चित्रपटातील मला न आवडलेल्या काही रूढ संकल्पना

Submitted by पशुपत on 4 November, 2026 - 13:02

हिंदी चित्रपटांमध्ये पूर्वापार काळापासून सरसकटपणे वापरल्या गेलेली काही प्रमेय मला फार बालिश वाटत आलेली आहेत . तुमचं त्यावर काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी काही प्राथमिक स्वरूपातली दोन-तीन उदाहरणे इथे देतो
१. चित्रपटातील नायिका ही बालिकावस्थेतून तारुण्यात पदार्पण करत असताना देहाने यौनात पोचली तरी मनाने ते अजून बालिकेसारखी अल्लड आणि निष्पाप आहे हे दाखवण्याची हौस हिंदी दिग्दर्शकांमधे पूर्वापार चालत आलेली आहे आणि हे दाखवण्यासाठी ( खरंतर पंधरा सोळा वर्षाची नटी मला आजवर कधीच दिसलेली नाही . तिच्या भूमिकेत ३५~४० वर्षाची प्रगल्भ नटी आपण प्रेक्षकांच्या डोक्यावर किंवा डोळ्यांवर सतत मारली गेलेलीआहे आणि ती ते सहनही करत आलेले आहेत) पण त्यातूनही ते अल्लड दाखवण्यासाठी; साधारण आठ नऊ वर्षांच्या मुलांबरोबर लगोरी विटी दांडू सारखे खेळ खेळताना दाखवलेली कित्येक चित्रपटात पाहत आलेलो आहोत.. त्यावेळेला मला ती निश्पाप बालिका वगैरे न वाटता मंदबुद्धीची किंवा स्लो लर्नर वगैरे असावी असेच वाटत आले आहे..

२. बऱ्याच वेळेला चित्रपटातले पात्र तीन-चार दिवस उपाशी राहून अचानक त्याच्यासमोर पक्वानांचं भरलेलं ताट आल्यावर तो ज्या पद्धतीने ते खाताना दाखवतात... म्हणजे हात कोपरापर्यंत बरबटलेले आणि चेहरा कापाळापासून गळ्यापर्यंत बरंबटलेला.. आणि पाहणार्‍याला अतिशय किळस वाटेल अशा पद्धतीने तो खाताना दाखवतात ते बघून मला त्या व्यक्तिरेखा बद्दल आपुलकी किंवा दया न वाटता किळसच वाटते. सर्व आति सुशिक्षित व्यक्तिरेखा अचानक इतक्या गलिच्छ पद्धतीने कशा काय वावरू शकतात आणि तिथे दिग्दर्शकाला तसे ते अपेक्षित का असते आणि ती प्रेक्षकांनी आनंदाने स्वीकारावे असे का वाटते हे मला खरंच कळत नाही

अर्थातच हे माझे वैयक्तिक मत आहे.. वाचकांना असेच वाटते का? त्यांचे या संदर्भात काय मत आहे हे निश्चित समजून घ्यायला आवडेल.
अशाच प्रकारचे इतर काही प्रसंग कोणाला खुपत आलेले असतील तर त्याही बद्दल प्रतिसादामध्ये लिहायला हरकत नाही !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>>>>हो पण तो खोलीबाहेरचा कोरस होता Happy ते लोक बाहेर नाच करत होते.
ते नवरा नवरी झोपीही गेले असतील ( काही न करता) पण ते बाहेरचं पब्लिकच फार एक्साईट झालेलं Lol त्यांना आवरा!

मी हल्लीचे म्हणजे गेल्या दहा वर्षातले हिन्दी चित्रपट फारसे पाहिले नाहीत. पण त्यांच्यात वर मुळ लेखात व प्रतिसादात लिहिलेली वर्णने दिसली नसावीत असे वाटतेय. हिन्दी चित्रपटांचे विषय, त्यांच्यातले कलाकार, कपड्यांच्या पद्धती, गाण्याच्या पद्धती हे सगळे आता पुर्ण बदलले आहे. बचपना करणारी निरागस नायिका, झाडाभोवती फिरणारे कपल, एका फटक्यात प्रेग्नन्ट होणारी अतीफर्टाईल नायिका, प्रत्येक प्रसंगासाठी एक गाणे व ते प्रत्यक्ष लिप सिन्क करुन गाणारे लोक वगैरे सगळे आता इतिहासजमा झाले अशी शंका यायला वाव आहे.

>> कॉलेजमधे जाताना फक्त हातात १ किंवा २ वह्या. बाकी काही सामग्री, backpack वगैरे काही नाही!
अगदी. इथं आपण जड सॅक, त्या ग्राफिक्स शीटच्या सुरनळ्या किंवा स्ट्रीम प्रमाणे तत्सम समग्री ची बोचकी घेऊन जायचो. हे मात्र मामाकडं जेवायला आल्याच्या थाटात हात हलवत चालत येणार.
दुसरं म्हणजे आडनावंच नसतात यांना. घरानेकीं इज्जत आहे पण आडनाव इल्ले. अगदी कॉलेजच्या समारंभात, पार्ट्यांमध्ये ओळख करून देताना. ये है मिस्टर अमित. मिस्टर कुमार नी तर धुमाकूळ घातला होता एकेकाळी.
आडनावं फक्त बिझनेसमन आणि विलन्स ना.

बाकी काहीही म्हणा..
पण बऱ्याचदा चर्चून झालेला पॉईंट..
ब्रेकफास्ट ला काचेच्या जार मधला orange juice, गरमा गरम पराठे (गोबी के ), आणि ब्रेड बटर ह्याला challange नाही
Pure सिनेमा!!!

शोले सारख्या सिनेमात हि जया भादुरी अल्लडपणाची परिसीमा करताना होळी है बडबडत टांग्याच्या मागे धावून इतकी बडबड करते कि लोकांना काव येतो.

या शिवाय ठाकूरच्या घरात ती कंदील लावते कारण गावात वीज नाही. पण धर्मेन्द्र दारू पिऊन प्रचंड टाकीवर चढतो तिथे वीज नसलेल्या गावात अशी टाकी कुणी बांधली आणि बांधली तरी त्यात पाणी कसे चढवता येई इतका मूलभूत विचार सुद्धा नाही.

हिंदी सिनेमा पाहताना डोके बाजूला काढून ठेवा असे म्हणतात

पण जेम्स बॉण्ड चा बिलियन डॉलर थ्रेट पहिला होता त्यात जे क्षेपणास्त्र संपूर्ण शहर बेचिराख करणार होते ते ००० झाल्यावर आडवे झेप घेते आणि तेथे फूसस होऊन कसे जाते याबद्दल कुणाला काही वाटत नाही.

जेम्स बॉण्ड सिनेमा मध्ये टाइम बॉम्ब "०००" होईपर्यंत कधीच कसा निकामी होत नाही? बाहेरच्या जीवसृष्टीतील अमानवी जीव बरोबर अमेरिकेवरच कसा हल्ला करायला येतात? उत्तर कोरिया किंवा चिली पेरू वर का नाही? जग वाचवायची जबादारी केवळ अमेरिकेचीच कशी आहे? असले प्रश्न विचारायचे नाहीत.

एकंदर काय सिनेमा म्हणजे निखळ करमणूक आहे त्याचा वास्तवाशी काही संबन्ध नाही हे गृहीत धरूनच पाहायला जायचं.

अजुन 'अमर अकबर ऍंथोनी' चार उल्लेख कुणीच कसा नाही केला. मी एकदा लोकप्रभा मधे एका खुप ज्येष्ठ डॉक्टरांची मुलाखत वाचली होती. त्यांनी सांगितले होते की अमर अकबर अँथनी हा त्यांनी बघितलेला शेवटचा चित्रपट! त्यातील तो सीन ज्यात अमर , ऍंथोनी आणि अकबर (ज्येष्ठता क्रमानुसार) हॉस्पिटल च्या बेडवर झोपलेले असतात आणि त्यांच्या दंडात खुपसलेल्या सुयांवाटे रक्त (अगेंस्ट ग्रॅव्हिटी, विथ नॉर्मल फोर्स ऍन्ड प्रेशर!) एका बाटलीत जमा होऊन इन रिअल टाईम निरुपा रॉय च्या शरीरात सोडले जाते. बघितल्यानंतर त्यांनी आयुष्यात कुठलाच हिंदी चित्रपट पाहिला नाही! Happy

एकंदरच हिंदी चित्रपटातील डॉक्टर्स आणि त्यांचे मेडिसिन फील्ड चे ज्ञान हा एका स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. मी शबाना आझमी, रेखा आणि जितेंद्र च्या पिक्चर मधला एक सीन बघितला होता. त्यात शबाना लाल ब्लड कॅन्सर होतो, तिला डॉक्टर सांगतात हिरवी मिरची खाऊ नकोस तुला वर्ज्य आहे! मेडिसिन कुठलाच संबंध नसलेल्या रेखाला डॉक्टरनी न सांगताही ही गोष्ट माहित असते. आपल्या निदानाबद्दल आधी शबाना तिला सांगते. मग तिला खूप दुःख झाले आहे हे लक्षात आल्यावर मी गंमत करत होते म्हणुन सांगते. ती खरोखरच गंमत करत होती का हे तपासून पहाण्यासाठी रेखा तिला घरातुन एक हिरवी मिरची आणुन देते आणि खाऊन सिद्ध करुन दाखव म्हणून सांगते. मैत्रीणीच्या अतीव प्रेमापोटी शबाना काकडी किंवा टोमॅटो खावा तितक्या सहजतेने हिरवी मिरची खाते! हे खरोखर अगदी असेच्या असेच घडते चित्रपटात.

गावात वीज नसेल पण डिझेल पंपाने टाकीत पाणी चढवता येईल ना? पूर्वी बऱ्याच शेतात असे पंप असायचे. काही ठिकाणी तर मी राजदूतचे इंजिन काढून पंपाला लावलेले पाहिलं आहे.

बाकी चालू द्या Lol

हिरोईन सदैव हसरी, मनमिळावू, नाचायला एका पायावर तयार असते व मैत्रिणी व कुटुंबिय, शेजारी वगैरेंच्या गराड्यात असते. कुठल्यातरी फूल्स पॅराडाइजमधे वावरत असते बरेचदा.. तिला कधीच शांत, इंट्रोवर्ट वगैरे दाखवत नाहीत. इंट्रोवर्ट, वास्तवात जगणारी आणि वर तुसडी अशी हिरोइन पहिल्यांदा बघितली "जिंदगी गुलजार है" नामक पाकिस्तानी ड्राम्यात. फारच आवडली ती. कशफ!

रश्मीका च्या द गर्लफ्रेंड पिक्चर मध्ये त्यातल्या त्यात अंतर्मुख आणि कमी पॉप्युलर नायिका चांगली दाखवली आहे.

हिंदी चित्रपटांचा शॉर्ट हेअरकट स्त्रियांबद्दलचा पूर्वग्रह:
श्रीदेवी चा गुमराह, अनुष्का चा पिके आणि अजून अगदी थोडे अपवाद वगळता चित्रपटातली शॉर्ट ट्रेंडी हेअर कट वाली स्त्री पात्रं एकतर व्हिलन ची सखी आणि दुष्ट असतात किंवा नायिकेला त्रास देणारी घरातली दुष्ट नातेवाईक असतात.अतिशय छान,गोड स्वभावाचं आणि चांगल्या फॅशनेबल मानेपर्यंतच्या शॉर्ट हेअर कट वालं स्त्री पात्र दुर्मिळच.

हिरोईन सदैव हसरी, मनमिळावू, नाचायला एका पायावर तयार असते व मैत्रिणी व कुटुंबिय, शेजारी वगैरेंच्या गराड्यात असते
>>> ही एक पॅट्रीआर्किकल विचारसरणीच होती ना? बाईने सगळ्यांना (त्यातल्या त्यात सासरच्यांना) धरून असावं (माहेराला वाऱ्यावर सोडलं तरी चालतं), (तुम्ही कसेही वागलात तरी तिने) चेहरा हसतमुख ठेवावा इ. इ. मग अंतर्मुख, स्वतःच्या विचारात नी विश्वात वावरणारी कशी चालेल?

कशफ इंट्रोव्हर्ट आणि वास्तवात जगणारी आहे. पण तुसडी आहे ती परीस्थितीच्या रेट्याने. ती जेव्हा नवऱ्याच्या प्रेमात पडत असते तेव्हा ती फार गोड वाटते.
तत्पूर्वी अनुपमामधे पण शर्मिला शांत दाखवली होती. पण ती अंतर्मुख नव्हती, बुजलेली होती.

>>मॅनर्स !

डोंबलाचे मॅनर्स ! :). गाण्यात 'खिडकी मे से देखो जरा' म्हणतात. ते Voyeurism मध्ये येतं Wink

बऱ्याचशा गोष्टी कमी वेळात परिणामकारक पद्धतीने दाखवण्याच्या उद्देशाने; प्रातिनिधिक स्वरूपात पटकन कळतील अशा दृश्यातून दाखवण्याच्या हेतूने तशा त्या मान्यही करता येतील.. पण या सगळ्याचं प्रतिनिधी स्वरूपच इतकं बालिश बावळट असते कि.. सगळंच एकदम डोक्यात जातं !
प्रेक्षकाचे प्रतिनिधित्व आठ वर्षाचा साधारणपणे दुसरी नापास झालेला मुलांच्या स्वरूपात आहे असे समजून चित्रपट काढलेले असतात बहुतेक...

हिरविणींच्या कानातल्यांना कधी फिरक्या नसतात.

कानातलं घालताना आणि काढताना एकदा तरी फिरकी खाली पडणार आणि मग आजूबाजूच्यांनी रांगत रांगत ती शोधणं हे कधी पहायला मिळत नाही.

मस्त धागा आणि 'अभ्यासपूर्ण' मनोरंजक प्रतिसाद वाचायला मजा आली!

@ mi_anu
>>>"श्रीदेवी चा गुमराह, अनुष्का चा पिके आणि अजून अगदी थोडे अपवाद वगळता चित्रपटातली शॉर्ट ट्रेंडी हेअर कट वाली स्त्री पात्रं">>>
मला पटकन आठवलेल्या आणखीन दोघी म्हणजे... 'द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' ह्या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी प्रियांका चोप्रा आणि 'अब ताक छप्पन - २' मधली गुल पनाग. छान शॉर्ट हेअर कट, आणि विशेष म्हणजे चष्मा लावणाऱ्या ह्या दोन्ही व्यक्तिरेखा असूनही मला त्यांचे लुक्स खूप आवडले होते.

हो पण हिरो मध्ये प्रियांका ला कटवून लांब केसवाल्या प्रिटी ला हिरो दिला आहे. Happy
यादे मध्ये शॉर्ट केस वाल्या मोनिषा ला नारळ देऊन करीना ला ह्रितिक दिलाय.

मिलिटरी ऑफिसर्स एकदम कडक असतात किंवा मग एकदम जॉली दाखवण्याच्या नादात मोठमोठ्याने हसणारे (आठवा नासीर हुसेन) असतात. ते लेफ्टनंट रँकच्या ऑफिसरला नेहमी "यंग मॅन" म्हणतात आणि या वयात काय करायचं याचं गडगडाटी आवाजात हातात व्हिस्कीचे ग्लास घेऊन मार्गदर्शन करतात.

रा.अ. Lol यंग मॅन तर परफेक्टच, पण ते हमखास "बर्खुर्दार" का असेही काहीतरी म्हणत. त्याचा नक्की उच्चार व अर्थ अजूनही मला (मी राहायचो त्या आसपास मिलिटरी कमांडर्स कोणी नसल्याने) माहीत नाही.

पिक्चर मधे कोणी मरतो तेव्हा त्याची भोळीभाबडी बायको किंवा आई बराच काळ ते मान्यच करत नाही, रडत नाही. त्या मेलेल्या व्यक्तीशी अहो उठा ना वगैरे रोजचे काही बोलल्यासारखे करते. बहुधा ते अहो जिवंत असतानाही इतकेच ढिम्म झोपत असावेत, त्यामुळे बायकोला कळायला जेन्युइनलीही वेळ लागत असेल. मग आजूबाजूचे पांढरे कपडेधारी लोक डोळे पुसत आहेत वगैरे. सुदैवाने पिक्चर्स मधून हा प्रकार कालबाह्य झालाय पण कुठेतरी अजून अधूनमधून्न सापडतो

बर्खुर्दार >> Lol
बरखुरदार म्हणजे सामान्य माणसाचं बाळा, बेटा पण पेठेतला माणूस जेव्हां मुलांना "अहो कुलदीपक" "ओ चिरंजीव" म्हणून हाक मारतो, त्याच्या जवळ जाणारा टोन.

बहुधा ते अहो जिवंत असतानाही इतकेच ढिम्म झोपत असावेत, त्यामुळे बायकोला कळायला जेन्युइनलीही वेळ लागत असेल. >>> Lol आज रविवार तर नाही अशी शंका त्या माऊलीला येत असेल.

तसेच ती माऊली (बर्‍याच वेळा निरुपा रॉयाच) आपल्या लाडक्या मुलाला "गाजर का हलवा" सारखी खिलवत असते

आणि नवपरिणीता पहिल्या रात्री सजवलेल्या खोलीत येताना दुधाचा ग्लास घेऊन येते !

हे मात्र खरंय
खूप जुने झाले आता हे सगळे

नवीन चित्रपटात कोणत्या गोष्टी दिसतात हे कोणी सांगेल का ?

नवीन चित्रपटातल्या हाणामारीबद्दल पण सगळीकडे बरंच लिहीलं गेलंय.

पृथ्वी रबराची आहे याची जाणिव व्हावी म्हणून एखाद्याला एका बुक्कीत खाली पाडले कि तो रबरी पृथ्वीवर आपटून वर उसळतो.
दक्षिणेच्या कुठल्याही नायकाला स्पर्श केला कि दोनशे लोक हवेत उअडत. आता हिंदी नायकांमधेही ती पावर आली आहे.

नायक नायिका पन्नाशीचे घोडे झाले तरी पडद्यावर त्यांना मैत्री आणि प्रेम यातला फरक कळत नसणे.

एका पेक्षा जास्त नायक असले कि त्यांनी एकमेकांच्या पाठीला पाठ लावून गोळीबार सुरू केला कि समोर हजार बंदूकधारी असले तरी त्यांना एकही गोळी लागू शकत नाही. तीन असले तर मग संख्या वाढू शकते.

बऱ्याच नवीन सिनेमांमध्ये मला लिप सिंकिंग चा प्रॉब्लेम वाटतो. म्हणजे आजकाल हे सिनेमे एकापेशा जास्ती भाषांमध्ये करतात...त्याने की काय...माहीत नाही!
पण हिरोईन च्या चेहऱ्यावरचे भाव, तिच्या ओठांची हालचाल आणि ऐकू येणारे शब्द यांत तफावत जाणवते. कृत्रिम वाटते ते मग.
कधीकधी, नायिकेचे संपूर्ण संवाद हे दुसऱ्याच कुणीतरी डब केलेले असतात..तेव्हाही काहीतरी विसंगती जाणवते.

दारू चे दोन चार घोट प्यायले कि पुढच्या ५ सेकंदात हिरो, हिरवीण किंवा कॉमेडीयन एकदम टल्ली होतात. आणि मग झिंगल्याची जे काही स्टीरीयो टाईप अ‍ॅक्टींग करतात कि बास ! झोकांड्या देत चालणे, असंबद्ध प्रकारचे बालीश बोलणे वगैरे वगैरे तसेच गेली वर्षानुवर्षे करत आहेत.

मी अनु, शॉर्ट ट्रेंडी हेअर कट वाल्या हिरॉईन चं म्हणालात ते कधी लक्षातच आलं नव्हतं. आता विचार केल्यावर अगदी पटतय! अगदी 'लक्ष्य' मधे सुद्धा प्रीती झिंटा तिच्या जागी अगदी बरोबर असली तरी हीरो वरच्या फोकस मुळे जरा निगेटीव्ह पोर्ट्रे होते.

आखूड केस प्रमेय फक्त वाचतोय. कारण सिनेमा बघताना त्यातल्या बायांची केशरचना, दागदागिने, साड्या हे अजिबात लक्षात राहत नाही. अदृश्य डोळे पुरूषांना दिलेलेच नाहीत. पण अमिताभ बच्चन, विनोद खन्नाची जाकीटं लक्षात आहेत अजून. त्या वेळी आजूबाजूला कुणी असली लेदरची जाकीटं घालत नसत.

पूर्वी तर थेटरात सिनेमा पाहिला कि पुन्हा पहायचा असेल तर थेटरातच जावं लागे. डॉन मधल्या झिंतामानचे केस लक्षात राहिले होते कारण असा बॉयकट पहिल्यांदाच पडद्यावर आला असेल.

चौकट राजा अगदीच बरोबर आहे तुमचं
मद्याला अजिबात स्पर्श न करणारी हीरोइन; हिरोवर चिडून समोरचा प्याला उचलून घटाघटा पिऊन टाकते; हे तितकेच हस्यास्पद आहे...
स्त्रियांची निरीक्षण क्षमता चारा खायला गेलेली आहे काय ?आजूबाजूचे लोक असे घटाघटा पिताहेत का! काहीही!!!

Pages