डाएट डाएट

Submitted by ऋतुराज. on 11 January, 2026 - 01:21

डाएट डाएट
Screenshot_20260111_113956_Chrome.jpg

नवीन वर्ष सुरू होताना बरेचजण नवनवीन संकल्प करतात. त्यात मुख्यत्वे "या वर्षात मी नियमित व्यायाम करणार" किंवा तत्सम व्यायामाशी निगडित एकतरी संकल्प हा असतोच असतो. या व्यायामाच्या संकल्पात चालणे, धावणे, पोहणे, एरोबिक्स, जिमला जाणे, झुंबा आणि यासारखे अनेक व्यायामाशी निगडित प्रकार येतात.
परंतु, व्यायामाबरोबरच आणि तितकाच आवश्यक असलेला, चौरस आहार म्हणजेच "डाएट" याला देखील या नववर्ष संकल्पात महत्वाचे स्थान असते.
आजकाल अनेक नवनवीन प्रकारचे डाएट आले आहेत. कीटो डाएट, विगन डाएट, इंटरमिटंट फास्टिंग....अशी यादी मोठी आहे.
त्यात आजकाल दररोज समाज माध्यमातून मधुमेह, हृदयविकार, स्थूलता आणि इतर आजारात कोणता आहार घ्यावा किंवा एकूणच आहार कसा असावा याबद्दल अनेक व्हिडिओ, माहिती यांचा सतत भडिमार चालू असतो. त्यातून नेमका आहार कसा निवडावा हा मोठा प्रश्न आहे.
लहान मुलांचा आहार, वृद्धांचा आहार, महिलांचा आहार, रुग्णांचा आहार यातही बरीच विविधता आहे. तसेच डाएटच्या नावाखाली अनेक नवीन उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. त्यातून योग्य अयोग्य कसे निवडावे हा एक मोठा प्रश्न आहे.

तर डाएट, त्याबद्दलचे समज- गैरसमज, तुमचे सध्याचे डाएट, त्याबद्दलचे तुमचे अनुभव. काही अभिनव डाएट रेसिपी, टिप्स आणि डाएटबद्दल सर्वसमावेशक चर्चा करण्यासाठी हा धागा.

प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा .मी इथे रोजच येत जाईन कारण सर्वात जास्त डायट आणि व्यायाम चे संकल्प इथे मीच करत आणि मोडत असेन. Proud
माझ्याकडे यासंबंधी भरपूर लिहिण्यासारखं आहे लिहेनच हळूहळू.

आहाराविषयीचे सल्ले हा सध्या सर्वाधिक घोळ झालेला विषय आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीधर्मानुसार वेगवेगळे आहारसूत्र ठरेल.
नियमित व्यायाम करावा आणि आवडेल ते सर्व काही खावे पण प्रमाणात खावे, या पलीकडे या विषयावर नवीन काही लिहीण्यासारखे माझ्याजवळ नाही.

खूपच इंटरेस्टिंग धागा.
मला नेहमी प्रश्न पडतो तो म्हणजे आयुर्वेदिक आणि अँलोपथिक जीवनशैलीमध्ये किती विरोधी समजुती आहेत!
एक म्हणते, मधुमेही लोकांनी गूळ, ड्राय फ्रुट्सचे लाडू खावेत, एक म्हणते नाही.
एक म्हणते तूप भरपूर खावे, दुसरे म्हणते अर्धा चमचा पुरे झाले.
शिवाय प्रोटीन, कॅलरीज, फायबर असा विचार आयुर्वेदिक वाले करत नाहीत....
नक्की काय अनुसरावे?

हेमंतकुमार +७८६
मलाही सध्या डाएट या विषयात प्रत्येकाचे प्रश्नच नाही तर सिलॅबसच वेगळा वाटतो. त्यामुळे इथली चर्चा, सल्ले आणि माहिती जशीच्या तशी कोणी उचलू नये.

स्वतःचे सांगायचे झाल्यास आयुष्यभर वजन कसे वाढवावे हा माझ्यासमोरचा प्रश्न होता पण गेले काही महिने अचानक पोट कमी करावे हा ज्वलंत प्रश्न होऊ लागलाय. मला याची सवय नाही. त्यामुळे पॉइंट ऑफ नो रिटर्नला जायच्या आधी शक्य ते करायचे आहे त्यामुळे व्यायाम आणि आहार या दोन गोष्टीवर लवकरात लवकर फोकस करायचा आहे. त्यामुळे या धाग्यावर नजर राहीलच. काढलात हे चांगलेच केलेत.

खाण्यात चोथा कमी पडला की माणुस या विषयाकडे वळुन चावून चावून चोथा करतो. Light 1

<<प्रत्येकाच्या प्रकृतीधर्मानुसार वेगवेगळे आहारसूत्र ठरेल.>> धन्यवाद.
साधारणपणे प्रोसेस्ड पॅकेज्ड फूड कमीत कमी (केवळ कोल्ड स्टोअर्ड ओके - उदा: हिरवे वाटाणे, मासे) खाण्यात विविधता - आठवड्या भरातून विविध धान्ये, कडधान्ये, रंगीबेरंगी भाज्या, फळे - नॉनव्हेज असल्यास ते आणि भूकेपेक्षा दोन घास कमी, उरतेय - इतर खाताहेत म्हणुन न खाणे असे करणे योग्य वाटतेय. (हे कुठला आजार नाही असे गृहीत धरून.)

*त्यामुळे या धाग्यावर नजर राहीलच. काढलात हे चांगलेच केलेत.* - +१ ! माझं कारण -

आतापर्यंत मी तुझ्या रेसिपी सहन केल्या; आता त्याची भरपाई म्हणून माबोवरच्या नव्या धाग्यावरील सर्व डायेटिंग फक्त तू पाळायचं !!20190916_055207.jpg

माझं पोट आता प्रमाणाबाहेर वाढलं आहे त्यामुळे १ जाने पासून calories track करतोय. Healthify म्हणून app आहे, सगळ्या भारतीय dishes आहेत त्यात, मराठी पण.

आहाराविषयीचे सल्ले हा सध्या सर्वाधिक घोळ झालेला विषय आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीधर्मानुसार वेगवेगळे आहारसूत्र ठरेल.
नियमित व्यायाम करावा आणि आवडेल ते सर्व काही खावे पण प्रमाणात खावे>>>+१

मला व्यक्तिशः डाएट वगैरे फार जमत नाही. आवडत नाही.
त्यात फारसे खोलात जायची इच्छा व आवड नाही. त्यात जितके वाचत बसू चर्चा करत बसू तेवढे जास्त फाटे फुटतात व मतांतरे वाचून उगीच आपल्या डोक्याला ताप होतो. शिवाय मी काही athlete, bodybuilder, sportsman नाही की ज्याने त्याकडे एवढे लक्ष द्यावे.

आपल्या शरिराचे engine गरज आहे तोपर्यंत विनासायास चालावे एवढीच अपेक्षा आहे.

माझे डाएट दोन तीन ओळीचेच आहे.

तेल, मैदा, साखर जास्त असलेले पदार्थ कमी खावे.
१६ तास फास्टिंग विंडो, रात्रीचे जेवण शक्य तितक्या वेळा संध्याकाळी सातच्या आधी.
रोज ४० मिनिटे physical activity.

हे सर्व वर्षातून कमीत कमी २५० ते २७५ दिवस पाळावे.

“माझा डाएट”, “माझा अनुभव“ आणि “My diet councillor” यावर भरभरून बोलतात लोक. A real conversation enabler, this topic.

सोमीवर आहार कसा असावा याबद्दल अनेक व्हिडिओ, माहिती यांचा सतत भडिमार …

सल्ला काय आहे यापेक्षा यातले किती “experts” आहार सल्ला देण्यास खरेच “पात्र” आहेत हा जास्त मोठा concern आहे (माझ्यासाठी)

स्वत:च्या डाएटबद्दल म्हणाल तर … हम तो गृहस्थ जीव हैं, जैसे सीता रखती है वैसे राम रहते हैं.

स्वत:च्या डाएटबद्दल म्हणाल तर … हम तो गृहस्थ जीव हैं, जैसे सीता रखती है वैसे राम रहते हैं. >>>>
सीता भी जगभरातील डायट रेसिपीज आणि हेल्थ रेलेटेड शोषण मीडिया रिल्स व्हिडीओ फिल्टर करत रामाच्या(तुमच्या) पोटाची काळजी घेत असेल ना तेच तर इथे लिहायचंय.
शेवटी आपल्याला काय डायट लागू पडतंय हे अनुभवाशिवाय किंवा स्वतः शिवाय जास्त कोणाला माहीत असणार . सो बेसिक टिप्स सर्वाना लागू पडणाऱ्या तरी येउद्या.

रात्रीचे जेवण शक्य तितक्या वेळा संध्याकाळी सातच्या आधी.>>>> सातच्या आत घरात (शिजवलेलं)
सगळं खावं प्रमाणात एवढंच पाळते ह्या दोन गोष्टी पाळते. गेली पस्तीस वर्षे व्यायाम करते योगासने व चालणे.

माझं पण मंजू सारखच आहे. "अति सर्वत्र वर्ज्ययेत" तत्व पाळते. बाहेरच फार कमी खाते. आणि फार तेलकट तिखट मसालेदार पदार्थ ही आवडत नाहीत फारसे. साधं जेवण घेते. आणि चालण्याचा व्यायाम करते.

मी पोर्शन साईझ जरा कमी केलाय आणि रात्री इच्छा नसेल अथवा उशीर झाला तर न जेवता झोपते - त्या न जेवल्यामुळे आपण मरत नाही हे एकदा सिद्ध झाल्याने, आता सोपे जाते.

भाऊ Happy

<<त्या न जेवल्यामुळे आपण मरत नाही हे एकदा सिद्ध झाल्याने, आता सोपे जाते.>> अरे वा धनश्री. मागे IF बद्दल बोलताना तुम्ही पण सुरू करणार असे लिहिले होते ते आठवले.

माझ्याकडे यासंबंधी भरपूर लिहिण्यासारखं आहे लिहेनच हळूहळू.>>>>> नक्की लिहा सिमरन.
प्रत्येकाच्या प्रकृतीधर्मानुसार वेगवेगळे आहारसूत्र ठरेल >>>> 👍
नियमित व्यायाम करावा आणि आवडेल ते सर्व काही खावे पण प्रमाणात खावे>>>> ह्या दोन्हींचा मेळ बसवणे अवघड आहे.
आयुर्वेदिक आणि अँलोपथिक जीवनशैलीमध्ये किती विरोधी समजुती आहेत!>>>>> विरुद्ध आहार, फळांचे मिल्कशेक
इथली चर्चा, सल्ले आणि माहिती जशीच्या तशी कोणी उचलू नये>>> 👍
खाण्यात चोथा कमी पडला की माणुस या विषयाकडे वळुन चावून चावून चोथा करतो>>>>> Lol
इतर खाताहेत म्हणुन न खाणे असे करणे योग्य वाटतेय.>>> सहमत.
भाऊ, मस्तच Lol
Healthify म्हणून app आहे>>>>> Noted.
तेल, मैदा, साखर जास्त असलेले पदार्थ कमी खावे.>>>> सहमत. यात कमी म्हणजे किती हे ठरवणे अवघड.
हे सर्व वर्षातून कमीत कमी २५० ते २७५ दिवस पाळावे.>>> आणि बाकीचे दिवस 😉
हम तो गृहस्थ जीव हैं, जैसे सीता रखती है वैसे राम रहते हैं.>>>> वाह वाह.
चौकस आहार नव्हे, तर चौरस>>> धन्यवाद. बदल केला.
सातच्या आत घरात (शिजवलेलं) सगळं खावं प्रमाणात >>> सातच्या आत हे जरा अवघड आहे. पण मी देखील शक्य तितक्या लवकर जेवण्याचा प्रयत्न करतो.
मी पोर्शन साईझ जरा कमी केलाय>>>> हे ही ठरवणे अवघडच.

मी गेल्या तीनेक वर्षापासून खारी, टोस्ट आणि बटर (चहात बुडवून खायची) पूर्णपणे बंद केली आहेत.
बिस्किटे महिन्यातून एकदा.
ब्रेड अगदीच कधी सँडविच खावे लागले तर .
पाव अजून पूर्ण बंद करणे जमले नाही पण कमी केले आहे.
वडा पाव, पाव भाजी, खिमा पाव, मिसळ पाव. ही चौकडी माझी साथ काही सोडत नाहीत.

डाएट मध्ये हे येईल की नाही शंका आहे, पण पावाला एवढं बदनाम का केलं आहे ? परदेशात वर्षानुवर्ष लोकं पाव खातायत आणि त्यांच सरासरी आयुर्मान ही चांगलं आहे मग सगळे च जण पावाला वाईट का म्हणतात ? की तो आपल्या हवामानाला वाईट ?

बरं तिकडे ही सगळेच पाव अगदी कणकेपासून केलेले आणि त्यात कसल्या कसल्या बिया वगैरे घालून हेल्दी केलेले नसतात. white ब्रेड खूप मिळतो म्हणजे खपत असेलच तो तेवढा. असो.

जर्मनीमध्ये व्हाइट ब्रेडचे प्रमाण मला कमी दिसले.
मैद्याचा ब्रेड असला तरी किण्वन प्रक्रियेच्या फरकामुळे पचन होण्यास फरक पडतो असे वाचले आहे. (उदा. सावर डो वापरुन मैद्याचा ब्रेड).
युरोप मध्ये अन्न सुरक्षा नियम आणि त्यांची अंमलबजावणी अधिक कडक आहे. तेव्हा मास प्रोडक्शन करताना काय काय घटक त्यात घालता येतील, त्यांचे प्रमाण कुठले टाळले पाहिजे याची अंमलबजावणी अधिक चांगल्या रीतीने होत असेल. तरीही कमर्शियल यीस्ट वापरून तिथे आता व्हाईट ब्रेड मास प्रॉडक्शन होते तर सावर डो- मैद्या ब्रेड पेक्षा तो कमी पाचक असेल.
आणि फायबर in-take हा पूर्ण जेवणाचा बघायला हवा. पोळी आहे आणि पण एकूण जेवणातील फायबर कमी आणि पाव आहे व एकुण जेवणातील फायबर जास्त यात दुसरे अधिक चांगले असू शकते (आपल्याकडे कमर्शियली मिळणाऱ्या पावात असलेल्या ऍडिटीव्ह्जचा यात विचार केलेला नाही. ते धोकादायक पातळीत नाहीत असे समजुन चलू. अशा वेळेस अधुन मधून पाव खायला हरकत नसावी.)

अधिक खपते म्हणजे ते हेल्दी असेलच असे नाही. युरोपमध्येही लठ्ठपणा, मेटाबॉलिक डिसऑर्डरचे प्रमाण वाढले आहे आणि तिथले डॉक्टर्स/न्यूट्रिशनिस्ट्स सुद्धा व्हाईट ब्रेड /जास्त प्रोसेस्ड फूड कमी करा, होल ग्रेन, मल्टी ग्रेन ब्रेड चांगला असे सांगत असतील.

---
ऋतूराज, मिसळ भाकरी आणि खिमा भाकरी ट्राय करून बघा एकदा. मला पावापेक्षा भाकरी सोबत हे दोन पदार्थ अधिक आवडतात.

मी गेल्या तीनेक वर्षापासून खारी, टोस्ट आणि बटर (चहात बुडवून खायची) पूर्णपणे बंद केली आहेत. >> मी पण
घरी सँडविच करायचे असेल तर महिन्यातून एखादेवेळी ब्रेड
बिस्किटे हल्ली खाल्ली जात आहेत
पण प्रमाण फार कमी आहे.
मिसळ सोबत मी पाव पोळी वगैरे काहीच नाही घेत, उसलीसारखी थेट खाते.
पाव भाजी घरी केली तर सोबत गरम गरम कड्डक पोळी.
.
मला कंट्रोल करायचं आहे अरबट चरबट येता जाता खाणं
आणि साखर.
गोडाच काय करू समजत नाही बंद तर सोडा कमी करणे कठीण झाले आहे

होल ग्रेन, मल्टी ग्रेन ब्रेड चांगला असे सांगत असतील.>>>> याबद्दल उत्सुकता आहे. आपल्याकडे ब्राऊन ब्रेड मिळतो त्यात ब्राऊन रंग असतो अशा अफवा (?) ऐकल्या आहेत.

ऋतूराज, मिसळ भाकरी आणि खिमा भाकरी ट्राय करून बघा एकदा. >>>>>> खिमा भाकरी खाल्ली आणि ती चांगली लागली. थॅन्क्स सुचवल्याबद्दल.
मिसळ भाकरी अजून टेस्ट केली नाही. आमच्याकडे सोमवार सोडून दररोज रात्री ज्वारीची भाकरी असते. मिसळ कायम सकाळी त्यामुळे आता एकदा हे जमवायला हवे.

गोडाच काय करू समजत नाही बंद तर सोडा कमी करणे कठीण झाले आहे>>>>>> गोड आवडणाऱ्यांना ते जरा कठीण आहे.

*...भाकरी सोबत हे दोन पदार्थ अधिक आवडतात. * - मी कोकणी असूनही गेली कांहीं वर्ष दोन्ही वेळच्या जेवणात भाजी कोणतीही असली तरी सोबत ज्वारीची भाकरीच घेतो. खूप बरं वाटतं. ( अर्थात, मी ' ज्येष्ठ नागरिक ' वर्गात आहे, 'जनरल ' वर्गात नाही, हेही आहेच )

याबद्दल उत्सुकता आहे. आपल्याकडे ब्राऊन ब्रेड मिळतो त्यात ब्राऊन रंग असतो अशा अफवा (?) ऐकल्या आहेत.>> खरं आहे ते कॅरॅमल घालतात. होल व्हिट ब्रेडही मिळतात. चवी वरून कळतं. युरोमध्ये होल व्हिट, ब्राऊन ब्रेड (तो गव्हाचा नसतो - कशाचा असतो नक्की माहीत नाही कडक असरो खूप) चव वेगळी असते, मऊपण कमी असतो.

पण साधारणपणे आठवड्यातून एकदा दोनदा ब्रेड-पाव खात असाल तर कशाला होल व्हिट-ब्राऊन ब्रेड? मैद्याचा ब्रेड आणि सोबत काय खातो ते बघायचं. रोजच ब्रेड/पाव खाणार असाल तर गोष्ट वेगळी. आणि एक वेळच्या जेवणाचे पूर्ण फायबर कंटेंट बघावे.

मला पाव ब्रेड बंद तर आहेच पण चपातीही कमी खायला सांगीतली होती एका डायटीशन ने, का तर पाव ब्रेड मैद्याचा असतो अगदी ब्राउन ब्रेडही त्यावरचं पॅकिंग नीट वाचलं तर लक्षात येईल त्यातही मैदा असतो आणि तो मेटाबॉलिझम स्लो करतो परिणामी वजन कमी होत नाही. आणि तसंही माझी सहजा सहजी व्यायाम करूनही वजन कमी होत नाही अशी एकंदर शरीर प्रकृती.

गव्हाच्या पिठात (चपातीत) ग्लूटेन असतं ज्यांना ग्लूटेन अँलर्जी आहे त्यांनी खाऊ नये मला अँलर्जी नाहीये पण pcos आहे त्यामुळे चपाती शक्यतो टाळून त्या ऐवजी भाकरी खायला सांगितली आहे .चपातीने काहींना पोट गच्च वाटतं त्यांनीही भाकरी ट्राय करायला हरकत नाही.
पण मला चपाती खूप आवडते त्यामुळे एकदम सोडणं जमलं नाही तरी दिवसाला 2 मोठ्या चपात्या खात असाल तर 1 लहान चपाती खाण्या इतपत जमवते.

अगदीच टोकाचं डायट करू नये या मताची आहे अगदीच उकडलेले सूप डायट ,कीटो डायट तत्सम फॅड डायट हे सस्टेनेबल डायट नाहीयेत आणि भारतीय प्रकृतीच्या लोकांसाठी योग्यही .आपल्याकडे शाळेत असताना जो चौरस आहार शिकवला आहे तोच योग्य आहे फक्त जे आपण कार्ब जास्त खातो आणि भाज्या सॅलेड अगदी तोंडी लावणे, ते बदलले पाहिजे . मी पूर्वी तीन चपात्या आणि इवलीशी भाजी खायचे आणि डाळ कमी ,भात जास्त त्यामुळे घरचं खाऊनही वजन वाढत होतं.पोषण तत्व मिळत नाहीत ते वेगळंच. शेवटी सॅलेड भाजीचा पोर्शन वाढवून चपाती बात भाकरी पोर्शन ने अगदी कमी करून वजन कमी होण्यात मदत झाली .चपाती भाकरी भात पूर्णपणे बंद करणं मला बरोबर वाटत नाही म्हणजे मला तरी शक्य झाले नाही .

मला कंट्रोल करायचं आहे अरबट चरबट येता जाता खाणं
>>>>
@किल्ली IF सुरु कर. आणि दोन्ही मील्समध्ये प्रोटीन असेल याची काळजी घे. प्रोटीनयुक्त आहार असेल तर पोट बराच वेळ भरलेले राहते व क्रेविंग्स कमी होतात. अरबट चरबट खायची इच्छा झालीच तर ते जेवणासोबत खायचे. आपोआप कमी प्रमाणात खाल्ले जाते. म्हणजे दोन बटाटेवडे खाण्याऐवजी १च वडा खाल्ला जातो किंवा प्लेटभर भजी फस्त करायच्या ऐवजी २ भजी खाऊनही समाधान होते.

मी गेली काही वर्षं आठवड्याचे ५ दिवस आहारात एका वेळी एकच carb घेते म्हणजे पोळी/भाकरी किंवा भात/भाताचा प्रकार.

मला मांसाहार आवडतो. म्हणून आठवड्यातून मॅक्झिमम 2 दिवस एका वेळी भात, पोळी सगळेच खाते. दुसऱ्या वेळी/दिवशी एका carb वर परत येते.

पण इतर अरबट चरबट खाणे खूप होत होते. आणि वजनाचा काटा ढिम्म हलत नव्हता. म्हणून सध्या माझे स्वतःचे IF व्हर्जन सुरु केले आहे. त्यामुळे क्रेविंग्सवर कंट्रोल आले. दोन जेवणाच्या मध्ये मी दुपारी अर्धा कप साखरेचा चहा घेते व ब्रन्चसोबत 1 कप साखरेचा चहा घेते. ब्रंचमध्ये प्रोटीन नसेल तर दुपारी भूक लागते. त्यावेळी मी एखादे फळ (केळी, चिकू सोडून) किंवा काकडी खाते.

साखर पूर्णपणे बंद करणे मला जमणार नाही, इच्छाही नाही कारण मला गोडाचे पदार्थ आवडतात. पण ते जेवणाच्या वेळीच घेते. अध्येमध्ये खात नाही.

मला रात्री लवकर जेवायची इच्छा होती पण पूर्वी काम किंवा टाईमपास करताना ते व्हायचे नाही. IF सुरु केल्यापासून भूकच लवकर लागते. त्यामुळे साहजिकच जेवणही लवकर होते.

बाकी मी काही टाळत नाही अगदी रेस्टोरंटमध्ये जाणे वगैरेही. पण पहिल्यापासून मला सूप, सॅलड वगैरे आवडतात. तर त्यावर भर देते. शक्यतो हेवी ड्रेसिंग असलेली सॅलड्स घेत नाही. सण, समारंभाच्या निमित्ताने हेवी खाणे झाले तर गिल्ट बाळगत नाही. परत लवकरात लवकर रूटीनवर येते.

ज्यांना भात खाल्ल्याशिवाय जेवण अपूर्ण वाटते त्यांनी एकदा ही ट्रीक वापरून बघा. मोठा वाडगाभर वरण किंवा आमटी घेऊन त्यात अगदी २ घास भात मिक्स करायचा व खायचं. भात खाल्ल्याचे समाधान मिळते व अनायासे वरण/आमटी खाल्ली जाते.

छान धागा.
सगळे खावे पण प्रमाणात हा थंब रूल आहे. पण खोलात जाऊन माहिती घ्यावी. न्युट्रिशियनचा सल्ला घेत असाल तर त्याचं रेटींग नक्की बघा. जर डॉक्टरच न्युट्रीशियन असतील तर प्रश्नच नाही.

माझा अनुभव. सायकलिंग मुळे जेव्हढी उर्जा खर्च होते त्या प्रमाणात व्हिटॅमिन्सचा सप्लाय कमी पडल्याने मला भयंकर त्रास झाला. एप्रिल पासून दुखणे होते. दोन तीनदा जोरात पडल्याने असे वाटून दुर्लक्ष केले. पण नंतर जून मधे मला डॉ कडे गेल्यावर ती व्हिटॅमिन डिफिशिअन्सी असल्याचे समजले. यामुळे शिरांवर ताण येऊन संपूर्ण हातांमधे चमका निघत होत्या. खांद्यात दुखणे वाढले. पाठीचा काही हिस्सा दुखत होता. हे हळूहळू कमी करायचे होते. सर्जरी टाळून आता नियंत्रणात आले आहे. पण मांसाहारी नसल्याने काही सप्लीमेंट्स चालू कराव्या लागल्या.

जेवणाचा व्हॉल्युम कमी पण त्यात सगळी सत्वे असावीत असा आहार असावा हे माझे मत. गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी आणि पॉलिश्ड तांदळाचा भात हे टाकाऊ पदार्थ आहेत. हे जेवणात सर्वाधिक व्हॉल्युम असलेले पदार्थ . या ऐवजी बाजरी , नाचणी हे सुपरफूड आहारात असावे. चपाती मधे अन्य पीठं मिसळावीत. या संबंधी माहिती घेतली तर सहज मिळते. सीझन मधे मिळतात ती सर्व फळं खावीत. गावरान मेवा चुकवू नये.

खूप दिवसांनंतर येत आहे मायबोलीवर. मधे व्यायामाच्या धग्यावर अपडेट टाकत होते नंतर ट्रेनर आणि अपडेट जमेना कंटाळा यायचा. त्यामुळे अपडेट बंद आहेत.
पण दिड वर्ष जिम मन लावून केली आठवड्यातून पाच दिवस पण माझा वजन तेवढाच राहिला पण मी नक्कीच सुडौल दिसायला लागले आहे , ट्राय शेप आणि बाइ शेप पण दिसत आहेत अगदी थोडेसे बेली फैट आहे. पण मी टारगेट अचिव्ह केले आहे.
आता डायट म्हणाल तर मी विशेष काही केले नाही सकाळी दोन अंडी खाते बाकी दुपारी भाकरी आणि भाजी संध्याकाळी मोस्टली वरणभात (ऑफिस मूळ नाही जमत स्वेपक). फ़ास्ट फ़ूड आधीपासूनच खात नाही शिवाय कोल्ड्रिंक पण अजिबात नाही. अपेय पान होत आठवड्याला थोडाफार.

तरीपण माझ्यामध्ये लक्षणीय बदल जाणवत आहे.

एक गोष्ट म्हणजे सातत्य हव मी पण पंद्रा पांढरा दिवसाचे ब्रेक घेतले जिम मधे. पण परत जाऊन जिम केली आठ महिने ट्रेनर होता आता स्वतच करते .
माझा वय ३५+ , दहा वर्षाची मुलगी आहे सकाळी साडे सहा ला उठून तिघांचा डब्बा बनवून जिम ला जावे लागते . कधी कधी इतकं अंग दुखायच की का करतोय असा वाटायचा पण आता इतका भारी वाटत ना स्वतःला पाहून .

Pages