Submitted by Madan Hunkare on 15 November, 2026 - 01:37
पूर्वी नवऱ्याने बायकोला साडी आणली कि महिनाभर चांगले वातावरण असायचे. ती साडी कधीही बाहेर जायला काढली कि ती कुठल्या प्रसंगी आणि तारखेला आणली ते बायका मुलांना सांगत. नवऱ्याच्या लक्षात असेलच असं नसायचं.
बायका स्वतः जाऊन साडी तेव्हाही घेत आणि आजही घेतात. पण नवऱ्याने आणलेल्या साडीने त्यांना जो आनंद व्हायचा त्याचे वर्णन करताच येत नाही. पूर्वीच्या काळी सीतेला काचोळीसाठी डिझाईनर कापड हवं म्हणून प्रभू रामचंद्र मारिचच्या मागे धावले होते. तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली आहे.
पण आता जमाना बदलला आहे का?
आता नवऱ्याने मोबाईल वर साडी दाखवून विचारले कि ही साडी मागवू का तर बायका हा रंग आहे अशी कारणे सांगतात. साडी नको म्हणतात. दुसरं काही घेऊ म्हणतात.
असं का होत असेल?
साडीचं आकर्षण संपलं का? कि साडी खरेदीतील आनंद कमी होत चालला आहे? काय बिघडलंय?
Vastranand
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साडीचा पोत, स्पर्श
साडीचा पोत, स्पर्श पाहिल्याशिवाय साडी घ्यायची इच्छा नसेल. ऑनलाईन शॉपिंगमध्ये रंगही फार ब्राईट दिसतात पण प्रत्यक्षात तेवढे असतील असे नाही. म्हणून घ्यायची नसेल किंवा काहींना अंगावर कापड लावून पाहून तो शोभत असेल तरच घ्यायची सवय असते.
ज्यांच्यासाठी साडी आणणार आहेत त्या रोज साडी नेसतात का?
ज्या बायका कधी मधी साडी वापरणार असतात त्यांना जनरली प्रत्येक साडी युनिक हवी असते.
रोज वापरत असतील आणि साडी जर इतरांच्या म्हणजे घरातील ज्येष्ठ नागरिक किंवा सासू सासऱ्यांच्या मर्जीसाठी वापरावी लागत असेल तर साडीचा कंटाळा आला असेल. सुटसुटीत सलवार कमीज वगैरे वापरायची इच्छा असेल पण सांगता येत नसेल. ते ही विचारून पहा.
काही नवरे उभ्या अक्ख्या
काही नवरे उभ्या अक्ख्या आयुष्यात कधीच बायको ला साडी विकत घेऊन देत नाहीत.. अशी जमात पण अस्तित्वात आहे.
तर काही दुकानात सोबत जातात पण निवडीला मदत करत नाहीत, फक्त बील देतात कटकट करत.
काही नवरे पैसे/कार्ड देऊन मोकळे होतात काहीही कर.
काही नवरे प्रत्येक साडीला उत्तम अशी बोटांनी खूण करतात, ते डोक्यात जाते.
ऑनलाईन साडी मधे दुकानतून घेतअलेल्या साडीची मज्जा नाही हे मात्र खरे!
<< बायका स्वतः जाऊन साडी
<< बायका स्वतः जाऊन साडी तेव्हाही घेत आणि आजही घेतात. पण नवऱ्याने आणलेल्या साडीने त्यांना जो आनंद व्हायचा त्याचे वर्णन करताच येत नाही.
पण आता जमाना बदलला आहे का? >>
तसं नाही. नवऱ्याने अचानक सरप्राइज दिले तर अजूनही आनंद होऊ शकतो. विचारून साडी आणायचा प्रकार केला तर साहजिकच नकार पुढे येतो, माझ्याकडे आधीच इतक्या साड्या आहेत, हल्ली मी साड्या नेसत नाही, पार्टीला जाणे कमी झाले आहे वगैरे वगैरे. पण म्हणून विचारायच्या फंदात पडू नये. तसेही ती साडी बायकोला स्वतः ला न्हवे, इतरांना दिसते. त्यामुळे तुम्हाला आवडेल ती साडी बिनधास्त घेऊन टाकायची. व्यक्तिशः मी तसे करतो, मग त्यासाठी सणवार किंवा विशेष दिवसाची वाट बघायचीपण गरज नसते.
माझ्या मते तुमचा प्रश्न थोडा वेगळा आहे. नवऱ्याने मोबाईलवर साडी दाखवून विचारले कि ही साडी मागवू का, हा खरा प्रश्न आहे. या बाबतीत माझे मत आहे की कपडे हाताळून बघूनच घ्यायला हवेत ज्यामुळे रंग, डिझाईन आणि पोत कळून येतो.
<< काही नवरे उभ्या अक्ख्या आयुष्यात कधीच बायको ला साडी विकत घेऊन देत नाहीत.. अशी जमात पण अस्तित्वात आहे. >>
माझा एक मित्र तसा आहे. त्याने उभ्या आयुष्यात साडी काय, एखादा ड्रेस किंवा एक हातरुमालपण बायकोसाठी स्वतः खरेदी करून दिलेला नाही. असे त्याची बायको माझ्या बायकोला म्हणाली. खरी गंमत पुढे आहे. मित्राशी बोलत असताना कळले की माझी बायको त्याच्या बायकोला म्हणाली "बरं आहे, माझा नवरा उगीचच खरेदी करत पैसे उधळत असतो". You can't win either way.
<< काही नवरे प्रत्येक साडीला उत्तम अशी बोटांनी खूण करतात, ते डोक्यात जाते. >>
जुन्या नवऱ्यांना माहीत असते They aren't buying things, they are buying peace. /s 
ते नवशिके आहेत का? अबोली रंगाला म्हणायचे की हा लाईट केशरी रंग चांगला दिसत नाही, असे म्हणून आपले अज्ञान अधूनमधून दाखवून द्यायचे असते.
<<< काही नवरे प्रत्येक साडीला
<<< काही नवरे प्रत्येक साडीला उत्तम अशी बोटांनी खूण करतात, ते डोक्यात जाते.>>>
प्रत्येक नवरा डिडीएलजेचा शाहरुख खान कसा असेल जो केळे खाता खाता साडी बकवास/ओके/उत्तम अश्या खुणा करेल. प्रत्येकाला बायकांच्या फॅशनचा इतका सेन्स कसा असेल. बायका सगळ्या अपेक्षा नवरा या एकाच व्यक्तीवर टाकतात इथेच त्यांचे चुकते. पुरुष मात्र वेगवेगळ्या अपेक्षापूर्तीसाठी वेगवेगळ्या बायकांच्या शोधात असतात. पण दुर्दैवाने यात त्यांचे कॅरेक्टर बदनाम होते
मला या धाग्यावर प्रत्येक
मला या धाग्यावर प्रत्येक प्रतिसादात प्रत्येक प्यारेग्राफनंतर "महिलावस्त्रे पहा" अशी जाहिरात येत आहे... काय करू?
बायका सगळ्या अपेक्षा नवरा या
बायका सगळ्या अपेक्षा नवरा या एकाच व्यक्तीवर टाकतात इथेच त्यांचे चुकते. >> असहमत.
(धागा स्फोटक होण्यासाठी सरांनी मुद्दाम तसे लिहिले असेल, तर क्षमस्व.)
बायका सगळ्या अपेक्षा नवरा या
बायका सगळ्या अपेक्षा नवरा या एकाच व्यक्तीवर टाकतात इथेच त्यांचे चुकते. >> सहमत. सरसकट नाही.. पण लग्नाची सुरुवातीची काही वर्षे आणि कोणी चांगली कानउघडणी करणारी मैत्रीण नसल्यास हा पॅटर्न आयुष्यभर राहतो.
पुरुष मात्र वेगवेगळ्या अपेक्षापूर्तीसाठी वेगवेगळ्या बायकांच्या शोधात असतात. पण दुर्दैवाने यात त्यांचे कॅरेक्टर बदनाम होते
>> कारण सगळ्या वेगवेगळ्या गरजा भागवायला फक्त बाईच कश्याला लागते? इतर पुरुष मित्र त्या गरजा भागवू शकत नाहीत का? तसेही शारीरिक गरज बायको सोडून इतर स्त्रीकडून भागवणे नैतिकतेला धरून नाहीये. ते सोडल्यास बौद्धिक, भावनिक, राजकीय, सामाजिक गरजेसाठी चांगले मित्र आणि मैत्रिणी दोन्ही करू शकतोच ना.
बायकोला प्रेमाने साडी घेऊन
बायकोला प्रेमाने साडी घेऊन देणारे नवरे अस्तित्वात आहेत का ?
काकाफॉचा वेगळा धागा असणे
काकाफॉचा वेगळा धागा असणे आउटडेटेड झाले आहे का?
बायकोला प्रेमाने साडी घेऊन
बायकोला प्रेमाने साडी घेऊन देणारे नवरे अस्तित्वात आहेत का ?भारतीय संस्कृती पहा
हे बघा मला काय दिसतय
मला या धाग्यावर प्रत्येक
मला या धाग्यावर प्रत्येक प्रतिसादात प्रत्येक प्यारेग्राफनंतर "महिलावस्त्रे पहा" अशी जाहिरात येत आहे>>> मला पण. साडी दुकानाचे नाव आहे का काय! अ तिरेक जाहिरातींचा.
प्रत्येकाला बायकांच्या फॅशनचा इतका सेन्स कसा असेल>>> हे बरोबर आहे पण जरा स्वतःचं पण डोकं वापरावं ना.. बायको च्या रंगाला साडी रंग कसा दिसेल वगैरे.. असो.
साडी बटबटीत वाटतेय का सोबर, पोत मऊ आहे का काथ फार मोठे आहेत का वगैरे भानगडी आम्ही बायका निस्तरू
साडीचा पोत, स्पर्श
साडीचा पोत, स्पर्श पाहिल्याशिवाय साडी घ्यायची इच्छा नसेल. >> चांगला मुद्दा आहे. पण नवरेमंडळाचा अनुभव असा आहे कि ऑनलाईन शॉपिंगचा वापर जास्त आहे. हल्ली बायका स्वतःहून साडीचा तगादा लावत नाहीत आणि चल खरेदीला म्हटलं कि नंतर म्हणतात. एखाद दुसर्या नवर्याचा अनुभव नाही हा. लसूण सोलता सोलता किंवा गहू निवडताना या गप्पा होतात.
काही नवरे उभ्या अक्ख्या आयुष्यात कधीच बायको ला साडी विकत घेऊन देत नाहीत.. अशी जमात पण अस्तित्वात आहे. >> अपवाद असतातच. अपवादानेच नवरे आवडीने साड्या आणतात हा नियम सिद्ध झाला.
नवराबॅशिंग चालू झालं आहे. नवरा हा गरीब प्राणी असतो. तो घरात कुठल्यातरी एका कोपर्यात पडून राहतो, दिलेलं निमूटपणे गिळतो आणि कितीही ओरडलं तरी लगेच शेपूट हलवतो. त्याच्यावर राग धरूच नये. भोळसट, भाबडा, गोड प्राणी.
ऑनलाईन साडी खरेदी करु नका,
ऑनलाईन साडी खरेदी करु नका, म्हणजे बायको करत असली तरी तुम्ही करु नका. बहुसंख्य स्त्रीयांना साडीचे प्रकार, पोत वगैरे माहित असतात, बरेचदा तशा प्रकारची साडी प्रत्यक्ष हाताळून बघितलेली असते, त्यामुळे त्यांना जमते. दुकानात जाऊन खरेदीचा मुद्दाम प्लॅनही करु नका. बरेचदा कुठल्यातरी वेगळ्याच खरेदीसाठी-कामासाठी बाहेर पडल्यावर अचानक शोरुम-दुकानाच्या बाहेरच्या काचेत लावलेली साडी बायकोला आवडते, अशावेळी लगेच खरेदीचा प्लॅन करावा. डिस्प्लेत आवडलेली साडी घेतली जाणार नाही , दुसरीच कुठली तरी साडी घेतली जाईल या गोष्टीची तयारी ठेवावी. कदाचित ठरलेली खरेदी बाजूला पडून साडी खरेदी हेच मुख्य काम असल्यासारखे अजून चार दुकाने फिरणेही होईल, तेव्हा कुरकुर करु नका. साडी खरेदी झालीच नाही तरी निराश होवू नका. हा पॅटर्न सुरु ठेवा. बायकोसाठी साडी खरेदी केल्याचा आनंद हवा आहे तर एवढे कष्ट घेणे भाग आहे.
मी स्वतः कधीच साडी खरीदी केलेली नाहीये. पण आमच्याकडे कपडे-पर्सेस-ज्वेलरी- शूज वगैरेची अचानक खरेदी होते. यात काही वेळा +१ साठी खरेदी करुन घरी असेही होते पण तेवढे तो करतो सहन!
माझ्याघरी पत्नीच्या बऱ्याचशा
माझ्याघरी पत्नीच्या बऱ्याचशा साड्या मीच आणलेल्या आहेत. तिला कुठला रंग खुलून दिसेल हे मला जास्त चांगले सांगता येते.
पूर्वी पत्नीने स्वतः जाऊन काही साड्या आणल्या होत्या परंतु नंतर तिच्या लक्षात आले कि आपली निवड फारशी चांगली नाही (साडी बाबत).
यामुळे आता तिच्या कडे असलेल्या साड्यांच्या संग्रहात दोन तर्हेच्या साड्या आहेत.
एक म्हणजे मी घेतलेल्या आणि दुसऱ्या म्हणजे इतर कुणीतरी समारंभाला/ लग्नात/ वाढदिवसाला आहेर म्हणून दिलेल्या.
यात मी घेतलेल्या साड्या नक्कीच चांगल्या आहेत हे ती मान्य करते. शिवाय दुसर्यांनी दिलेल्या साडया महागाच्या असल्या (उदा. दोन्ही विहिणींकडून आलेल्या) तरी बहुतेक तुमच्या आवडीच्या नसतात. देणाऱ्याचे पैसे जातात आणि मिळणारी साडी तुमच्या आवडीची नसते.
आमचे लग्न झाल्यापासून कोणालाही आहेर म्हणून साडी ( इतकेच नव्हे तर कोणतीही वस्तू) देणे हे मला मान्यच नाही यामुळे मी आपले बजेट ठरवून साडी (किंवा आवडीची वस्तू) घेण्यासाठी तेवढे पैसे रोख रक्कम म्हणून आहेर देतो. हेच तत्व मी मुलांच्या वाढदिवसाची भेट देताना एक तर त्यांना विचारून वस्तू घेतो किंवा तेवढे पैसे सरळ रोख रक्कम देतो
लष्करात असताना मी जोधपूर, वाराणसी, लखनौच्या चिकनकारी चेन्नई मधली नल्ली कोईमतूर मैसूर सिल्क अशा विविध ठिकाणच्या उत्तमोत्तम साड्या तिच्याकडे आहेत. एक तर मी एकट्याने तिला आणल्या होत्या किंवा आम्ही दोघांनी एकत्र जाऊन आणलेल्या होत्या.
त्यातून आता तिची पन्नाशी, दोन्ही मुलांचे साखरपुडे, विवाह, मुलीचे डोहाळे जेवण, नातवाचा जन्म अशा असंख्य प्रसंगांमुळे तिच्याकडे इतक्या साड्या झाल्या आहेत कि त्या ठेवायला जागा नाही आणि त्यातील उंची साड्या नेसायला प्रसंग पण फारसे येत नाहीत.
एवं च - आता आमचे साडीच्या दुकानात जाणे बंद झालेले आहे.
बायकोला सर्वात पहिला ड्रेस
बायकोला सर्वात पहिला ड्रेस घेतला तो जोधपूरला. त्या वेळी पुण्यात असे ड्रेस कुठेच मिळत नसत. एकदा आग्र्यात साडी घेतली. ते दुकान नेमकंच चांगलं निघालं. पुण्यातल्या कितीतरी दुकानांना यांच्याकडून साड्या आणि अन्य कपडे पाठवत. नंतर तिला आग्र्याला घेऊन आलो तेव्हां त्याच दुकानातून बनाना फायबर (केळीच्या तंतूपासून) बनवलेली साडी घेतली होती. एक बंगळुरूत घेतली होती. कोइमतूरला एक मद्रास साडी सारखी साडी घेतली. त्या साडीची तारीफ बायकांनी केली होती. पुढच्या वेळी जाल तेव्हां आम्हालाही एक आणा अशी ऑर्डर मिळाली. (तेव्हां बिझनेसचा विचार डोक्यात आला होता, पण आहे त्याच दरात दिल्या. व्यापारी कसा काय नफा काढतात तेच जाणोत)
बायकोबरोबर गेलो तेव्हां मी सुद्धा अनेक साड्या काढल्या होत्या, पण खूप खर्च होतो म्हणून तिने त्या घेतल्या नाहीत. हिमाचल वरून एक साडी घेतली होती. तशीच दिल्लीत पण मिळाली. बडोदा, वलसाड मधे घेतलेल्या साड्या फार स्वस्त मिळाल्या. सूरतला मात्र जाणं आजतागायत झालेलं नाही आणि बरेच जण सांगतात कि सूरतला नका घेऊ साड्या.
नगरला घेतल्या पण एव्हढ्या काही खास नाहीत वाटल्या. कलकत्त्यात पांढरी बंगाली साडी घेतली (नाव विसरलो). डिझाईनच्या मानाने किंमती बर्याच जास्त वाटल्या होत्या. बायकोलाही खूप महाग वाटली. बाकी लक्ष्मी रोड झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा.
स्वाती२ सल्ला आवडला.
स्वाती२ सल्ला आवडला.
माझ्यामते साडीच काय काही ही
माझ्यामते साडीच काय काही ही भेट आणणे कालबाह्य होत चालले असावे. जो तो आपापल्या पसंतीने घेत असेल.
कोणती ही साडी नवरा आणेल आणि बायको आनंदाने नसेल ही गोष्ट राहिली नाही आता. पूर्वीच्या काळात बायका साडी फारच दूर चार आण्याच्या मोगऱ्याच्या किंवा अबोलीच्या वेणीवर ही खुश होत, लगेच गरमगरम पोहे मिळायचे त्या दिवशी त्यांना हापिसातून आल्यावर. आता काळ बदलला आहे.
साडीचं आकर्षण संपलं का? कि साडी खरेदीतील आनंद कमी होत चालला आहे? काय बिघडलंय?महिलावस्त्रे पहा >> माझ्यामते नवऱ्यावर असलेलं आर्थिक अवलंबित्व कमी झालं आहे , त्याने आणलेल्या पण न आवडलेल्या वस्तूच कौतुक करून त्याला चढवण्याची, त्याच्या पुढे पुढे करण्याची गरज उरलेली नाही.