TCS नाशिक

Submitted by रेव्यु on 12 April, 2026 - 00:28

मी ही बातमी वाचली व यावर विश्वास बसू शकला नाही..
कॉर्पोरेट जगात, आचार संहिता मोठ्या प्रमाणात काटेकोर पणे पाळली जाते हे मी स्वतः पाहिले आहे.
हे टी सी एस मध्ये कसे घडू शकते--- इतक्या व्यापक प्रमाणावर??
की हा खरात प्रकरणा पासून ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न असावा?
Sexual Harassment, Conversion at
@TCS
, HR official Ashwini Ashok Chainani, was taken into custody from Pune's Loola Nagar after an initial investigation established that complaints of the victims were not acted upon, and he kept dithering over the issue

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे लोक्स डिनायल मोड मधे आहेत वा वाळुत डोके खुपसुन घेत आहेत त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे कि केवळ जो चाललाय तो प्रोपगंडा आहे हे सिद्ध करायला तुम्ही तुमच्या घरातल्या तरुण मुलीला अश्या ठिकाणी काम करण्यास पाठवाल का? आताच अजुन एक बातमी आली आणि त्यानुसार गोरेगावच्या एका आय.टी कंपनीतही असे मिनि पाकिस्तान तयार झाले आहे.तर अश्या कंपन्यात तुम्ही तुमच्या पोरिबाळिंना पाठवु शकाल का? अजुनच जनरायलेशन करायचे झाले तर अमुक अमुक कंपनीत/दुकानात साधारण ६०-७० टक्के स्टाफ हा शांतीप्रिय धर्माचा आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि जो उरलेला ३०-४० स्टाफ हिंदु वा तत्सम धर्मीयांचा आहे पण ह्या सर्व महिला आहेत तेव्हा तिथे तुम्ही तुमच्या मुलीला/नातीला जॉब लागला तर काय सल्ला द्याल?

भारतीय लोकांना मुद्दाम खिजवायला शांतीप्रिय आणि मिनी पाकिस्तान म्हणून संबोधण्याचा तीव्र निषेध!
बाकी उत्तर हवं असेल तर तीन ही प्रश्नांची उत्तरे हो हो आणि हो आहेत.

मला आलेला तो मेसेज आता सापडत नाही. पण तो वाचल्या वाचल्या हे कुभांड असावं असं वाटलं. बातम्या माहीत नव्हत्या. पण मी हा असा संशय बोलून दाख्वल्याने जर पीडीता खरंच अन्यायग्रस्त असेल तर तिच्यावर माझ्याकडून अन्याय होतो का? तर हो.

मला या प्रकरणात आतल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे का? - अजिबात नाही.

मग मी या प्रकरणावर बोलावं का? अजिबात नाही.

पण जे लोक यात उड्या मारताहेत त्यांचं रेकॉर्ड वाईट आहे, त्यांनी हे प्रकरण शिजवलंच नसेल अशी बिल्कुल खात्री वाटत नाही. हे सांगण्याने मी कुणावर अन्याय करत नाही याची खात्री आहे. या मंडळींचे सतत स्त्री विरोधी मेसेजेस वाचून वैताग आला आहे. कुठल्याही प्रकरणात बातमी आली कि हे स्त्री ला दोष देऊन मोकळे होत असतात. त्यांना ही उपरती का झाली? हा कळीचा प्रश्न आहे.

हे लोक बाजूला राहीले तर या प्रकरणाकडे स्वच्छ नजरेने पाहता येईल. आरोपी कुणीही असो, निष्पक्षपाती चौकशी होऊन गुन्हा उघडकीस आला पाहीजे आणि कडक शिक्षा झाली पाहीजे.

हाच न्याय कोथरूड पोलीस स्टेशन मधे मुलींना मारझोड झाली तिथेही लागला पाहीजे. त्या प्रकरणाकडे याच मंडळींनी कसे पाहीले? अशा अनेक केसेस मंडळींना माहीतही नसतात. असो. हे व्हॉटबाऊटरी होईल. पण इलाज नाही. न्याय प्रत्येकाला मिळायला हवा. नाहीतर विश्वास उडतो.

या केसमध्ये धर्माचा अँगल नसता आणि निव्वळ sexual harrasment case असती तर धाग्यावरील सर्वांची मते जवळपास एकाच पानावर असती! वाद न होता चर्चा झाली असती.

धर्म आल्याने sexual harrasment हा विषय बॅकफुटवर गेला आहे

>>एप्स्टिन फाईल्सबद्दल एप्स्टिन फाईलच्या धाग्यावर बोला. कठीण जातंय का इतकी सोपी गोष्ट समजायला?<< Happy
हेविलि रिडॅक्टेड एप्स्टिन फाइलची "खोदा पहाड, निकला चूहा" अशी परिस्थिती आहे. तिचा वारंवार उल्लेख करुन कोणाला आनंद/गुदगुल्या होत असतील तर त्यांचा आनंद हिराउन घेउ नका..

टिसिएस मधलं हे कांड नाशिकच्या पुलिस फोर्सने एक कोवर्ट ऑपरेशन करुन उघडकिस आणलं. हा सुद्धा एक जुमला आहे असं इथल्या सेकुलर विद्वानांचं म्हणणं आहे काय?..

>> एप्स्टिन फाइलची "खोदा पहाड, निकला चूहा" अशी परिस्थिती आहे.>>
किती ती वकिलपत्र घ्यायची घाई?
सिलेक्टिव संवेदनशिलता-न्यायप्रिय वगैरे यालाच म्हणावे का? अर्थात नवल अजिबातच वाटत नाही.

>>जनरायलेशन करायचे झाले तर अमुक अमुक कंपनीत/दुकानात साधारण ६०-७० टक्के स्टाफ हा शांतीप्रिय धर्माचा आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि जो उरलेला ३०-४० स्टाफ हिंदु वा तत्सम धर्मीयांचा आहे पण ह्या सर्व महिला आहेत तेव्हा तिथे तुम्ही तुमच्या मुलीला/नातीला जॉब लागला तर काय सल्ला द्याल?>> अशाच ठिकाणी का कुठेही जॉब लागला तर सल्ला समानच हवा. सेक्शुअल हॅरॅसमेंट काय किंवा ग्रुमिंग काय ही काही एकाच धर्माची मक्तेदारी नाही.

हैद्राबादमध्येही कार्पोरेट जिहाद आणि गोरेगाव मध्येही हे इथे आलंय.
नाशिक टीसीएस केस बद्दल पोलीस याबद्दल काय म्हणालेत:

We have not found an organised conspiracy or the accused acting on someone else’s instructions to carry out conversions,” Mitke said. “Tausif, after undertaking a religious visit two years ago, became religious and influenced the other accused, who then influenced others still. It was their own religious zeal that led them to influence those working around them. There was no external factor or conspiracy driving them.”
स्रोत इंडियन एक्स्प्रेस. हे आजच्या TOI मध्येही आलंय.

केस पुढे कशी उलगडत जाते पहावे.

'कोवर्ट ऑपरेशन' वगैरे वाचून टॉम क्रूझ च्या मिशन इंपॉसिबल ची आठवण झाली.

असो, वरील इंडियन एक्सप्रेस ची बातमी वाचून माझा initial skepticism justified होता असे दिसते !

>>केस पुढे कशी उलगडत जाते पहावे.<< +१
इथे क्लीन चीट ध्यायची घाई बघुन धन्य झालो..

एप्स्टिन फाइल्स - अ‍ॅम आय मिसिंग समथिंग? इंपिचमेंट आणि बाय्डनच्या कारकिर्दित झालेल्या विचहंटचा विसर पडलेला दिसतोय.. चालायचंच, पब्लिक मेमरी (एस्पेशियली वोक) इज शॉर्ट-लिव्ड...

रिलेशनशिप इश्यू आहे अस म्हणत आहेत हे. >> वा वा. छान. प्रशांत कदम म्हणतायत म्हणजे काय प्रश्नच नाही.

भारतीय अर्थव्यवस्था डेड झाली आहे यावरून लोकांचं लक्ष हटवायला मोदी शहांनीच हे घडवून आणलं असणार.

प्रशांत कदम यांनी इंडीयन एक्सप्रेसचा हवाला दिला आहे.

काही तासातच इंडीयन एक्सप्रेसला मुस्लीम देशांतून होणारं फंडींग . इराणच्या बाजूने असलेला त्यांचा कल, तसे लेख याचा एक लेखाजोखा प्रसिद्ध होईल. तो काही काळ प्रकाशात राहील. मग काही काळाने पुन्हा इंडीयन एक्सप्रेस देशप्रेमी असल्याचा निर्वाळा येईल.

एपस्टिन फाईल्स आणि इराण वॉर यांच्यावरून लक्ष हटवायला अमेरिकेने रचलेला हा बनाव आहे, अशी एक थिअरी सुशांत कदम यांच्या "लव्ह जिहाद- एक अमेरिकन बागुलबुवा" या लेखात वाचली.

त्या लेखामुळे अमेरिकन देशभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून सुशांत कदम यांच्या विरूद्ध एन आय ए ने कारवाई केली.
असे स्वप्न थोरोबांना पडले.

प्रशांत कदमांची विश्वासार्हता विभोर आनंद, आर्णब, नविका वगैरेंपेक्षा नकी जास्त आहे.
असो, हे प्रकरण माझ्या अंदाजाप्रमाणेच 'खोदा पहाड निकला चूहा' निघाले आहे.
मोदीभक्तांकडून अपेक्षाच नाहीत पण इतर अनेक सेन्सिबल लोकही या होक्स्ला बळी पडले हे पाहून आश्चर्य वाटले.
आता ते बीपीओ पुण्याला नेण्याचा कंपनीचा विचार आहे म्हणे, एका विबासं मुळे शंभर जणांची नोकरी गेली हे गिनेज बूक मध्ये जायला हवे.

टीप : आपले लग्न झाले आहे हे एखाद्या पुरुषाने कंपनीतल्या कलीग पासून लपवून ठेवणे हे मुंबईत कदाचित शक्य आहे, नाशिक मध्ये अशक्य आहे.

इतर अनेक सेन्सिबल लोकही या होक्स्ला बळी पडले हे पाहून आश्चर्य वाटले. >> सेन्सिबल च्या यादीत येण्याचा कुठलाही विचार नाही.
पण जिथे आपल्याला पडताळणी शक्य नाही आणि पोलीसांनी कारवाई सुरू केली आहे तिथे काठावर शांत बसने श्रेयस्कर असते. हे पहिले प्रकरण नाही आणि अंतिमही नाही.

कोथरूड पोलिसांनी काही मुलींच्या घरात घुसून चौकशी केली होती तेव्हांही पोलिसांच्या या प्रो अ‍ॅक्टिव्ह कार्यक्षमतेचे आश्चर्यच वाटले होते. इथे तर अंडकवर ऑपरेशनसाठी एव्हढे पोलीस कामाला लागले. इतर केसेस मधे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. हाथरसचे प्रकरण आहेच.
त्यामुळे लोकांना अंदाज असतो. फक्त आता दर वेळी बोलून दाखवलेच पाहीजे असे वाटत नाही. कारण मग अशा ( हाथरस, खैरलांजी, कथुआ इत्याडी) प्रकरणात उदासीन असणार्‍यांना गळे काढण्याची संधी मिळते.

ह्या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण तक्रारी/नऊ गुन्हे दाखल झालेत तर आठ लोकांना अटक झालेली आहे.

हे प्रकरण माझ्या अंदाजाप्रमाणेच 'खोदा पहाड निकला चूहा' निघाले आहे.
मोदीभक्तांकडून अपेक्षाच नाहीत पण इतर अनेक सेन्सिबल लोकही या होक्स्ला बळी पडले हे पाहून आश्चर्य वाटले. >>> हे काय / कशावरून ? नविन काही अपडेट आल्या आहेत का?

विकुंना आतली बातमी कळली असणार की हे सगळं खोटं आहे आणि असं काही होतच नाही कारण न्यूज्मध्ये असं काही डिक्लेअर केलेलं नाहीये.
हे असं काही ना काही होतंच रहाणार. बायकांनीच जागरुक रहाण्याची आणि आजूबाजूला काय चाललंय हे लक्षात घेऊन वागण्याची गरज आहे असं मला वाटतंय.

BPO मध्ये कामाचा अनुभव नाही. पण मी काम केलेल्या किमान २ कंपन्यांमध्ये काही मोड्यूल्ससाठी BPO होते. ट्रेनिंगसाठी आणि ऑफिस बसमध्ये एकत्र येणे व्हायचे त्यावरून सांगते आहे.

साध्या ग्रॅज्युएट्ससाठी अव्हेलेबल असलेल्या नोकऱ्यांपेक्षा BPO मध्ये पगार बरे असले, ऑफिस AC असले आणि इतर काही फॅसिलिटीज (कँटीन वगैरे) बरे असले तरी BPO मध्ये काम करणारी मुले मुली उच्चशिक्षित नसतात, अत्यंत सुस्थित घरातली नसतात. विशेषतः सुस्थित घरातल्या मुली इथे कामाला नसतात. कारण शिफ्टमध्ये काम. थोडक्यात या जॉबमध्ये काम करणाऱ्यांकडे फारसे आर्थिक सेफ्टी नेट नसते.

ठराविक वेळेला लॉगिन, तुमच्या पुढच्या शिफ्टची मुलगा मुलगी आल्याशिवाय डेस्क सोडता न येणे, ठराविक मिनिटांचा बाथरूम, लंच ब्रेक असणे आणि त्यानंतर लॉगिन केले नाही तर तेवढ्या मिनिटांनी शिफ्ट वाढणे, परिणामी घरी जायचा ड्रॉप मिस होणे याचे खूप प्रेशर असते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये टीम लीडरचे सहकार्य मोलाचे असते.
IT किंवा इतर ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना अमुक मिनिटांचा बाथरूम ब्रेक वगैरे वाचून धक्का बसेल. पण एका वेळी त्या त्या शिफ्टला अमुक इतकी माणसे लॉगिन दिसलीच पाहिजेत वगैरे टीम लीडरचे KRA असतात. थोडक्यात काहीशी व्हल्नरेबल आर्थिक पार्श्वभूमी आणि टीम लीडरकडे सिग्निफिकंट अधिकार हे २ पॅरामीटर (धर्म बाजूला ठेवला तरी) शोषणासाठी पुरेसे आहेत.

ज्या कंपन्यात मी काम केले तिथे POSH आणि HR खूप स्ट्रॉंग होते. पण एखाद्या कंपनीत HR जर तुमच्या आरोपांकडे दुर्लक्ष्य करत असेल तर मात्र शोषण होऊच शकते. TCS सारख्या कंपनीमध्ये ३६० डिग्री अप्रेजल्स, स्किप लेव्हल मिटींग्स, मिड सिनिअर रोल मधल्या मुलांच्या वन ओव्हर मॅनेजर मिटींग्स का झाल्या नाहीत हा खरा प्रश्न आहे. यातली कुठलीही एक गोष्ट रेग्युलर होत असती तर हे प्रकार उघडकीला यायला फार तर ६ महिने लागले असते. जनरली सिनिअर मॅनेजमेंट वेगळ्या शहरात असेल तर ६ महिन्यांनी त्यांनी त्यांच्या हाताखाली असलेल्या प्रत्येक ऑफिसला भेट देणे व ऑफिशिअली सगळ्या एम्प्लॉयीजशी बोलणे हा नॉर्म होता. आता वर्च्यूअल मिटींग्स/कॉस्ट कटिंगच्या नावाखाली हे कल्चर संपले आहे काय? काही रिपोर्ट्सनुसार हे फ्रँचायझी ऑफिस होते म्हणून रूटीन प्रोसेस फॉलो झाल्या नाहीत का?

इथे नेमके HR वर आरोप आहेत. एका मुलीने पुणे ऑफिसच्या HR ला तक्रार केली व ती ही दडपली गेली हा ही आरोप आहे. अश्विनी चैनानी यांची अटक या संदर्भात असावी.
शिवाय नोकरी सोडली तरी एक्सपीरियन्स सर्टिफिकेट वगैरे HR च्या हातात असताना आणि HR जर आरोपींना सामिल असल्याचा आरोप असेल तर ही नोकरीही नको, सर्टिफिकेटही नको आणि एक्सपीरिअन्समधला गॅप दाखवेन ही तयारी असणे ही लक्झरी सर्वांसाठी उपलब्ध नसेल ना?
दुसरं म्हणजे रिपोर्टींग लाईनमधला (सिनिअर ज्युनिअर) ऑफिस रोमान्स (धर्म कुठचाही असो) डिस्करेज केला जातो आणि अगदी तुम्ही लग्न केलेत तरी एका पार्टनरला प्रोजेक्ट/प्रोसेस बदलावीच लागते. इथे ज्या मुलीने तक्रार केली तिला त्याच मॅनेजरच्या हाताखाली कसे काय ठेवले? किमान चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांना वेगवेगळ्या प्रोसेसवर का नाही टाकले? ही HR ची अक्षम्य चूक आहे.

थोडेफार सण साजरे करणे हे सर्वच ऑफिसमध्ये होते त्याला ईद/रमझानही अपवाद नसावा पण हेडस्कार्फ़ कसा गुंडाळावा याचे क्लासेस HR ने ऑफिसमध्ये कशासाठी घ्यावे? कुठे सणानिमित्त प्रसाद, ईदीचा शीरखुर्मा किंवा रमझाननिमित्त अफलातून वगैरे गोष्टी ऑफिसात लोकांनी एकमेकांना खाऊ घातल्याचं पाहिलं आहे. पण कुणी मुद्दामहून बीफ किंवा पोर्क आणून इतरांना जबरदस्ती केल्याचं ऐकलं नाही. इथे धर्माचा अँगल होता म्हणून ७ महिला पोलिसांनी अंडरकव्हर काम केले. त्यांनी काही व्हिडीओ काढले हे ही ऐकिवात आहे त्यामुळे तो अँगल कोर्टात बाहेर येईलच.

तोवर इतर कंपन्यांनी आपल्या कागदावर स्ट्रॉंग दिसणाऱ्या HR पॉलिसीज प्रत्यक्षात उतरताहेत का, तसेच सिनिअर मॅनेजमेंट अश्या चॅलेंजेसना तोंड देण्यासाठी कितपत सक्षम आहे, त्यांचा जमिनीशी कितपत संबंध उरला आहे हे ताडून पाहण्याची ही वेळ आहे.

वरचा प्रशांत कदमांचा व्हिडिओ पाहिला तर बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील.

असो, तोपर्यंत चर्वितचर्वण करायला आणखी एक बातमी.
जिम जिहाद !
https://x.com/kajal_jaihind/status/2044019521535778939

  1. आरोपींचा गुन्हा सिद्ध झाला तर योग्य ती शिक्षा व्हावीच.
  2. पण जर आरोप सिद्ध होउ शकला नाही तर हे कुंभांड रचणार्‍यांविरुद्ध कारवाई होइल का?की ते पुरावा नाही एवढेच म्हणुन तसेच उजळ माथ्याने फिरतील?

विकुंना आतली बातमी कळली असणार की हे सगळं खोटं आहे>>>>
हे विकू नेहमी भक्त, भाजप, काँग्रेस मोड मध्ये असतात. माघेही त्यांनी ऑपेरेशन सिंदूर दरम्यान खोट्या बातम्या ऐकून भक्त खुश झाल्याच विधान केलेलं. आशिया कप मध्येही पाक विरुद्ध भारत हरला तर हायस वाटेल म्हणाल्याच आठवतंय.
हितेही ते भक्तांना बोलत आहेत. खरं तर तिन्ही गोष्टीत भक्त, गुलाम आणायची काहीच गरज नव्हती.
एक तर झालेले आरोप खरे असतील किंवा खोटे. दोन्ही शक्यता गंभीर आहेत.

BPO बद्दल माझेमन यांची निरिक्षणे spot on आहेत.
त्यामुळेच बीफ खायची सक्ती वगैरे गोष्टींबद्दल skeptical होतो.
आता जर ते बीपीओ खरेच पुण्याला गेले तर इथल्या लोकांना ऑफर झाली तरीही पुण्याला शिफ्ट होणे परवडण्यासारखे नाही, कारण पगार जेमतेमच असतो.
त्यातला एक जण तर ऑफिस ला डबाही शाकाहारीच नेत होता, (त्यालाही अटक झाली आहे)

रचा प्रशांत कदमांचा व्हिडिओ पाहिला तर बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील. >> प्रथमच प्रशांत कदमांचा व्हिडिओ दुसरी बाजू दाखवत असला तरी, ते कारण एका बद्दल असू शकेल. इथे तर ८ जण पकडले गेलेत आणि एक मुख्य आरोपी फरार आहे.

भारतातील कित्येक IT कंपन्यांमध्ये दर शुक्रवारी दुपारी या जमातीचे पुरुष २ तास ऑफिस मध्ये नसून जवळच्या मशिदीत जातात. महिलांना यातून सूट असावी कारण त्या कधी गैरहजर नसतात शुक्रवारी दुपारी. कित्येकदा कस्टमर मीटिंगची वेळ बदलावी लागते कारण ही मंडळी न सांगता गायब होतात आणि फोन पण घेत नाहीत. HR कडे या गोष्टी नेल्या तरी कितपत उपयोग होईल माहित नाही कारण धार्मिक गोष्टी दुधारी तलवारीसारख्या असतात आणि कशा उलटतील हे सांगता येत नाही. इथे प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची काळजी असते आणि यात पडून वेळ आणि मनःशांती घालवायची तयारी नसते. ऑफिसच्या मीटिंग रूम मध्ये तर सर्रास हे धार्मिक प्रार्थना करतात, मीटिंग रूम बुकिंग न करता. खूप काही सांगण्यासारखे आहे पण जे चालले होते TCS नाशिक मध्ये ते नक्कीच हिमनगाचा वरचा भाग आहे. यांच्याकडे खूप प्रकारची टूलकिट तयार आहेत, फक्त तुम्हाला या गोष्टीत जाणवत नाहीत किंवा कळुन सवरून याकडे दुर्लक्ष करतात.

माझेमन उत्तम पोस्ट!

आता नाशिक ऑफिस बंद होऊन पुण्याला गेले म्हणजे नोकर्‍या गेल्याच. म्हणून सांगत होतो जरा सहन करा! लगेच तक्रारी करू नका! पोलिसात जाऊ नका. आता पोटावर पाय आलाच ना! काय झालं दाद मागुन? थोडी सहनशक्ती अंगी बाळगलीच पाहिजे. बाई माणसांना घरातून बाहेर अर्थार्जनाला जायला मिळतंय, तर इतकीही सहनशीलता अंगी नाही हे स्केलेबल कसं व्ह्यायचं? जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी!

दरम्यान एनडिटीव्हीने सध्या नाशिक टीसीएसमध्ये असलेल्या आणि टीसीएस मध्ये एकूण सहा वर्षापासून असलेल्या एका मुलीशी व्हडिओ कॉल द्वारे सम्पर्क केला. आणि त्याबद्दल अतिशय खोडसाळपणे बातमी दिलीय. ती इतर बऱ्याच इंग्रजी, हिंदी, मराठी वृत्तपत्रांनी तशीच कॉपी केली आहे. टीव्ही चॅनल्सवर पण कदाचित दाखवली असेल. तिने जे म्हटलंच नाही ते आणि बरंच काही तिच्या तोंडी कोंबून विपर्यास केला आहे.
इतक्या सगळ्या वृत्तपत्रांनी मूळ व्हिडिओ पब्लिकली उपलब्ध असून तो न पाहता बातमी दिली याचे आश्चर्य वाटले.

Pages