आत्ता त्याने फलंदाजीचा वेगळा स्तर दाखवला आहे. सध्या त्याची देहबोली, वर्तन हे सगळे सुखद वाटावे असे आहे. खरे तर या वयात आयुष्यभराची कमाईसुद्धा झालेली आहे.
पुढे सातत्य, तंदुरुस्ती वगैरे विषय उभे ठाकायला लागतात. वयानुसार इतर प्रलोभनेही असतात व वाईटावर असणारे लोक असे काही मुद्दामही करू शकतात. उत्तेजक द्रव्य चाचण्या, खोटे हनी ट्रॅप, मानसिक खच्चीकरण वगैरे गोष्टी मुद्दाम घडवल्या जाऊ शकतात किंवा खरोखरही होऊ शकतात.
असे म्हणतात की गोलंदाजाने घेतलेली प्रत्येक विकेट व फलंदाजाने काढलेली प्रत्येक रन ही त्याच्या संघासाठी उपयोगीच असते. त्या हिशोबाने वैभव सूर्यवंशीच्या आत्तापर्यंतच्या बहुतेक इनिंग्ज ह्या खूपच उपयोगी ठरल्या आहेत. अजून मोठ्या पडद्यावर, मोठाल्या मैदानांवर, महान गोलंदाजांसमोर, विविध formats मध्ये, देशासाठी म्हणून वगैरे तो कसा खेळतो ते बघायचे आहे.
त्याने फलंदाजीची व्याख्या बदलण्याची क्षमता नक्की दाखवली आहे. फार पूर्वी के श्रीकांतने पॉवर प्ले च्या ओव्हर्समध्ये वेगात खेळायचे असते ही संकल्पना प्रत्यक्षात आणली होती व जयसूर्याने तिला वेगळी मिती देऊ केली. त्याही आधी रिचार्ड्सने गोलंदाजीची केव्हाही धुलाई करता येते हे दाखवून दिले होते. सेहवाग, ख्रिस गेलं, ए बी डी, मॅक्सवेल वगैरेंनीही हे सिद्ध केले.
वैभव सूर्यवंशी ते सगळे पुढच्या लेव्हलला नेताना दिसत आहे. मात्र पुढे असलेल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील विविध टप्प्यात ती नेमका कसे परफॉर्म करेल हे अनुभवणे रंजक ठरेल.
आजमितीला तरी तो सितारा म्हणून गणला जात आहे.
मी सध्या रोहित शर्मा आणि ऋषभ
मी सध्या रोहित शर्मा आणि ऋषभ पंत (कसोटीत) यांच्यानंतर वैभव सूर्यवंशीचीच फलंदाजी आवर्जून बघू लागलो आहे.
त्याच्यासाठीच भारत अ संघाचे सामने फॉलो करत होतो.
पुढची पंधरा वर्ष त्याला खेळताना बघण्यासाठी एक्साईटेड आहे.
पण त्याने सचिनचा आदर्श ठेवणे गरजेचे. या वयात असे नाही तर कायमच!
त्या दिवशी श्रीलंकेशी हरल्यावर त्याची आणि श्रीलंकन खेळाडूंची बाचाबाची झाली. प्रकरण इथवरच थांबायला हवे होते. पण तो एका खेळाडूच्या अंगावर धावून गेला. धक्काबुक्की केली. बघायला काही हे चांगले वाटले नाही. भले समोरच्याने का उकसवले असेना. याने खेळावरचा फोकस जायची भीती असतेच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे येत्या काळात तो आयकॉन प्लेअर बनायची लक्षणे आहेत. त्याने खेळाचे स्पिरीट राखणे गरजेचे आहे.
हो, तो श्रीलंकेतील प्रसंग
हो, तो श्रीलंकेतील प्रसंग वाचला. बरोबर नाही झाले ते.
वैभवकडे असामान्य प्रतिभा आहे
वैभवकडे असामान्य प्रतिभा आहे व त्याने खेळावर खूप मेहनत घेतली आहे हे स्पष्ट आहे. पण, जागतिक दर्जाच्या क्रिकेटमध्ये तंत्र व मानसिकता यात प्रगल्भता आणण्याचा सतत कसोशीने प्रयत्न करावा लागतो कारण अशा खेळाडूच दोष व मर्मस्थळं यांचा सतत शोध घेतला जात असतो. वैभवने आपला एक कमजोर दुवा श्रीलंकेतील प्रसंगात उघड केला आहे पण तो केवळ वयानुसारच असावा हीच शक्यता अधिक. तो क्रिकेट रसिकाना दीर्घ काळ आनंद देत राहणार, ही खात्री व प्रार्थना ! अर्थात, त्याची कुणाशीही तुलना न करता त्याला त्याचं वेगळं स्थान निर्माण करायचं स्वातंत्र्य मिळायला हवं.
त्याने फलंदाजीची व्याख्या
त्याने फलंदाजीची व्याख्या बदलण्याची क्षमता नक्की दाखवली आहे >>> नक्कीच.
मजा येते त्याची बॅटिंग बघायला. तो आत्ता २५ वर्षांचा आहे असे सिद्ध झाले तरी त्याची बॅटिंग कायच्या काय भारी आहे. प्रियांश आर्य, अभिषेक शर्मा सारखे इतरही जोरदार फटकेबाजी करणारे आहेत पण हा त्याही पुढे आहे. १५०+ चा स्ट्राइक रेट असलेले लोक याच्यापुढे पुजारा वाटू लागलेत
अजून नवीन आहे. त्याच्या बॅटिंग मधले बारकावे सध्या खूप अॅनॅलाइज केले जात असतील. कोठेतरी चुका सापडतील, बोलर्स त्या वापरून त्याला लौकर आउट करतील. कधीतरी आउट ऑफ फॉर्म जाईल. अशा वेळी तो कसा बाउन्स बॅक करतो त्यावर त्याचे दीर्घकालीन यश अवलंबून असेल. आणि तो ५० ओव्हर्स किंवा कसोटीत कसा खेळेल हे पाहणेही रंजक असेल.
त्याचे काही इंटरव्ह्यु मी
त्याचे काही इंटरव्ह्यु मी पाहिले आहेत ... अजून खूप करायचे आहे
वैभवच्या भावाची बातमी कोणी
वैभवच्या भावाची बातमी कोणी ऐकली का? भले स्थानिक गल्ली क्रिकेट सामना असेना. पण वय दहा वर्षे लिहिले आहे. दो भाई दोनो तबाही वाटत आहेत.
वैभव सूर्यवंशीचा धाकटा भाऊ, आशीर्वाद सूर्यवंशीने, बिहारमधील समस्तीपूर येथे एका स्थानिक सराव सामन्यात अवघ्या ८७ चेंडूंमध्ये शानदार १०३ धावा ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. केवळ सहा महिन्यांपासून सराव करणाऱ्या या १० वर्षीय प्रतिभावान खेळाडूने २० चौकार आणि एक षटकार ठोकला, ज्यामुळे वैभवने त्याचे अभिमानाने कौतुक केले.
पंधारा वर्षाच्या पोराकडून लोक
पंधारा वर्षाच्या पोराकडून लोक मॅच्युरिटी ची अपेक्ष्क्ष ठेवणार्यांनी आपण त्या वायचे असताना काय करत होतो ह्याचे तारतम्य ठेवले तर बरे होईल. वैभव पुढे सचिनच्या वाटेने जाईल कि विनोदच्या ते माहित नाही, युवराज ठरेल कि कोहली ते माहित नाही पण सध्या जो काही आहे ते नकीच इंजोञ करण्यालायक आहे.
बाकी सरांनी रोहित, पंत नंतर वैभवला दत्तक घेतले असे दिसल्यामूळे पोटात गोळा उठला आहे
रोहीत आणि पंत यांचे कौतुक मी
रोहीत आणि पंत यांचे कौतुक मी तेव्हा केले जेव्हा यांनी त्यांच्यातील टॅलेंटला शून्य न्याय दिला होता. पुढे त्यांनी माझा विश्वास सार्थ ठरवला याचा आनंदच आहे.
वैभवची केस मात्र वेगळी आहे. तो थेट चमचम करतच अवतरला आहे. पण तरी काही जण ज्यांना निव्वळ कौतुक करणे जड जाते असे क्रिकेटप्रेमी त्याला परदेशात किंवा कसोटीत खेळणे जमेल का वगैरे शंकास्त्रे सोडत राहतातच. त्यांच्याशी मात्र बच्चे की जान लोगे क्या म्हणत भांडायला आवडते
फक्त त्याने वर उल्लेख केला ती लंकेतील घटना टाळावी.
अर्थात प्रत्येकाने विनम्र असावे असा हट्ट नाही. पण एटीट्यूड दाखवणे आवडत असेल तर तो दादासारखा दाखवावा. एक लीडर म्हणून शोभायला हवा. नाहीतर गुमान त्याने आपल्या गेम वर फोकस करावे.
पण एटीट्यूड दाखवणे आवडत असेल
पण एटीट्यूड दाखवणे आवडत असेल तर तो दादासारखा दाखवावा. >> फायनलला त्याने बुकलऊन दाखवला ना अॅटीट्यूड ! १५ वर्षाच्या पोराकडून किती अपेक्षा ठेवायच्या राव.
परवा रात्री सॉकर ची मॅच बघत
परवा रात्री सॉकर ची मॅच बघत असताना, वैभव ची बॅटिंग सुरू असल्याचं समजलं आणि चॅनेल बदलला. तुफान टॅलेंट आहे ह्या मुलाकडे. अंडर १९ वर्ल्डकप फायनलला मोठी सेंच्युरी, आयपीएलच्या क्वालीफायर आणि एलिमिनेटरमधे ९०+ धावा आणि परवाच्या फायनलमधे ९४ धावा, ह्या मुलाकडे बिग मॅच टेंपरामेंट असावं असं सुचवतात. वैभवला खूप शुभेच्छा!!
फायनलला त्याने बुकलऊन दाखवला
फायनलला त्याने बुकलऊन दाखवला ना अॅटीट्यूड !
>>>
हो, याच प्रकारे तर दाखवायला सांगत आहे.
तो खेळलेल्या गेल्या सर्व स्पर्धात तो फायनल सामन्यात हमखास खेळला आहे. ही एक फार मोठी क्वालिटी त्याने दाखवली आहे जी माझ्यामते सर्वात महत्वाची असते या खेळात.
आणि मैदानावर धक्काबुक्की केली याबद्दल काही म्हटले तर लगेच पंधरा वर्षाचा मुलगा आहे राहू द्या हो या वयात मुले अशीच वागतात असे म्हणायची गरज नाही असे मला वाटते. उलट हेच वय आहे कान पिळायचे.
बाकी सरांनी रोहित, पंत नंतर
बाकी सरांनी रोहित, पंत नंतर वैभवला दत्तक घेतले असे दिसल्यामूळे पोटात गोळा उठला आहे
>>
अगदीच
पोस्ट त्याच टोन मधल्या येताहेत
आता चुम्मा सदृश बारसं झालं की कन्फर्म होईल
(No subject)
सर, पण यापुढे मला कोचिंगची गरजच काय ! आता माबोवर कुणीतरी मला दत्तक घेऊन सांभाळेलच ना !!!
आमच्याकडे मला लहानपणी आई
आमच्याकडे मला लहानपणी आई सूर्यवंशी बोलायची.
का ते चाणाक्ष लोकं ओळखतीलच.
उलट हेच वय आहे कान पिळायचे. >
उलट हेच वय आहे कान पिळायचे. >> तुझे कान पिळूनही तू डो डोंगर जाळलाच होतास ना ?
आता माबोवर कुणीतरी मला दत्तक घेऊन सांभाळेलच ना ! >> खरय भाऊ ! उगवत्या सूर्याला प्रणाम करण्याची अहमहिका !
परवा. मला आमच्या ह्यांनी
परवा. मला आमच्या ह्यांनी चांगला प्रश्न विचारला. वैभव कडे सचिन किंवा सुनील यांच्या येवढे टेक्निक (त्यांचा शब्द) आहे का?.
)टेक्निक त्या दोघांकडे नक्कीच नव्हते.
मी त्यांना म्हणले एकतर दोघांनीही अशी फटके बाजी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत येवढी सलग कधीच केली नाही. वैभवने 200 च्या वर स्ट्राईक रेट ने 700 च्या वर धावा काढल्या. त्यामुळे तो fluke नक्कीच नाही. आणि त्याचे हे अभूतपूर्व (correct description
पुढे जाऊन गोलंदाजांना काही उत्तर मिळाल्यास त्याचे वैभव कसे उत्तर शोधतो, टेस्ट मध्ये तो 50 च्या वर average राखू शकेल काय, त्याचा कांबळी होईल काय (im sure BCCI will ensure this doesn't happen) याची उत्तरे काळच देईल. आपण सध्या त्याच्या खेळाची मजा घेऊ.
“बाकी सरांनी रोहित, पंत नंतर
“बाकी सरांनी रोहित, पंत नंतर वैभवला दत्तक घेतले असे दिसल्यामूळे पोटात गोळा उठला आहे”
“त्याचे काही इंटरव्ह्यु मी पाहिले आहेत” - त्याचे काही इंटरव्ह्यूज मध्यंतरी सोशल मिडियावर फिरत होते, जे एआयने मॉडिफाय केलेले होते.
वैभव सुर्यवंशी बाबत कपिल
वैभव सुर्यवंशी बाबत कपिल देवने दिलेलं स्टेटमेंट बोलकं आहे - त्याला २०-२२ वर्षाचा होउद्या, मग त्याला जज करुया...
आज आयर्लंडविरुद्ध वैभव
आज आयर्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीला घेतले नाही म्हणून सोमीवर बऱ्याच चर्चा सुरू आहेत. त्याला घ्यायला हवे होते असे आपले माझे मत आहे.
वैभव सूर्यवंशीला घेतले नाही
वैभव सूर्यवंशीला घेतले नाही ह्यावरून प्रचंड वाद सुरू आहे. (इतरत्र).
तो असता तर आपण जिंकलोच असतो किंवा जिंकलो असतो असे काहीच नाही ह्या दोन्ही शक्यता आहेत.
पण अभिषेकसारखी रत्ने जो प्रकाश पाडत असतात त्या पार्श्वभूमीवर प्रयत्न करायला हरकत नव्हती असे एक आपले त्याचा पंखा म्हणून वाटले. आता अभिषेकने पहिली match गाजवली असेलही म्हणा!