प्रकाशचित्रांचा झब्बू १ - प्रवेशद्वार/ दरवाजे

Submitted by संयोजक on 6 September, 2026 - 12:34

मायबोली गणेशोत्सव २०२६ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू

आजचा विषय आहे प्रवेशद्वार/ दरवाजे.

t9.jpg

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

१. ही स्पर्धा नसून हा खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_20260916_153544_Gallery.jpg

Screenshot_20260914_223124_Gallery.jpg

कायमाकली अंडरग्राऊंड सिटी - कापाडोचिया - तुर्कीये
रांगत जाता येईल इतक्याच उंचीचे प्रवेशद्वार. Sad

IMG-20231217-WA0049.jpg

छोट्या छोट्या गावातील, दुर्गम भागातील हे मुलांच्या आणि भारताच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे प्रवेशद्वार


WhatsApp Image 2026-09-16 at 1.46.17 PM (6).jpeg

प्रत्येक दरवाज्याला स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. काही दरवाजे 'बाहे फैलाके' तुम्हाला निमंत्रण देत आहेत तर काही ... लाजत बुजत Happy काही दरवाजे मात्र एकटे एकटे उभे आहेत.

प्रत्येक दरवाज्याला स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे

+ १

आणि या निमित्ताने मायबोलीकर किती आणि कुठे कुठे फिरतात ते ही दिसून येते Happy

Screenshot_20260916_213802_Gallery.jpg

मस्त फोटो आहेत सगळे.
प्रत्येक दरवाज्याला स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे> +1
हा आहे लंडन च्या ट्यूब चा दरवाजा. ह्या फोटोवर वर जाऊ नका. पीक आवरला गाड्या सोडाव्या लागतात एवढी गर्दी असते.
DSCN1889.jpg

पीक आवरला गाड्या सोडाव्या लागतात एवढी गर्दी असते.

हे म्हणजे आपल्या मुंबई लोकल सारखेच झाले Lol

माझे मन छान फोटो.
हे म्हणजे आपल्या मुंबई लोकल सारखेच झाले Lol >> होय, फक्त त्यांना लाईन लावण्याची आवड असल्याने गर्दीला शिस्त असते. तिथे ही एक अदृश्य लाईन असते. आपल्या सारखा शक्तीप्रयोग करावा लागत नाही गाडीत चढताना.

हे परांडा तालुक्यातील एका छोट्या गावातील गावची वेस.
आता गाव वेसेच्या बाहेर पसरले म्हणा.


अदृष्य लाईन ही एकदम भारी कन्सेप्ट आहे. इथे पण बसला उभे असतील तर रांग अशी लावलेली नसते. पण जनरली आपल्या आधी आलेल्या माणसापूर्वी आपण चढायचे नाही. बसच्या दारासमोर उगा गर्दी करायची नाही नजरा नजर झाली तर ओठावर ओठ दाबुन हसलंच पाहिजे असे कडक नियम आहेत. Lol

aeef5161-7591-4b39-be79-c116e8dd8b23.jpeg

# फ़लकनुमा हैदराबाद
# प्रवेशद्वार/ दरवाजा
# तस्वीर- ए- दर - ओ - बाम

या दरवाज्याची ख़ासियत म्हणजे यातल्या stain glasses मधे लपलेली फ़लकनुमा राजवाड्याच्या वास्तुरचनाकार आणि स्थापत्य विशारदाची छबी.

आपल्याकडे या professionals चा असा सन्मान अतिदुर्मिळ.

(Designer / Principal Architect and Chief Engineer immortalised by the art connoisseurs par excellence- The Paigah Family)

अनिंद्य, माझे मन आणि ऋतुराज , सर्व फोटो आवडले.
मनीमोहोर, तुमच्या घराचा दरवाजा सर्वात जास्त आवडला. जिव्हाळा जाणवला.
झकासराव, गावची उबदार आठवण जागवली.

हर्पेन, खूप सुंदर फोटो आलेत.
शेवटचा निळा दरवाजा तुमच्या गावच्या घराचा आहे का? अशी घरं खूप आवडतात.

<<<<<<<आणि या निमित्ताने मायबोलीकर किती आणि कुठे कुठे फिरतात ते ही दिसून येते>>>>>>>>>
Lol Lol Lol

IMG_7868.jpeg

@ माधव,

तुमचा ref brick arches वाला फोटो फार आवडला.

कमानींची रांग असलेले सर्वच फोटो यथा हह, अनिरुद्ध यांचे बड़ा इमामबाड़ा/ अयुधा येथील, ऋतुराज स्निग्धा यांचे जापानचे- फार सुंदर आले आहेत.

@ राज अज्ञानी,
थँक्यू

20260115_113950~2.jpg

अमित पूर्ण पोस्ट ला अनुमोदन.
मनीमोहोर, तुमच्या घराचा दरवाजा सर्वात जास्त आवडला. जिव्हाळा जाणवला. >> थँक्यु सो मच राज अज्ञानी

हर्पेन, खूप सुंदर फोटो आलेत.
शेवटचा निळा दरवाजा तुमच्या गावच्या घराचा आहे का? अशी घरं खूप आवडतात.
>>

धन्यवाद @ राज
निळ्या दरवाजाचे घर आमचे नाही. मेळघाटातलेच एक घर आहे दरवाजा सागवानी लाकडाचा आहे.

Pages