अभिनव बिंद्राला बक्षिस योग्य वाटते का?

Submitted by हिम्सकूल on 12 August, 2008 - 07:32

अभिनव बिंद्राला महाराष्ट्र राज्य आणि पुणे महानगर पालिकेनी जाहिर केलेली बक्षिसे योग्य वाटतात का?

अभिनव बिंद्राला महाराष्ट्र शासनाने १० लाख तर पुणे महानगर पालिकेने ५ लाख असे बक्षिस जाहिर केले आहे.. ह्या बद्दल तुमचे मत काय आहे..
अभिनव बिंद्रा हा भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिंपिक विजेता आहे हे पूर्णतः मान्य..
भारत सरकार.. पंजाब राज्य सरकार.. किंवा चंदीगड महानगर पालिका ह्यांनी त्याला बक्षिस जाहिर केले तर त्यात काहीच वावगे ठरणार नाही...
पण मग इथे महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगर पालिका ह्यांचा काय संबंध...
अभिनव बिंद्रा हा स्वतः एका कंपनीचा ceo आहे .. तसेच तो एका नामांकित संस्थेचा MBA देखिल आहे.. आणि त्याच्या घरी स्वतःची शूटिंग रेंज आहे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी बरोबर रविभाई.
---- अहो टोणगे, ते त्यांनी उपहासाने लिहीले असण्याची शक्यता आहे.

सर्वेपि सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरमयह सर्वे भद्राणि पशन्तु मा कश्चिद दुखमाप्नुयात
स्पष्टिकरण
मी हे मुळीच उपहासाच्या भावनेने लिहिलेले नाही.

मंजुडी, हे खास तुझ्यासाठे पोस्ट करते आहे. १७ ऑगस्ट्च्या The Economic Times मध्ये अभिनवच्या interviewमध्ये वाचलं

In what way do you think you will like to contribute and give back to the society, especially your fellow athletes ?

I want to give back to the country and the athletes by giving talented people the opportunity. There is a lot of talent in India. We have a family trust by the name of Abhinav Sporting Trust (estd in 2001), through which we plan to select budding talents from different sporting disciplines and nurse and support them in their uphill sporting journey. I am not sure whether we will take the support of government or business community.

अरे व्वा!! आर्च, धन्यवाद.
त्याच्या ब्लॉगवर पण मी त्याची ही अशी मनोकामना वाचली होती. त्याच्या ह्या भरीव प्रकल्पासाठी त्याला अनेक शुभेच्छा!!

खरे तर पुढे-मागे अभिनवला ह्या खेळासंदर्भात काही अडचणी आल्यास सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे, सध्या फक्त पद्म वगैरे गौरव पुरस्कार दिले तरी पुरे. पण आपल्या सरकारची स्मरणशक्ती अशक्त असल्याने आत्ता लगेच पैसे दिले ते ही बरेच आहे. आता अभिनववर जबाबदारी की तो त्या पैशांचा विनियोग कसा करतो. नाहीतर - आपल्याच देशातल्या एक बाई रोम आणि कुठे कुठे सुट्टी साजरी करतात सारख्या आणि Olympics सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतुन मनगट दुखावले म्हणुन खेळतच नाहीत - तसे व्हायला नको.
.
पण्....ह्या सगळ्यात पुणे महानगरपाका कुठे येते ते कळाले नाही. अभिनवच्या यशाने प्रभावित होउन पुण्यात एक मोफत किंवा कमी खर्चाचे प्रशिक्षण केंद्र उघडले तरी समजु शकतो.
.
तसेच वर कुणीतरी पुण्यात जागरुक लोक असण्याचा उल्लेख केला. आता पुण्यातच अशा प्रकारचे पैसे देण्याचे जाहीर झाल्याने पुण्यातल्या लोकांनी आवाज उठवला तर काय नवल ? करदाते म्हणुन त्यांचेच आहेत ना हे पैसे Happy

न्यू जर्सी हूनही ह्यात भारताशी काही संबंध नसणायानीही यात तेल ओतावे म्हणजे फारच झाले!!)

भारताशी संबंध नाही कसा? जर इथे येऊन भारतीय बातम्यांबद्दल वाचतो, तर त्यावर लिहीणारच. नि आगीत तेल काय? क्कैच्या क्कैच्च लिहायचे?

आता तुमचा तरी त्या अभिनवशी नि सरकारी कामकाजाशी काही संबंध? इथे लिहिता ते तुमच्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींना लिहून कळवा. ते तुमच्या पत्राची काय किंमत करतात ते कळले म्हणजे स्वत: ला एव्हढे शहाणे समजता तेव्हढे नाही आहात हे कळेल!

महाराष्ट्र टाईम्स
माझ्या मातीचे गायन
22 Aug 2008, 0014 hrs IST
-- संजय परब

अभिनव बिंदाच्या रूपानं १०८ वर्षांत पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळाल्याचा आनंद जेवढा आहे, त्यापेक्षा दुप्पट हर्ष सुशीलकुमार व वीजेंदरकुमार यांच्या पदकांनी ११५ कोटी भारतीयांना झालाय...

का माहितेय?

कारण ऑलिम्पिक खेळ आता खऱ्या अर्थाने तळागाळात झिरपायला लागलेत, याची साक्ष मिळाली. खेळाडू घडवण्याची भारतीय स्पोर्ट्स सिस्टम आहे, त्याचे अभिनव हे काही फळ नाही. गर्भश्रीमंत घरात जन्मलेल्या या राजपुत्रामध्ये नेमबाजीचे उपजत गूण होते. ते हेरले त्याच्या उद्योगपती वडिलांनी. नंतर गेली २० वर्षं त्याला नेमबाजीसाठी जे जे काही हवंय ते ते त्यांनी दिलं. या साऱ्याचं अभिनवनं चीज केलं...

पण, जिथं महिना कसाबसा ढकलण्याची कसरत करावी लागते अशा कुटुंबात जन्मलेल्या सुशील व वीजेंदर यांनी मिळवलेल्या पदकाला अस्सल भारतीय मातीचा गंध आहे. सुशीलचे वडील व्यवसायानं ड्रायव्हर आणि आवड कुस्तीची. परिस्थितीशी झुंजताना त्यांना आपल्या आवडीला मुरड घालावी लागली; पण तीच आवड त्यांनी आपल्या मुलामध्ये फक्त जोपासलीच नाही, तर फुलवली. जी गोष्ट सुशीलची तीच वीजेंदरची. वडील महिपाल बस कंडक्टर. थोडीफार शेती आणि नोकरी. कुटुंबाचं दोनवेळचं पोट भरू शकेल, इतके उत्पन्न. मात्र महिपाल यांनी आपल्या दोन्ही मुलांना बॉक्ंसिगसाठी पाठवलं. मोठा मुलगा याच खेळाच्या जोरावर आमीर्मध्ये गेला आणि दुसऱ्या वीजेंदरने अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर ऑलिम्पिक पदकावर नाव कोरलं.

अशीच तळागाळातील उपजत गुणवत्ता हेरण्याचं, फुलवण्याचं काम चिनी लोकांनी केलं... शालेय स्तरावर आणि करड्या शिस्तीनं.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून हीच तर अपेक्षा होती! पण... यात त्यांना दहा टक्के यश आणि नव्वद टक्के अपयश आलं.

सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिले गेले याबद्दल अभिनव बिंद्राला विरोध करणा-यांचे मत काय हे जाणून घ्यायची इच्छा आहे. भारत या देशाचे थेट प्रतिनिधित्व होणा-या ऑलिंपिक मधे पदके का मिळत नाहीत याची कारणे आपोआप मिळताहेत.

(पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य हे (अजून तरी) भारतातच असावे अशी माझी समजूत आहे. हा धागा २००८ साली निघालेला असल्याने मागेच यात काही बदल झालेला असल्यास इतकी वर्षे चुकीच्या समजुतीत वावरत असल्याने स्वत:चाच तीव्र शब्दांत निषेध करावासा वाटतो. याच महानगरपालिकेने भय्यू महाराज आणि अशा अनेक मान्यवरांचा देखील सत्कार केल्याचे आठवले).

भारतात आणि जगात एकमेव खेळाडू आहे त्यालाच सर्व बक्षीसं द्या. इतरांना काही अक्कल नाही कि स्कील नाही. शारापोव्हा नावाच्या गल्ली टेनिस खेळणा-या खेळाडूला धडा शिकवला आहेच. मिलोस्लाव्ह क्लोज, मेस्सी वगैरेंच्या सामान्य ज्ञानाची पण चाचणी घ्यायला पाहीजे. काय तो नेमबाजी सारखा फालतू खेळ, त्यात सुवर्णपदक काय मिळवलं म्हणजे काय शतक काढल्यासारखंच बोलतात लोक.

Pages