TCS नाशिक

Submitted by रेव्यु on 12 April, 2026 - 00:28

मी ही बातमी वाचली व यावर विश्वास बसू शकला नाही..
कॉर्पोरेट जगात, आचार संहिता मोठ्या प्रमाणात काटेकोर पणे पाळली जाते हे मी स्वतः पाहिले आहे.
हे टी सी एस मध्ये कसे घडू शकते--- इतक्या व्यापक प्रमाणावर??
की हा खरात प्रकरणा पासून ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न असावा?
Sexual Harassment, Conversion at
@TCS
, HR official Ashwini Ashok Chainani, was taken into custody from Pune's Loola Nagar after an initial investigation established that complaints of the victims were not acted upon, and he kept dithering over the issue

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर तन से जुदा" च्या घोषणा देतात आणि अनेकदा त्या अमलात आणतात. >>
आमच्या धर्माची टिंगल करणार्याला जशास तसे उत्तर द्यायला हवे असे कुणी म्हटले तर त्याला काय प्रतिवाद? >>
साळसूदपणे न झालेल्या हिंसेचे समर्थन... सोप्या शब्दांत हिंसेला चिथावणी आहे ही. मायबोलीवर खपवून घेऊन नये. त्वरित कारवाई केली जावी.

या पुढे TCS आणि तत्सम कंपन्यांमधे नोकरी मिळण्यापूर्वी मारुती दलाचे NOC घेणे बंधनकारक राहिल. त्यांच्या कार्यालयांत टेम्प्लेट तयारच ठेवतील. संपूर्ण नाव, पत्ता आणि ( पगारा वर आधारित) शुल्क भरावे लागेल.

ज्या लगबगीने आणि उत्साहाने प्रसार केला गेला ( एका खर्‍या घटने सोबत अनेक अनेक खोटे जोडत घटना जनतेसमोर ठेवणे अशी मोडस ऑपरेंडी कुणाची आहे ?) तो बघितल्यावर अचंबित व्हायला होते. एका राजकीय कार्यकर्त्याच्या पुढाकाराने हे सर्व उघडकीला आले आहे. वेषांतर करुन ६-८ पोलीस काही दिवस काम करत होती, माहिती गोळा करत होती यातून प्रकरणाची गंभिरता दिसते.

समाजमनावर (विशेषत : मुलींच्या भविष्यावर आणि स्वातंत्र्यावर) या घटनेचे दुरगामी परिणाम होणार आहेच. मुलींच्या पालकांना सावधानतेचे WA मेसेजेस यायला सुरवात झाली आहे. मुलीं च्या हातामधे मोबाईल द्यायला हवा का? शिक्षण कुठवर द्यायला हवे ? नोकरीसाठी परवानगी द्यायला हवी का ? हे *** लोक सावज ( कुठले आणि) कसे हेरतात यावर मोठे पॅरा आहेत. शेवटी सावध रहा असा जनतेला इशारा.

<< बाय द वे एका आरोपीच्या वडिलांनी आपल्या मित्रासाठी गिफ्ट म्हणून कुठून तरी आणलेली टोपी त्याला घालतानाचा व्हिडिओ चॅनल वाले धर्मांतर की कोशीश म्हणून दाखवत आहेत. >>

----- धर्मांतर झाले याला पुरावा काय तर टोपी दिली, कुर्ता घालून आला होता किंवा रोजा पाळला हे सर्व हास्यास्पद वाटते.

आपणही रंगपंचमीला रंग लावतो, अनेकांना आवडत नाही पण लावतोच. मुस्लिमांच्या सोबती ( असला तर) हातावर प्रसादही देतो, अनेक लोक त्याचा स्विकार करतात. या देवाण घेवाणी मधे कसले आले धर्मांतर ?

आमचा सकाळचा रनिंगचा ग्रुप आहे. रनिंग नंतर तिथे ज्यूस पीत बसलो असताना चर्चा होतात.
एक म्हणाला कालचं राजीव गांधीचं भाषण पाहिलं का? मागे सगळ्या महिला बसवल्या होत्या. हे प्रतिकात्मक होतं. राहुल गांधीने मास्टरस्ट्रोक मारला. यातून आम्ही महिलांना किती महत्व देतो हे काँग्रेसने दाखवून दिलं. सगळीकडे याचं कौतुक होतंय.

आता जे भगवे होते ते म्हणाले, "तुम्हा राहुलभक्तांना अक्कल नाही. मोदीजींनी हे बिल मांडून २०२९ च्या विजयाची ग्यारण्टी मिळवली आहे. ५०% महिलांचं व्होट भाजपाला मिळणार"

तिसरा म्हणाला "निवडणूक गडबड करूनच जिंकणार, पण कारण महिलांचं देणार"

मी सगळीकडे खडूसपणाच करतो. "तिथेही इथल्याप्रमाणेच विचारलं कि ही मतं तुमची स्वतःची आहेत का? सगळीकडे कौतुक होतंय हे किती जणांना भेटून तुमचं मत बनलंय? महिला भाजपालाच मत देणार हे किती महिलांनी तुम्हाला सांगितलं?"

हे त्यांनी युट्यूब व्हिडीओवर स्वतंत्र पत्रकारांचे मत पाहून ठरवले होते. विशेष म्हणजे काही काळातच हे मत आपले स्वतःचे आहे असे वाटू लागते. हे प्रत्येकाचं होत असतं. आणि यासाठीच तर पत्रकार, मीडीया कामाला लागलेले असतात. त्यांचं हे वरचं इन्कम असतं, ज्यात काही गैर आहे असं त्यांना वाटतच नाही. पत्रकारितेचा उद्देश काय हे जर आजच्या जगात सांगितलं तर त्याला लोक हसतील.

अशी प्रकरणं यातूनच घडतात. मागच्या पिढीत पत्रकारितेची उद्दीष्टं आदर्श काय हे क्लिअर होतं. ध्येय स्वच्छ होते. आता सगळ्यात एव्हढी भेसळ आहे कि ते सांगणं हे बुरसटलेलं वाटतं. भांडवली व्यवस्थेने मेंदूचा एव्हढा ताबा घेतलाय कि किती तरी चुकीच्या धारणा या चुकीच्या आहेत हेच समजत नाही. माझ्या मते हा मूळ प्रॉब्लेम आहे. असा समाज चुकीच्या गोष्टींचा प्रचार, प्रसार होण्यासाठी आदर्श असतो.

लहान असताना मुंबईतल्या दंगली अनुभवलेल्या आहेत. सुटीत किंवा प्रसंगानुसार मुंबईला जाणं राहणं व्हायचं. चार वेळा दंगली झाल्या होत्या. एक थोडी दूर झालेली भिवंडीला. पण तिचे पडसाद जवळच्या वस्तीत उमटले होते.

या दंगलींदरम्यान अफवा कशा पसरायच्या हे जवळून पाहिले आहे. त्या वेळी या अफवा आहे हे समजत नव्हतं कारण वय नव्हतं. पण मोठ्यांनाही समजत नव्हतं. लहान मुलाची जीभ कापली, डोळा काढला अशा अफवांना जोर येई. या अफवा पसरवणारे कधीही समोर आले नाहीत. पण या अफवांमुळे दंगल पेटत असे. हे म्हणजे विझत आलेल्या आगीत पेट्रोल टाकण्याचा प्रकार असायचा.

आज या कुजयाज मीडीयाची जागा व्हॉटस अ‍ॅपने घेतली आहे. युट्यूबवर इतके थेट भडकपणा असलेले मेसेजेस नसले तरी पेट्रोल असतंच त्यात. आज त्यामुळे घरबसल्या अफवा क्षणात पूर्वीपेक्षा लाख पटीने वेगाने प्रवास करत असली तरीही पोलिसांनी जर ठरवल तर व्हॉटस अ‍ॅप वर मूळ मेसेजकर्ता शोधून काढणे अवघड नाही. खरं तर दोन टिक पण त्यासाठीच येत असतात. तरीही अफवा पसरवणारे पोलिसांना कधी सापडत नाहीत. पूर्वी ठीक होतं कि डिजिटल फूटप्रिंटस नव्हत्या. लिखित स्वरूपात अफवा नव्हत्या. त्या ही वेळी जर पोलिसांनी ठरवलं तर मास्टरमाईण्ड सापडत होते. आज सापडत नाहीत याचा अर्थ स्पष्ट आहे.

लोक वेबसाईटवर इतके बिनधास्त अफवा खरीच आहे असे लिहीतात तेव्हां यांना पोलिसांची भीती कशी वाटत नाही हा प्रश्न पडतो. लिहा कि, पण थोडी तरी पडताळणी करावी ना. काही बेसिक प्रश्न स्वतःला पडले पाहीजेत. परदेशात बसून अफवा पसरवल्या तरीही पोलिसांची इच्छाशक्ती असेल तर मानगूट पकडून आणता येऊ शकते.

पोलिसांची इच्छाशक्ती असती तर प्रकरणं इतकी दीर्घकाळ चिघळली नसती. लोकांनाही त्याचं काहीच वाटत नाही.
काही जण तर इतके इनसेन्सिट्व्ह आहेत कि माझ्या गाड्या चालवण्याने पर्यावरणाचा नाश झाला तर मी का चिंता करू? पुढची पिढी बघेल असे म्हणतात. असाच विचार केला तर या माणसाच्या घराबाहेर लोकांनी गाड्या सकाळपासून रात्रीपर्यंत का चालू ठेवू नयेत? इथेच आवाजाचे प्रदूषण का करू नये? इतके इनसेन्स्टिव्ह वागता, हाच आदर्श सर्वांनी घेतला तर जग २५ वर्षांनी नष्ट व्हायचे ते २५ दिवसात होईल. पर्यावरण नष्ट झाले तर कुणाला काही फरक पडत नाही. मानवजात पण नष्ट होईल. मग हजारो वर्षांनी पुन्हा जीवन आकाराला येईल. बरंच होईल. त्या वेळी लक्झरीचा शोध लागू नये म्हणजे प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार राहील.

आज माणसांची संख्याच इतकी वाढलीय कि द्वेष आपोआपच वाढला आहे. कुठलीही गोष्ट अती झाली कि तिच्यासोबत ती नष्ट करण्यासाठी बिल्टइन टॉक्झिक मेकॅनिझम घेऊन येते. द्वेष आणि हिंसा हे ते मेकॅनिजम आहे.

या घटना फक्त निमित्त आहे.
हे भाषण संपवून खाली बसतो. जयहिंद!

जर ७८ इमेल्स ही बातमी खोटी असेल तरीही आमच्या रेकॉड्स आणि सिस्टमच्या प्राथमिक तापसणी नुसार या एफआयआरशी रिलेटेड कसल्या तक्रारी आढळल्या नाही असे सांगताना तोंडी तक्रारींचे काय याबद्दल सुद्धा खुलासा यायला हवा. >>> मानव, सहमत.

गेल्या काही वर्षांत हिंदुत्त्ववादी संघटना आणि मिडिया ने अनेक केसेस मधे लांडगा आला रे सारखे केलेले आहे. पण तो नॉइज बाजूला केला तरी काहीतरी असावे अशी शंका नक्की आहे.

यात कायद्याने गुन्हा नसलेल्या गोष्टींच्या बाबतीत कोणाही निरपराध व्यक्तीला कायद्याने गुन्हेगार ठरवू नये (कंपनीच्या नियमांचा भंग पण कायद्याने गुन्हा ठरेल इतका त्रास नाही, इतकेच असेल तर त्याचे काय करायचे हे कंपनीवर अवलंबून आहे). त्यांचा धर्म काहीही असो. तेव्हा यातले आरोपी सगळे दोषी आहेत असा निर्वाळा देण्याइतकी माहिती - पुरावा- अजून उपलब्ध नाही. पण यात काहीच नाही आणि सगळा होक्स आहे असा निर्वाळा देण्याइतकीही माहिती क्लिअर नाही. तो देण्याची घाई होत आहे. तसे असेल तर चित्र काही दिवसांत स्पष्ट होईलच.

कंपनीने अजून यातून स्वतःला वेगळे केलेले नाही हे एक आश्चर्य आहे. कंपन्यांचे वकील कंपन्यांचे हित पाह्तात. कामगारांचे नाही. हे जितके दिवस चालेल तितकी कंपनी यात गोवली जाते, बदनाम होते. म्हणून हे लोक पहिले दोन्ही गोष्टी वेगळ्या करायचा प्रयत्न करतात. जर कंपनीला खात्री असेल की कामगारांनी काही चूक केलेली नाही तर ते त्यांच्यामागे उभे राहतील पण इथे ते ही केलेले नाही. एखाद्या स्थानिक संघटनेच्या दबावाखाली करण्याइतकी टाटा कंपनी लहान नाही. अशा गोष्टी बर्‍याच वरच्या लेव्हलला मॅनेज होउन कंपनीला आत्तापर्यंत यातून मोकळे केले गेले असते.

तेव्हा सध्या फक्त काहीतरी शंकास्पद आहे, इतकेच ठामपणे सांगता येते. मिडियामधे बरीच बकवास आहे, पण ते सगळे पोलिसांच्या अधिकृत आरोपांत नाही. पोलिसांनी केलेले आरोप फ्रिव्होलस वाटत नाहीत. त्यामुळे त्यांनी पेरलेल्या महिला पोलिसांनी जे रिपोर्ट केले ते ही इतक्या सहज डिसमिस होण्यासारखे नाही.

एक तरुण आणि एक तरुणी ह्यांच्या मध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले तर...
आणि जर तरुण मुस्लीम असेल तर आपण म्हणायचे
"दया, कुछ तो गडबड है. काहीतरी शंकास्पद आहे."

त्या तरूणाचे ऑलरेडी लग्न झाले आहे. तिला त्याची कल्पना होती की नाही हे क्लिअर नाही. तो कंपनीत तिच्यापेक्षा वरच्या पदावर आहे. तिने आरोप केला आहे. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. कंपनीने नाकारलेले नाही.

यातून "सिद्ध" काहीच होत नाही. पण शंकेलासुद्धा जागा नसावी? "पोलिस नाय तर काय चोर आहे?" आठवले.

Now you are clutching at straws.
नाशिक सारख्या गावात एखाद्या तरुणाला आपले लग्न झालेले आहे हे कंपनी कलीग पासून लपवणे अशक्य आहे.
एकवेळ ते खरे आहे असे मानले तरी यावरून इतका सारा ड्रामा करणे योग्य आहे ?

आपल्यासारख्या पांढरपेशा लोकांचा पोलिस यंत्रणेशी परिचय नसतो किंवा पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी आलेल्याला चिरिमीरी देणे, DUI मध्ये अडकलेले 'लायसन' पोलिस स्टेशन मधून सोडवून आणणे इतपतच असतो, त्यामुळे 'एफ आय आर मध्ये आहे म्हणजे काहीतरी तथ्य असेल', 'कमिशनर लेव्हल च्या अधिकार्‍याने स्टेटमेंट दिले आहे म्हणजे खरेच असेल' अशी भावना असते. ती खरी नाही याची अनेक उदाहरणे देऊ शकेन, पण विषयांतर होईल.

>>
आमच्या धर्माची टिंगल करणार्याला जशास तसे उत्तर द्यायला हवे असे कुणी म्हटले तर त्याला काय प्रतिवाद? >>
साळसूदपणे न झालेल्या हिंसेचे समर्थन... सोप्या शब्दांत हिंसेला चिथावणी आहे ही. मायबोलीवर खपवून घेऊन नये. त्वरित कारवाई केली जावी.
<<
मायबोली म्हणजे कॅनडा नाही. विचार आवडला नाही तर बंदी घाला असले कॅन्सल कल्चर इथे नाही.
चिथावणी वगैरे काही नाही. जो धर्म आपल्या धर्मावरील टीका सहन करत नाही त्या धर्माचे अनुयायी टी सी एसच्या ऑफिसात दुसर्‍या धर्माची टिंगल कशी करू शकतात असा माझा प्रश्न आहे. उत्तर साफ आहे. त्यांच्या लेखी इस्लाम सोडून अन्य धर्म कमी दर्जाचे आहेत. इस्लामवरील टीकेवर जहाल उत्तर मिळते कारण इस्लाम हा धर्मांतला सर्वश्रेष्ठ आहे आणि बाकी धर्मांना तो "मान" मिळू शकत नाही.

आता असे पहा.
तरुण हिंदू तरुणी हिंदू.
इतने बडे देश मे ऐसी छोटी मोठी चीजे चलती रहती है. गुगल वर रेप ची आकडेवारी पहा.
तरुण हिंदू तरुणी मुस्लीम, व्वा छानच कि . कुणाची आठवण येते आहे?
तरुण मुस्लीम तरुणी मुस्लीम, ये s@@ली कौम ही ऐसी है.
तरुण मुस्लीम तरुणी हिंदू .
जिहाद .
मायबोलीवर धागा!
कपडे फाडके बाल नोचके . डान्स
See how selective we are!

शंका कोणत्या प्रकारात घ्यावी याचं भान सुटायला नको.
जिथे एखाद्या पीडीता/तेची तक्रार घेत नाहीयेत, त्यांच्या मागे कुणीही नाही, सत्तेत कुणी नाही आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल जनमत बनलेलं नाही, मीडीया मदत करत नाही, सगळे आरोपींच्या बाजूने आहेत, तिथे विवेकी लोकांनी शंका घ्यायला हरकत नाही.

जिथे एकच बाज सगळीकडून ठणाणा करतेय आणि त्यातल्या अनेक गोष्टी तर्काच्या जोरावर खर्‍या वाटत नाहीत. एका पद्धतशीर कँपेनचा पॅटर्न वाटाव्या अशा आहेत, अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नसणे आणि मागचा इतिहास काहीच सिद्ध होण्याचा नसेल.

अशा वेळी शंका कुठल्या बाजूने घ्यावी. मायबोली म्हणजे कोर्ट नाही. इथे प्रचारक मंडळी थंड पडली म्हणजे न्याय झाला असं नाही. आरोप करणारे स्ट्राँग आहेत. ज्यांच्यावर आरोप आहेत ते मायबोलीवर त्यांची बाजू मांडल्याने निर्दोष सुटले/ सुटतील असं होणार नाही. उलट निर्दोष असलेच तर मालेगाव खटल्याप्रमाणे किती काळ आत सडतील याची खात्री नाही.

यापूर्वी कन्हैय्या, चंद्रशेखर आझाद, पुणे पोलिसांनी उभी केलेली भीमा कोरेगावची बनावट केस यातले काहीही सिद्ध झालेले नाही.

याउलट उन्नाव, कथुआ, हाथरस यासारख्या गुन्ह्यात आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही. कथुआमधल्या बालिकेच्या आरोपींना मुक्त करा म्हणून मोर्चा काढलेल्या भाजपच्या आमदाराला लाल सिंह याला नंतर काँग्रेसने तिकीटही दिलं. इथे आरोपी कोणत्या धर्माचे जातीचे होते ते बघून त्यांना दहशतवादी लेबल लावले होते का?

नाशिक सारख्या गावात एखाद्या तरुणाला आपले लग्न झालेले आहे हे कंपनी कलीग पासून लपवणे अशक्य आहे.>>> विकु मी मुळची नाशिककर आहे, तुम्ही या आधी पण १-२ वेळा नाशिक हे छोट गाव असल्यासारखा उल्लेख केलात,
बहुधा तुम्हाला नाशिक एकिवरित्या माहिती असावे आणी तुम्ही कधिच व्हिजिट केलेले नसावे.
फॉर युवर काइन्ड इन्फॉरमेशन नाशिक हे गाव, तालुका नसुन जिल्हा आहे आनी बराच मोठा जिल्हा आहे.सध्याच पॉप्युलेशन २ मिलियन इतक...१०.१२ हजाराची वस्ती नाही की कलिगच्या घरात काय शिजतय हे माहित असायला.
त्यातही कळण तस कठिणच आहे.
कन्पनी कलिग पासुन काय लपवता येवु शकते याचा शहराशी तसाही सबध नाही.

they know each other from college days…. असे कदमांच्या व्हिडिओ मधे आहे.

चार दिवस लपवणे शक्य आहे.

ओह येस ! प्रशान्त कदम का? मग ठिक आहे...सर्वद्य आहेत ते!! तसे सर्वच मराठी पत्रकार फार म्हणजे फार हुशार हो !!

>>
नाशिक सारख्या गावात एखाद्या तरुणाला आपले लग्न झालेले आहे हे कंपनी कलीग पासून लपवणे अशक्य आहे.>>> विकु मी मुळची नाशिककर आहे, तुम्ही या आधी पण १-२ वेळा नाशिक हे छोट गाव असल्यासारखा उल्लेख केलात,
<<
ह्याला अनुमोदन. नाशिक हे काही खेडे नाही. ते तसे कधीच नव्हते. आणि गेल्या २५-३० वर्षात प्रचंड वाढलेले आहे. महानगर. बनले आहे.

See how selective we are! >>> say that to those that are selective. तुम्ही माझ्या पोस्टनंतर जे लिहीले आहे त्याला मी उत्तर दिले आहे. आणि मी कधी जिहाद बिहाद म्हणालो? दुसरे कोणी म्हणतात म्हणून आपण शंकाही घेऊ नये?

विकु, पोलिसांनी आरोप केलेत, बीपीओ मधे हे सर्रास चालते हे सर्वज्ञात आहे. अशा वेळी केवळ "शंका" उपस्थित केली आहे मी.

त्यामुळे 'एफ आय आर मध्ये आहे म्हणजे काहीतरी तथ्य असेल', >>> आरोपपत्र आहे आणि त्याला पूरक माहिती आहे. दोन्ही आहे. लोकसत्ताच्या बातमी एका तक्रारीतील डिटेलिंग वाचा. ही महिला वेगळी आहे. मूळची ती अफेअर वाली नाही.

अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नसणे आणि मागचा इतिहास काहीच सिद्ध होण्याचा नसेल. >>> हे बरोबर आहे. पण म्हणूनच मी त्यांना लगेच दोषी धरत नाहीये. पण सध्याच्या माहितीवर हे पूर्ण डिसमिस करण्याइतकेही साधे वाटत नाही, इतकेच मत आहे.

अणि तर्काच्या जोरावर यातल्या गोष्टी खर्‍या वाटत नाहीत याबाबत असहमती आहे. सगळ्या गोष्टी मला तशा वाटत नाहीत.

माझा अ‍ॅप्रोच साधा आहे. उपलब्ध माहिती वरून सध्याचे मत बनवायचे. वेगळी माहिती मिळाली तर बद्लायचे. अशा इतर उदाहरणांमधे जो काही नॉइज होतो, मिडिया ट्रायल्स होतात म्हणून प्रत्येक गोष्ट निकालात काढायची नाही. आणि इथे उपलब्ध माहिती म्हणजे आक्रस्ताळी क्लिप्स नव्हे. द हिंदू सारख्या साइटस आहेत, दुसरी बाजू दाखवणारे ओपिनियन पीस सगळेच आले.

बाबांच्या सरकारी नोकरीमुळे बालपणी काही वर्षे नाशिकलाच होतो, प्रॉपर तांबट आळी, डिंगर आळी, रविवार कारंजा वगैरे. आजही नाशिकलाच बहिण असल्याने अधून मधून जातोही. आजचे नाशिक फार मोठे आहे हे मान्य. मला असे म्हणायचे होते की परगावातून एखादा विवाहित माणूस मुंबईत एकटाच आला व आपले लग्न लपवून त्याने अफेअर केले तर ते विश्वसनीय आहे. नाशिक मध्येच लहानाचा मोठा झालेल्या माणसाला आपले लग्न लपवणे अशक्य आहे.

फा, वाचले ते डिटेलिंग. काकोडकरांची कादंबरी वाचतोय की काय असे वाटले. आज तरी हे फक्त पीडेतेचे डिटेलिंग आहे.

बीफ बद्दल थोडेसे, या बातमीच्या सुरुवातीच्या hysteria मध्ये बीफ खायची सक्ती केली वगैरे होते. नाशिक मध्येच एक लिंचिंग झाले आहे, विधानसभा अध्यक्षांनी नाशिक पोलिसांना गोरक्षकांवर गुन्हे दाखल करू नयेत अशी तंबीही दिलेली आहे. एखाद्याच्या डब्यात वा फ्रीज मध्ये बीफ सापडले तर त्याचे लिंचिंग होऊन वर त्याच्यावरच एफ आय आर होतो. अशा स्थितीत बीफ खायची सक्ती होत होती आणी इतकी वर्षे / महिने कुण्णा कुण्णालाच कळले नाही ?

मग मीही फक्त आरोपच म्हणतोय की. मी कोठे म्हणतोय की ते सगळे दोषीच आहेत म्हणून. पण त्यातले डिटेलिंग आहे ते अशा ठिकाणी काम करणार्‍यांनाच माहीत असू शकते. इतर पब्लिकला असले काही माहीत नसेल.

परगातून एखादा विवाहित माणूस मुंबईत एकटाच आला व आपले लग्न लपवून त्याने अफेअर केले तर ते विश्वसनीय आहे. नाशिक मध्येच लहानाचा मोठा झालेल्या माणसाला आपले लग्न लपवणे अशक्य आहे.>>>काहीही बोलताय! मी जन्मापासून नाशिकलाच वाढले पन्चवटीत राहिलेय म्हणजे मला कॉलेज रोड ला, नाशिक रोडला ,देवळालीला अगदी रविवार पेठेत लहानच मोठ झालेल्या व्यक्तीविषयी सगळ कस माहिती असेल्? तुमच लॉजिक पुर्णपणे गन्डलय !
एका विशिष्ठ समाजाला धर्माची पाठराखण करायला आपण विक्टिम ब्लेमिन्ग करतोय हेही तुमच्या लक्षात येवू नये?

नाशिकमधे बिफ मिळते ? ( Maharashtra Animal Prevention Act नुसार) बंदी आहे ना ?

बिफ थाप नाही पचली तर मग चिकन किंवा बफेलो असेल का ? एक शंका.
खोटेपणा किती पेरायचा याला काही सिमा राहिली नाही.
त्या मुलीवर अन्याय झाला आहे, तिची फसवणूक झाली आहे हे सत्य. आता या परिस्थितीचा फायदा घेत ( आणि आरोपी मुस्लीम आहे तर ) अजून दहा असत्य गोष्टींची पेरणी करुन दावा/ प्रतिदावा धुराळा उडवायचा.

>>नाशिकमधे बिफ मिळते ? ( Maharashtra Animal Prevention Act नुसार) बंदी आहे ना ?
बिफ थाप नाही पचली तर मग चिकन किंवा बफेलो असेल का ? एक शंका.
<<
पुरेशी माहिती न घेता दावे करू नयेत. महाराष्ट्रात गाईची, बैलाची कत्तल करून बीफ विकायला बंदी आहे. पण अन्य राज्यातून बीफ आणून ते कुणी खाल्ले किंवा खायला घातले तर ते बेकायदा नाही. मुंबई उच्च न्यायालयाने तसा निर्णय दिलेला आहे.

नाशिक मोठे शहर आहे. पीडिता- आरोपी यांची किमान चार वर्षांपासून , कॉलेज दिवसांपासून ओळख आहे. एकाच ऑफिसमधे काम करत आहेत. जवळीक पण आहे. सर्व माहित असायलाच हवे असे नाही पण जवळच्या कलिग बद्दल थोडी माहिती असतेच. TCS विश्व एव्हढे मोठेही नाही कि ज्याच्यासोबत सलगी करत आहोत त्याच्या विषयी काहीच माहिती नसावी.

नाशिक TCS मधली पीडिता दोन वेळा फसवली गेली आहे. पहिल्यांदा आरोपी कडून आणि आता तिच्या या असहाय परिस्थितीचा फायदा घेत आपला अजेंडा पुढे नेणारा लब्बाड राजकीय पक्ष. येथे victim बद्दल काळजी नाहीच्च आहे. केवळ तिचा वापर होत आहे. उद्देश धर्माला झोडपणे हा आहे.

आरोपी मुस्लीम नसता ( ठाकूर किंवा सिंगर किंवा बृजभूषण किंवा.... ) तर कळवळा नावालाही दिसला नसता.

<< >नाशिकमधे बिफ मिळते ? ( Maharashtra Animal Prevention Act नुसार) बंदी आहे ना ?
बिफ थाप नाही पचली तर मग चिकन किंवा बफेलो असेल का ? एक शंका.
<<
पुरेशी माहिती न घेता दावे करू नयेत. महाराष्ट्रात गाईची, बैलाची कत्तल करून बीफ विकायला बंदी आहे. पण अन्य राज्यातून बीफ आणून ते कुणी खाल्ले किंवा खायला घातले तर ते बेकायदा नाही. मुंबई उच्च न्यायालयाने तसा निर्णय दिलेला आहे. >>

----- कुठल्या राज्यांतून महाराष्ट्रात बिफ आणता येते ? वाहतूक करण्याची परवानगी आहे का?

गोवा, दादरा नगर हवेली, केरळ ह्या ठिकाणाहून बीफ आणणे सहज शक्य आहे. व्यापारासाठी नसून वैयक्तिक खाण्यासाठी आणले आहे असे सांगितले तर त्यात काही बेकायदेशीर नाही. तसेही बाहेरून महाराष्ट्रात येणार्या प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी होत असेल असे वाटत नाही.

>>
आरोपी मुस्लीम नसता ( ठाकूर किंवा सिंगर किंवा बृजभूषण किंवा.... ) तर कळवळा नावालाही दिसला नसता.
<<
आरोपी मुस्लिम नसता तर त्याचे आधीच एक लग्न झालेले असणे, रमझानचे रोझे पाळायला लावणे, जबरदस्तीने देवळात जाण्यापासून परावृत्त करणे वगैरे प्रकार झाले नसते.

Pages