✪ नाझी जर्मनी आणि युद्धासंदर्भातील वेगळी बाजू
✪ भूगोलाबरोबर इतिहासातही वेगळं स्थान असलेला देश
✪ आसुरी महत्त्वाकांक्षा असूनही एकही वसाहत नसलेला देश
✪ लोकशाहीवादी देशांनी केलेली आक्रमणं, जुलुमशाही आणि छळ
✪ महायुद्धाचा खरा सूत्रधार कोण?
✪ रशियामध्ये जर्मनीचा पराभव होण्यामागचं वेगळं कारण
✪ ब्रिटन व अमेरिकेचं नंतरच्या काळातलं वागणं
३ सप्टेंबर १९३९! दुसरं महायुद्ध नावाचं अग्नीकुंड ह्या दिवशी पेटलं. पोलंडमध्ये युद्धाला तोंड फुटल्यापासून हिरोशिमानंतर जपानने शरणागती पत्करण्यापर्यंतचे हे २१६३ दिवस! आधुनिक इतिहासातलं महाभारत आणि अतिशय नाट्यमय कालखंड. पराक्रम, क्रूरता, अमानुषता, स्वार्थ आणि जागतिक वर्चस्ववादाचा विलक्षण अविष्कार. दुसरं महायुद्ध हा माझ्यासाठी अतिशय जवळचा विषय. गेल्या ३ सप्टेंबरलाच युद्ध आणि हिटलरबद्दल एक वेगळा दृष्टीकोन सांगणारं हे पुस्तक वाचण्यात आलं. पराग वैद्य ह्यांची शैली आणि विषय मांडणी अशी आहे की एकदा सुरू केल्यावर थांबवता आलं नाही. त्या पुस्तकाबद्दलची ही प्रतिक्रिया.
(माझा ब्लॉग. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, आकाश दर्शन, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)
ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.
प्रचलित- रूढ इतिहास सांगतो की, नाझी जर्मनीच्या आसुरी महत्त्वाकांक्षेमुळे हे युद्ध सुरू झालं. जर्मनी व जपान ह्यांचा साम्राज्यवाद, त्यांनी जगावर लादलेलं युद्ध व ब्रिटन- अमेरिका अशा लोकशाही देशांनी त्यांच्यापासून जगाचं केलेलं रक्षण. रूढ इतिहास हा आहे. ह्या इतिहासाची एक वेगळी फार समोर न येणारी बाजू हे पुस्तक सांगतं. जर्मनी देश म्हणून कसा होता, त्याचं वेगळेपण काय आहे, त्याचं सामर्थ्य काय होतं आणि ब्रिटीश- अमेरिकन व रशियाचा खरा चेहरा काय होतं ह्याची खूप वेगळी चर्चा ह्या पुस्तकात आहे. जर्मनीचा तो आक्रमक साम्राज्यवाद आणि स्टॅलिनच्या रशियाने ओरबाडलेले पोलंड, लिथुआनिया, फिनलंड, लॅटव्हिया, युगोस्लाव्हिया व युद्धोत्तर काळात ग्रीस असे देश; नाझी हे मानवता विरोधी आणि साम्राज्यवादी; पण जगभर नाझींपेक्षा प्रचंड मोठ्या जुलुमी वसाहती असलेले देश मात्र शांतताप्रेमी ह्या प्रचलित रूढ इतिहासाची मोडतोड करणारी मांडणी पुस्तकामध्ये आहे. आणि त्यासाठी पुस्तकामध्ये अक्षरश: शंभरहून अधिक पानं भरतील इतकी संदर्भ सूची आहे. लेखक पराग वैद्य ह्यांनी हे पुस्तक प्रचंड अभ्यास करून लिहीलं आहे. आणि त्यांनी मांडलेली भुमिका व वेगळ्या दृष्टीकोनातून सांगितलेली तथ्यं खूप रोमांचक आहेत.
दुसर्या महायुद्धाच्या सुरूवातीला जर्मनीचं सैन्य अतिशय तुटपुंजं होतं. आर्थिक मंदी होती आणि अनेक समस्या होत्या. त्यांचे असंख्य पुरावे त्यांनी दिले आहेत. त्यामुळे नाझी जर्मनी युद्धखोर देश होता आणि त्यांच्या आसुरी महत्त्वाकांक्षेमुळे युद्ध सुरू झालं हा प्रचलित इतिहास केवळ सांगितलेला इतिहास आहे हे लक्षात येतं. आणि तेव्हा लोकशाही देशांच्या वसाहती जगभर होत्याच की. एका देशाने अनेक खंडांमध्ये ढिगाने देशांवर राज्य केलं तरी तो लोकशाही देश आणि दुसर्या एका देशाने व्हर्सायच्या तहात गमावलेले स्वत:चेच भाग- प्रदेश, शहरं किंवा अगदी जमिनीचा तुकडा परत घेतला तरी तो देश मानवताविरोधी अशी ही लोकशाही देशांनी उभी केलेली धारणा होती.
पुस्तक पुराव्यानुसार दाखवून देतं की, इंग्लंड- अमेरिका व त्यांच्या गटातील राष्ट्रांमुळे १९३९ मध्ये युद्धाला सुरूवात झाली. आणि तेव्हा तुटपुंजी सैनिकी क्षमता असलेला जर्मनी वस्तुत: युद्ध सुरू करू शकतच नव्हता. कारण असंख्य समस्या होत्या. शक्ती कमी होती. पुस्तक सांगतं की, जर्मनीवर युद्ध लादलं गेलं आणि मग तो देश जिद्दीने उभा राहिला आणि पुढे मोठ्या मोठ्या देशांना युद्धात जर्मनीने पाणी पाजलं. पण जगभर पसरलेली साम्राज्य- जागतिक अर्थसत्ता व रशियातलं मनुष्यबळ ह्यामुळे जर्मनीचा पराभव झाला. तो अपरिहार्यच होता पण तरीही जर्मनीने युद्धात दाखवलेला पराक्रम किती वेगळा होता ह्याचं सैनिकी विश्लेषण पुस्तक सांगतं. जर्मनी रशियाविरुद्ध हरण्यामागे असलेलं एक अज्ञात कारणसुद्धा त्यात येतं.
ऍडॉल्फ हिटलर राष्ट्रप्रमुख म्हणून ह्या पुस्तकात समोर येतो. त्याचं पूर्वायुष्य व व्यक्तिगत जडण घडणीची संक्षिप्त चर्चा आलेली आहे. पुस्तकामध्ये अनेक उल्लेख आहेत जे दर्शवतात की, ३ सप्टेंबर १९३९ नाही तर हिटलर जर्मनीत सत्ताधीश झाला तेव्हापासूनच शत्रूंनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं होतं. हे शत्रू आणि युद्धाचे खरे सूत्रधार कोण हे पुस्तकातच वाचायला हवं. हिटलर व नाझींबद्दल अनेक धक्कादायक मतं पुस्तकात आहेत जी मला पटली नाहीत. पण ब्रिटन व अमेरिकेबद्दल लेखकाची मतं पटण्यासारखी आहेत. भारताला ह्या लोकशाही देशांनी दिलेली वागणूक कोण विसरेल? युद्धासाठी सगळा जोर लावत असताना १९४३ च्या दुष्काळात लाखो बंगाली लोकांना चर्चिल सरकारने मदत न करता मरू दिलं. जर्मनी व रशियाने एकमेकांची शक्ती कमी करावी व नंतर आम्ही त्याचा फायदा उठवू असं अमेरिकेचं गणित होतं. शिवाय स्टॅलिनने केलेली रशियन लोकांची दडपशाही, हत्याकांडं व छोट्या देशांवरचा वरवंटा लोकशाही देशांनी नजरेआड ठेवला. अशा अनेक विसंगतीवर हे पुस्तक बोट ठेवतं.
लेखकांनी अभ्यासाने दिलेले पुरावे व संदर्भ वाचनीय आहेत. हिटलर आणि नाझी ह्यांना छळछावण्या, दडपशाही व जुलुमशाहीच्या ज्या अपराधांसाठी ओळखलं जातं, त्या गोष्टीही लोकशाहीवादी देशांनी व सूत्रधारांनी पसरवलेल्या आहेत असं पुस्तक सांगतं. पण त्याबद्दलचे पुरावे त्यात अजून हवे होते. लेखक ज्या गोष्टींना असत्य म्हणतात, त्या त्यांनी सिद्ध करायला हव्या होत्या. ज्याला दुसर्या महायुद्धाचा इतिहास महत्त्वाचा वाटतो आणि ब्रिटन- अमेरिकेचं खरं चरित्र आणि चारित्र्य ज्यांना माहिती आहे, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं! भारताच्या स्वातंत्र्यामध्ये दुसर्या महायुद्धामुळे उद्भवलेल्या स्थितीचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे त्या दृष्टीकोनातूनही हे पुस्तक वाचनीय आहे. हे पुस्तक बूकगंगा व इतर ठिकाणी उपलब्ध आहे. लेख वाचल्याबद्दल धन्यवाद!
-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 8 सप्टेंबर 2026.
सुभाषबाबूंनी मदत घेण्यात
सुभाषबाबूंनी मदत घेण्यात काहीच गैर नाही.
ब्रिटीश ही हलकट आणि जर्मन्सही. लोहा लोहेको काटता है हा न्याय आहे.
एक बाळबोध विधान करतो.
एक बाळबोध विधान करतो.
इतिहासाचा उपयोग विवेकवादी होण्यासाठी करावा व आजच्या समाजात दुफळी माजवण्यासाठी करू नये.
हे तसे दिसायला जरासे भारदस्त वगैरे विधान वाटेल पण अर्थातच ते तसे नाहीच. किरकोळ मत आहे ते एक! आपल्या दैनंदिन आयुष्यात ज्या गोष्टी नव्यानेच समजून किंवा अजिबात न समजून काही फरकच पडत नाही त्या गोष्टी चघळण्यात माणसाने स्वारस्य दाखवू नये असे आपले मला वाटते. कळते पण वळत नाही हे मलाही लागू होतेच.
नाझी भस्मासुर मध्ये एक वाक्य
नाझी भस्मासुर मध्ये एक वाक्य आहे
लक्षात ठेवा चक्र नेहमी पूर्ण फिरत असते आशा स्वरूपाचे
फ्रांस ब्रिटन आणि कॅनडा सह अन्य युरोपियन देशांनी इस्रायल वर व्यापार निर्बंध लादले आहेत, गाझा पट्टीत सुरू असलेल्या नरसंहाराच्या निषेधार्थ
आजचा लोकसत्ता चा अग्रलेख वाचनीय आहे त्यासाठी
Foreign Secretary Ed Miliband
Foreign Secretary Ed Miliband has defended the decision to sanction illegal Israeli settlements in the West Bank - insisting the UK could not remain "silent or passive" over the issue.
a ban on imports of goods produced in illegal settlements in the occupied West Bank
गाझाचा संबंध दिसला नाही.
भरत +१. वेस्ट बँक मधील
भरत +१. वेस्ट बँक मधील उत्पादनांवर बंदी इतकंच वाचलं. इस्त्रायलवर निर्बंध नाहीत, इस्त्रायली सेटलमेंटवर फक्त आहेत.
होय हे बरोबर आहे
होय हे बरोबर आहे
ब्रिटन (UK), फ्रान्स आणि कॅनडासह एकूण १२ देशांनी ८ सप्टेंबर २०२६ रोजी एक संयुक्त घोषणा केली आहे. त्यानुसार, वेस्ट बँक (West Bank) मधील बेकायदेशीर इस्रायली वस्त्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व मालाच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे. यामध्ये खजूर, ऑलिव्ह ऑइल, अवाकाडो आणि इतर शेती उत्पादनांचा समावेश आहे. इस्रायली नागरिकांकडून पॅलेस्टिनींवर होणारा हिंसाचार आणि बेकायदेशीर वस्त्यांचा विस्तार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयाला स्पेन, आयर्लंड, नॉर्वे, फिनलंड आणि स्वीडन या युरोपीय देशांनीही पाठिंबा दिला आहे
पण त्यासोबत हेही आहे
संयुक्त राष्ट्रांच्या (UN) तज्ज्ञांनी आणि युरोपियन युनियनच्या (EU) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाझा मधील इस्रायलच्या कारवाईला "नरसंहार" (Genocide) असे संबोधले आहे. तसेच, इस्रायलसोबतचा सर्व प्राधान्य व्यापार करार (EU-Israel Association Agreement) तात्काळ निलंबित करावा, अशी मागणी युरोपमध्ये तीव्र झाली आहे.
सोबतच
आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने (ICC) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरोधात युद्ध गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्ससह आयसीसीच्या सर्व १२५ सदस्य देशांवर नेतान्याहू त्यांच्या देशात आल्यास त्यांना अटक करण्याचे कायदेशीर बंधन आहे.
ज्यूंचा नरसंहार हा मानवी
ज्यूंचा नरसंहार हा मानवी इतिहासातील काळा अध्याय आहे. कुठल्या तरी धर्माच्या गटाच्या जातीच्या लोकांना असे अमानुष हाल करून मारणे हे मानवी मूल्यांच्या विरुद्ध आहे. एक हिटलर आणि त्याचे चेले विकृत असतील. पण समस्त जर्मन जनतेने हे कसे मान्य केले हे अगम्य आहे. इतक्या मोठ्या संख्येने पूर्ण देश ह्या भयंकर उपक्रमात सहभागी होऊ शकला ते एक कोडेच आहे. त्या छळ छावण्यांची वर्णने वाचणेही अवघड वाटते. ज्यांनी भोगले असेल त्यांचे काय झाले असेल?
तरी ह्या महायुद्धाचा फायदा हा की ब्रिटिश महासत्ता खिळखिळी झाली आणि भारत आणि अनेक देशांचा स्वतंत्र होण्याचा मार्ग सुलभ झाला.
भारताचे लोक हिटलरचे कौतुक करतात ते त्याने लाखो ज्यू लोकांना हाल करून मारले म्हणून नाही तर इंग्रजांशी लढाई केली म्हणून.
होलोकॉस्ट वगैरे तपशील खूप नंतर उघडकीस आले. तोवर तो एक इंग्रजांना भिडणारा म्हणून हिरो वाटत असावा.
भारतीय लोकांना ज्यू लोकांबद्दल कधीच तिरस्कार नव्हता. कोकणात अनेक ज्यू लोक आनंदाने अनेक पिढ्या राहत होते. त्यामुळे ज्यूंवर अत्याचार केले म्हणून आसुरी आनंद होऊन हिटलरबद्दल कौतुक असेल ह्याला आधार नाही.
अजून एक म्हणजे इतिहास हा जेतेच लिहितात. त्यामुळे दोस्त राष्ट्रांची जरा जास्तच भलावण केली जात असेल आणि त्यांच्या विरुद्ध असणार्यांना शक्य तितक्या काळ्या रंगात रंगवले जात असेल.
इतक्या मोठ्या संख्येने पूर्ण
इतक्या मोठ्या संख्येने पूर्ण देश ह्या भयंकर उपक्रमात सहभागी होऊ शकला ते एक कोडेच आहे>>>
याचे उत्तर नाही पण काहीसे या जवळ जाणारे द रीडर या पुस्तकात आहे
बर्नहार्ड शलिंक Bernhard Schlink
ज्यावर एक सिनेमाही आला केट विंसलेट चा
त्यातला कथनायक विचारतो इतकं निर्घृण हत्याकांड कसे होऊ दिलेत तुम्ही, काहीच कसे बोलला नाहीत
आणि काही प्रमाणत नाझी भस्मासुर मध्येही आहे
की शालेय वयापासून मुलांच्या मनावर हेच बिंबवण्यात आले की ज्यू हे बांडगुळ आहेत, ज्यांना माणूस पण म्हणणे योग्य नाहीत, त्यांनी जर्मन जनतेवर अत्याचार केले, कोवळ्या जर्मन मुलींना वेश्याव्यवसाय मध्ये ढकलले, आणि अशाच स्वरूपाचे
त्यामुळे जेव्हा हे हिटलर युथ चे सदस्य, नाझी पार्टी, एसस मध्ये गेले तेव्हा त्यांची मनोधारणा हीच होती की ही कीड आहे मानवासाठी त्यामुळे त्यांना मारणे हे काही चूक नाही
याच संदर्भात एक फोटो ही पहिला होता
कोन्स्ट्रेशन कॅम्प चे कर्मचारी सहली ला गेले आहेत असा
त्यांच्या आनंदी हसऱ्या चेहऱ्याकडे बघून कोणालाही वाटणार नाही की रोज हीच लोकं हजारो निरपराध ज्यू ना थंडपणे गॅसिंग करून मारत आहेत
सगळंच इतकं भयानक आहे ना जितकं वाचतो, जितकी माहिती घेतो तितका त्रास वाढतो
एक हिटलर आणि त्याचे चेले
एक हिटलर आणि त्याचे चेले विकृत असतील. पण समस्त जर्मन जनतेने हे कसे मान्य केले हे अगम्य आहे. >> गुजरात २००२.
होलोकॉस्ट वगैरे तपशील खूप
होलोकॉस्ट वगैरे तपशील खूप नंतर उघडकीस आले. तोवर तो एक इंग्रजांना भिडणारा म्हणून हिरो वाटत असावा. >> खूप नंतर म्हणजे कधी? कारण इथे लिहिणार्या बहुसंख्य लोकांच्या जन्मापासून ते तपशील व्यवस्थित माहित होते.

>> पण समस्त जर्मन जनतेने हे कसे मान्य केले हे अगम्य आहे. इतक्या मोठ्या संख्येने पूर्ण देश ह्या भयंकर उपक्रमात सहभागी होऊ शकला ते एक कोडेच आहे. >> दोन वर्षांनी हाच प्रश्न कोणीतरी विचारणार आहे.
दोन वर्षांनी हाच प्रश्न
दोन वर्षांनी हाच प्रश्न कोणीतरी विचारणार आहे>>>> Bulls eye!
दुसरे महायुद्ध सुरु झाले
दुसरे महायुद्ध सुरु झाले १९३९ साली. आणि सर्व तपशीलासकट होलोकॉस्ट उघडकीस आले ते १९४५ साली.
तेव्हा इंटरनेट वगैरे नसल्यामुळे भारतापर्यंत पोचायला कदाचित आणखी काही महिने लागले असतील.
महायुद्ध होऊन ८० वर्षे उलटून गेल्यामुळे एक वाईट पायंडा पडला आहे.
हिटलर होऊन गेल्यामुळे खुट्ट झाले की कुणालाही हिटलर म्हणणे, कुठल्याही गोष्टीची होलोकॉस्टशी बरोबरी करून खरे तर त्या भयानक प्रकाराचे गांभीर्य कमी करत आहेत आणि त्या लाखो ज्यू बळींचा अपमान करत आहेत हे विचारात घेत नाहीत. आपल्या नावडत्या व्यक्तीला चांगली शिवी घातली ह्याचा आनंद घेत असताना मानवी इतिहासातील एका भयानक अध्यायाला मामुली पातळीवर आणणे खटकते.
कुणालाही हिटलर म्हणण्याने
कुणालाही हिटलर म्हणण्याने कोणी खरोखरच हिटलर बनत नाही पण हिटलर बनू देण्याच्या पातळीवर जाऊ न देणे हे तरी योग्य आहे का नाही
जे त्या काळात घडले, की एक ठराविक वंशाच्या लोकांना सरसकट जबाबदार ठरवणे, विरोधीपक्ष संपवून टाकणे, विरोधकाना खोट्या आरोपात अडकवणे, लेखक, विचारवंत, शिक्षक यांना देशद्रोही ठरवणे, जाहीररीत्या त्यांची पुस्तके जाळणे
खुद्द हिटलर नेच लिहून ठेवलं आहे
प्रस्थापित वर्गाकडे हल्ल्याला तोंड देण्याचे सामर्थ्य नसते, एका इशाऱ्यावर त्यांच्यावर जेव्हा सर्वबाजूने टीका, निंदा आणि किटाळ भडिमार होऊ लागतो तेव्हा ते कोलमडून पडतात
आता मला सांगा याच्या जवळपास जाणारे आपल्या आजूबाजूला घडताना आपल्याला दिसते आहे का नाही?
>>मानवी इतिहासातील एका भयानक
>>मानवी इतिहासातील एका भयानक अध्यायाला मामुली पातळीवर आणणे खटकते. >> भयानक अध्यायाची चाहुल लागल्यावर आवाज उठवणे वि. पूर्णपणे माती खायची वाट बघणे असे दोन पर्याय आहेत. ज्याचा त्याचा प्रश्न.
त्यामुळे जेव्हा हे हिटलर युथ
त्यामुळे जेव्हा हे हिटलर युथ चे सदस्य, नाझी पार्टी, एसस मध्ये गेले तेव्हा त्यांची मनोधारणा हीच होती की ही कीड आहे मानवासाठी त्यामुळे त्यांना मारणे हे काही चूक नाही>>>>
आशु इतकं उघडपणे बोलू नका,
गतकाळाचीवास्तवाची भुतं डोळ्यासमोर पुन्हा फेर धरून नाचायला लागायची..." जिहाद करून शहीद झालात तर थेट स्वर्गात प्रवेश असले भयानक विचार ज्या धर्मात शिकवले जातात तो धर्म म्हणजे दारूगोळ्याचा ढीग आहे. एक ठिणगी निर्माण झाली की स्फोट होऊ शकतो. असले तत्त्वज्ञान ज्या धर्माच्या मागे आहे त्याचा अनुयायी कधी डोके फिरून जिहादी बनून काहीतरी भयानक कृत्य करेल हे सांगता येत नाही."
अध्याय
अध्याय
›
अध्याय 2
›कविता 37
भगवद गीता: अध्याय 2, श्लोक 37
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।
नवीन Submitted by केशवकूल on
नवीन Submitted by केशवकूल on 11 September, 2026 - 12:45>>>> वॉव केकू, जरा आणखी खंगाळून बघा, स्वर्गात अप्सरा मधाने आंघोळ घालतात की नाही ते??
मेल्या शिवाय स्वर्ग दिसत
मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही. तस्मात अजून बराच वेळ आहे. तसेच स्वर्गात जाईन का नरकात ह्याची खात्री नाहीये. नंतर सांगितले तर चालेल का?
कालच्या लोकसत्तेच्या
कालच्या लोकसत्तेच्या अग्रलेखात असे म्हटले आहे कि , "हमास" च्या दहशतवादी हल्ल्यात हजारभर इस्त्रायली मारले गेले , त्या बदल्यात 70 हजार पॅलेस्टिनी मारले गेले . मग होलोकॉस्ट मध्ये लाखो ज्यू मारले गेले त्याच्या बदल्याचे काय ? दुसरे महायुद्ध थांबवायला ज्या अणुबॉम्ब चा वापर झाला , त्यात लाखो जपानी गेले पण जर्मन्सना काही झाले नाही , एकंदरीत जर्मन लोकांवर काहीच आंच आली नाही ?
आली की भरपूर
आली की भरपूर
ड्रेसेन, कलोन सारख्या शहरांची राखरांगोळी करण्यात आली, 1000 बॉम्बर रेड असे त्याला म्हणण्यात आले,हजारो लाखो नागरिक होरपळून मेले, कोट्यवधी बेघर झाले
हे अमेरिकन सैन्याकडून
रशियन सैन्याने तर प्रचंड अत्याचार केले
सूड घेण्यासाठी लाखो जर्मन महिलांवर सामुहिक बलात्कार झाले ज्यात लहान मुलीपासून वृद्ध कोणीही सुटले नाहीत, कित्येक जणी या अत्याचारात वेदनांनी मरण पावल्या कित्येकांनी आत्महत्या केल्या
शेवटी अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्याला यात हस्तक्षेप करावा लागला
नंतरही जर्मनीची फाळणी झाली, पूर्व जर्मनी रशियाच्या ताब्यात गेला आणि हजारो नागरिक त्यात मारले गेले
उपासमार, हालअपेष्टा आणि आजार यामुळे
जर्मनीची अक्षरशः वाताहत झालेली होती दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस
तसेच स्वर्गात जाईन का नरकात
तसेच स्वर्गात जाईन का नरकात ह्याची खात्री नाहीये. >> मार्ग आहे.... 'युद्धाय कृतनिश्चयः'
केकू हे दोन्ही सारखेच आहे
केकू हे दोन्ही सारखेच आहे म्हणताय का?
नाही. मी कोण बोलणार. सहज
नाही. मी कोण बोलणार. सहज आठवले म्हणून लिहिले. ज्याला जासे पाहीजे तसे घ्यावे.
ओहह!
ओहह!
इतकी चर्चा आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद! सर्व प्रतिसाद वाचले. सर्वांना धन्यवाद! @ आशुचँपजी, विशेष धन्यवाद
तेव्हा इंटरनेट नव्हतं, आता
तेव्हा इंटरनेट नव्हतं, आता आहे. तरी तेच सुरू आहे. आता डोळ्यावर कातडं आणि ओठांवर पोस्ट ट्रुथ आहे.
नेपोलियन वर एका मराठी लेखकाने
नेपोलियन वर एका मराठी लेखकाने पुस्तक लिहीलेले आहे. फ्री मिळाले म्हणून वाचले.
पण त्यात त्याने जी काही धमाल केलीये त्याला तोड नाही.
जर नेपोलियनने पेशव्यांची मदत घेतली असती तर तो विश्वविजेता / अजिंक्य ठरला असता.
बॅरिस्टर सावरकर जर थोडे आधी जन्माला आले असते तर जगाचा इतिहास काही वेगळाच असता. जर सावरकरांची आणि नेपोलियनची भेट झाली असती ( ती झालीच असती, कारण विद्वत्तेचा गंध सर्वत्र पसरतो) तर नेपोलियनला सावरकरांनी मार्गदर्शन केलं असतं. ते व्हायचं नव्हतं म्हणून नियतीने त्यांचे कालखंड वेगवेगळे ठेवले.
तेव्हां मराठी लेखकांपासून सावधान!
शेक्सपीअरला जर ह मो मराठे भेटले असते तर त्याच्या साहित्याचा दर्जा उंचावला असता असंही वाचायला मिळू शकतं.
होमरने नक्कीच गोनीदांचे मागच्या जन्मात मार्गदर्शन घेतले असावे, नाहीतर एव्हढे डिटेलिंग त्याला कुठून जमायला?
केकू, मी ते विचारतोय कारण या
केकू, मी ते विचारतोय कारण या दोन गोष्टी सोमिवर कधीकधी एकत्र चर्चिल्या जातात. तुम्ही जिहाद च्या पोस्टनंतर तो श्लोक लिहीलात त्यावरून तुम्हाला काहीतरी साम्य वाटले का आणि त्याबद्दल तुमचे काय मत आहे ते जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे.
मध्ययुगीन काळात आपला धर्म व आपले राज्य वाढवणे हे सगळेच करत होते हा इक्विव्हॅलन्स सोडला तर दोन्हीत मला साम्य दिसत नाही. एकतर हा श्लोक त्याच्या बराच पूर्वीचा. मध्ययुगीन काळात भारतातील राजे लोकांनी ही धार्मिक आज्ञा असल्यासारखी वापरल्याचे ऐकिवात नाही. सध्याच्या काळातही कोणी हा श्लोक शब्दशः घेत नाही. किंबहुना आता लोक "तुमचे कर्तव्य" या अर्थाने तो वापरतात. इव्हन तेव्हाही तो तुमच्यापेक्षा वेगळे असलेल्या लोकांना सरसकट मारत सुटा या अर्थाने नव्हताच.
पुण्याचे बापटही सध्या त्यांना भीती वाटत नाही का विचारल्यावर या श्लोकाचा दाखला देतात यापेक्षा चांगले उदाहरण काय देणार? पण कोणाचे वेगळे मत असेल तर आवडेल वाचायला.
Pages