टॅरो - माझ्याकरता निखळ आनंद

Submitted by सामो on 2 August, 2026 - 01:25

डिसक्लेमर - मी व्यवसाय म्हणुन टॅरो वाचत नाही ना मित्र-मैत्रिणींकरता रीडींग देते. मी टॅरो स्वतःपुरते वापरते. त्यातून मला निखळ आनंद मिळतो. ज्यांना टॅरो वगैरे गोष्टी भंपक वाटतात, सायकॉसिस वाटतात त्या सर्व तज्ञ मंडळींना, विद्वान मंडळींना लांबूनच कोपरापासून नमस्कार. नका वाचू.
लेख विस्कळीत आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
टॅरो म्हटले की मला उत्साह येतो. अगदी झपाटून टाकल्यासारखा. टॅरो ने मला एक आतलं जग सापडलं. इन्ट्युइशनवालं, फेमिनाईन, अंधारं, ओलसर, ऊब असलेलं. सूर्याच्या प्रखरतेपासून दूर, स्वमग्न आणि अतिशय समृद्ध असं परिपूर्ण भावविश्व. या प्रत्येक शब्दाचं विच्छेदन करत अर्थ मी सांगणार नाही कारण इट विल लुझ इन ट्रान्स्लेशन. मला २ वर्षांपूर्वी हे साधन सापडलं. आमच्या जर्सी सिटीत एक wicca दुकान आहे. अन्य न्यु एज दुकानांहून हटके आणि खूपसे मॅजिकलच. मेणबत्त्या, स्फटिक, लोलक, विविध बिया, अत्तरे, उदबत्त्या येशू पासून गणपती, बुद्धा, आणखीही आफ्रिकन तश्या प्रकारच्या वस्तू. तिथे मला 'डेव्हिअंट मून' डेक दिसला आणि आवडलाच. हाच डेक, पुढे माझ्या स्पिरिच्युअल ग्रोथ चा अविभाज्य भाग बनला.
.

.
लाँग आयलंडला, इंडिया-पाकिस्तान मॅच झालेली आणि मुलीने आमच्याकरता तिकीट काढलेले. ती पहायला निघणार त्या दिवशी मी ठरविले टॅरो बघू माझ्या दिवसाबद्दल काय सांगते. त्या दिवशी सकाळी, 'टु स्वोर्डस' कार्ड निघाले. आणि खरोखर मॅच तुल्यबळ, अटीतटीची झाली.
.

.
असे अनेक रीडिंग्ज माझे माझे बरोबर येत गेले. simply uncanny! टॅरॉट का इतकं अ‍ॅक्युरेट येतं हे गूढ आहे. काहीजण म्हणतात, तुमचेच अमूर्त मन तुम्हाला सिंबॉल्समधुन (लक्षणे), गाईड करतं. काहीजण म्हणातात कलेक्टिव्ह कॉन्शसनेस टॅप होतो. जे काही आहे, मी तरी टॅरॉट वापरताना, विलक्षण मेडीटेटिव्ह स्टेटमध्ये जाते. असीम शांत आणि एकाग्रता ही दोन विविक्षित लक्षणे मी सांगू शकते.
आज मी एक पुस्तक एका बैठकीत वाचून काढलं. आणि प्रचंड रिलेट करु शकले. हे पुस्तक जणू मला माहीतीच होतं , मी त्या पुस्तकात सांगीतलेले सराव करतच होते, टिप्स जणू मला आधीच माहीत होत्या (मला वाटतं नेटवर वाचल्या असणार.) पुस्तक फार आवडले.
.

.
टॅरोची रुक्ष पण बेसिक माहीती पुढे - एकूण ७८ कार्डस आहेत. मेजर आर्केना आणि मानर आर्केना असे दोन भाग आहेत. मेजर आर्केनात २२ कार्ड आहेत. ही कार्डस नेहमी मोठ्या बदला संबंधात, निर्णय, चोखाळलेला मार्ग दाखवतात. मायनर आर्केना 'रोजमर्रा' म्हणजे डेली रुटीन, नित्याचे लहानसहान कारभार, कटकटी, निर्णय , कामे , मूड दर्शवितो. मायनर आर्केनाची ४ भागात त्यांची विभागणी होते - स्वोर्डस (वायु तत्व), पेन्टॅकल्स्/कॉइन्स (पृथ्वी तत्व), कप्स (जल तत्व) आणि वाँडस (अग्नी तत्व).
.
मेजर आर्केना फार फार सुंदर आहे. '१५-डेव्हिल' कार्ड घ्याना. हे कार्ड दाखवते, वाईट सवयी, व्यसने, ऑब्सेशन्स, कंपल्शन्स, अ‍ॅटॅचमेन्टस. या सर्व गोष्टी सिंबॉल मधुन दिसतात. माझ्या एका मैत्रिणीच्या ' र्‍हुमेटॉइड आर्थ्रायटीसचे नुकतेच निदान झालेले होते. अगदी नुकतेच आणि दोघेही त्यातून सावरले नव्हते. मला माहीत नव्हते आणि गंमती गंमतीत म्हणुन मी तिच्या नवर्‍याचे कार्ड काढले. ते निघाले 'डेव्हिल.' मला तेव्हा कळले नाही का. कारण मैत्रिणीने काहीच सांगीतलेले नव्हते. तर या 'डेव्हिल' कार्डमध्ये पहा, त्या सैतानाने, त्या स्त्री-पुरुषाला बांधलेलेच नाही. पण तरीही दोघे साखळदंडाने बांधलेले आहेत. त्यांनीच स्वतःला मानसिकरीत्या बांधू घातलेले आहे.
.

.
माझे आवडते कार्ड आहे १७-स्टार. एक जलाशय आहे ज्यातून एक सुंदर स्त्री पाण्याचा घडा भरते आहे. पाण्याची विपुलता आहे भवताली, निसर्ग आहे. पाणी हे स्पिरिच्युअ‍ॅलिटी, कनेक्शन, भावभावना, अमूर्त मन यांचे प्रतिक मानले जाते. स्टार हे एक खूप सकारात्मक कार्ड समजले जाते. स्टार ऑफ मॅगी सुद्धा म्हणतात या कार्डला.
.

.

.
जसजसे तुम्ही, तुम्ही या कार्डांबरोबर कनेक्ट होता, अक्षरक्षः एक एक स्टोरी तुमच्यापुढे सादर होउ लागते. तुम्ही म्हणाल कार्ड्स तर स्टॅटिक आहेत. एकदा अर्थ कळला की बदलणार कसा? पण तसे नाही कॉन्टेक्स्ट प्रमाणे तुम्हाला इनसाईट मिळत जाते.जितका सराव जास्त तितकी अ‍ॅक्युरसी जास्त. अजुन एक बीईंग अ व्हिज्युअल पर्सन, मी बरेचदा वगवेगळ्या डेक्स्ची कार्डस आणि त्यांचे सिंबॉल्स ब्राउझ करत बसते. मन निवळशंख तळ्यासारखं शांत होउन जातं.
.
सांगण्यासारखं बरच आहे पण प्रत्येक कथा ही फार फार पर्सनल होउन बसते. फक्त आपल्याला ते जाणवलेलं असतं. प्रखर जगात रहाणार्‍या लोकांना ना ते कळतं ना त्यांना टिका करायला काही वाटत नाही. आपल्याला कळत नाही कारण आपला अभ्यास नाही, अनुभव नाही हे मान्य करणारे फार कमी असतात.
परवाच, मी ज्यूरी ड्युटीला गेलेले. तो दिवस महत्वाचा वाटल्याने मी सकाळी कार्ड काढलेले. हे कार्ड उलटे निघाले म्हणजे खाली डोके/वर पाय.
.

.
या कार्डातील स्त्री मी अशी पाहीली की एक तर भूतकाळातील काहीतरी मागे टाकते आहे जे तिला आवडत नाही आहे आणि मला चेहर्‍यावरुन, ती बोअर झालेली वाटली.
कार्ड उलटे आल्याने हे इन्टरप्रिटेशन बरोब्बर उलटे करायचे.
तो दिवस इतका हॅपनिंग ठरला. राऊंडवर राऊंडस, न्यायाधिश आणि वकीलांचे डेलिबरेशन की कोणाला ज्युरी म्हणुन निवडायचे. क्रिमिनल केस असल्याने बरेच जण नको म्हणत होते तर काहींना उत्साह होता. उत्साही लोकांचे सिलेक्शन न झाल्याने, निराशा संपूर्ण चेहर्‍यावर झळकत असे. आता ज्युरी समिती निवडताना, दोन्ही बाजूचे वकील प्रश्न विचारतात. रिटायर्ड लोक एकदा माईक मिळाला की सोडतच नसत. सांगायचा मुद्दा हा की एकही मिनिट कंटाळवाणे गेले नाही. माझाही इन्टर्व्ह्यु झाला, ज्यात मला दोन्ही वकीलांनी प्रश्न विचारले. पण त्या प्रश्नांमध्ये माझ्या भूतकाळातील काही प्रसंग मला सांगावे लागले. कप्स म्हणजे जलतत्व भावना , जल, मूड, सबकॉन्शस. वकीलांची उत्तरे देताना, मला नक्कीच भावना टॅप कराव्या लागल्या. थोडे सांगू की नको? असे झाले.
.
तेव्हा आपलं आपल्याला अंदाज येतो काय होणार आहे. कार्डस ९०% वेळा अ‍ॅक्युरेट सांगतात.
-----------------------------------------------
मी आमच्या वॄद्धत्वाबद्दल, भविष्यकाळाबद्दल, पैसे, आरोग्य यांबद्दल विचारते. आणि मला काही उत्तरे मिळतात. पण आपला भविष्यकाळही सेट इन स्टोन नसतो. आपल्या प्रयत्नांवरती आधारीत असतो आणि कार्डस बदलतात. कारण आपण शिकून उत्तम नोकरी घेत असतो, आपले स्टॉक्स अप-डाउन होत असतात, आपले सेव्हिंगचे डिसिजन , आरोग्याबाबत जागरुकता बदलत असते मग कार्ड प्रत्येक वेळी तसेच कसे येणार.
------------------------------------------------
मला मेजर आर्कना कार्ड फक्त 'सूर्य' हे परत परत परत परत अक्षरक्षः २५ वेळा आलेले. द कार्ड वॉज स्टॉकिंग मी.

पण हां एकदा आमचे घर होइल का विचारलेले असताना, तेव्हाही मेजर आर्कना कार्ड - 'डेथ' कार्ड आलेले.
.

आता याचा अर्थ घर होणाचा चान्स नाही. स्वप्नाचा अंत असे मी इन्टरप्रिट केले नाही.तर हा जो त्याग आहे ( ते लहान जनावर) म्हणजे कदाचित आमची उधळीची लाईफस्टाइल असू शकते. तिचे दमन केले तरच नवीन घर घेता यावे. वगैरे.
आता परत घराबद्दल कार्ड काढण्याचा धीर झालेला नाही.
मजा बघा महत्वाच्या निर्णयांत मेजर आर्केना आले. टॅरॉट तुमचा मूड विलक्षण मस्त पकडते. इट गिव्ज इनसाईट इन्टु युअर ओन सायकी.
--------------
बाकी टॅरो हॅज सेन्स ऑफ ह्युमर टु Happy इट डझ.
परवा अ‍ॅक्युपंक्चरकरता निघण्याआधी विचारले कसे जाईल ते सेशन तर हे कार्ड आले -
.

सहसा याचा अर्थ फार दु:ख किंवा अगदी पार नकारात्मक असता. पण ही फिरकी होती. "युद्धावर निघालीयेस का? काय फुटकळ विचारत असतेस Lol Lol " असे म्हणाणारी.
-----------------
अजुन एक फिरकीचे उदाहरण -
खरं तर मी अजुनही $३ चे लॉटरी तिकीट घेते. परवा विचारलेले, आज मोठ्ठी लॉटरी लागेल का? आणि मोठ्ठी डिफाइन केली = $१०,००० किंवा त्याहून जास्त. तर परत फिरकी घेतली. Happy 'द एंपरर' कार्ड आलं. Happy होय तर ३ डॉलरमध्ये, अगदी साम्राज्य मिळेल असे काहीसे. कोणतेही ऐरे गैरे नाही तर 'एंपरर' कार्ड. खूपदा फिरकी घेतलेली असते Happy
.

.
फिरकीबद्दल फक्त मी म्हणत नाही अनेकांचा अनुभव आहे . ए आय उवाच - Yes, tarot often has a very sharp, ironic, and literal sense of humor. Readers frequently report pulling comically perfect or sarcastic cards that mirror life’s absurdities, whether it is the deck's personality or just human projection at play.

माझा डेक मिष्किल असल्याचा अनुभव अनेकदा आलेला आहे.
.
बर्‍याच प्रकारचे स्प्रेडस म्हणजे पत्ते मांडणी असतात.-
- फक्त एक कार्ड काढणे -------------------------------------------> मी फक्त हेच केलेले आहे. नवखा खेळ असल्यामुळे अन्य स्प्रेडस ट्राय केलेले नाही.
- दोन कार्डस काढणे - फिक्शन वि फॅक्टस
- ३ कार्डस - भूत वर्तमान भविष्य
- रिलेशनशिप मध्ये किंवा कोणत्याही प्रसंगी क्लॅरिटी हवी असेल तर केल्टि़क क्रॉस असतो
.

- हॉर्स शु एक प्रसिद्ध, क्लिष्ट प्रकार आहे.
.

अश्या अनेक कार्डसमुळे एक स्टोरी बनत जाते. कितीतरी पर्म्युटेशन्स - कॉम्बिनेशन्स तुम्हाला उपलब्ध होतात. मग मन शांत करुन आपण प्रवासास निघायचे. प्रत्येक कार्ड त्याच्या आधीच्या आणि पुढच्या कार्डात जणू विरळलेले आहे, ब्लर झालेले आहे असे समजून उत्तरे शोधायची.
---------
पत्ते नीट अगदी व्यवस्थित पिसावे लागतात नाही तर उत्तर येत नाही असे लक्षात आलेले. नेटवरती शोधले असता हा अनुभव अनेकांचा असल्याचे लक्षात आले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Interesting.

हल्ली युट्युबवर देखील बरेच tarrot रिडींग करणारे राशीनुसार रिडींग टाकतात.
उत्सुकता म्हणून 3 की 4 वेळा पाहिलंय.

रोचक
हे जग मलाही आवडतं
वाचायला जाणून घ्यायला.
आणखी लिही ना

खूप इंटरेस्टिंग आहे . मला पण युट्यूब वर पुष्कळ सजेशन येतात taarot चे. उत्सुकता वाढली आहे. मला आवडेल माझे reading करून घ्यायला. Happy

(आमच्या कॉलनीमध्ये एक tarrot card reader बाई राहतात. खूप फेमस आहेत. २-२, ३-३ महिने आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. )

झकासराव, किल्ली, मनीम्याऊ आणि शर्मिला खूप आभार..

---------------------------------------
खालील माहीती लेखात डकवते आहे.
.
किल्ली सांगण्यासारखं बरच आहे पण प्रत्येक कथा ही फार फार पर्सनल होउन बसते. फक्त आपल्याला ते जाणवलेलं असतं. प्रखर जगात रहाणार्‍या लोकांना ना ते कळतं ना त्यांना टिका करायला काही वाटत नाही. आपल्याला कळत नाही कारण आपला अभ्यास नाही, अनुभव नाही हे मान्य करणारे फार कमी असतात.
परवाच, मी ज्यूरी ड्युटीला गेलेले. तो दिवस महत्वाचा वाटल्याने मी सकाळी कार्ड काढलेले. हे कार्ड उलटे निघाले म्हणजे खाली डोके/वर पाय.
.

.
या कार्डातील स्त्री मी अशी पाहीली की एक तर भूतकाळातील काहीतरी मागे टाकते आहे जे तिला आवडत नाही आहे आणि मला चेहर्‍यावरुन, ती बोअर झालेली वाटली.
कार्ड उलटे आल्याने हे इन्टरप्रिटेशन बरोब्बर उलटे करायचे.
तो दिवस इतका हॅपनिंग ठरला. राऊंडवर राऊंडस, न्यायाधिश आणि वकीलांचे डेलिबरेशन की कोणाला ज्युरी म्हणुन निवडायचे. क्रिमिनल केस असल्याने बरेच जण नको म्हणत होते तर काहींना उत्साह होता. उत्साही लोकांचे सिलेक्शन न झाल्याने, निराशा संपूर्ण चेहर्‍यावर झळकत असे. आता ज्युरी समिती निवडताना, दोन्ही बाजूचे वकील प्रश्न विचारतात. रिटायर्ड लोक एकदा माईक मिळाला की सोडतच नसत. सांगायचा मुद्दा हा की एकही मिनिट कंटाळवाणे गेले नाही. माझाही इन्टर्व्ह्यु झाला, ज्यात मला दोन्ही वकीलांनी प्रश्न विचारले. पण त्या प्रश्नांमध्ये माझ्या भूतकाळातील काही प्रसंग मला सांगावे लागले. भूतकाळातील काही प्रसंग मला सांगावे लागले. कप्स म्हणजे जलतत्व भावना , मूड, सबकॉन्शस. वकीलांची उत्तरे देताना, मला नक्कीच भावना टॅप कराव्या लागल्या. थोडे सांगू की नको? असे झाले.
.
तेव्हा आपलं आपल्याला अंदाज येतो काय होणार आहे. कार्डस ९०% वेळा अ‍ॅक्युरेट सांगतात.
-----------------------------------------------
मी आमच्या वॄद्धत्वाबद्दल, भविष्यकाळाबद्दल, पैसे, आरोग्य यांबद्दल विचारते. आणि मला काही उत्तरे मिळतात. पण आपला भविष्यकाळही सेट इन स्टोन नसतो. आपल्या प्रयत्नांवरती आधारीत असतो आणि कार्डस बदलतात. कारण आपण शिकून उत्तम नोकरी घेत असतो, आपले स्टॉक्स अप-डाउन होत असतात, आपले सेव्हिंगचे डिसिजन , आरोग्याबाबत जागरुकता बदलत असते मग कार्ड प्रत्येक वेळी तसेच कसे येणार.
------------------------------------------------
मला मेजर आर्कना कार्ड फक्त 'सूर्य' हे परत परत परत परत अक्षरक्षः २५ वेळा आलेले. द कार्ड वॉज स्टॉकिंग मी.

पण हां एकदा आमचे घर होइल का विचारलेले असताना, तेव्हाही मेजर आर्कना कार्ड - 'डेथ' कार्ड आलेले.
.

आता याचा अर्थ घर होणाचा चान्स नाही. स्वप्नाचा अंत असे मी इन्टरप्रिट केले नाही.तर हा जो त्याग आहे ( ते लहान जनावर) म्हणजे कदाचित आमची उधळीची लाईफस्टाइल असू शकते. तिचे दमन केले तरच नवीन घर घेता यावे. वगैरे.
आता परत घराबद्दल कार्ड काढण्याचा धीर झालेला नाही.
पण तू मजा बघ महत्वाच्या निर्णयांत मेजर आर्केना आले. टॅरॉट तुमचा मूड विलक्षण मस्त पकडते. इट गिव्ज इनसाईट इन्टु युअर ओन सायकी.

खरंय
सोप्या शब्दात सांगितलं आहेस

होय भरत मला वाटतं टॅरो असा आहे. मी व्हिडिओज पूर्वी पाहीलेले आता आठवत नाही. पण बहुतेक होय.
----
तब्येत कशी आहे भरत? मध्यंतरी तुम्ही म्हणालेलात बरे वाटत नव्हते. काळजी घ्या.

इंटरेस्टिंग. या छंदाने आनंद मिळत असेल तर छान आहे छंद.

मी प्रतिसाद काय देणार होतो?
(टेरो कार्ड सांगेल का?)

थांबा बघते. खरच.
-------------

दोन गोष्टी बॅलन्स करणारी ट्रॅपिझ आर्टिस्ट आहे.
तुम्ही द्विधा होता. अंधश्रद्धेबद्दल लिहू की सरळसोट लिहू? याबद्दल तुम्ही विचार केलात. काहीतरी परस्परविरोधी पण दोन्हीचा सुवर्णमध्य गाठेलसं तुम्ही पाहीलत. काहीतरी द्वंद्व होते मात्र.

इंटरेस्टिंग आहे.

विश्वास तर माझा देवावर सुद्धा नाही पण त्यांच्या कथा वाचायला सांगायला आवडतातच. तसेच देवावर विश्वास ठेवल्यास जे एक आत्मिक बळ मिळते ते नक्कीच फायदेशीर असते याच्याशी सहमत आहे.

या कार्डबाबत सुद्धा माझे तसेच मत होते. या कार्ड मधील चित्रांचा अर्थ लावताना जो विचार केला जातो त्यात एक सायकोलिजिकल दृष्टीकोन असावा असे वाटायचे. साधारण हे तसेच दिसत आहे.

दोन गोष्टी बॅलन्स करणारी ट्रॅपिझ आर्टिस्ट >> या चित्रावरून पुढे अंदाज बांधलाय का? म्हणजे यात कौशल्य, बुद्धीचातुर्य, अनुभव पण पणाला लागतो का?
कारण वेगळ्या परिस्थितीत जर हे कार्ड आलं तर त्या वेळी उत्तर सेम नसेल ना? माझा इतिहास पण विचारात घेतला आहे का?

सामो - तुमचा स्वभाव खूप साधा आणि सरळ आहे. तुम्ही नेहेमी दुसर्‍याचे चांगले चिंतिता. पण तुम्हाला भेटणारी बहुसंख्य माणसे तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात , अनफेअर वागतात.

आता तुम्ही येणारी टॅरो कार्ड पुन्हा वाचून बघा. तुम्हाला अजून डीपर मिनिंग मिळतील.

Happy
>>>>>सामो - तुमचा स्वभाव खूप साधा आणि सरळ आहे. तुम्ही नेहेमी दुसर्‍याचे चांगले चिंतिता. पण तुम्हाला भेटणारी बहुसंख्य माणसे तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात , अनफेअर वागतात.
पहिला अर्धा भाग बरोबर आहे आणि मला माहीत आहे. पुढील अर्धा खरा नाही.
महाराजांनी ज्ञानेश्वरी तले एक वचन उधृत केलेले आहे - या जगात जर काही दुर्मिळ असेल तर ती आहे सद्वासना. मी निदान त्या वाक्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करते. बाकी आपण दुसर्याला फक्त तेच देऊ शकतो ज्याची आपल्यापाशी विपुलता आहे.

नाही राज तुमची कमेन्ट्स हिस्टरी नाही पाहीली. कार्ड निघताच मला वाटले ते लिहीले. पण त्यास्त्रीला कसरत करावी लागतेय. शी इज ग्रेस फुली बॅलन्सिंग हर अ‍ॅक्ट. तुम्ही जाणिव्पूर्वक जंप टु कन्क्लुजन्स न करता - नीट प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केलाय(कराल). तुमची नी जर्क रिअ‍ॅक्शन तुम्ही टाळून व्यवस्थित प्रतिसाद दिलात(द्याल).
————-
असो. फार चिकीत्सा नको.

टॅरो वर विश्वास आहे आणि रिडिंग घ्यायला आवडेलही. Happy

फक्त मला हा 'डेव्हिअंट मून' डेक नाही आवडला फारसा.
त्या आकृत्या / चेहरे जरा भेसूर / डेव्हील वाटताहेत.

>>>>फक्त मला हा 'डेव्हिअंट मून' डेक नाही आवडला फारसा.
एक्स्ट्रीम आहे जरा हे खरे आहे. पण मला म्हणुनच आवडला.
---------------- खालील पॅरा, मेन लेखात घातलेला आहे --------------------
>>>>रिडिंग घ्यायला आवडेलही.
पियु मग मस्तसा एखादा डेक घे आणि स्वतःचे रीडींग घे. सरावाने तुलाच ताबडतोब कळू लागेल. बाकी टॅरो हॅज सेन्स ऑफ ह्युमर टु Happy इट डझ.
परवा अ‍ॅक्युपंक्चरकरता निघण्याआधी विचारले कसे जाईल ते सेशन तर हे कार्ड आले -
.

सहसा याचा अर्थ फार दु:ख किंवा अगदी पार नकारात्मक असता. पण ही फिरकी होती. "युद्धावर निघालीयेस का? काय फुटकळ विचारत असतेस Lol :D" असे म्हणाणारी.
.
असो. हे सर्व नुआन्सेस सरावाने कळतात.

>>>>>>>>>जिज्ञासा असते ही. हा खेळ आहे कि कला कि कौशल्य कि शास्त्र हे समजून घेण्यासाठी विचारले होते.

होय कळले आत्ता. सॉरी फॉर स्नॅपिंग अ‍ॅट यु.

इंटरेस्टिंग आहे. आपलीच मनोवस्था मिरर करतात हे कार्डस् असे ऐकून आहे.

प्रत्यक्ष अनुभव इल्ले.

>>>>>>>>आपलीच मनोवस्था मिरर करतात हे कार्डस् असे ऐकून आहे.
अनिंद्य यु आर स्पॉट ऑन. इतकं खणखणीत बोललात. अगदी हेच्च. भविष्य नाही सांगत तर आपल्याच विचारांतील स्वच्छता दाखवतात.
-------------
खरं तर मी अजुनही $३ चे लॉटरी तिकीट घेते. परवा विचारलेले, आज मोठ्ठी लॉटरी लागेल का? आणि मोठ्ठी डिफाइन केली = $१०,००० किंवा त्याहून जास्त. तर परत फिरकी घेतली. Happy 'द एंपरर' कार्ड आलं. Happy होय तर अगदी साम्राज्य मिळेल असे काहीसे. कोणतेही ऐरे गैरे नाही तर 'एंपरर' कार्ड. खूपदा फिरकी घेतलेली असते Happy
.

------------------
फिरकीबद्दल फक्त मी म्हणत नाही अनेकांचा अनुभव आहे . ए आय उवाच - Yes, tarot often has a very sharp, ironic, and literal sense of humor. Readers frequently report pulling comically perfect or sarcastic cards that mirror life’s absurdities, whether it is the deck's personality or just human projection at play.

माझा डेक मिष्किल असल्याचा अनुभव अनेकदा आलेला आहे.

बाबांना भेट मिळालेला एक टॅरो डेक घरात साधारण २०-२२ वर्ष निद्रावस्थेत आहे. कोरा करकरीत, रिच कलर्स. वेष्टनसुद्धा काढलेले नाही. माझ्या अनेक decluttering drives मधून बचावला आहे अजून.

बाबांनी predictions साठी वापरून बघितलेला नाही, त्याची गरज नाही म्हणाले.

“योग्य वेळ येईल तेव्हां तू किंवा मी बघू हा प्रकार काय आहे ते”असे त्यांचे भाकित असल्याने Tarot deck awaits its destiny अशी गमतीशीर परिस्थिती 😀

>>>>>Tarot deck awaits its destiny अशी गमतीशीर परिस्थिती
हाहाहा
आई ग्ग! २० वर्षे Happy
----------------------
@बाबांचे भाकित Lol Lol
----------------
माझ्याकडे तीन डेक आहेत परंतु मला अतिप्रिय , अगदी लाडका - डिव्हिअंट मुन च. बाकी चे बासनात.

सामो
छान माहिती आणि प्रतिसाद.
याबाबत उत्सुकता आहे पण अनुभव काहीच नाही.
एक प्रश्न मला नेहमी टॅरो कार्डबद्दल आहे की टॅरो कार्ड वाचणाऱ्या ह्या कायम स्त्रिया असतात. म्हणजे मी तरी अजून कोणी पुरुष टॅरो कार्ड रीडर पाहिला नाही (असू शकेल).
पण हे टॅरो कार्ड फेमिनीन एनर्जीशी निगडित आहे का? किंवा तत्सम काही?

>>>>>>मी तरी अजून कोणी पुरुष टॅरो कार्ड रीडर पाहिला नाही (असू शकेल).
ऋतुराज यु ट्युबवर पुरुषही आहेत. स्त्रियांना कदाचित चटकन अपील होत असावं. कदाचित अंतर्मुखता हा थोडा फेमिनाईन स्वभावविशेष असावा.
पण आहेत, आहेत. युट्युबवरती पुरुषही आहेत.

Pages