार-कलमाडी राजकारणाचा वास येतो आहे, हे एखाद्या पढतमुर्खालाही कळेल!
पण तरीसुध्दा काहीच बिघडलं नाही.
आपण रस्त्यानं जाताना बघतोच ना? लाखो रुपयांचं नुकतंच केलेलं डांबरीकरण उकरून काँक्रिटीकरण चालू आहे; अन केलेले काँक्रिटीकरणही फोडून आतल्या केबल्स्-डक्ट्स्-वाहिन्या-गटारे दुरूस्त करणं चालू आहे ते? तिथं दोन सेकंद थांबून निर्विकार मनानं तिथनं चालू लागतो.
कारण तेवढ्यात सिग्नल पडलेला असतो.
--
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!

मंजु, आतापर्यंत तसे झाले नाही आणि यापुढेही होणार नाही.

साजिरा - मलाही तेच म्हणायचं आहे.... सामान्य जनतेचे एवढे पैसे असे वाया जाताहेतच. यावर्षी नव्या मुंबईत बनवलेला एकही नवा रस्ता पहिल्या पावसानंतर टिकला नाही. पैसे मात्र तेवढेच लागले ना जेवढे चांगला रस्ता बनवायला लागतात? मग त्यातलेच थोडे पैसे, देशाचे नाव उजळवणा-या एका वीराला दिले तर काय बिघडले??

अर्थात सुवर्णपदके मिळवण्याचीच आपली परंपरा असती, जशी अमेरिका, चिन यांची आहे, तर मी नक्कीच विरोध केला असता, उगाच लाड कशाला करता म्हणुन. पण ज्या परिस्थितीत बिन्द्रा ने पदक मिळवले ती पाहता त्याचा गौरव होणे गरजेचे आहे.

गौरव होऊ नये असे म्हणणे नाहीच आहे.. गौरव तर झालाच पाहिजे.. आणि तोही यथोचित.. भारत सरकारला पण त्याचा गौरव कसा करावा हे कळत नसणार आहे.. खेळाडूंसाठी असलेले अर्जुन पुरस्कार आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार आधीच देऊन झालेले आहेत.. आता बहुतेक पद्मश्री, पद्म भूषण अशासाठी त्याची शिफारस केली जाईल....
.
महाराष्ट्र शासनाने कुठल्या आधारावर गौरव केला. त्यात कलमाडी आणि पवार ह्यांच्या राजकारणाचा वास तर येतोच आहे... आज पुण्यात ठिकठिकाणी बिंद्राच्या अभिनंदनाचे बोर्डस लागले आहेत पण सोबतीला कलमाडी आणि सोनिया गांधीही आहेतच..
.
मंजू.. तू खूप मोठे दिवा स्वप्न बघती आहेस.. अगदी अभिनव बिंद्रा उद्योजक असला तरीही तो दुसर्‍या कोणासाठी काही करेल किंवा खेळासाठी काही करेल असे मुळीच वाटायला वाव नाही आहे.. अर्थात त्याची असलेली शूटींग रेंज तो त्याच्या बरोबर भारतीय चमूत असलेल्या खेळाडूंना तरी वापरू देतो की नाही काय माहित..
आणि अजुन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शूटींग हा खेळ प्रचंड महाग आहे... त्या खेळासाठी लागणारे साहित्यच एवढे महागडे आहे की ह्या खेळाच्या मागे कोण लागणार हाही मुद्दा आहेच..
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

असा हलकट प्रश्न त्या 'विशिष्ट' शहरातूनच विचारला जाऊ शकतो!
अभिनवचा प्रत्येकाला अभिमान आहे. कौतुक आहे. काही शुभेच्छा देऊन व्यक्त करतात. ज्याना शक्य आहे त्यानी आर्थिक मदत देऊनही व्यक्त करावा. एक बिन्द्राचे सोडा त्याचे वडील आय ए एस अधिकारी होते. बी आय सी सी चे पदाधिकारी होते . त्याची स्वताची शूटिंग रेन्ज आहे म्हणून त्याला पैसे बक्सीस देऊ नये असे म्हणणे म्हणजे शुद्ध वेडगळपणा आहे. शूटिंगच्या प्रशिक्षकाला किती पैसे द्यावे लागतात माहीत आहे का? अमिरातीचा गोल्ड मेडालिस्ट ५ कोटी देत होता . राजवर्धनला दीड कोटी द्यावेलागले. म्हणून आर्मीने नियम बाजूला ठेऊन राजवर्धनला जाहिरात करायची परवानगी दिली. आणि वर ४० की काय लाखही दिले. ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळते पण पैसा मिळत नाही म्हणून ज्याना शक्य आहे त्या संस्थानी अवश्य मदत केली पाहिजे. शूटिंगचे अम्युनिशन किती खर्चिक असते हे त्यातल्या लोकाना विचारा.
चीनमधले बॅड्मिन्टनची मुले खाली पडलेले शटल उचलीत देखील नाहीत.

पूर्वी ज्याच्याकडे लग्नादी मंगलकार्य असे त्याला आर्थिक रूपाने आहेर करून अप्रत्यक्ष मदत केली जायची. तसे कौतुक करताना शक्य तिथे पैसे दिलेच पाहिजेत्.आमचे एक मित्र हॉस्पिटलमध्ये भेटायला जाताना हजार दोन हजार रुपये घेऊनच जातात. हळूच बाजूला जाऊन सांगतात गरज नसली तरी राहू द्या नन्तर परत करा. त्याना ते शक्य आहे म्हणून करतात पण ज्याना शक्य आहे ते सगळे करीतही नाहीत.
म्हणे अमक्या तमक्याच्या वादाचा वास येतोय!

याना गुलाबातून देखील शौचालयाचाच 'वास' येणार!!

कौतुक करतानाही प्रान्तवाद मनात आणणार्या या नराला तुकारामाने काय केले असते ते तुकारामच जाणे.....

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

हो अगदी बरोबर. मी तर म्हणेन की के.न्द्र सरकार आणि समस्त राज्य सरकारा.नी आपले आधीचे अर्थस.न्कल्प रद्द करावेत. नव्याने अर्थ स.न्कल्प बनवावेत. आणि कमीत कमी बजेटमधील ५० टक्के रक्कम अभिनवला भेट म्हणून द्यावी. सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामप.न्चायती ह्या.नीही हाच कित्ता गिरवायला हवा. नागरिका.न्करता वीज, पाणी, रस्ते, शिक्षणपेक्षा ह्या गुणी वीराचे कौतुक करणे महत्त्वाचे.
अभिनवचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस हवा. प्रत्येक गावात त्याचे पुतळे उभारावेत. मगच त्याचा खरा गौरव होईल नाही का?

साधनाल अनुमोदन!! एखादा खेळाडू करोडपती आहे म्हणुन त्यल बक्शिस देउ नये म्हनजे कहितरिच . बकिचे करोद्पति असा कहि परक्रम कर्तात का? आणी त्यच्या बक्शीसाचे त्याने काय करायचे हा त्याचाच प्रश्न आहे. बकिचे कोन त्यल सान्गनारे? आणि त्याने ति रक्कम स्वत: सठी वापरली तर त्यह्च पराक्रम कमि होतो का?
फुलरानी

गौरव होऊ नये असे म्हणणे नाहीच आहे.. गौरव तर झालाच पाहिजे.. आणि तोही यथोचित..
आणि परवडेल एव्हढा! 'उचित' काय हे कोण ठरवणार? निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी ते ठरवलेच आहे की!
शेंडेनक्षत्र, तुमची सूचना रास्त आहे, उरलेली अर्धी रक्कम, परवा क्रिकेटमधे तीन पैकी एक कसोटी सामना जिंकण्याचा महापराक्रम करणार्‍या सचिन, द्रविड इ. ना त्यांनी काढलेल्या एकेक धावेमागे दहा कोटी रुपये, घेतलेल्या एकेक विकेटमागे पन्नास कोटी रुपये अशी बक्षिसे देण्यासाठी वापरावीत. अगदीच काही नाही तर बारावा खेळाडू असणार्‍याला काही लाख तरी द्यावेच.
त्यातून काही उरलेच तर मंत्री व त्यांचे कुटूंबीय यांना अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, स्वित्झर्लँड इ. देशात 'गरीब लोकांना मदत कशी करावी' यावर चर्चा करण्यास पाठवण्यासाठी वापरावे.
जर कुणि म्हणाले की अहो रस्तादुरुस्ति, गरीबांना मदत, इ. साठी पैसा नको का, तर म्हणावे की आमचे अंदाजपत्रक आधीच तुटीत आहे, पैसे कुठून आणावेत? ते काम आमटे आदि लोक खाजगी क्षेत्रात करत आहेत, त्यांनीच करावे.

या सर्व जाहीर झालेल्या रकमा त्याच्या पर्यंत पोहोचतील? अभिनवने सुवर्ण पदक मिळवल्याचे कौतुक व्हायलाच हवे,
भारत सरकारने अभिनवचा यथोचित सत्कार करावा. तो लक्ष्मीपुत्र (हा त्याचा दोष आहे?) आहे म्हणुन आर्थिक स्वरुपात ब़क्षिस नको असे मला वाटत नाही, तो एक कौतुकाचा/ गौरवाचा भाग आहे. पण म्हणुन काही प्रत्येक नगरपालिकेने/ राज्य सरकारने 'आर्थिक' स्वरुपातच ब़क्षिस रकमा जाहीर करुन कौतुक/ गौरवाचा हाच एकमेव मार्ग आहे असे भासवायची अवशक्ता नाही.

महाराष्ट्रासारख्या राज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना असे पैसे वाटणे उचीत नसेल, परंतु दरवर्षी करोडो रुपये खड्ड्यात (खड्डे दुरुस्तीसाठी) घालणार्‍या महापालीकेला ५/१० लाख देश गौरवासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या खेळाडुला द्यावेसे वाटत असेल तर विरोध होउ नये.
---------------------------------------
मी मराठी .. मी मराठी ... मी मराठी ....

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी

हिम्या, तुला ५००% अनुमोदन!!
.
प्रश्न अभिनवच्या गौरवाचा नाहीच आहे. तो यथायोग्य पद्धतीने व्हायलाच हवा आणि होईलही.... पण खेळाबद्दलची हीच आस्था, तळमळ महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या खेळाडूंबद्दल दाखवावी एवढीच माफक अपेक्षा आहे.
कोणाच्या तरी हुकुमावरून स्पर्धा लागल्यासारखं बक्षिस जाहिर करणे ह्याला आमचा विरोध आहे.

प्रश्ण गौरवाचा नाहीये. त्याचा यथोचित गौरव ह्यायला हवा ही माझी पण इच्छा आहे. पण त्याने त्याच्या प्रशिक्षकांची फी महागडी आहे म्हणुन बक्षीस द्यावे हे काही पटत नाही. ते शुटिंग रेंज गरीब व होतकरु तरुणांना पण वापरता यायला हवी. नाही तर ज्याच्या कडे आधीचा पैसा आहे इच्छा आहे फक्त तेच मग खेळु शकतील असे नको. ह्या पदकामधुन आपण सुद्धा पदक जिंकु शकतो. हा आत्मविश्वास महत्वाचा. त्यासाठी त्याच्या जवळ चे resources सर्व सामान्य जनतेला कसे उपलब्द होतील ते बघणे महत्वाचे.
शुटींग रेंजला अभीनव चे नाव देणे. इथवर सगळ ठिक आहे. पण म्हणुन पुणे महानगर पालीकेने ५ लाख द्यावे हे काही पटत नाही

आयला, भारीच विषय की! झक्कास.....!
बिन्द्राबद्दल मला आदर हे! त्याला काही एक बक्षीसे मिळाली तर माझ्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही!
प्रश्ण हे की हे जे देणारे हेत, त्यान्ची बक्षिस देण्यामागचे "हिडन" हेतू/उद्दिष्टे काय हेत, बक्षीस देण्याची त्यान्ची लायकी हे का याचा विचार मात्र केलाच पाहिजे असे वाटते!
अनेक राज्यान्चे/प्रान्ताचे मिळून बनलेल्या भारत नामक देशास नेमके पुस्तकी शब्दात काय म्हणावे ते माहीत नाही (सन्घराज्य की काय..!) पण, जेव्हा अमुक एखादी व्यक्ती "भारत देशाचे" प्रतिनिधित्व करीत काहि एक यश मिळवते तेव्हा त्या व्यक्तीचा यथोचित सन्मान करण्याचे सर्वप्रथम उत्तरदायित्व हे या "भारत देशाच्या" केन्द्र सरकारचे आहे हे कोणासही अमान्य नसावे!
मग बाकी राज्ये व स्थानिक प्रशासने केन्द्राच्या प्रथम अधिकारास डावलून, वा त्या अधिकारास मागे टाकत "जनतेच्या" पैशातून खिरापतीसारखी बक्षिसे वेगवेगळ्या हिडन हेतून्नी जाहीर करत सुटतात (खरोखर पोचतात की नाही शन्काच हे! Proud ) तेव्हा त्यास आक्षेप घेणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्यच हे! आता "अस्ले सुजाण नागरीक" त्या 'विशिष्ट' "पुणे" नामक शहरातच जास्त सन्ख्येने हेत, त्याला कोण काय करणार! Proud
.
हे जी खिरापत वाटतात ना, ते बघुन मला एका गोष्टीची आठवण झाली....... बघा हं!
रस्त्यावरच्या डोम्बार्‍याचा खेळ कुणी बघितला हे का? अगदी गेला बाजार रस्त्याकडेला समोर चिरगुट पसरुन बसलेला भिकारी?
तर; डोम्बार्‍याचा खेळ झाला की तो पैशाकरता थाळी पसरुन लोकान्पुढे जातो, थाळीत जर बरेच पैसे आधीच अस्तिल, वा पैसे "टाकणारे" त्या डोम्बार्‍याने नेमलेलेच कुणी असेल, तर इतर बरेच जण बहुदा इर्ष्ये पोटी, वा नेमेलेल्या लोकान्नी टाकलेल्या पैशाकडे बघून लाजेकाजेस्तव थाळीत कितीची नाणी वा नोटा हेत हे बघत बघत आपलेही दान त्या डोम्बार्‍याच्या पदरात टाकतात.
हीच बाब भिकार्‍याची..... मी स्वतः प्रत्यक्ष अनेक वेळेस बघितले आहे कि भिकारी चिरगुटावर थोडी नाणी आधीच पसरुन टाकतो, अगदी सिग्नलला भेटणारे "प्रोफेशनल" भिकारी सहसा हाताचा रिकामा पन्जा पुढे करीत नाहीत, तर त्यात एखाददोन तरी नाणी, सहसा जास्त रकमेची, ठेवतातच! (रिकाम्या हाती कुणाकडे जाऊ नये असे म्हणतात, तसच "रिकाम्या हाती भिक मागू नये" असा रिवाज असेल त्यान्च्यात Proud )
तर, इतरान्नी केलेला "दानधर्म" बघुन आपणही मागे नाही, कमी नाही हे दाखविण्याकरता सामान्य जन्तेचा हात आपसुक स्वतःच्या खिशात जातो व डोम्बारी वा भिकार्‍याची कमाई होते!
मी हे उदाहरण केवळ यातील एका "भावनेचा" प्रकर्षाने उल्लेख करण्याकरता दिले आहे...... आक्षेप हे तो इतरान्नी केलेला "दानधर्म" बघुन आपणही मागे नाही, कमी नाही हे दाखविण्याकरता व अन्धानुकरणातून, दुसर्‍याच्या खिशातून अर्थात जनतेच्या पैशातून वाटलेल्या खिरापतीकरता.....!

जर काही द्यायचेच असेल तर ते केन्द्रसरकारच्या ताब्यात देऊन सर्वान्चे मिळून एक असे का दिले जात नाही??
पुण्यासारख्या कोपर्‍यातील महापालीकेने असे द्यायची खरोखरच गरज हे का जेव्हा पुणे मनपा असलेल्या बालभवन्/क्रिडाग्रामची वाट लावत आहे/अस्ते?
.
बर यान्नी वाटलेल्या खिरापतीला "प्रतिष्ठा" तरी काय हे?
या देशात अनेक सन्मान दिले जातात, त्यातिल काहीन्ना पैशात काही मुल्य फारसे नसले तरी ते अत्यन्त मानाचे समजले जातात!
काही पुरस्कारान्ना मान व मुल्य, दोन्ही अस्ते
पण कावळ्याच्या उगवणार्‍या छत्रीप्रमाणे प्रसन्गोपात, अचानक, केवळ आणि केवळ (जनतेच्या) पैशाचे मूल्य असणार्‍या या तथाकथित "सन्मानान्ची" खरोखरच त्या विजेत्याला तरी काही "किम्मत" असेल का?
.
देण्याबद्दल काहीच हरकत नाही, पण पुन्हा तेच, स्वतःच्या जीवावर शिका, लढा व जिन्का! जिन्कलात तर(च) तुमची थोडीफार दखल, बाकी सगळीकडे आनन्द! ही आमची सर्वदूर प्रथा........ कशाला वाटेल त्या "बक्षीसान्चे" तरी कौतुक?
.
आजही अनेक खेळाडू, विजेते वा तसेच, असेही हेत की ज्यान्ना खरोखरच आर्थिक सहाय्याची आवश्यकता हे! पण तिकडे त्याबाबतीत लालफितीचा कारभार करणार्‍यान्च्या अन्गात शिरलेल्या या अचानक बक्षिसवाटपाच्या "बर्ड फिवर" चा मात्र काही एक इलाज करावासा वाटतो!
.
बिन्द्रा करोडपती हे की नाही हा विषयच नाही, त्यास पैशाची आवश्यकता हे की नाही हा ही विषय नाही, त्यास त्याने केलेल्या कामगिरीबद्दल काहीएक सन्मान मिळालाच पाहिजे, होय, अगदी रोख व कागदी सर्टीफिकटाच्या स्वरुपात, पण हे होताना देशातील अन्य असन्ख्य होतकरू खेळाडू/सामान्य जनता यान्च्या आसुसलेल्या नजरान्मधे निराशेचे अन्जन घातले जात नाहीना याची काळजी प्रत्येकच प्रशासनाने घेतली पाहिजे व आपली जबाबदारी बघुन वागले पाहीजे
उगाच चारजण करतात म्हणुन "हलवायच्या घरावर तुळशीपत्र" या न्यायाने "बक्षिसे" जाहीर करत सुटू नये!.
येवढेच कौतुक असेल, तर बिन्द्राला, पुणे शहरी बोलवावे सत्कारासाठी, पालिकेच्या निधीसहीत, पुण्याच्या रस्तोरस्ती पैसाफन्ड प्रमाणे पैसे गोळाकरायला कलमाडी प्रभुतिन्नि हाती कटोरा घेवुन उभे रहावे, आणि मग तो निधी, जर बिन्द्राने सत्काराचे आमन्त्रण स्विकारुन तो इथे आला, तरच त्यास सुयोग्य हस्ते द्यावे! (व हे करताना जिथे तिथे केवळ आपले व आपल्या पक्षाच्या प्रमुखाचे/प्रमुखीचे मुखडे न झळकवता, बिन्द्राचा सत्कार हा पक्षीय सत्कार नसून, पुणेकर जनतेतर्फेचा, देशाभिमानाचा सत्कार हे याचे भान ठेवुन वागावे)
पण हे होईल का?
.
एनिवे, मी तरी मागे का राहू? माझ्या ऐपतीप्रमाणे, सारासार विवेकबुद्धिप्रमाणे, मी देखिल माझ्याकडून रुपये सव्वा अकराचे बक्षीस जाहीर करतो! Happy (कुठे कसे पाठवावे, कोण सान्गु शकेल का?)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

बिंद्राला सत्कार पैशाच्या रुपात होऊ नये असे, तो पैसा गरिबांना वाटावा, शेतकरी आत्महत्या करताहेत वगैरे ठिक आहे. पण आपल्याकडे आयपीएल ची सर्कस चालु होती तेव्हाही हे सगळे होतेच. आणि आयपिएल मधल्या खेळाडुंना धावेमागे किती पैसे मिळत होते हे सामना चालु असताना दुरदर्शनवर दाखवले जात होतेच. तेव्हा कोणी हे चुकीचे आहे, शेतकरी आत्महत्या करताना पैशाचा असा विध्वंस बरा नाही, हा सगळा पैसा देशकार्यासाठी वापरावा असे म्हटले नाही. हा पैसा कुठच्या महापालिकेने दिला नसेल, पण होता तर सामान्य माणसाचाच ना?

खरेतर, देशकार्यालाच ज्यानी कुटुंबियांसकट वाहुन घेतले होते अशी मंडळीच पुढे होती पैसा कमावण्याच्या कामाला. आयपिएलच्या फायद्यामधील अमुक एक टक्के देशकार्यासाठी देण्याची घोषणाही ऐकू आली नाही. उलट, त्यावर आयकर भरावा लागु नये यासाठी उचापत्याही त्यांनी केल्या असतील, माहीत नाही.

इतक्या वर्षात जे घडले नाही ते एकाने स्वबळावर केले तर त्याचा गौरव व्हावा. त्यासाठी पैशाची कमतरता नसावी.

तो पैसा इतर खेळाडूंसाठी वापरावा तर तसे आधीच करता आले असते की, त्यासाठी ऑलिम्पिकचे पदक जिंकण्याची वाट कशाला पाहा? आणि तो पैसा काय पदक मिळाल्यावर निर्माण झालेला नाही. तो आधीपासुन होताच की. आता तो बिंद्राला मिळाला नाही तर तो कोणितरी लोकप्रतिनिधी खाणारच आहे, कुठल्यातरी देशकार्याचेच नाव घेऊन. मग मिळूद्या की बिंद्राला.

लिंबुटिंबु, तुमचे भिका-याचे/डोंबा-याचे उदाहरण अजिबात आवडले नाही. ती भावना खोटी आहे म्हणुन नव्हे, तर बिंद्राला भिका-याचे/डोंबा-याच्या लायनीत आणले म्हणुन. एक जण देतोय म्हणुन सगळे देताहेत हे खरेच आहे, पण मुळात बिंद्राने काही अपेक्षा केलीच नाहिय. त्याने स्वबळावर हे पदक कमावले आहे. हे सगळे पैसे मिळाले नसते तरी त्याला काहीच फरक पडत नसता.

अभिनवने दुस-या खेळाडूंसाठी काय केले हे पाहण्याआधी, त्याच्यासकट सगळयांसाठीच काही करण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या क्रिडा मंत्रालयाने, आणि पुढे पुढे करणा-या कलमाडींनी काय केले ते पाहणे मनोरंजक होईल. राज्यवर्धनला दिड कोटी स्वतः का द्यावे लागले? त्यातला काही भार नाही उचलता आला या लोकांना? अगदी हल्लीच अंजली भागवतने एका मुलाखतीत, कोच साठी कलमाडींच्या मागे लागुनही काही होत नाही पाहुन स्वतःच्या सहका-यांबरोबर पैसे गोळा करुन कोच आणला असे सांगितले होते.

कुठल्याही क्षेत्रात मनापासुन काहीच न करणा-या सरकारची वृत्ती अचानक बदलेल ह्यावर माझा अजिबात विश्वास नाही. १९८२ मध्ये एशियाड भरवले तेव्हा याच लोकांनी, एशियाडमुळे लोकांना नवीन खेळ समजतील, भारतात खेळांचे सुवर्णयुग येईल असे म्हणुन त्या प्रचंड खर्चाचे समर्थन केले होते. ते सुवर्णयुग अजुन अवतरायचे आहे. आजही जे खेळाडु काही चांगले प्रशिक्षण घेऊ शकताहेत ते लोकांनी दिलेल्या पैशाच्या आधारावरच. विरधवल खाडे हे एक चांगले उदाहरण आहे त्याचे. पुढच्या ऑलिंपिक मध्ये पदकाची आशा तो नक्किच करु शकतो. वय त्याच्या बाजुने आहे. पण हे सगळे वैयक्तिक. ज्यांनी करायचे ते काहीच करत नाहीत. त्यांचे लक्ष स्पर्धा भरल्या की आपली किती माणसे अधिकारी म्हणुन पाठवायची ह्यावर. आणि कोणि चुकून पदक मिळवले की त्याचे श्रेय स्वतःकडे घेण्यातच.

अभिनव बिंद्रा हा स्वतः एका कंपनीचा ceo आहे .. तसेच तो एका नामांकित संस्थेचा MBA देखिल आहे.. आणि त्याच्या घरी स्वतःची शूटिंग रेंज आहे.. अगदी अभिनव बिंद्रा उद्योजक असला तरीही तो दुसर्‍या कोणासाठी काही करेल किंवा खेळासाठी काही करेल असे मुळीच वाटायला वाव नाही आहे.. अर्थात त्याची असलेली शूटींग रेंज तो त्याच्या बरोबर भारतीय चमूत असलेल्या खेळाडूंना तरी वापरू देतो की नाही काय माहित.. <<<

हिम्स, तुझी ही वरची माहिती/मत वाचून अभिनव बिंद्राविषयी आणखी जाणून घ्यायची इच्छा झाली आहे. तुला माहित असेल तर लिही इथे.

अभिनवने दुस-या खेळाडूंसाठी काय केले हे पाहण्याआधी, त्याच्यासकट सगळयांसाठीच काही करण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या क्रिडा मंत्रालयाने, आणि पुढे पुढे करणा-या कलमाडींनी काय केले ते पाहणे मनोरंजक होईल. राज्यवर्धनला दिड कोटी स्वतः का द्यावे लागले? त्यातला काही भार नाही उचलता आला या लोकांना? अगदी हल्लीच अंजली भागवतने एका मुलाखतीत, कोच साठी कलमाडींच्या मागे लागुनही काही होत नाही पाहुन स्वतःच्या सहका-यांबरोबर पैसे गोळा करुन कोच आणला असे सांगितले होते.

साधना, हा विषय चर्चेला आणण्यामागे हीच आणि केवळ हीच भावना आहे. अभिनवला पैसे मिळताहेत म्हणून पोटदुखवा अजिबात नाही.

इतक्या वर्षात जे घडले नाही ते एकाने स्वबळावर केले तर त्याचा गौरव व्हावा. त्यासाठी पैशाची कमतरता नसावी. >>> ashbaby, १००% सहमत.
तुमचे सर्वच मुद्दे, (खासकरुन आयपीएल चा) रास्त आहेत. जरी ते पैसे बिंद्राला दिले नाहीत तरी त्यातून काही समाजोपयोगी कार्य होईलच असे नाही.
गौरव करण्यासाठी फक्त पैसे देणे हा एकच मार्ग नसला तरी निदान पैसे बघून इतर लोकांना काही करुन दाखविण्याची इर्षा निर्माण होईल असा विचार योग्य वाटतो.
इतर अनेक ठीकाणी पैसे वाया जात असतात तिथे आपण आवाज उठवतो का ? तिथे वाया जातात म्हणून इथे वाया जावे हे बरोबर नसले तरी आधी निषेध त्याचा करावा जे जास्त अयोग्य आहे.

>>>>>> लिंबुटिंबु, तुमचे भिका-याचे/डोंबा-याचे उदाहरण अजिबात आवडले नाही. ती भावना खोटी आहे म्हणुन नव्हे, तर बिंद्राला भिका-याचे/डोंबा-याच्या लायनीत आणले म्हणुन. एक जण देतोय म्हणुन सगळे देताहेत हे खरेच आहे, पण मुळात बिंद्राने काही अपेक्षा केलीच नाहिय. त्याने स्वबळावर हे पदक कमावले आहे. हे सगळे पैसे मिळाले नसते तरी त्याला काहीच फरक पडत नसता.<<<<<<

माफ करा ऍश, पण तो पॅरा पुन्हा पुन्हा नीट वाचलात तर तुम्हाला जरुर कळेल की मी बिन्द्राला कुणाच्याच लायनीत आणले नाहीये, तर, तुम्हीही म्हणल्याप्रमाणे, "अन्य एक जण देतोय म्हणुन" वा अन्य कारणाने पब्लिकचा पैसा देत सुटलेत त्यान्नाच केवळ "भीक घालणार्‍यान्च्या" लायनीत बसवले आहे! व त्यान्नी त्यान्च्या कृतीने त्या "बक्षिसाची" गत "भीकेप्रमाणे" करुन ठेवली हे!
आणि माझी खात्रीहे, की खरतर ही बक्षिसे जाहीर करणारान्ची लायकी याहून खराब हे, कारण भीक घालणारे निदान स्वतःच्या खिशातून तरी घालतात, जनतेच्या नव्हे!

तुम्हालाच काय, बर्‍याच जणान्ना ते उदाहरण आवडणार नाही, (मलाही आवडले नाहीये) पण काय होते ना? कधी कधी अशी मेचकीच उदाहरणे असतात, त्यान्ना पर्याय नस्तो! Happy
भीकेशी तुलना नको म्हणता, बर, पण जर बिन्द्राची अपेक्षाच नसेल (अर्थातच, हे मान्य केलेच पाहीजे), तर मग या बक्षीसान्ची तुलना कशाशी करू???? दोन नम्बरच्या पैशातून बारबालान्वर उधळल्या जाणार्‍या नोटान्शी??? की अजुन कशाशी??? तूम्हीच कुणीतरी सान्गा!
.
बाकी तुमच्या पोस्ट मधील भावनान्शी सहमत! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

>>>>> गौरव करण्यासाठी फक्त पैसे देणे हा एकच मार्ग नसला तरी निदान पैसे बघून इतर लोकांना काही करुन दाखविण्याची इर्षा निर्माण होईल असा विचार योग्य वाटतो.

वाचक, पैसे बघुन की अजुन कशामुळे इर्षा निर्माण होते हा वेगळाच विषय हे! पण पुणे मनपा हे पैसे देताना, ज्यान्ची ज्यान्ची "मुखकमले" होर्डीन्गवर दाखवत दाखवत जाहिराती करीत हे, त्याचा नि पुणेकरान्च्या अर्थात पुणे मनपाच्या बक्षिसाच्या रकमेचा काय सम्बन्ध???
.
बस्स, त्याने गोल्ड मेडल जिन्कले, एक नविन इव्हेण्ट झाली, सन्धी साधा, पब्लिकचा पैसा बक्षीस म्हणुन द्या, त्यानिमित्ताने जागोजागी होर्डीन्ग वर्तमानपत्रा द्वारे आपली व आपल्या राजकीय पक्षाची जाहिरात करुन घ्या, या पलिकडे पुणे मनपा देत असलेल्या बक्षिसाचा दुसरा अर्थ तरी मला दिसत नाही! (आता खर तर या जाहिराती/होर्डिन्गचा खर्च तरी नेमका कोण करतय, हा अजुन एक खोचक पुणेरी प्रश्ण शिल्लक उरतोच!)
अन याविरुद्ध कोणी बोलले तर "गोल्डमेडलिस्ट बिन्द्राला आम्ही "पुणेकरान्चे वतिने" (?) देत असलेल्या बक्षीसाकरता तुम्हाला पोटदुखी का?" असा भावनिक रन्ग देण्याचे कसब व शक्यता काहि नविन नाही!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मंजू मान्य, मलाही त्याला पैसे मिळावेत असे वाटते कारण ज्या गोष्टी करायच्या त्या केल्या जात नाहीत. मग आता काहीतरी करताहेत, चुकीचे आहे, पण निदान एका खेळाडुचा तरी फायदा होतोय ना..

हे पैसे खेळासाठी वापरले असते तर अधिक योग्य झाले असतेच, पण होणार नाही ना असे.. पैसे देतानाही एकानेही, खेळाबद्दल अवाक्षरही काढलेले नाही. पैशाची घोषणा केली, संबंध संपला. (किती निराशावादी झालेय मी)

खेळाडूंसाठी योग्य साधने आणि सवलती असत्या, आणि मग पदके मिळवली असती तर हा प्रश्न उपस्थित झालाच नसता. ते दिवस कधी दिसणार आहेत आपल्याला?

"जागोजागी होर्डीन्ग वर्तमानपत्रा द्वारे आपली व आपल्या राजकीय पक्षाची जाहिरात करुन घ्या"" >>>> हे करणे चुकीचे आहेच, परंतू राजकारण्यांचा उद्देश काहीही असला तरी सामान्य माणूस राजकीय पुढार्यांची होर्डींग्स बघून नजर मेल्यासारखे तिकडे दुर्लक्ष करतो, पण होर्डिंगवरच्या अभिनव बिंद्राच्या बातमीकडे मात्र लक्ष जाते.
"बक्षीसाकरता तुम्हाला पोटदुखी का" >>> असे मी तरी म्हणलेले नाही. माझे म्हणणे हेच आहे की आधी त्या गोष्टिंविरुद्ध आवाज उठवूया ज्या सर्वांनाच चीड आणण्याजोग्या आहेत.

साधना, लाल फितीचा हस्तक्षेप संपेपर्यंत ते दिवस दिसणार नाहीत...
.
माझ्या माहितीसाठी कोणी सांगेल का की भारतीय ऑलिंपिक प्राधिकरणाने अभिनवला किती रुपयांचं किंवा काय बक्षिस जाहिर केलं आहे?

http://en.wikipedia.org/wiki/Abhinav_Bindra
अभिनव बिंद्र बद्दल थोडेसे..
http://www.iloveindia.com/sports/shooting/shooters/abhinav-bindra.html
अजुन थोडेसे
अजुन काही मिळाले तर तेही देतोच आहे
ह्यात जी लिस्ट दिली आहे त्या नुसार तरी ऑलिंपिक प्राधिकरणाने काहीही दिलेले नाही...

http://yas.nic.in/yasroot/beneficiaries/nsdf.htm
ही लिंक बघा.. यात NSDF नी कोणावर किती पैसे खर्च केले त्याची माहिती आहे.
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

नाही!!!

मुळात हे फक्त जाहीर केले आहे... दिलेले नाही!
हे म्हणजे अगदी कोल्ह्याघरचे जेवण आहे!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

सध्या बिंद्रावर वेगवेगळ्या सरकारांकडून, संस्थांकडून जो बक्षिसांचा मारा होतोय, त्याचा पॅटर्न लक्षात घेतला की मग हा प्रकार योग्य का अयोग्य ते ठरवता येईल. मुळात भारतात बिंद्रासारखे आंतरराष्ट्रीय यश कमवलेले फार थोडे खेळाडू आहेत. त्यात ऑलिंपिक्स पदकासारखा युगे अठ्ठाविसांतून घडणारा चमत्कार झाल्यावर आपापल्या सरकारांची, पक्षांची, संस्थांची ,(आणि अर्थात) स्वत:ची खेळाला/खेळाडूंना कशी प्रोत्साहक, पाठराखणीची प्रतिमा आहे हे बोंबलून सांगायची, प्रतिमा रंगविण्याची घाई उडणारच. कारण त्यातून आपापली समाजप्रतिमा धुवून घेता येते; आपण कसे मोठे सुसंस्कृत, अभिरुचिसंपन्न, उदार आणि पुरोगामी असल्याचं भासवता येतं. त्याकरता कोणालाही मिळालेलं पदक, कोणाचंतरी कुठल्यातरी ध्रुवावर उतरलेलं पॅराशूट, कुणाचंतरी एव्हरेस्टाचा उद्धार करून आलेलं पाऊल, कुठलंही साहित्यसंमेलन, कुठल्याही क्रीडासंघटनेचे पदाधिकार हे मार्ग उत्तम! शिवाय, उभ्या जन्मात केलेल्या कुकर्मांचं क्षालन गंगेत चारदोन डुबक्या मारल्यावर होतं, तसं आधीच्या आपल्या क्रीडासुविधांबद्दलच्या बेपर्वाईचं, खेळ/खेळाडूंसंदर्भातल्या बेरकी राजकारणाचं क्षालन कुणा एखाद्या गुणी, यशस्वी खेळाडूवर केलेल्या खैरातगंगेत आपलेही काही लाख रुपये ओतून होणारच की!

आणि हे सर्व केवळ राजकारणी लोकच करतात असं नाही, सर्वसामान्यांमध्ये मोडणारे तुम्ही-आम्हीदेखील काय वेगळे असतो? कृष्णमेघ कुंटेसारखा एखादा पोरगा विशिष्ट पठडीतल्या अभ्यासाची गोडी नसल्याने नापास होतो, तेव्हा त्याच्यावर 'वाया गेलेला कार्टा' म्हणून शिक्का मारणारे तुमच्या-आमच्यासारखे नातेवाईक-शेजारीपाजारी-मित्रमंडळी-परिचित लोक नंतर मात्र 'तरी आम्हाला वाटतच होतं.. कुंट्यांच्या पोरात काहीतरी स्पार्क आहे खास!' अशी कौतुकांकाला पुस्ती जोडतात. मग आपणतरी काय वेगळे आहोत? लोकशाहीत 'यथा प्रजा, तथा राजा'!

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

सर्वेपि सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरमयह सर्वे भद्राणि पशन्तु मा कश्चिद दुखमाप्नुयात
टिपिकल क्षुद्र अन कोत्या वृत्तीचे प्रदर्शन अशी ही चर्चा आहे

अगदी बरोबर रविभाई. खर्चणार्‍याचं खर्चतं अन कोठीवरच्याचं पोट दुखतं असा हा मामला आहे. आता बिन्द्राला महापालिकेने बक्षीस द्यावे का याबाबत त्या पुण्यातही अगदी रस्त्यावरही ओपिनिअन पोल घेतला तरी बहुसंख्य करदाते द्यावे असेच म्हणणार .तिथे ह्या बुद्रुकाना कोण विचारतो? पण चार भिंतीच्या आत कडाकडा बोटे मोडणार्‍या म्हातारीसारखे ह्यांच्या 'निषेधाचे' रडगाणे चालूच!!!

खरी पोटदुखी याना त्या कलमाडीच्या पोस्टरबद्दल दिसते ते लिम्बूच्या पोस्ट वरून दिसतेच आहे. म्हनजे कलमाडेचा फोटो महत्वाचा तो बिन्द्रा का कोण तो गेला तेल लावत!!!

(अगदी न्यू जर्सी हूनही ह्यात भारताशी काही संबंध नसणायानीही यात तेल ओतावे म्हणजे फारच झाले!!)

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

खरे तर त्या बिंद्राला अनेक पत्रे वारंवार पाठवून विनवा, की बाबारे, तुला महाराष्ट्र सरकार नि महाराष्ट्रातले इतर कुणि जे पैसे दिले आहेत (लिंबूटिंबूंचे सव्वा अकरा धरून) त्यांना धन्यवाद दे, नि ते पैसे महाराष्ट्रातील लोकांनाच मदत म्हणून दे. आमटे, बंग अश्या लोकांच्या हातात दे. राजकारण्यांना मुळीच नको.

(खरे म्हणजे धन्स म्हण. नि हे पैसे मी डोनेटतो असे म्हण. महाराष्ट्रियांना कुठलीच भाषा धड येत नाही, ना हिंदी , ना मराठी ना इंग्रजी. सगळ्याचे कडबोळे करून बोलतात ते! शक्यतो मराठी शब्द कमी वापर. मराठी ही अडाण्यांची भाषा आहे असे ते समजतात!) .

Pages