टॅरो - माझ्याकरता निखळ आनंद

Submitted by सामो on 2 August, 2026 - 01:25

डिसक्लेमर - मी व्यवसाय म्हणुन टॅरो वाचत नाही ना मित्र-मैत्रिणींकरता रीडींग देते. मी टॅरो स्वतःपुरते वापरते. त्यातून मला निखळ आनंद मिळतो. ज्यांना टॅरो वगैरे गोष्टी भंपक वाटतात, सायकॉसिस वाटतात त्या सर्व तज्ञ मंडळींना, विद्वान मंडळींना लांबूनच कोपरापासून नमस्कार. नका वाचू.
लेख विस्कळीत आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
टॅरो म्हटले की मला उत्साह येतो. अगदी झपाटून टाकल्यासारखा. टॅरो ने मला एक आतलं जग सापडलं. इन्ट्युइशनवालं, फेमिनाईन, अंधारं, ओलसर, ऊब असलेलं. सूर्याच्या प्रखरतेपासून दूर, स्वमग्न आणि अतिशय समृद्ध असं परिपूर्ण भावविश्व. या प्रत्येक शब्दाचं विच्छेदन करत अर्थ मी सांगणार नाही कारण इट विल लुझ इन ट्रान्स्लेशन. मला २ वर्षांपूर्वी हे साधन सापडलं. आमच्या जर्सी सिटीत एक wicca दुकान आहे. अन्य न्यु एज दुकानांहून हटके आणि खूपसे मॅजिकलच. मेणबत्त्या, स्फटिक, लोलक, विविध बिया, अत्तरे, उदबत्त्या येशू पासून गणपती, बुद्धा, आणखीही आफ्रिकन तश्या प्रकारच्या वस्तू. तिथे मला 'डेव्हिअंट मून' डेक दिसला आणि आवडलाच. हाच डेक, पुढे माझ्या स्पिरिच्युअल ग्रोथ चा अविभाज्य भाग बनला.
.

.
लाँग आयलंडला, इंडिया-पाकिस्तान मॅच झालेली आणि मुलीने आमच्याकरता तिकीट काढलेले. ती पहायला निघणार त्या दिवशी मी ठरविले टॅरो बघू माझ्या दिवसाबद्दल काय सांगते. त्या दिवशी सकाळी, 'टु स्वोर्डस' कार्ड निघाले. आणि खरोखर मॅच तुल्यबळ, अटीतटीची झाली.
.

.
असे अनेक रीडिंग्ज माझे माझे बरोबर येत गेले. simply uncanny! टॅरॉट का इतकं अ‍ॅक्युरेट येतं हे गूढ आहे. काहीजण म्हणतात, तुमचेच अमूर्त मन तुम्हाला सिंबॉल्समधुन (लक्षणे), गाईड करतं. काहीजण म्हणातात कलेक्टिव्ह कॉन्शसनेस टॅप होतो. जे काही आहे, मी तरी टॅरॉट वापरताना, विलक्षण मेडीटेटिव्ह स्टेटमध्ये जाते. असीम शांत आणि एकाग्रता ही दोन विविक्षित लक्षणे मी सांगू शकते.
आज मी एक पुस्तक एका बैठकीत वाचून काढलं. आणि प्रचंड रिलेट करु शकले. हे पुस्तक जणू मला माहीतीच होतं , मी त्या पुस्तकात सांगीतलेले सराव करतच होते, टिप्स जणू मला आधीच माहीत होत्या (मला वाटतं नेटवर वाचल्या असणार.) पुस्तक फार आवडले.
.

.
टॅरोची रुक्ष पण बेसिक माहीती पुढे - एकूण ७८ कार्डस आहेत. मेजर आर्केना आणि मानर आर्केना असे दोन भाग आहेत. मेजर आर्केनात २२ कार्ड आहेत. ही कार्डस नेहमी मोठ्या बदला संबंधात, निर्णय, चोखाळलेला मार्ग दाखवतात. मायनर आर्केना 'रोजमर्रा' म्हणजे डेली रुटीन, नित्याचे लहानसहान कारभार, कटकटी, निर्णय , कामे , मूड दर्शवितो. मायनर आर्केनाची ४ भागात त्यांची विभागणी होते - स्वोर्डस (वायु तत्व), पेन्टॅकल्स्/कॉइन्स (पृथ्वी तत्व), कप्स (जल तत्व) आणि वाँडस (अग्नी तत्व).
.
मेजर आर्केना फार फार सुंदर आहे. '१५-डेव्हिल' कार्ड घ्याना. हे कार्ड दाखवते, वाईट सवयी, व्यसने, ऑब्सेशन्स, कंपल्शन्स, अ‍ॅटॅचमेन्टस. या सर्व गोष्टी सिंबॉल मधुन दिसतात. माझ्या एका मैत्रिणीच्या ' र्‍हुमेटॉइड आर्थ्रायटीसचे नुकतेच निदान झालेले होते. अगदी नुकतेच आणि दोघेही त्यातून सावरले नव्हते. मला माहीत नव्हते आणि गंमती गंमतीत म्हणुन मी तिच्या नवर्‍याचे कार्ड काढले. ते निघाले 'डेव्हिल.' मला तेव्हा कळले नाही का. कारण मैत्रिणीने काहीच सांगीतलेले नव्हते. तर या 'डेव्हिल' कार्डमध्ये पहा, त्या सैतानाने, त्या स्त्री-पुरुषाला बांधलेलेच नाही. पण तरीही दोघे साखळदंडाने बांधलेले आहेत. त्यांनीच स्वतःला मानसिकरीत्या बांधू घातलेले आहे.
.

.
माझे आवडते कार्ड आहे १७-स्टार. एक जलाशय आहे ज्यातून एक सुंदर स्त्री पाण्याचा घडा भरते आहे. पाण्याची विपुलता आहे भवताली, निसर्ग आहे. पाणी हे स्पिरिच्युअ‍ॅलिटी, कनेक्शन, भावभावना, अमूर्त मन यांचे प्रतिक मानले जाते. स्टार हे एक खूप सकारात्मक कार्ड समजले जाते. स्टार ऑफ मॅगी सुद्धा म्हणतात या कार्डला.
.

.

.
जसजसे तुम्ही, तुम्ही या कार्डांबरोबर कनेक्ट होता, अक्षरक्षः एक एक स्टोरी तुमच्यापुढे सादर होउ लागते. तुम्ही म्हणाल कार्ड्स तर स्टॅटिक आहेत. एकदा अर्थ कळला की बदलणार कसा? पण तसे नाही कॉन्टेक्स्ट प्रमाणे तुम्हाला इनसाईट मिळत जाते.जितका सराव जास्त तितकी अ‍ॅक्युरसी जास्त. अजुन एक बीईंग अ व्हिज्युअल पर्सन, मी बरेचदा वगवेगळ्या डेक्स्ची कार्डस आणि त्यांचे सिंबॉल्स ब्राउझ करत बसते. मन निवळशंख तळ्यासारखं शांत होउन जातं.
.
सांगण्यासारखं बरच आहे पण प्रत्येक कथा ही फार फार पर्सनल होउन बसते. फक्त आपल्याला ते जाणवलेलं असतं. प्रखर जगात रहाणार्‍या लोकांना ना ते कळतं ना त्यांना टिका करायला काही वाटत नाही. आपल्याला कळत नाही कारण आपला अभ्यास नाही, अनुभव नाही हे मान्य करणारे फार कमी असतात.
परवाच, मी ज्यूरी ड्युटीला गेलेले. तो दिवस महत्वाचा वाटल्याने मी सकाळी कार्ड काढलेले. हे कार्ड उलटे निघाले म्हणजे खाली डोके/वर पाय.
.

.
या कार्डातील स्त्री मी अशी पाहीली की एक तर भूतकाळातील काहीतरी मागे टाकते आहे जे तिला आवडत नाही आहे आणि मला चेहर्‍यावरुन, ती बोअर झालेली वाटली.
कार्ड उलटे आल्याने हे इन्टरप्रिटेशन बरोब्बर उलटे करायचे.
तो दिवस इतका हॅपनिंग ठरला. राऊंडवर राऊंडस, न्यायाधिश आणि वकीलांचे डेलिबरेशन की कोणाला ज्युरी म्हणुन निवडायचे. क्रिमिनल केस असल्याने बरेच जण नको म्हणत होते तर काहींना उत्साह होता. उत्साही लोकांचे सिलेक्शन न झाल्याने, निराशा संपूर्ण चेहर्‍यावर झळकत असे. आता ज्युरी समिती निवडताना, दोन्ही बाजूचे वकील प्रश्न विचारतात. रिटायर्ड लोक एकदा माईक मिळाला की सोडतच नसत. सांगायचा मुद्दा हा की एकही मिनिट कंटाळवाणे गेले नाही. माझाही इन्टर्व्ह्यु झाला, ज्यात मला दोन्ही वकीलांनी प्रश्न विचारले. पण त्या प्रश्नांमध्ये माझ्या भूतकाळातील काही प्रसंग मला सांगावे लागले. कप्स म्हणजे जलतत्व भावना , जल, मूड, सबकॉन्शस. वकीलांची उत्तरे देताना, मला नक्कीच भावना टॅप कराव्या लागल्या. थोडे सांगू की नको? असे झाले.
.
तेव्हा आपलं आपल्याला अंदाज येतो काय होणार आहे. कार्डस ९०% वेळा अ‍ॅक्युरेट सांगतात.
-----------------------------------------------
मी आमच्या वॄद्धत्वाबद्दल, भविष्यकाळाबद्दल, पैसे, आरोग्य यांबद्दल विचारते. आणि मला काही उत्तरे मिळतात. पण आपला भविष्यकाळही सेट इन स्टोन नसतो. आपल्या प्रयत्नांवरती आधारीत असतो आणि कार्डस बदलतात. कारण आपण शिकून उत्तम नोकरी घेत असतो, आपले स्टॉक्स अप-डाउन होत असतात, आपले सेव्हिंगचे डिसिजन , आरोग्याबाबत जागरुकता बदलत असते मग कार्ड प्रत्येक वेळी तसेच कसे येणार.
------------------------------------------------
मला मेजर आर्कना कार्ड फक्त 'सूर्य' हे परत परत परत परत अक्षरक्षः २५ वेळा आलेले. द कार्ड वॉज स्टॉकिंग मी.

पण हां एकदा आमचे घर होइल का विचारलेले असताना, तेव्हाही मेजर आर्कना कार्ड - 'डेथ' कार्ड आलेले.
.

आता याचा अर्थ घर होणाचा चान्स नाही. स्वप्नाचा अंत असे मी इन्टरप्रिट केले नाही.तर हा जो त्याग आहे ( ते लहान जनावर) म्हणजे कदाचित आमची उधळीची लाईफस्टाइल असू शकते. तिचे दमन केले तरच नवीन घर घेता यावे. वगैरे.
आता परत घराबद्दल कार्ड काढण्याचा धीर झालेला नाही.
मजा बघा महत्वाच्या निर्णयांत मेजर आर्केना आले. टॅरॉट तुमचा मूड विलक्षण मस्त पकडते. इट गिव्ज इनसाईट इन्टु युअर ओन सायकी.
--------------
बाकी टॅरो हॅज सेन्स ऑफ ह्युमर टु Happy इट डझ.
परवा अ‍ॅक्युपंक्चरकरता निघण्याआधी विचारले कसे जाईल ते सेशन तर हे कार्ड आले -
.

सहसा याचा अर्थ फार दु:ख किंवा अगदी पार नकारात्मक असता. पण ही फिरकी होती. "युद्धावर निघालीयेस का? काय फुटकळ विचारत असतेस Lol Lol " असे म्हणाणारी.
-----------------
अजुन एक फिरकीचे उदाहरण -
खरं तर मी अजुनही $३ चे लॉटरी तिकीट घेते. परवा विचारलेले, आज मोठ्ठी लॉटरी लागेल का? आणि मोठ्ठी डिफाइन केली = $१०,००० किंवा त्याहून जास्त. तर परत फिरकी घेतली. Happy 'द एंपरर' कार्ड आलं. Happy होय तर ३ डॉलरमध्ये, अगदी साम्राज्य मिळेल असे काहीसे. कोणतेही ऐरे गैरे नाही तर 'एंपरर' कार्ड. खूपदा फिरकी घेतलेली असते Happy
.

.
फिरकीबद्दल फक्त मी म्हणत नाही अनेकांचा अनुभव आहे . ए आय उवाच - Yes, tarot often has a very sharp, ironic, and literal sense of humor. Readers frequently report pulling comically perfect or sarcastic cards that mirror life’s absurdities, whether it is the deck's personality or just human projection at play.

माझा डेक मिष्किल असल्याचा अनुभव अनेकदा आलेला आहे.
.
बर्‍याच प्रकारचे स्प्रेडस म्हणजे पत्ते मांडणी असतात.-
- फक्त एक कार्ड काढणे -------------------------------------------> मी फक्त हेच केलेले आहे. नवखा खेळ असल्यामुळे अन्य स्प्रेडस ट्राय केलेले नाही.
- दोन कार्डस काढणे - फिक्शन वि फॅक्टस
- ३ कार्डस - भूत वर्तमान भविष्य
- रिलेशनशिप मध्ये किंवा कोणत्याही प्रसंगी क्लॅरिटी हवी असेल तर केल्टि़क क्रॉस असतो
.

- हॉर्स शु एक प्रसिद्ध, क्लिष्ट प्रकार आहे.
.

अश्या अनेक कार्डसमुळे एक स्टोरी बनत जाते. कितीतरी पर्म्युटेशन्स - कॉम्बिनेशन्स तुम्हाला उपलब्ध होतात. मग मन शांत करुन आपण प्रवासास निघायचे. प्रत्येक कार्ड त्याच्या आधीच्या आणि पुढच्या कार्डात जणू विरळलेले आहे, ब्लर झालेले आहे असे समजून उत्तरे शोधायची.
---------
पत्ते नीट अगदी व्यवस्थित पिसावे लागतात नाही तर उत्तर येत नाही असे लक्षात आलेले. नेटवरती शोधले असता हा अनुभव अनेकांचा असल्याचे लक्षात आले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>काही तरी आधार मिळत असेल. माझ्या सारख्या डाऊटिंग थोमा साठी देवही नाही कुंडलीही नाही वा टॅरोही नाही.
धन्यवाद केकू.
पॅशनेट वाटते. एखाद्या गोष्टीबद्दल उत्कटतेने काही सकारात्मक वाटते. Happy

सामो, लेख लिहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मी amazon वरून The Rider Tarot Deck मागवला आणि पहिल्याच दिवसापासून त्याच्याशी एक वेगळे नाते जुळल्यासारखं वाटल. त्यांनतर मी वेगवेगळे प्रश्न विचारून पाहिले आणि प्रत्येक वेळी मला अर्थपूर्ण उत्तर आणि मार्गदर्शन मिळत गेले.
डेक आपल्याशी बोलतो ते आता मला पटु लागले आहे. आपण काढलेली कार्ड्स आपल्या विचारांचा, भावनांचा आणि सध्याच्या मनस्थितीचा आरसा बनतात त्यामुळे स्वतःकडे स्पष्टपणे पाहण्यास आणि योग्य दिशा शोधण्यास मदत होते.
मला हा अनुभव अत्यंत सकारात्मक वाटला. पुन्हा एकदा या विषयावर इतका सुंदर लेख लिहिल्याबद्दल मनापासून आभार.

रोचक लेख आणि माहिती. पूर्वी टीव्ही वर बघितले आहे असे आठवते.
Samo एखादे आवडते स्तोत्र आणि ही कार्ड ह्यातले काय निवडाल?

>>>>आपण काढलेली कार्ड्स आपल्या विचारांचा, भावनांचा आणि सध्याच्या मनस्थितीचा आरसा बनतात त्यामुळे स्वतःकडे स्पष्टपणे पाहण्यास आणि योग्य दिशा शोधण्यास मदत होते.
करेक्ट. कालपासून मला कशाची तरी प्रचंड गिल्ट आलेली आहे. इतकी की आज ऑफिसला गेले नाही. आय फेल्ट अनवेल. आज कार्ड काढलं ते हे ५ कप्स -
.

इंटरेस्टींग आहे हे. पुस्तक नोंदवून ठेवले आहे. कार्डस बघत नसू तरी वाचले तर समजेल ?
कार्ड्स कशी वाचायची ह्याचे काही मॅन्युअल असते का ? डेक बरोबर वगैरे ?
एकदा सराव झाल्यावर उठ सुट उत्तर बघायचे असे होत असेल ना काही वेळा ?
आणि समजा एखादे कार्ड आले, त्यातून अस्वस्थ करणारे उत्तर आले तर दुसरे काढून बघू असे होते का ? जसे की वजन बघतांना आधीपेक्षा जास्त दिसले तर काटा पुढे मागे सरकवून बघू असं होतं तसं.
आणि जर दोन किंवा जास्त डेक्स वापरत असू तर प्रत्येक ठिकाणाहून काय उत्तर येते असे कधी बघितले आहे ?
फक्त उत्सुकता म्हणून विचारत आहे.

>>>>आणि समजा एखादे कार्ड आले, त्यातून अस्वस्थ करणारे उत्तर आले तर दुसरे काढून बघू असे होते का ?
नक्कीच Happy
>>>>कार्ड्स कशी वाचायची ह्याचे काही मॅन्युअल असते का ? डेक बरोबर वगैरे ?
नाही पाहीले कधी.
>>>>>आणि जर दोन किंवा जास्त डेक्स वापरत असू तर प्रत्येक ठिकाणाहून काय उत्तर येते असे कधी बघितले आहे ?
फक्त उत्सुकता म्हणून विचारत आहे.
नाही मला ते पटत नाही.
-------------------
आज मला माझे सर्वात आवडते कार्ड 'द सन' आले आहे. माझा दिवस चांगला जाइल असे वाटते. बघू यात. पण आपल्या दिवसानुसारच सराव मी तरी करते.

असं एखादं कार्ड आहे का जे काढल्यावर आपण आपल्याला हवं ते रूप घेऊ?
म्हणजे ते कार्ड निघाल्यावर मला रणजित किंवा शक्तीकपूर सारखं दिसता येईल काय? अशा कार्डांचा सेट असेल तर कळवा.

बाकिच्या कार्डात खालील फायदे असावेत.
उडता येणे, अदृश्य होणे, हात लागेल त्या दगडाचे सोने करणे करणे, ड्युआयडी ओळखणे, समोरच्याला संमोहित करणे, हव्या त्या घटना घडवून आणणे (ट्रंपजींचा राजीनामा)इ, अक्षय थाळीचे कार्ड इत्यादी.

द सन कार्डाने काहिहि दिवे लावले नाहियेत सो फार. पेरलेच नाही तर शिंचे उगवणार कोठुन? त्यात डेकचा काही दोष नाही. Wink

कार्ड्स कशी वाचायची ह्याचे काही मॅन्युअल असते का ? डेक बरोबर वगैरे ?
<<<>>>> मला म्हणायचं होतं की कार्डाचा अर्थ / त्यातून काय मेसेज अभिप्रेत आहे हे समजून येण्यासाठी काही मटेरीयल दिले असते का ?
आणि डेक वेगवेगळे असले तरी चित्रे तिच असतात का ? म्हणजे पत्ते जसे सगळीकडे सारखे, पण त्यावरची ( मागची ) चित्रे वेगळी तसे.

गुगलवरती पत्त्यांचे अर्थ सापडतील.
पत्ते सारखे असतात पण प्रत्येक कलाकाराची स्टाइल, अभिव्यक्ती वेगळी असते - हेच सौंदर्य. १७ म्हणजे स्टारच येणार,१६ म्हणजे टॉवरच असणार वगैरे ..

Pages