डाएट डाएट
नवीन वर्ष सुरू होताना बरेचजण नवनवीन संकल्प करतात. त्यात मुख्यत्वे "या वर्षात मी नियमित व्यायाम करणार" किंवा तत्सम व्यायामाशी निगडित एकतरी संकल्प हा असतोच असतो. या व्यायामाच्या संकल्पात चालणे, धावणे, पोहणे, एरोबिक्स, जिमला जाणे, झुंबा आणि यासारखे अनेक व्यायामाशी निगडित प्रकार येतात.
परंतु, व्यायामाबरोबरच आणि तितकाच आवश्यक असलेला, चौरस आहार म्हणजेच "डाएट" याला देखील या नववर्ष संकल्पात महत्वाचे स्थान असते.
आजकाल अनेक नवनवीन प्रकारचे डाएट आले आहेत. कीटो डाएट, विगन डाएट, इंटरमिटंट फास्टिंग....अशी यादी मोठी आहे.
त्यात आजकाल दररोज समाज माध्यमातून मधुमेह, हृदयविकार, स्थूलता आणि इतर आजारात कोणता आहार घ्यावा किंवा एकूणच आहार कसा असावा याबद्दल अनेक व्हिडिओ, माहिती यांचा सतत भडिमार चालू असतो. त्यातून नेमका आहार कसा निवडावा हा मोठा प्रश्न आहे.
लहान मुलांचा आहार, वृद्धांचा आहार, महिलांचा आहार, रुग्णांचा आहार यातही बरीच विविधता आहे. तसेच डाएटच्या नावाखाली अनेक नवीन उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. त्यातून योग्य अयोग्य कसे निवडावे हा एक मोठा प्रश्न आहे.
तर डाएट, त्याबद्दलचे समज- गैरसमज, तुमचे सध्याचे डाएट, त्याबद्दलचे तुमचे अनुभव. काही अभिनव डाएट रेसिपी, टिप्स आणि डाएटबद्दल सर्वसमावेशक चर्चा करण्यासाठी हा धागा.
प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार
हा विषय फारच लांब रुंद आणि
हा विषय फारच लांब रुंद आणि उंच आहे प्रत्येक माणसाला लागू पडेल असा कॊणताही फॉर्म्युला नाहीच, पण काही मूलभूत मुद्दे असे आहेत.
एक (अति)विशाल महिला डॉक्टरांकडे वजन कमी करण्यासाठी सल्ला मागायला गेली होती .
डॉक्तरांनी तिला आहाराची पूर्ण तालिका बनवून दिली
त्यावर तिने डॉक्टरांना विचारले डॉक्टर हा सर्व आहार तुम्ही लिहून दिला आहे हा जेवणापूर्वी खायचा कि जेवणा नंतर
विनोद बाजूला ठेवला तर या सर्व सव्यापसव्याच्या मुळाशी एकच मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या गरजेपेक्षा आपण कितीतरी जास्त खात असतो.
आयुर्वेदात एक मूलभूत तत्व सांगितले आहे ते म्हणजे आपल्या जठराच्या क्षमतेचा अर्धा भाग अन्न घ्यावे पाव भाग पाण्याने भरावा आणि पाव भाग रिकामा असावा..
आपण काय करतो पोट भरेस्तोवर खात राहतो. यामुळे होतं काय कि आपले जठराचे स्नायू ताणले जातात आणि जठर रुंद होत जाते. यामुळे मूळ १ लिटर असलेली क्षमता दीड ते दोन लिटर होते आणि किती खाल्लं तरी पोट भरतच नाही.
मग माणसं मी अगदी कमी खातो म्हणतात तेंव्हा दोन लिटर क्षमतेच्या जठरात अर्धे भरले तरी ते एक लिटर होतेच. म्हणजेच तुम्ही प्रत्यक्ष डाएट करूनही अन्नाचे सेवन कमी होतच नाही.
माणसं आठवड्याचे सहा दिवस डाएटिंग करतात त्यात रोज २००० ऐवजी १५५० कॅलरी सेवन करतात (४५० कॅलरी कमी खातात) आणि शनिवारी पार्टीत दाबून खातात ज्यात ४५०० कॅलरी खाल्ले जाते म्हणजेच अख्ख्या आठवड्याचे डाएटिंग फुकट जाते.
यासाठी जेवणाच्या अगोदर दोन ग्लास थंड पाणी पिऊन मग जेवायला सुरुवात करा.
एका वेळी एकच मुद्दा मांडणार आहे. पुढचं पुढे बघू
माझी युक्ती - पोळी/ भाकरी
माझी युक्ती - पोळी/ भाकरी डाव्या हातात धरायची आणि चमच्याने भाजी, आमटी, कोशिंबीर वगैरे खायचे. चतकोर भाकरीबरोबर किमान तीन वाट्या भाजी, उसळ, आमटी संपतात.
भाऊ
भाऊ
अंतरंगी, माहीत नव्हता हा ब्रेड. त्यातील घटक पाहुन (ग्लुटन वेगळे ऍड केले आहे) मैदा न वापरता मऊ ब्रेड करणे शक्य असेल.
बाकी मी जाणकार नाही आणि फर्मेंटेड व्हिट फ्लोअर - ग्लुकोज बद्दल माहिती नाही, पर्णीका देऊ शकतील योग्य माहिती, आणि वेगवेगळे ब्रेड्स बनवणारे सुद्धा आहेत माबोवर, ते सुद्धा सांगु शकतील. किती टिकू शकतो हे ब्रेड वगैरे.
फक्त गव्हाचे पिठ वापरून
फक्त गव्हाचे पिठ वापरून बनवल्या जाणाऱ्या बाजारातल्या ब्रेड मध्ये बहुदा vital wheat gluten घालतात. बहूतेक वेळा लेबल वर त्याचा उल्लेख असतो.
मी स्वतः अजून फक्त गव्हाच्या पिठाचा ब्रेड बनवला नाही, पण बनवला तर तयार एक्स्ट्रा ग्लूटेन घालावे लागेलच. नाहीतर तो फुलणार नाही, डेन्स होईल.
वरच्या लिंकमधल्या ब्रेडमध्ये पण extra gluten घातलेले दिसतेय आणि fermented wheat flour बहूतेक preservative म्हणून काम करत असणार. ब्रेड मऊ व्हावा म्हणून लादी पाव, सँडविच ब्रेड सारख्या ब्रेड मध्ये तेल किंवा लोणी / तूप सारखे फॅट घालावे लागते. शिवाय थोडी साखर किंवा मध सुद्धा घातलेला असतो. साखर किंवा मध यीस्ट/ सावर्डो यीस्ट ला खाद्य म्हणून उपायगी पडते, ब्रेड लवकर फुलतो, ब्रेडचे चव आंबूस येण्याऐवजी किंचित गोडसर येते, ब्रेडला वरून चांगला रंग येतो आणि ब्रेड मऊ होतो.
साखर आणि तेलाच्या/ फॅट च्या वापरामुळे ब्रेड जास्त टिकतो सुद्धा.
यासाठी जेवणाच्या अगोदर दोन
यासाठी जेवणाच्या अगोदर दोन ग्लास थंड पाणी पिऊन मग जेवायला सुरुवात करा.
किती आगोदर? तासभर आगोदर पाणी प्यायला पाहिजे कुठंतरी ऐकलं आहे.
फारेंड
फारेंड
वरती मानव नि लिहिल्या प्रमाणे
वरती मानव नि लिहिल म्हणून त्यांचा मागचा प्रतिसाद वाचला. त्याप्रमाणे युरोप मधील कायदे अती कडक आहेत. आणि पालनही केल जात, असे दिसते. त्यामुळे भारतातल साधा ब्रेड व इथला साधा मैद्याच्या ब्रेड मध्ये पोत , वास व चवीत फरक जाणवतो. युरोप मध्ये ब्रेड मध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार असतात त्यातही गव्हा प्रमाणेच इतर धान्य rye वगैरे ला मागणी आहे. आणि मला जाणवणारा व सुखावणारा एक प्रकार म्हणजे , ताटात अर्ध्या हून अधिक भागात फक्त हिरव्या लाल पिवळ्या रंगांची भाज्या , कोशिंबिरीची उधळण बरोबर प्रोटीन आणि उरलेल्या भागात ब्रेड, किंवा आजकाल पास्ता / भात .
माझा अनुभव मुख्यत्वे Scandinavian व आसपासच्या प्रदेशातला आहे आणि मी फक्त ब्रेड चे आहारातील स्थान बद्दल लिहिलंय.
डॉ सुबोध, खरच हास्यास्पद आहे.
डॉ सुबोध, खरच हास्यास्पद आहे. तुम्ही अजून लिहा याविषयी, विशेषतः तुमचे अनुभव . वाचायला आवडेल.
फ्फ
डॉक्टर म्हणाले, आता डाएट कराच. म्हणून, ' डाएट सोडा ' घेणं तत्काळ बंद केलं !!
अगदीच टोकाचं डायट करू नये या
अगदीच टोकाचं डायट करू नये या मताची आहे>>>>> बरोबर
मोठा वाडगाभर वरण किंवा आमटी घेऊन त्यात अगदी २ घास भात मिक्स करायचा व खायचं. >>>>>> हे छान वाटतंय
सगळे खावे पण प्रमाणात हा थंब रूल आहे. पण खोलात जाऊन माहिती घ्यावी.>>>>>> बरोबर
गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी आणि पॉलिश्ड तांदळाचा भात हे टाकाऊ पदार्थ आहेत. >>>>>> ज्वारीची भाकरी टाकाऊ?
पण मी टारगेट अचिव्ह केले आहे.>>>>> सीमा, छान
आम्ही वाट्टेल ते घरी करून खातो>>>>>>>> किल्ली, इथल्या सगळ्या गोडखाऊंना घरी बोलवायचे. कदाचित त्यामुळे गोड खाणे कमी होईल
वामन राव, मोड आलेले वाटाणे मस्त दिसत आहेत.
'ढूँढने से तो खुदा भी मिलता है, प्रयत्न केले तर निरोगी शरीर मिळेलच..!' असा आशावाद बाळगून आहे मी..!>>>>>> रूपाली, inspiring लिहिले आहे.
आहारानंदी थाळी>>>> मस्त. मीपण इथे लिंक देत जाईन दर आठवड्याला.
माबोकर मंदार गद्रे याचं या विषयावर पुस्तक आहे, आधुनिक भस्मासूर नावाने. >>>>> माहितीबद्दल धन्यवाद हरपा
जे माझा सल्ला अनुल्लेखाने मारतील त्यांच्या पोटाचा घेर तिप्पट होईल. >>> एले, तुमचा सल्ला मानला तरी तेच होईल. मग काय करावे?>>>>> खरंच की.
प्रिझर्व्हेटिव्ह>>>>>> यांचे प्रकार आणि प्रमाण याबद्दल अधिक माहिती करून घ्यायला आवडेल.
अल्पना, माहितीपूर्ण पोस्ट.
तुमचा बेकिंग क्षेत्रात अनुभव भरपूर आहे त्यामुळे तुम्ही इथे यावर नक्की लिहा.
सुबोध खरे, तुमचे अनुभव नक्की लिहा इथे.
भाऊ, जबरदस्त.
तुमचा SOH भारीच आहे. आवडलं.
सर्वांची दखल घेण्याचं कसब
सर्वांची दखल घेण्याचं कसब वाखाणण्याजोगे आहे.
पर्णीका , बरोबर आपल्या
पर्णीका , बरोबर , आपल्या आताच्या आणि पूर्वीच्या जीवनशैलीत खूप फरक आहे पण आयुर्वेदिक असो वा अँलोपॅथी, दोन्हीचे उपाय योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावेत .आयुर्वेदिक चे साईड इफेक्ट नसतात हा गैरसमज आहे ,कारण स्वतः च्या मनाने टीव्ही वरच्या ऍड्स बघून चूर्ण औषध घेणे तितकच धोकादायक आहे जितकं इतर अँलोपॅथीचा औषधं घेणं जी आपण प्रिस्क्रिप्शन शिवाय घेत नाही. कारण कोरोनामध्ये वेगवेगळे स्ट्रॉंग काढे स्वताच्या मनाने घेऊन मूळव्याध झाल्याची उदाहरणे नातेवाईकांमध्ये पाहिली आहेत. त्यामुळे जे काही उपचार घ्यायचेते तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.
बाय द वे पर्णीका ,वरचा आयुर्वेदिक वाला प्रश्न मी नाही स्वानंदी१ यांनी विचारला होता .पण असुदे मला पण यावर लिहायचंच होत. आयुर्वेदिक डॉक्टर जरी सांगत असले साखरेपेक्षा गुळ खायला काही हरकत नाही ,तर त्याबाबतीत जर का तुम्ही डायबेटिक असाल तर मात्र अँलोपॅथी डॉक्टरचं ऐकावं ,जे साखर ,गुळ,मध खाऊ नका सांगतात, जे अगदी 100% योग्य आहे .कारण साखर गुळ मध मेपल सिरप हे सगळेच रक्तातली साखर स्पाईक करतात(रक्तातली ग्लुकोजची पातळी वाढवतात)(शेवटी साखर ,उसाचा रस ,गुळ ही सगळी शुगरच)जे की मधुमेहींसाठी धोकादायक आहे. हे सगळं मी स्वतः ग्लुकोमिटर ने चेक केलंय त्यामुळे खात्रीलायकरित्या सांगू शकते.
परंतु ज्यांना डायबिटीस नाही त्यांनी साखरेऐवजी हेल्थ बेनिफिट्स साठी थोडा गुळ वापरला तर हरकत नाही.
धन्यवाद अमित.!
धन्यवाद अमित.!
माझाही उत्साह दोन दिवसांच्या वर टिकत नाही. मात्र या नविन वर्षात जरा मनावर घेतलंय ..
@ऋतुराज
@ऋतुराज
मी लिहिताना सोशल मिडिया यूजर ची लाईफस्टाईल गृहीत धरून लिहिले होते. अंगमेहनतीची कामे करणाऱ्यांना पथ्ये पाळायची गरज आहे असे मला नाही वाटत.
आमच्याकडं गावाकडे शेतीची कामे करणाऱ्यांना भाकरी पोट भरायला उत्तम. तिथे चपाती भात खात नाहीत.
मी टाकाऊ लिहिले ते बैठी जीवनशैली आणि Glycemic Index च्या संदर्भात. चुकले तर सांगा.
सुबोध खरे सरांची पोस्ट आवडली.
सुबोध खरे सरांची पोस्ट आवडली. त्यांनी सविस्तर माहिती दिली तर खूप छान. अर्थात त्यांना वेळ मिळाला तर.
@रानभुली,
@रानभुली,
OK.
ज्वारीच्या भाकरी बद्दल तुम्ही ग्लायसेमिक इंडेक्स संदर्भात लिहिले, म्हणजे GI जास्त आहे पण भात आणि चपाती पेक्षा भाकरी या कार्ब पदार्थाला जास्त प्राधान्य देतात कारण त्यात फायबर असते म्हणून.
फायबर साठी गव्हाच्या पिठात
फायबर साठी गव्हाच्या पिठात सोयाबीनचे पीठ मिसळतात.
ज्वारी गावी गेल्या दोन तीन पिढ्यात आली. त्या आधी बाजरी आणि नाचणी. आता दोन्ही महाग आहेत.
*ज्वारी गावी गेल्या दोन तीन
*ज्वारी गावी गेल्या दोन तीन पिढ्यात आली * - कोकणात तर ( निदान सिंधुदुर्गात ) भाकरी, चपाती हा प्रकारच नव्हता हल्लीपर्यंत. भात, भाजी, कडधान्ये व मासे हेच जेवण असे. सकाळी पण नाश्ता तांदळाची पातळ पेज व हंगामी भाजी, कैरीची चटणी वगैरे. पण डोंगराळ प्रदेश असल्याने नुसतं चालणं देखील चांगलाच व्यायाम असायचा व स्वच्छ हवा यामुळे डायेटिंग ही निकड नसावी.
छान चर्चा!
छान चर्चा!
गेल्या दोन वर्षात केवळ मानसिक ताण हे कारण होवून झोप, व्यायाम, खाणे याचे गणित चुकत गेले आणि परीणाम म्हणून वजन वाढले. मूळची बारीक चण + साठीकडे झुकलेले वय बघता यावर्षी माझ्यासाठी डायेट म्हणजे उत्तम पोषणमूल्य + कॅलरीची तूट असे आहे. माझी कॅलरीजची गरज १४०० -१६०० एवढी कमी असल्याने त्यात मनाची तृप्ती + शरीराचे पोषण+ कॅलरीची तूट हे गणित बसवणे जरा चॅलेंजिंग प्रकरण आहे. मी अमेरीकेत (मिडवेस्ट) मधल्या लहान गावात रहाते त्यामुळे इथे सहज उपलब्ध हा देखील फॅक्टर आहेच. मी पदार्थाचे घटक काय आणि कसा बनवलाय यावरुन तो खायचा की नाही, किती प्रमाण/वारंवारीता ठरवतेय, जोडीला शरीराचे ऐकतेय आणि त्यानुसार फेरफार करतेय.
कोकणात तर भाकरी, चपाती हा
कोकणात तर भाकरी, चपाती हा प्रकारच नव्हता हल्लीपर्यंत. भात, भाजी, कडधान्ये व मासे हेच जेवण असे>>>>>>>>>अगदी खरं
माझी एक काकू तिन्ही वेळेला फक्त भात खायची
पण अगदी बारीक होती
पण जीवनशैलीही तशीच होती
साधं पाणी आणायचं म्हटलं तरी दोन मजल्याइतकी दरड चढावी लागायची आणि अर्धा किमी अंतर
अशा किमान सहा ते सात फे-या दिवसभरात
तांदूळही घरचा पाॅलिश नसलेला
कोकणात तर भाकरी, चपाती हा
कोकणात तर भाकरी, चपाती हा प्रकारच नव्हता हल्लीपर्यंत. भात, भाजी, कडधान्ये व मासे हेच जेवण असे>>>>>>>>>अगदी खरं
माझी एक काकू तिन्ही वेळेला फक्त भात खायची
पण अगदी बारीक होती
पण जीवनशैलीही तशीच होती
साधं पाणी आणायचं म्हटलं तरी दोन मजल्याइतकी दरड चढावी लागायची आणि अर्धा किमी अंतर
अशा किमान सहा ते सात फे-या दिवसभरात
तांदूळही घरचा पाॅलिश नसलेला
समुद्र किनारी भात खातात. तो
समुद्र किनारी भात खातात. तो घाटावर नाहीत खात.
बरोबर. कोकणात तांदळाची भाकरी
बरोबर. आणि कोकणात तांदळाची भाकरी करतात तशी इतरत्र फारशी नाही.
ज्वारी हजारो वर्षे आधी भारतात आली आणि बाजरीच्या आधी आली असे दिसते. मिलेट्स प्रकारातील ही व अशी पिके कमी पाण्यात, कोरडवाहु जमिनीतही घेता येत असल्याने त्यांचा पूर्वी वापर जास्त प्रमाणात होता असे वाचले आहे. त्यात फायबरचे -कॉम्प्लेक्स कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे GI कमी असतो.
आहारानंदी थाळी: आहारशैली
आहारानंदी थाळी: आहारशैली अपयशी ठरतेय? - Marathi News | Why New Year Diets Fail And How To Fix Them Amy 95 - Latest Chaturang News at Loksatta.com https://share.google/CwTcfj87dg9kBIfLw
अमिता गद्रे यांचा आजच्या चतुरंग मधील लेख
लोकप्रभा दिवाळी अंकात रंगांवर
लोकप्रभा दिवाळी अंकात रंगांवर एक लेख होता. त्यातला एक मुद्दा जेवायच्या खोलीतल्या रंगांचा अॅपेटाइटवर होणा रा परिणाम असा होता.
यावर अनेक लेख दिसले. हा त्यातला एक.
यामागे खरंच विज्ञान आहे, छद्मविज्ञान आहे , मार्केटिंग आहे की ते परंपरागत संस्कारांतून आलं आहे. ; ते मी ठरवू शकत नाही. आजमावून पहा.
Chinese च्या गाड्या रेड
Chinese च्या गाड्या रेड रंगवतात त्याचे हे कारण असावे का?
माझा आहार गेली तीन वर्षे
माझा आहार गेली तीन वर्षे सकाळी ड्रायफ्रुटस + एक पराठा असा आहे. पराठा रोज वेगळा असतो. फक्त आलु सोडून. थोड्या वेळाने दूध.
दुपारी बाजरीची भाकरी (हिवाळ्यात) + उसळ / हिरवी पालेभाजी / शेंगदाण्याची चटणी + खर्डा . रात्रीच्या जेवणाबाबत रोज खटके उडतात. ते स्किप करावंसं वाटतं. पण वादानंतर थोडंसं हलकं खावं लागतं. सायकलिंगमुळे भूक नियमित आहे. अधे मधे भूक लागत नाही. दुपारची भूक सडकून लागते. (ड्रायफ्रुटस गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून अॅड केले आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार). या व्यतिरिक्त एक फळ माझ्यासोबत असतंच. ते भूक असो नसो दिवसभरात कधीही एकदा खायचं. चार महिन्यांपासून चीज अॅड झालं आहे.
सायकलला सुटी असेल तेव्हां मग पोटभरीचे हलके पदार्थ. पण कधी कधी अपवाद होतो जसं आज लग्नाला जायचं आहे. तर जेवण टाळता येत नाही. मग उद्या कसर भरून काढायची. बाहेर गेल्यानंतर फास्ट फूड , कोल्ड्रिंक्स अजिबात नाही. त्या ऐवजी दही, ताक, लस्सी, कोकम, लिंबू सरबत आणि गावरान मेवा यावर भर असतो.
आजच्या चतुरंग मध्ये आहारानंदी
आजच्या चतुरंग मध्ये आहारानंदी थाळी सदरात प्रथिनांचे आहारातील महत्व यावर माहिती आली आहे.
त्यातील सारांश.
"थोडक्यात सांगायचं तर… आपलं पारंपरिक भारतीय जेवण अपूर्ण नाही. आपण ज्या पद्धतीने ते खातो, तो दृष्टिकोन चुकीचा आहे. आपण प्रथिनांना ‘साइड डिश’ बनवून टाकलं आणि कर्बोदकांना ‘हिरो’."
Nature Medicine मध्ये
Nature Medicine मध्ये प्रकाशित झालेला एक अभ्यास.
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC12618255/
यानुसार, भारतीय आहारांमध्ये कमी दर्जाचे कार्बोहायड्रेट्स आणि संतृप्त चरबीचे (saturated fats) प्रमाण जास्त असते आणि प्रथिनांचे प्रमाण कमी असते.
याचा संबंध वाढत्या स्थूलतेशी आणि मधुमेहाशी आहे.
Pages