
साहित्य- बँबिनो ब्रँडच्या रोस्टेड शेवया, १ चमचा उडीद डाळ भिजवून, मूठभर काजू, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर, अर्धी वाटी बारीक चिरुन भोपळी मिरची, सहज मिळत असल्यास एदामामेचे दाणे किंवा फ्रोझन मटार, पाव वाटी कॉर्न, ४,५ कढिपत्त्याची पानं, वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर, फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, मीठ, साखर इत्यादी.
कृती- एकीकडे मोठ्या भांड्यात पास्त्याकरता उकळतो तसंच पाणी उकळत ठेवावं. दुसरीकडे पसरट पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरी, भिजवलेली उडीद डाळ आणि हिंग घालून फोडणी करावी. त्यातच कढिपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून कांदा परतावा. मग त्यात बाकी सगळ्या भाज्या घालून मध्यम आचेवर करपू न देता परतत रहावं. चवीपुरतं मीठ, चिमूटभर साखर घालावी. आता पाणी उकळलं असेल तर त्यात किंचित तेल घालून दोन तीन मुठी शेवया घालाव्यात. ह्या शेवया फार शिजवायची गरज नाही तेव्हा साधारण चार पाच मिनिटांत शिजलेल्या वाटल्या की चाळणीत घालून ड्रेन कराव्यात आणि भाज्यांवर घालाव्यात. वरुन कोथिंबीर घालून गरम गरम खाव्यात.
छान सोपी आहे कृती. थोड्याफार
छान सोपी आहे कृती. झटपट होईल. थोड्याफार फरकाने अशीच करतो. कधीकधी rice noodles चा ही करतो शेविग्गे उपमा.
Edamame ची आयडिया भारी आहे, तेव्हढेच प्रोटीन. आता एकदा ते वापरून आणि मका दाणे वगळून करणार.
सायो, तुमच्या काही पाककृती आमच्या घरी हिट्ट आहेत, खासकरून मसालेभात. हे सांगायचे राहिले होते, इथेच सांगतो.
छान आहे रेसिपी.
छान आहे रेसिपी.
मी उपम्या सारख्या त्यात गरम पाणी घालून शिजवते.
पण ह्या पद्धतीने त्या जास्त मोकळ्या होत असतील असं वाटतंय त्यामुळे आता ही पद्धत वापरून बघेन.
खूप दिवसांनी sayo ची पाकृ आली
खूप दिवसांनी sayo ची पाकृ आली
शेवया किती प्रमाणात घ्यायच्या
प्र का आ टा
अरे हो, एका माणसाला साधारण १
अरे हो, एका माणसाला साधारण १ मुठ शेवया पुरेशा होतात कारण भाज्याही आहेत. भाज्या पण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करता येतीलच.
मस्त दिसतोय !
मस्त दिसतोय !
वीकेन्डमध्ये हा उपमा
वीकेन्डमध्ये हा उपमा सायोच्याच हातचा खाण्याचा योग आला.
अत्यंत भारी चव, आणि रंग+टेक्स्चर्सची मेडली!
तिने त्यात घातलेल्या लाल सिमला मिरचीचा फार सुंदर स्वाद आला होता त्याला!
हा पुरावा:

मस्त रेसिपी. मी असा नाही पण
मस्त रेसिपी. मी असा नाही पण करायचे हा उपमा. आता असा करून बघेन. पण शेवया घरच्या आहेत माझ्या. बॅंबिनो नाहीत.
घरच्या शेवयांचा फार सुंदर
घरच्या शेवयांचा फार सुंदर होतो हा उपमा
बाॅम्बिनोच्या शेवयांचा असा कधी केला नाही
शेवया फोडणीत परतून नॉर्मलच उपमा केलेला आहे
असं करून पाहिला पाहिजे
शेवया आधीच उकडून घेतल्यामुळे आणि वरून टाकल्यामुळे भाज्यांचा क्रंच कायम राहील
घरच्या शेवयांचा फार सुंदर
घरच्या शेवयांचा फार सुंदर होतो हा उपमा
गव्हाच्या कुरडयांचाही छान होतो
बाॅम्बिनोच्या शेवयांचा असा कधी केला नाही
शेवया फोडणीत परतून नॉर्मलच उपमा केलेला आहे
असं करून पाहिला पाहिजे
शेवया आधीच उकडून दिल्यामुळे घेतल्यामुळे आणि वरून टाकल्यामुळे भाज्यांचा क्रंच कायम राहील
बँबिनो किंवा एम टी आर च्या
बँबिनो किंवा एम टी आर च्या शेवयांचा उपमा बरेचदा होतो घरी, पण शेवया फोडणीत परतून मग आधणाचे पाणी घालतात. उडदाची डाळ भिजवून मग फोडणीत घालायची पद्धत पण नवीनच ऐकली. आता या पद्धतीने करुन पाहीन. ज्येनांना तिथी/ वार पाहून रात्रीच्या जेवणात भात वर्ज्य असतो बरेचदा. अशा जेवणाला ' आज टिफिन आहे' म्हणतात. पोळी / पराठे फारसे आवडत नाहीत. त्यामुळे हा उपमा टिफिन च्या रोटेशनला चालून जाईल असे वाटते.
दोन्ही फोटो भारी :तोंपासु:
घरात असतील तर ह्यात बटण
घरात असतील तर ह्यात बटण मश्रूम्स घालायलाही मला आवडतात. एक nutty बाईट येतो तो आवडतो. शक्य त्या ह्याबरोबर जाणार्या भाज्या घालायला आवडतात.
फारच छान. मी साध्या घराच्या
फारच छान. मी साध्या घराच्या शेवयांचा फोडणीत घालून करते. आता उकडून करून बघेन
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
मी उपम्या सारख्या त्यात गरम पाणी घालून शिजवते.>>>>>
आमच्याकडे पण.
आता ह्या पद्धतीने करून पाहायला पाहिजे.
एदामामेचे दाणे टाकून पण वेगळं लागत असणार.
सुंदर.
सुंदर.
छान दिसताहेत आणि लागत असतीलच.
छान दिसताहेत आणि लागत असतीलच.
शेवया वेगळ्या उकळुन करतो आम्ही (पण करून जमाना बीत गया) पण इतर बरेच घटक तुम्ही घातले, डाळ भिजवून, याने मस्त होतील.
आता या करणे आलेच.
(आले वरून मनातल्या मनात स्वतःच कोटी करून घेऊन, वाचकांचे श्रम वाचवले आहेत याची वाचकांनी नोंद घ्यावी.)
मिलेट्स नूडल्सचा उपमा सुद्धा चांगल्या लागतो.