हिंदी चित्रपटांमध्ये पूर्वापार काळापासून सरसकटपणे वापरल्या गेलेली काही प्रमेय मला फार बालिश वाटत आलेली आहेत . तुमचं त्यावर काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी काही प्राथमिक स्वरूपातली दोन-तीन उदाहरणे इथे देतो
१. चित्रपटातील नायिका ही बालिकावस्थेतून तारुण्यात पदार्पण करत असताना देहाने यौनात पोचली तरी मनाने ते अजून बालिकेसारखी अल्लड आणि निष्पाप आहे हे दाखवण्याची हौस हिंदी दिग्दर्शकांमधे पूर्वापार चालत आलेली आहे आणि हे दाखवण्यासाठी ( खरंतर पंधरा सोळा वर्षाची नटी मला आजवर कधीच दिसलेली नाही . तिच्या भूमिकेत ३५~४० वर्षाची प्रगल्भ नटी आपण प्रेक्षकांच्या डोक्यावर किंवा डोळ्यांवर सतत मारली गेलेलीआहे आणि ती ते सहनही करत आलेले आहेत) पण त्यातूनही ते अल्लड दाखवण्यासाठी; साधारण आठ नऊ वर्षांच्या मुलांबरोबर लगोरी विटी दांडू सारखे खेळ खेळताना दाखवलेली कित्येक चित्रपटात पाहत आलेलो आहोत.. त्यावेळेला मला ती निश्पाप बालिका वगैरे न वाटता मंदबुद्धीची किंवा स्लो लर्नर वगैरे असावी असेच वाटत आले आहे..
२. बऱ्याच वेळेला चित्रपटातले पात्र तीन-चार दिवस उपाशी राहून अचानक त्याच्यासमोर पक्वानांचं भरलेलं ताट आल्यावर तो ज्या पद्धतीने ते खाताना दाखवतात... म्हणजे हात कोपरापर्यंत बरबटलेले आणि चेहरा कापाळापासून गळ्यापर्यंत बरंबटलेला.. आणि पाहणार्याला अतिशय किळस वाटेल अशा पद्धतीने तो खाताना दाखवतात ते बघून मला त्या व्यक्तिरेखा बद्दल आपुलकी किंवा दया न वाटता किळसच वाटते. सर्व आति सुशिक्षित व्यक्तिरेखा अचानक इतक्या गलिच्छ पद्धतीने कशा काय वावरू शकतात आणि तिथे दिग्दर्शकाला तसे ते अपेक्षित का असते आणि ती प्रेक्षकांनी आनंदाने स्वीकारावे असे का वाटते हे मला खरंच कळत नाही
अर्थातच हे माझे वैयक्तिक मत आहे.. वाचकांना असेच वाटते का? त्यांचे या संदर्भात काय मत आहे हे निश्चित समजून घ्यायला आवडेल.
अशाच प्रकारचे इतर काही प्रसंग कोणाला खुपत आलेले असतील तर त्याही बद्दल प्रतिसादामध्ये लिहायला हरकत नाही !
पहिल्या पॉईंटबद्दल १००% सहमत.
पहिल्या पॉईंटबद्दल १००% सहमत.
मराठी सीरिअलमधली हिरॉईन असेल तर तिने मोठी ओढणी फलकावत, गिरकी मारत झाडाला बांधलेला झोका/नसल्यास घरातला पडदा हलवणे, धाकट्या भावा-बहिणीला उगीचच टीझ करणे, म्हाताऱ्या आजी-आजोबांना पाठीमागून येत खांद्याला पकडणे मस्ट असते.
चांगल्या तिशीतल्या माधुरीला चॉकलेट लाईम ज्यूस गाण्यात आचरटपणा करताना दाखवले आहे.
त्यामानाने जंगलीमध्ये सायरा बानो वाटली होती तारुण्यात पदार्पण करणारी आणि तिने वेडे चाळे केले नव्हते.
हिरॉइन आणि २ प्रेमी असा तिढा
हिरॉइन आणि २ प्रेमी असा तिढा असेल तर तिचे मत लक्षात न घेता तिची एकमेकांकडे टोलवाटोलव आणि त्याग वगैरेची जी चढाओढ लागते ती हास्यास्पद असते. महामूर्खपणा.
वरच्या लेखात आणि
वरच्या लेखात आणि प्रतिक्रियांत आलेल्या सगळ्याच पॉइंट्स शी सहमत. तो लडिवाळपणा खऱ्या बाली उमर वाल्यांना थोडा तरी शोभेल. पण इतर वेळी डोक्यात जाईल. खूप जुन्या मुव्हीज मधे माला सिन्हा हा प्रकार अतिशय वाईट करायची. काय तो बावनकशी बावळट्टपणा! यक्क!
शिवाय
नणंद किंवा आत्या अतिशय पाताळयंत्री दाखवतात ते पण मला फारसे आवडत नाही. बहुसंख्य स्त्रिया या कुणाची तरी आत्या किंवा नणंद असतातच. ही नाती काय परग्रहावरून येतात का काय!
दुसरं म्हणजे मोठी सून अतिशय डोक्यात जाणारी त्यागी असते. अगदी संधी असून पण आपली बाजू न मांडता सहन करत राहणे. मग शेवटी अचानक दुसऱ्या सोर्सेस कडून उलगडा होऊन घरच्यांना पश्चात्ताप होणे वगैरे. पण ही बाई तोंड उघडणार नाही.
संस्कार असतात.
संस्कार असतात.
लहानपणी आई वडील सांगतात चोरी करू नये, खोटं बोलू नये. जे जे नये ते सगळं खरं तर किती नैसर्गिक आहे, पण संस्कारांमुळं हे नये, ते नये अंगवळणी पडतं. तसंच आहे चित्रपटांचं. त्याने प्रेक्षकांना वळण लावलं. आता आपण बायको सोबत गाणं म्हणत रस्त्याने जातो का? पण ते दाखवतात तसं. लेखकाला पण गाणं खटकलं नाही. संस्कार.
<<मोठी ओढणी फलकावत, गिरकी
<<मोठी ओढणी फलकावत, गिरकी मारत झाडाला बांधलेला झोका/नसल्यास घरातला पडदा हलवणे, धाकट्या भावा-बहिणीला उगीचच टीझ करणे, म्हाताऱ्या आजी-आजोबांना पाठीमागून येत खांद्याला पकडणे मस्ट असते.>>
माझे मन अगदी बरोबर!
सामो ; एके काळी अशा कथांचा
सामो ; एके काळी अशा कथांचा सुकाळ होता !
पारिजाता ;
पारिजाता ;
<<दुसरं म्हणजे मोठी सून अतिशय डोक्यात जाणारी त्यागी असते. अगदी संधी असून पण आपली बाजू न मांडता सहन करत राहणे>>
माझं तर असे प्रसंग पाहताना " अगं बोलना बये !!" अशी स्थिती होते !
मदन ;
मदन ;
बरोबर आहे.
आपले वैचारिक कंडिशनिंग झाले आहे.