शक्य तिथे आणि तेवढी काटकसर

Submitted by हर्ट on 19 January, 2010 - 04:46

मी माझे पुर्वीचे दिवस जे अत्यंत काटकसरीचे होते त्यांची जर आजच्या दिवसांशी तुलना करुन पाहिली तर माझी मला खूपच लाज वाटते! काटकसरीची जी सवय चांगली होती ती जशी जशी प्रगती होत गेली तशी तशी मागे पडत गेली. हल्ली प्रवास, कपडे, ग्रंथालयाचे दंड, विजेचे-पाण्याचे बील, खाणे-पिणे कुठेच मला कपात करता येत नाहीये. पुर्वी बस साठी मी तासंतास ताटकाळत उभा असायचे. हल्ली बस येत नाही आली तर इतर पर्याय मला असतात. हीच गत अनेक माझ्यासोबतच्या मित्रांची आहे. काटकसर ही फक्त पैशाचीच असते असे नाही. जी कुठली गोष्ट जास्त खर्च होते.. नि वाया जाते तिथे तिथे आपण काटकसर करू शकतो.

तुम्ही जी काटकसर पुर्वी करायचे आणि आत्ता करता त्याबद्दल इथे नीट लिहा. कदाचित इथे उधळपट्टी करणारे भानावर येतील!!!!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हूड दोन बोस सिस्टीम्स घ्या एक चुकून माझ्याकडे येउदे.


>>>>
अहो मामी, तुम्ही २ सिस्टीमच्या गोष्टी करताय. बोसवाल्याकडे गेलो अन त्याचा डेमो वगैरे रुबाबात पाहिला मग त्याने ज्या किमती सांगितल्या त्या ऐकून जे पळत सुटलो ते अजून मागे वळून पाहिलेले नाही Proud

imagesCAQH797E.jpg

जी एस,. मायबोली : एक सूडाचा प्रवास ! Proud

किमती सांगितल्या त्या ऐकून जे पळत सुटलो ते अजून मागे वळून पाहिलेले नाही
---- हे पहिल्यांदा डेमो पहातांना घडले कि दुसर्‍यांदा?

टण्या - मी हीच पद्धत वापरतो.
एखादी गोष्ट घ्याविशी वाटली, की ती एका वहीत लिहून ठेवतो, ४-५ आठवड्याने ती वही बघतो.
तेव्हा असेल गरज तर घेतो, नाही वाटली गरज तर, ती वस्तू आपोआपच घेतली जात नाही.

मी सद्ध्यातरी स्वतःला "खरंच गरज आहे का आत्ता?" हा प्रश्न विचारण्यापर्यंत प्रगती केली आहे.
दुर्दैवाने उत्तर बर्‍याचदा हो येतंय. ठीके.. प्रगती हळूहळूच होत असते! .. Proud

अहो मामी, तुम्ही २ सिस्टीमच्या गोष्टी करताय. बोसवाल्याकडे गेलो अन त्याचा डेमो वगैरे रुबाबात पाहिला मग त्याने ज्या किमती सांगितल्या त्या ऐकून जे पळत सुटलो ते अजून मागे वळून पाहिलेले नाही फिदीफिदीहूड >>माझे तेच झाले बोस च्या दुकानात आम्ही टेचात पोकीरीची गाणी ऐकली. मग सेकंड ओपिनीअन असे आले की ते पैसे इमर्जन्सीला ठेवावेत. ह्ह्ह्ह्ह. प्रत्येक महाग गोष्टीस स्वस्त पर्याय शोधायचा. नाहीतर इबे/ सुलेखा आहेतच. मी एक विश लिस्ट बनवते त्यात अगदी दिल खोलके वस्तू लिहिते घ्यायच्या.
मॅक बुक प्रो! च्या ऐवजी ड्ब्बा एच पी लॅप्टॉप फॉर्मॅट करून.
बोस होम थीएटर च्या ऐवजी आय्पॉड.
चॉकोलेटी फोर्ड आयकॉन. च्या ऐवजी स्कूटर
बंगला च्या ऐवजी इमर्जन्सी रोकडा सेव करणे
उत्तम कपडे बनारसी सिल्क साडी,
पैठणी, शिफॉन व सिल्कस च्या ऐवजी सुती/ खादीचे कपडे हपिसात.
घरी जुने टीशर्ट वगैरे.
उत्तम चपला च्या ऐवजी १०० रु च्या चपला.
मेकपची साधने च्या ऐवजी फक्त स्किनकेअर उत्पादने. घरगुती उपाय.
महाग मॉइस्चरायजर च्या ऐवजी पेट्रोलीअम जेली.

रॉबिनहूड, काटकसर करायची तर हिंजेवाडीत करा खरेदी. मला अंडरपँट्स नि बनियन दिसले. अत्यंत स्वस्त. ('फार वेळा वापरले नव्हते, साहेब!')

आजकाल अमेरिकेचे दिवाळे निघत असल्याने बरेच यूरोपिअन्स व जपान, आर्जेंटिना इथले लोक येऊन खरेदी करतात. भारतीयांनाहि ते जमेल. फक्त अडचण अशी की सेलवरील गोष्ट म्हंटली की भारतीयांची dignity, prestige आड येते.
जेव्हढे जास्त पैसे देऊन गोष्ट विकत घेतली तेव्हढी त्यांची प्रतिष्ठा जास्त! 'आमचा नाक पुसायचं फडकं बघा, फ्रान्सहून मागवलं आहे. भारतातल्यापेक्षा २५ पट किंमतीला.' अर्थात् विशिष्ठ शहरात ते पाहुण्यांना फक्त दाखवण्यातच येते. नि प्रत्यक्ष नाक पुसायला... शर्टांना बाह्या असतातच.

मंडळी काटकसर कशी करायची हे शिकायचे असेल तर एखादा/एखादी तेलुगु मित्र्/मैत्रीण असु द्या सोबतीला मग बघा कसा बदल घडतो ते तुमच्यामध्ये. मी स्वतः बे एरिया (मिनि तेलांगाणा) राहात असल्याने अगदी जवळून पाहते आहे हे सगळे उदा:
१ बाहेर खायचेच असेल तर mc donaldचाच burger खाणे.
२ शक्यतो laundry न करणे केलीच तर महिन्यातून १दा करणे.
३ २ कुटुंबामध्ये १ कार वापरणे.
४. शक्यतो अमेरिकेत कपडे खरेदी न करणे, भारतातून येताना पॉलिस्टरचे (वजनही कमी आणि इस्त्रीची गरज नाही) सलवार कमीज आणणे
५ मुले मोठी असतील तर भारतातच ठेऊन येणे(डे केअर, शाळा खर्च कशाला?)
६.जमलेल्या पैशातून सोने आणि फक्त सोने विकत घेणे .

बघा यातली एखादी तरी गोष्ट जमतीय ते का?

१. मग ते फॅट, कॅलरी, कोलेस्टेरॉल वगैरेचे काय? नि ते लोक मांस खातात? तेहि गायीचे? का पैसे वाचतात म्हणून तात्पुरता धर्म बदलायचा?
२. शीSSS
3. कठीण आहे.
५. धन्य, धन्य! मग तुम्ही पण भारतातच जा ना, म्हणावे. आणखीन स्वस्त!

आणि इथे काय साल्व्हेशन आर्मीच्या दुकानातून सामान घ्यायचे का? नि युगो कार?

फाटके मळके कपडे नि सोन्याचा हार गळ्यात. पोलीस घेऊन जातील.

पैशासाठी जगणे का जगण्यासाठी पैसे?

पण मी सुद्धा हे पाहिलेय अगदी की मुलांना पण भारातातच ठेवून आलेत. काय मिळवतात असे करून आई-वडिल देवास ठावूक.

आता कळलं आमच्या इथे एक तेलुगु इंजिनियर आहे. पॉट्लक लंचला कधीही काहीही घेऊन येत नाही. पण जेवायला हजर असतो. सेक्रेटरी नोट्पण लावते, " If you want to attend potluck lunch, you have to bring a dish". हा स्वतःची डिश (प्लेट खाण्यासाठी) घेऊन हजर असतो. एखादवेळेस मी आणलेली डिश स्वतःची म्हणूनपण सांगत असेल. ( ही त्याची काटकसर मित्रांना शिकवत असेल.) Proud

स्वप्ना_तुषार, आर्च अगदी. एक किस्सा - आम्ही डि.सी मध्ये होतो तेव्हा आमच्याकडे एक कपल आले. ओळख नाहि काहि नाहि.हातात तान्ह्या बाळाला घेउन होते म्हणुन मग मी त्याना आत बोलावले. ते म्हणाले की आम्ही अपार्टमेंट लिज करत आहोत तर त्या ऑफिसमध्ये कळाले की जर रेफरल असेल तुमचे इथे तर त्याना ३०० डॉ. मिळतील. तर हे लोक आमच्याकडे आले आणि म्हणे तुम्ही रेफर करा म्हणजे आपण ते पैसे अर्धे अर्धे वाटुन घेउ. मुलगी डॉ. मुलगा आयटीमध्ये. मी त्याना चहा दिला आणि नम्रपणे नकार दिले.

गड्यांनो ह्या गोष्टींसाठी दुसरा बाफ चालु करा. माझ्याकडेपण भरपूर गोष्टी आहेत तेलुगु लोकांच्या Proud

इथे आपली काटकसर लिहुया Happy

ह्या ह्या खरेच आहे. मी नवीन असताना त्यांच्यात मिक्ष होण्याचे प्रयत्न केले होते आता आजिबात नाही.
१९८८ मध्ये एका रेड्डी ने मला लिहिण्याची नोकरी दिली होती. मस्त ज्युबीलि हिल्स मध्ये बंगला राजकीय कनेक्षन्स वगैरे. श्रिमन्त पब्लिक. काही काम नसले की आम्ही इतर वाचत असू. तर माझा बॉस म्हणे
मी आर्ट डायरेक्टर ला तुझ्यापेक्षा जास्त पगार देतो. त्याला बिझी ठेवण्यासाठी लिहिणे हे तुझे काम आहे.

तेव्हा माझा पगार खरेच १००० रु. महिना होता.

ही एजन्सी अशीच फिक्टिशीअस कामे स्टाफ ला देत आहे असे लक्षात आल्यावर ती नोकरी सोड्ली.
म्हण्जे हा ही काट्कसरीचा एक नमुना. सोन्याने खरेच लदलेल्या अस्तात त्यांच्या बायका.पन काय उपेग?

- वेळः
माझा थोडा जास्तं वेळ झोपण्यात जातो आणि त्याचं मला खुप वाईट वाटतं..८ तासापेक्षा कमी झोप मला झेपत नाही. बाकी टि.व्ही वगैरे पाहण्यात मला काही स्वारस्य नाही..
इंटरनेट फक्तं ऑफिसमध्ये वापरते एरवी नाही..
- पाणी:
भांडी धुतांना, विसळतांना नळ सुरु असेल तर मला इरीटेट होतं आणि नळ बंद केल्या जातो...
चेन्नईत प्यायचं पाणी विकत घ्यायला लागतं. त्यामुळे प्यायला घेतलेलं पाणी थोडंही वाया जाऊ देत नाही..
- शक्ती
उगाच चिडचिड करुन मी स्वत्।चं मनस्वास्थ्य नेहमीच खराब करुन घेते आणि माझ्या शक्तीचा व्यय होतो..
लोकांना सुधरवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे समजुन जिथे होऊ शकेल तिथे लोकांना ग्यान देणे यातही माझी शक्ती वाया जाते.
आई म्हणायची बोलण्याने आपल्या साठलेल्या उर्जेचा व्यय होतो..त्यामुळे बोलणे कमी करणे हा उपाय शक्ती व्ययाकरता अवलंबवावा लागणार आहे..
- पैसा
-कपडे हवे तेव्हा घेते. गरज नसली तर नाही घेत. मॉल मध्ये जाणं अगदी नाममात्र आहे त्यामुळे शॉपिंग चा उपद्रव कमी आहे.
- वाणसामानाची शक्यतो यादी करुन मगच घ्यायला जाते. जनरली जाणं टाळते. यादीनुसार नवरा सगळं सामान आणतो. माझा वेळ इथे वाचतो.
- घरी फ्रिज नाही त्यामुळे अन्न अगदी नेटकं करायला लागतं. जास्तं केलं की दमट हवामानामुळे लगेच खराब होतं..भाज्या पण शक्यतो वाया जाऊ देत नाही.. फ्रिज नसल्याने भाज्यांचं लाईफ खुप कमी होतं..आणि काही भाजा लगेच खराब होतात, म्हणुन त्या पहिले करुन संपवुन टाकते.
- वीज
- घरात कुणी नसलं माझ्याशिवाय तर सगळे दिवे लावते नाहितर जिथे गरज आहे तिथेच
- फॅनही गरज असली तरच लावते..

मुग्धा तु माझी धाकटी बहीण तर नव्हेस? आधी उधळ्माधळ लिहिते.

वेळ -
मी बहुधा अपव्यय करत असेन... मला नक्की समजत नाहीये. कारण मला काही करायला वेळच मिळत नाही. नोकरीसाठी दिवसाचे १२-१४ तास घराबाहेरच असते. त्यामुळे शनी-रवी काहीही न करता फक्त आराम आणि आराम करते. Sad
झोप कमी आहे. रोज ११ला झोपुन सकाळी ६ ला उठते. सुट्टीच्या दिवशी फारतर ७.

पैसे
यात बर्‍याच गोष्टी येतील. माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त चपलांचे जोड आहेत. किमान ८ ते १० वापरातले तरी असतीलच असतील. पण एकातही मला फास्ट चालता येत नाही. सगळ्या चपला लागतात मला. मग निदान ही लागणार नाही म्हणून मी घेत जाते.. पण सगळ्याच लागतात. Sad स्पोर्ट शू, स्लिपर आणि फ्लोटर्स सोडून.... नाहीतर म्हणाल... Sad

कपडे मी एकदा अंगात घातले की दुसर्‍यांदा परत घालू शकत नाही. आता लगेच हसू येईल तुम्हाला. पण आपण रोज ऑफिसला एक ड्रेस घालतो तो ७-८ तास वापरला जातो (माझा तर चांगला १२-१४ तास :फिदी:) पण सुट्टीच्या दिवशी साधं लायब्ररीत जाताना घातलेला ड्रेस पण मी घरी आल्यावर धुवायला टाकते... मग तो अगदी अर्धा तास घातलेला असो, किंवा २ तास.. काही लोक ऑफिसला एकदा घातलेला ड्रेस अजून एकदा वापरतात आणि मगच धुतात Uhoh जिन्स वगैरे मी फारतर २ वेळा वापरते आणि धुते. लोक तर म्हणे ६-६ महिने जिन्स धुवत नाहीत. मध्ये इथे माबो वरच वाचले होते की जिन्स वारंवार धुतल्याने ग्लोबल वॉर्मिंग होते... Uhoh ऐतेन..

लिप्स्टिका पण खूप आहेत, एक मॉईश्चरायझर संपायच्या आधी दुसरं आणते, जे काही विकत घेते ते मोठंच घेते, स्वस्त पडतं म्हणून... पण पैसे त्यात जास्त जातात...

पण एकातही मला फास्ट चालता येत नाही. सगळ्या चपला लागतात मला. मग निदान ही लागणार नाही म्हणून मी घेत जाते.. पण सगळ्याच लागतात. स्पोर्ट शू, स्लिपर आणि फ्लोटर्स सोडून.... नाहीतर म्हणाल...
>>>>>>> दक्षिणा हे नवरर्‍याला वाचायला देणार आहे.. तो मला भयंकर चिडवतो यावरुन की तुला कसलीही चप्पल कशी काय लागु शकते असं .. पण याचा परिणाम उलट आहे माझ्यावर. मी घाबरुन चप्पल घेणं टाळते आणि एकदा चांगली मिळाली की ६-८ महिने तीच वापरते नेहमी. ती तुटल्याशिवाय नवीन नाही घेत.

overall खर्चिक नाहीये मी पण आणि नवरापण, तरी पैसे कुठे जातात देव जाणे! Wink

पैशासाठी जगणे का जगण्यासाठी पैसे? >> एक लाख वेळा अनुमोदन, झक्की. Happy
हा काटकसरीचा बाफ म्हणजे नक्की काय भानगड आहे? एकाची अत्यावश्यक गरज दुसर्‍याला चैन वाटू शकते. आणि एकाची काटकसर दुसर्‍याला दात कोरून पोट भरणे वाटू शकते. आता हे एक, दोघे नाही तर असे शेकडो एकत्र आलेत इथे. अनिरुद्ध बापुपेक्षा जास्त पोष्टी पडूनही बापू बीबीत निघाले तेवढेही फलित निघणार नाही. Proud

वेळ, पैसा, शक्ती या सार्‍यांचे नियोजन केले पाहिजे, हे मान्य. पण आपण यंत्रे नसून माणूस आहोत, हेही लक्षात ठेवले पाहिजे. लहर, बुद्धी, मन असलेल्या हाडामांसाच्या माणसाला परीटघडीच्या शेड्युलमध्ये वावरायला लावणे म्हणजे अन्याय आहे. दात होते तेव्हा चणे मिळालेच नाहीत, अन चणे आले तेव्हा दातांचं आयुष्य संपून गेलं.. या दात-चण्याच्या लढाईत इच्छा, जगणं, मनासारखं करणं राहून गेलं- हा सुप्रसिद्ध डॉयलॉग मला कधीही म्हणावा लागू नये, अशी माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. Happy

(चला, आता मी पळूनच जातो. Proud )

साजिरा, अनुमोदन!
मी सध्या या दात-चण्यांच्या मारामारीत आहे,कार घ्यायची गरज आहे,बायको म्हणते नवी घेण्यापेक्षा तेवढ्याच पैशात जुनी मोठी गाडी घेउ,पण पहिलीच कार सेकंडहँड घ्यायला मन तयार होत नाही.लहान तर लहान.आता इथे कुणाची काटकसर जास्त बरोबर?

साजिरा मी पण सहमत आहे तुझ्याशी...
माणूस आहोत आणि आपल्याला भाव भावना इच्छा आहेत म्हणून ढिगभर कपडे, चपला, सौंदर्य प्रसाधनं विकत घेऊन आत्ताच हौस भागवून घेतेय... ४०शी उलटल्यावर थोडंच हे सगळं करायला मिळणार आहे? Sad असा विचार आला की काटकसर मागे पडते. तरी हॉटेलिंग वगैरे ची फार हौस नाही. (ते बरंय) फार्फार तर भेळ पाणिपुरी अशी रू. ५०/- पर्यंतची उधळपट्टी होते... (पण मी खाण्यासाठी कितीही पैसे खर्च केले तरी ती उधळपट्टी मानत नाही... खायचं नाही तर जगायचं कशाला? :फिदी:)

पण पाणी, वीज याबाबतीत मात्रं नो कॉम्प्रमाईज. जिथे असते तिथलाच दिवा सुरू असतो. रात्री फक्त टिव्ही पाहत असताना खोलितला दिवा मालवते. पण बरोबरीने भाजी निवडणे वगैरे सारखं काम असेल तर मात्रं दिवा लागतोच. मॉस्किटो रेपलंट लक्षात ठेवून सकाळी उठल्या उठल्या बंद करते. घरात एसी नाहिये (नशिब) पंखा ही लागत नाही फारसा... आधी खिडक्या उघडून हवेचा अंदाज घेते, अगदीच पुरे होत नसेल तर पंखा लावते Proud (हे म्हणजे अतिच झालं नै?) पाणी भरायला लावलं की बादली पुर्ण भरेपर्यंत हालत नाही. २-५ मिनिटं इथे तिथे गेलं तरि बादल्यांना पुर येऊन बरंचसं पाणी वाया जातं. फ्रिजची जास्ती वेळा उघडझाप करत नाही. गरम पदार्थ पुर्ण गार झाल्याशिवाय आत ठेवत नाही.

Pages