शक्य तिथे आणि तेवढी काटकसर

Submitted by हर्ट on 19 January, 2010 - 04:46

मी माझे पुर्वीचे दिवस जे अत्यंत काटकसरीचे होते त्यांची जर आजच्या दिवसांशी तुलना करुन पाहिली तर माझी मला खूपच लाज वाटते! काटकसरीची जी सवय चांगली होती ती जशी जशी प्रगती होत गेली तशी तशी मागे पडत गेली. हल्ली प्रवास, कपडे, ग्रंथालयाचे दंड, विजेचे-पाण्याचे बील, खाणे-पिणे कुठेच मला कपात करता येत नाहीये. पुर्वी बस साठी मी तासंतास ताटकाळत उभा असायचे. हल्ली बस येत नाही आली तर इतर पर्याय मला असतात. हीच गत अनेक माझ्यासोबतच्या मित्रांची आहे. काटकसर ही फक्त पैशाचीच असते असे नाही. जी कुठली गोष्ट जास्त खर्च होते.. नि वाया जाते तिथे तिथे आपण काटकसर करू शकतो.

तुम्ही जी काटकसर पुर्वी करायचे आणि आत्ता करता त्याबद्दल इथे नीट लिहा. कदाचित इथे उधळपट्टी करणारे भानावर येतील!!!!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑफिसात माझा डेस्क पॅन्ट्री च्या शेजारी आहे. रोज एखादा तरी ऑफिसबॉय माझं बोलणं खातोच पाण्यावरून...
हाईट म्हणजे पाण्याच्या वेंडिंग मशिनला हॉट आणि कूल शिवाय कॉफी वेंडींग मशिन ला नुसतं हॉट वॉटर चं ऑप्शन आहे लोक, स्वत:चा कप त्या "शुद्ध गरम पाण्याने" धुतात... Uhoh पण सिंक मधला वापरायच्या पाण्याचा नळ सोडायचे कष्ट घेत नाहीत. Sad

प्रिंटींग ची एक वेगळीच कथा आहे. एका नविन एच आर एक्झि. ने १५६ पानाची पॉलिसी प्रिंट केली... Uhoh ती पण बॅक टू बॅक नाही... जाम हजरी घेतली मी तिची.. Angry लोकांना साध्या गोष्टी कशा कळत नाहीत? Sad

साजिर्‍या, पोस्ट आवडलं. विचारही चांगले आहेत. माणसासारखंच जगा. जगण्याचा आनंद घेत जगा. पण या बीबी वरुन काहीतरी 'फलित' निघेल असं कुणी सांगितले तुला ? Proud ( रादर, ते कोणत्या बीबी वर आजवर निघाले आहे! Light 1 ) काटकसर व्यक्तिसापेक्ष आहे १००% मान्य. एखाद्याला थोडा वेळ घालावून होणारी ५० रु. ची बचत सुध्दा महत्त्वाची वाटेल तर एखाद्याला तो वेळ वाचवणं! इथे फक्त चर्चा होऊ शकते. आपापल्या परिस्थिती व आवडीनुसार आपल्याला काटकसर (करायची असेलच तर!) करायचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात यातून. त्यातही त्याची अंमलबजावणी कितपत होते हे ज्याचं त्यालाच समजणार ना! Happy (शिवाय आपल्यासारखे /पेक्षा उधळे /कवडीचुंबक पण आहेत अजून हे वाचून मनाला हायसं वाटतं ते समाधान निराळंच! :फिदी:)

"काटकसर" हा जन्मजात कोब्रा गुण घेऊनच मी देखिल जन्माला आलो
पण कुन्डली नि हस्तरेषान्प्रमाणे मी इतका खर्चिक आहे की "कुबेरालाही भीकेला लाविल" असे आई म्हणायची!
लहानपणी आमच्या शेजारि एक आजोबा रहायचे, कॉलेज जीवन सम्पल्यावर पन्नास ठिकाणचे बरे वाईट अनुभव घेत घेत एकट्याने जगतानाच, एकदा त्यान्नी मुद्दामहून बोलावले व सान्गितले की, तुम्ही, म्हणजे माणसाने किती रुपये कमावले याला तितकासा अर्थ नसुन कमावलेला एकेक रुपया किती व कसा गमावला आणि किती शिल्लक ठेवला यावरच सर्व अवलम्बुन आहे, हे आयुष्यभर लक्षात ठेव! Happy

>>>>>> तिच्या काटकसरीची हाईट म्हणजे बाई काडेपेटीची एकच काडी/ किंवा मग पेपर (लाईटर नसावा बिचारीकडे) वापरुन दरवेळेस दुसरा गॅस पेटवणार. गॅस पेटवायचा की ओढ काडी असं करायच नाही!
आमच्या शेजारच्य्या आज्जी, आलेल्या जुन्या पोस्टकार्डान्च्या पट्ट्या माझ्याकडुन कापुन घ्यायच्या व ग्यास शेजारी डब्यात त्या ठेवलेल्या असायच्या, वरील उदाहरणातील पेपर ऐवजी सुटसुटीत पणे त्या या पट्ट्या कापायच्या! Happy

अगदी सुरवातीपासून, जरी कपड्यान्ची टन्चाई असली, इतकी की आदल्या दिवशीचे कपडे रात्री धुऊन पहाटे उठून इस्त्रीने वाळवुन तेच घालायचे असे असले तरी बाहेर वावरताना मी टापटीपीच्या बाबतीत कमालीचा काटेकोर होतो! होतो असे म्हणण्याचे कारण, सध्याच्या कम्पनीत जॉईन झालेल्याला आता १६ वर्षे होतिल, व "ड्रेस अपकिपिन्ग" नावाचा अलाऊन्स, ग्रेड मधे मी बसत नसल्याने मला दिला जात नाही हे कळल्यावर मी तत्काळ शर्टप्याण्टीला इस्त्री करणे सोडून दिले! दोरी वर वाळत घातलेला शर्ट काढायचा अन जसाच्या तसा धुपका घालून ऑफिसला यायचे! अपवाद फक्त बोर्ड मिटिन्ग व एजीएम च्या एकुण पाच दिवसान्चा! ग्रेडवाईज हायर रेन्ज मधे मी मोडत नसल्याने मला अपकिपिन्ग अलाऊन्स देणे टाळणार्‍या कम्पनीकरता मी माझ्या खिशातून पैसे खर्च करुन "टापटीपीत (?)" का राहू? Proud
याबाबत मला आडून आडून व स्पष्टही विचारणा झाली तेव्हा अत्यन्त रोखठोक शब्दात मी वरील कारण सान्गितले! तुम्ही कुणी आणाल तर बुटपॉलिशच्या लहान लहान डब्या आणाल, माझ्याकडेमात्र प्रोफेशनल बुटपॉलिशवाले वापरतात ती मोठी चपटी डबी असते, होलसेल मधुन घेतलेली, पण मी वरील पाच दिवसान्व्यतिरिक्त ऑफिसला जाण्यासाठी म्हणून कधीही बुटपॉलिश करत नाही! हव तर ओल फडक फिरवतो अगदीच गरज लागली तर! तोच मुद्दा बुटान्च्या ब्र्याण्डचा! एकेकाळी ब्रॅण्डेड बुट वापरणारा मी, एकिकडे बुटान्च्या किमती अतोनात वाढू लागल्या, तर भारीचे बुट घालुन माझा देह "सजवण्यात" खर्च का करावा असे म्हणून, व आमची कम्पनी "फ्याक्टरी अ‍ॅक्ट" खाली येत असल्याचा फायदा उचलुन सध्या २५० ते ३०० रुपयात मिळणारे, पुढे लोखण्डी वाटी असणारे इन्डस्ट्रियल शूज दोनेक वर्ष सर्व सिझनला, अगदी ट्रेकिन्गला देखिल सहज वापरतो.
सगळे जग "आ ऊट सोर्सिन्गच्या" मागे लागलेले असताना, ज्या ज्या कामाकरता पैस्से मोजुन काम करुन घ्यावे लागते त्यातिल जवळपास प्रत्येक काम मी स्वतः करायचा प्रयत्न करतो, वेळेस कामास हव्या त्या हत्यारान्वर पैसे खर्च करिन, ते वाया जात नाहीत, वस्तू शिल्लक रहाते, स्वतः काही केल्याचे समाधान मिळते, पैसा वाचतो.
या जोशातूनच, घरच्याघरीच (काढल्या तर) हव्व्या तेवढ्या मिळणार्‍या फावल्या वेळात मी स्कुटर्/मोटरसायकल दुरूस्ती, त्यान्ना रन्गविणे, चाम्भारकामाची सगळी हत्यारे/उपकरणे वापरून सोल लावणे-खिळे ठोकणे-शिवणे,सुतारकाम, शिम्पीकाम इत्यादी, तर गवण्डीकाम करुन खोली, कम्पाऊण्डभिन्त, त्यात देऊळ, गावाकडे सन्डास इत्यादी बान्धणे, लोखण्डी गेट उभे करणे, वेल्डीन्ग करणे, झाडे लावणे व तोडणे, वगैरे एकाचा दुसर्‍याशी सम्बन्ध नसलेल्या अनेकानेक गोष्टी करत असतो. गेली दहा वर्षे माझ्याकडे एक दगड अर्धवट कोरलेल्या अवस्थेत पडून आहे, एक ना एक दिवस ते देखिल पूर्ण करणार
मी मूर्तिकार का झालो याचा विचार करताना आठवते की, अगदी लहानपणी तुळशीबागेत गणपती आणायला आईसोबत गेलो असताना आम्हाला जो जसा गणपती हवा, तो आमच्या बजेट बाहेर जात होता व विक्रेता चार आणे देखिल कमी करायला मागत नव्हता, तो अनुभव आजही तितकाच ताजा आहे, व तेव्हा तर जिव्हारी लागला होता नि तेव्हाच पण केला होता की एकनाएक दिवस घरची मूर्ति माझि मीच बनवुन बसवेन, पुढील उण्यापुर्‍या चार वर्षातच ती सन्धि चालून आली, शिकायला मिळाले व मी मूर्तिकार झालो! तेव्हापासून तो खर्च वाचला, नाही का?
स्पेशल म्हणुन विकत मिळणारा नि आवडणारा प्रत्येक खाद्यपदार्थ स्वतःच घरच्या घरी करुन पहाणे, व नन्तर करतच जाणे हा आवडीचा विषय!
पण मी खर्चिक देखिल तेवढाच आहे! उधळ्या आहे - खिशातला शेवटचा रुपया सम्पेपर्यन्त खर्च करितच राह्तो असा आहे.
यामुळे टोकाची कफल्लकता देखिल अनुभवावयास लागते, पण तो वेगळा गमतिचा विषय आहे!

दक्षिणा...:)

साजिरा >> दात होते तेव्हा चणे मिळालेच नाहीत, अन चणे आले तेव्हा दातांचं आयुष्य संपून गेलं..>> हे विधान मला पटलं नाही..ते अशाकरता की पैसा, शक्ती, वेळ, पाणी आणि वीज मिळत आहे तोवर त्याचा अपव्यय होऊ नये हा माणुस म्हणुन प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करायला हवा..
चणे खाऊ नका कोण म्हणतंय..खा की..पण त्याचा अपव्यय करु नका एवढंच...

'अल्ला मेरा खर्चा बढाव' अशी प्रार्थना करतो कारण मग मिळवायचीही ताकद आपोआप येते, तसे मीही कष्टाने मिळवतो आणि ते जीवनाचा आनंद घेण्यासाठी घालवतो. पुन्हा नव्या खर्चासाठी सज्ज होतो. अर्थशास्त्राची गंमत बघा. ज्या बाजारपेठेत ग्राहक सढळ खर्च करतात तिथे मंदी येत नाही आणि तो समाज गरीबही राहात नाही.
>>>>

मुग्धा, माझे ते विधान अतिरंजित वाटत असेल, तर प्रयोगचा हा परिच्छेद वाचा. मला म्हणायचेय, ते त्याने बरोबर शब्दांत लिहिलेय. Happy

वस्तू 'कंझ्युम' करण्यासाठी असतात. (म्हणजे उधळून टाकण्यासाठी नव्हे). वस्तूंकडून आपण 'कंझ्युम' होत नाही ना, हे वेळीच समजायला हवे. कारण बर्‍याच वेळेला प्रयोग म्हणातो तसे 'काटकसर कुठे संपते आणि कृपण वृत्ती कुठे सुरू होते, हे समजतच नाही'. समजते तेव्हा उशिर झालेला असतो. याच संदर्भात तो दात आणि चण्यांचा सुपरहिट डॉयलॉग. Happy

पया,
कधी येऊ मग मटार उसळ खायला घरी? Proud
>>पण तरीही एकंदर माझा स्वभाव उधळ्याच आहे. << हो ते माहीत आहे आम्हाला. मिसळीचं सगळं बिल तु भरलंस त्या दिवशी.. Happy

ग्रेडवाईज हायर रेन्ज मधे मी मोडत नसल्याने मला अपकिपिन्ग अलाऊन्स देणे टाळणार्‍या कम्पनीकरता मी माझ्या खिशातून पैसे खर्च करुन "टापटीपीत (?)" का राहू? >>
याला काटकसर म्हणतात? uhoh.gif

प्रयोग, मस्त पोस्ट!
मनीष, त्याला सूड देखिल म्हणायला आवडेल मला, तुमची हरकत नसेल तरच! Proud
काटकसर अशाकरता, की जिथे आवश्यकच नाही, मोबदल्यामधे मिळणे जरुरीचे अस्ताना, केवळ लोकलज्जेस्तव मी तो खर्च का करत राहू? करणार नाही, मला लाज वाटत नाही, वाटणार नाही, लाजायचे तर म्यानेजमेण्टने लाजुन घ्यावे की आपण सरसकट किमान अलाउन्स सगळ्यान्ना न देता केवळ मोजक्या म्यानेजरान्ना देतो! असो..... अशा विचारातुनच कम्युनिस्ट जन्म घेतात Lol
माझ्या वैयक्तिक आयुष्यात कुठे जायचे असल्यास मी पुरेसा टापटीपीत रहातो, येवढेच नव्हे तर पोरी शाळेच्या ड्रेसला देखिल इस्त्री करतात स्वतःच! मात्र कम्पनीत????? नट्स
मुग्धा, धन्यवाद!
दक्षिणा, पुढच्या वेळेस तू दे! हा. का. ना. का.

वस्तूंकडून आपण 'कंझ्युम' होत नाही ना, हे वेळीच समजायला हवे.>> हा addiction चा बीबी नाहीये.

काटकसर आणि कंजुषपणा यात बरंच अंतर आहे..

काटकसरी माणुस एखादी वस्तू विकत घेईल त्याला खरंच गरज आहे का वगैरे विचार करुन...कंजुष माणूस पैसे लागतात म्हणुन आवश्यक गोष्टीही विकत घ्यायला मागे पुढे पाहील..

अर्थात हे सगळं व्यक्तीसापेक्ष आहे. पण वीज, इंधने, पाणी या सगळ्या साधनांना काटकसरीनेच वापरले पाहीजे प्रत्येकाने असं माझं मत आहे...

आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या साधनांचा अपव्यय टाळणे हा मुद्दा महत्वाचा...

प्रयोग.. Lol
माझा मार्ग थोडासा वेगळा आहे. मी महिन्याच्या पहिल्या आणि तिसर्‍या रविवारी दाढी करतो. पण एखाद्या रविवारी जर काही अडचण आली (उदा. लालू जीटीजी :फिदी:) तर थेट पुढचा रविवार. दरम्यानच्या काळात तुच्छतेने बघणार्‍यांकडे तुच्छतेने बघतो.
अशा रीतीने कधी कधी महिन्यातून एकच दाधी. बचतच बचत. Proud

दाढीवरून आठवले. मी गेली असंख्य वर्षे दाढी वाढवून आहे.पंचवीसेक वर्षे. (प्रचन्ड बचत.) पंचविसेक वर्षे सिगरेट सोडली आहे(प्रचन्ड बचत.) पण यातून वाचलेले पैसे कोठे गेले त्याची काय टोटलच लागत नाय.

बायकोही तुच्छतेने वागवते ते वेगळेच )
..
>> दाढीबाबत आमच्या घरच्याना च फार आवड आहे. अनेक वेळा ते जंजाळ काढायचा निर्धार केला पण पोरे म्हनतात दाढी करून आल्यास घरात घेनार नाही. आता काय करावे या कर्माला? प्रयोगने वर्णन केलेल्या सगळ्या खर्चातून सुटका.

योगेश मी पण थोपटतो तुझी पाठ आणि वर परत एक आयडिया पण देतो .
एक साबण मिळतं (माहीत नाही ऐकुन आहे ) , ते लावल की केसं जातात , ते जास्त स्वस्त पडेल Lol Light 1

ग्रोसरी चा खर्च कमी करायचा असेल्,आणि वाया जाणार्‍या भाज्या वाचवायच्या असतील तर्....आधी पेन आणि कागद घेऊन बसा..फ्रीज आणि फ्रीजर मधल्या भाज्या लिहा..बाहेर च्या पण, जसे कांदे, बटाटे..मग, घरातील कडधान्य आठवा.आता ह्यापासून होऊ शकणारे मेनू लिहा...जितक्या दिवसांचे मेनू होतील, ते सोडून बाकी दिवसांची ग्रोसरी आणा...मला तरी ह्याचा फायदा होतो.

साजिरा, माझे सासरेहि म्हणत, 'या खुदा, खर्चे बढा'. म्हणजे अचानक खर्च करायची वेळ आली, तर घाबरू नका, झोप घालवू नका. देव करेल व्यवस्था. आणि पैसे मिळतील. ते त्यांच्यासारख्या कन्सल्टन्ट ना ठीक आहे, मिळेल कुठे तरी काम नि त्यातून पैसे.

पण नोकरदारांच काय? त्यांची आवक ठरलेली, खर्च मात्र न सांगता येतात. म्हणून त्यांनी अत्यंत काळजी पूर्वक पैसे वापरावे. लग्नाला, विशेष कार्यक्रमाला जायला भारी कपडे ठीक आहेत, रोजच्या वापराला काय करायचे डिझायनर कपडे. घ्या की साधेच. (म्हणजे अगदी हिंजवडीचे कपडे नाहीत). तसेच इतर गोष्टींचे.

दाढी बद्दल प्रयोग, हूड आणि साजिर्‍या, Rofl कठीण आहे!
पण यातून वाचलेले पैसे कोठे गेले त्याची काय टोटलच लागत नाय. >> अगदी अगदी. Proud मला वाटतं, जेव्हा आपण असे कुठेतरी पैसे वाचवतो तेव्हा जे खरंच वाचलेले पैसे असतात ते बाजूला ठेवावेत (अगदी बँकेत नाही वेगळ्या पर्समधेय इ., रोज १० रु तरी वाचवत असू आपण या ना त्या मार्गाने) जेव्हा त्याची एक ठराविक रक्कम झालेली दिसेल तेव्हा किती बरं वाटेल! Happy (तेवढी साठेपर्यंत त्यातून काय वस्तू घ्यायची याची लिस्ट सतरा वेळा बनवून खोडून झाली असेलच! Proud )

झक्कींना मोदक. Happy

दाढीदीक्षितांना माझ्या तर्फे एक हेड मसाज फ्री. ह्ह्ह्ह.

मी म्याकडी पिजा हट वगैरे मातब्बर चेन्स मधे कधी पोरांना नेले तर जे केचप चे पाकीट मिळते ते संपले नाही तर घरी घेउन येते. ड्ब्यात न्यायला उपयोगी येते.

रात्री हळूच एसी बंद करते.

उन्हाळ्यात इथे गीजर चे पैसे वाचतात. गार पाण्यानेच शावर.

चांगली चर्चा वाचायल मिळत होती,
चांगल्या बीबीची वाट्ट लावली.
मुग्धा टेंशन कशाला घेतेस? हे 'बाइच' काळ कुत्र आहे. कुत्र्यामाग ढालगज भवान्या आल्या.
रामशास्त्रीसुद्धा संसर्गाने बिथरले.. त्यांनी थोडावेळ आणलेला गांभिर्याचा आव गळुन पडला.

Pages