शक्य तिथे आणि तेवढी काटकसर

Submitted by हर्ट on 19 January, 2010 - 04:46

मी माझे पुर्वीचे दिवस जे अत्यंत काटकसरीचे होते त्यांची जर आजच्या दिवसांशी तुलना करुन पाहिली तर माझी मला खूपच लाज वाटते! काटकसरीची जी सवय चांगली होती ती जशी जशी प्रगती होत गेली तशी तशी मागे पडत गेली. हल्ली प्रवास, कपडे, ग्रंथालयाचे दंड, विजेचे-पाण्याचे बील, खाणे-पिणे कुठेच मला कपात करता येत नाहीये. पुर्वी बस साठी मी तासंतास ताटकाळत उभा असायचे. हल्ली बस येत नाही आली तर इतर पर्याय मला असतात. हीच गत अनेक माझ्यासोबतच्या मित्रांची आहे. काटकसर ही फक्त पैशाचीच असते असे नाही. जी कुठली गोष्ट जास्त खर्च होते.. नि वाया जाते तिथे तिथे आपण काटकसर करू शकतो.

तुम्ही जी काटकसर पुर्वी करायचे आणि आत्ता करता त्याबद्दल इथे नीट लिहा. कदाचित इथे उधळपट्टी करणारे भानावर येतील!!!!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी दिवसातून चार-पाच वेळा चहा पिणे होत असे ते आता बंद करुन दुपारच्या वेळी एक कप कॉफी पितो फक्त. शनिवार रविवारी ते पण नाही. थोडक्यात आठवड्यातून फक्त पाच कप कॉफी होते. हळू हळू ते पण बंद करणार आहे.

मी नेहमीच काटकसर करते म्हणजे माझ्या आईकडुन शिकले...मला रोज रोज चमचमीत खायचा खुप राग येतो उगाचच खायच जास्त आणि वजन वाडल की ऊपाय करायचे.माझी आजी बाथसोप चे ऊरलेले तुकडे कपड्यांच्या ट्रंक मध्ये टेवते...झुरळ येत नाही आणि कुबट वास येत नाही,तसेच ति कपड्यांच्या साबणांचे तुकडे वेगळे टेवते आणि परत एकत्र करुन वापरते.माझी आई आणि मी नवीन साबनाला चिटकवतो.
आपण सगळ्या गोष्टी किलोत मोजतो साबण जर कीलोत मापला तर ड्व्ह साबन १००(की ५०) ग्रॅम ६०+ ला आहे मग कसा किलो झाला? मग तो असा वाया का घालवायचा?

.

सीमा२७६ - बाथसोपची ट्रंकेत ठेवण्याची आयडीया छान आहे पण डाग पडत नाही का हो कपड्यांवर ??
>>>
मि पाहील नाही पण डाग नाही पड्त आजीच्या साड्यांना तर डाग नाय दिसले.साबनाने डाग स्वछ होतात मला सीमा म्हणा..अहो नको हो.

मी तेल स्प्रे बॉटल मधे भरुन वापरते म्हणजे कमी तेल वापरले जाते, मुळ उद्देश डाएट आहे पण बचतही बरीच होते. एकदा नानावटीच्या डाएटीशीयन ने सांगितले होते महीन्याला एका व्यक्तीने जास्तीत जास्त अर्धा कीलो इतकेच तेल कन्झ्युम करावे. मी स्वतः महीन्याला पाव किलो कन्झ्युम करते. पापड भाजुन खाते. भाज्या शक्यतो पाणीदार असतात.

हो पण आरोग्य ही महत्वाचं ना , महीन्याला ४ कीलोवरुन निदान ३ किलोवर आणा, मग हळुहळु कमी करा, तळणाचे प्रकार रोज करत असाल तर सुरुवातीला एक दिवसाआड नंतर हळुहळु २ दिवसाआड बनवा.

को़कणस्थांना तर काटकसर सांगायलाच नको.
आडनावापासुनच सुरवात होते. ती ही आटोपशीर. उधळ माधळ तिथे ही नाही.
कोब्रांचे खाण्याचे पदार्थ ही काटकसरीचे. फुकट मिळणार्‍या पाण्याचाच जास्त वापर. पातळ भात हे त्यांचे प्रमुख अन्न. त्यांना झुणक्या पेक्षा पातळ पिठलं जास्त आवडतं. त्यांची आमटीही पातळच असते. दह्यापेक्षा पाणीदार ताकावर जास्त भक्ती. किती आणि काय काय सांगु? ) Happy Happy

बरं, मजेचा भाग जाउ दे पण मला असं वाटत की काटकसरीच्या कल्पना ह्या व्यक्ती स्थल काला प्रमाणे बदलत असतात. पूर्वीच्या काळी शर्टाची कॉलर फाटली की सर्रास शिंप्याकडून आतली बाजू बाहेर करुन घेऊन वापरत असतं आता काळ बदलला कापड कृत्रिम धाग्यामुळे उदंड झालं त्यामुळे ही काटकसर आता कालबाह्य झाली.
एखाद्या शाळकरी मुलीला बससाठी एक तास उभे रहाणे काटकसर वाटु शकेल पण एखाद्या गृहिणीला ती नाही वाटणार. प्रवासाचा वाचलेला वेळ तिच्यासाठी जास्त मोलाचा असेल. आपल्याक्डे साध्या साध्या वस्तू दुरुस्त करुन वापरण्यावर आपला भर असतो आपल्याक्डे ती काटकसर होऊ कएल. पणप्रगत देशात जिथे मानवी कौशल्य महाग आहे तिथे वस्तु दुरुस्त करुन घेणे आतबट्ट्याचा व्यवहार ठरेल.

तात्पर्य, काय काटकसर जरुर करावी पण तारतम्य बाळगून. खर्चिकपणाचा काय किंवा काटकसरीचा काय अतिरेक वाईटच. काटकसर करणे हाच आपल्या आयुष्यातला ए़कमेव आनंद होऊ नये. जीवनातले इतर पण आनंद जरुर घ्यावेत.

Pages