डाएट डाएट

Submitted by ऋतुराज. on 11 January, 2026 - 01:21

डाएट डाएट
Screenshot_20260111_113956_Chrome.jpg

नवीन वर्ष सुरू होताना बरेचजण नवनवीन संकल्प करतात. त्यात मुख्यत्वे "या वर्षात मी नियमित व्यायाम करणार" किंवा तत्सम व्यायामाशी निगडित एकतरी संकल्प हा असतोच असतो. या व्यायामाच्या संकल्पात चालणे, धावणे, पोहणे, एरोबिक्स, जिमला जाणे, झुंबा आणि यासारखे अनेक व्यायामाशी निगडित प्रकार येतात.
परंतु, व्यायामाबरोबरच आणि तितकाच आवश्यक असलेला, चौरस आहार म्हणजेच "डाएट" याला देखील या नववर्ष संकल्पात महत्वाचे स्थान असते.
आजकाल अनेक नवनवीन प्रकारचे डाएट आले आहेत. कीटो डाएट, विगन डाएट, इंटरमिटंट फास्टिंग....अशी यादी मोठी आहे.
त्यात आजकाल दररोज समाज माध्यमातून मधुमेह, हृदयविकार, स्थूलता आणि इतर आजारात कोणता आहार घ्यावा किंवा एकूणच आहार कसा असावा याबद्दल अनेक व्हिडिओ, माहिती यांचा सतत भडिमार चालू असतो. त्यातून नेमका आहार कसा निवडावा हा मोठा प्रश्न आहे.
लहान मुलांचा आहार, वृद्धांचा आहार, महिलांचा आहार, रुग्णांचा आहार यातही बरीच विविधता आहे. तसेच डाएटच्या नावाखाली अनेक नवीन उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. त्यातून योग्य अयोग्य कसे निवडावे हा एक मोठा प्रश्न आहे.

तर डाएट, त्याबद्दलचे समज- गैरसमज, तुमचे सध्याचे डाएट, त्याबद्दलचे तुमचे अनुभव. काही अभिनव डाएट रेसिपी, टिप्स आणि डाएटबद्दल सर्वसमावेशक चर्चा करण्यासाठी हा धागा.

प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेली कित्येक वर्ष मी एकवाढ पद्धती फॉलो करतोय. चांगलं वाटलं म्हणून आणखी घ्यायचं नाही आणि नावडीचं असलं तरी कमी करायचं नाही. त्यामुळं वजन चांगलं राखून आहे. (चांगलं वजन राखून आहे असं नाही म्हणालो बरं का... Happy Happy Happy )

Pages