Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
IMPOSSIBLE STORIES II मध्ये
IMPOSSIBLE STORIES II मध्ये
PART ONE
COMPARTMENTS
ह्या पुस्तकातील part one
किंवा
अमाझोन वर स्वतंत्र पुस्तक म्हणून मिळेल.
Books
›
Science Fiction & Fantasy
›
Fantasy
›
Paranormal & Urban
›
Contemporary
Compartments
Follow the authors
See all
Zoran Živković
Zoran ŽivkovićZoran Živković
Follow
Zoran Živković
Zoran ŽivkovićZoran Živković
4.0 4.0 out of 5 stars (1)
On a strange train journey, in a series of six compartments, a traveller experiences unpredictable encounters, culminating in a meeting of epiphanic power. Through a narrative of dreamlike sharpness Compartments taps into the fears and absurdities, the beauties and mysteries of the unconscious mind, to achieve a consummation both moving and full of hope.
Includes a new essay on Compartments by British author Tamar Yellin.
इथे excerpt वाचायला मिळेल.
https://zoranzivkovic.com/compartments/excerpt.html
Zoran Živković हा लेखक
Zoran Živković हा लेखक वाचनयादीत आहे, पण अजून त्याचं एकही पुस्तक वाचण्याचं धार्ष्ट्य झालेलं नाही.
वावे,
कमी-अधिक फरकाने सगळे एकाच माळेचे मणी - हे अगदी खरं.
ते पुस्तक वाचताना फेसबुकच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल नरेशनच्या ओघात जे जे काही येतं ते वाचून मला झुकरबर्गबद्दलही कौतुक वाटलं. ही वॉज माइंडिंग हिज ओन बिझिनेस. आजही तो बहुतेक फक्त टेक्नो गीक आहे. मात्र त्याच्या अवतीभोवती बिझिनेस-माइंडची टगी माणसं आहेत. प्रसारमाध्यमांमधून झु.चं जे काही दर्शन घडतं, तो काय म्हणतो याला फुटेज दिलं जातं, ते सगळं मुळात या माणसांच्या डोक्यातून उत्पन्न होतं - असं पुस्तकातून इन जनरल चित्र उभं राहतं.
Meta investors settle $8bn
Meta investors settle $8bn lawsuit with Zuckerberg over Facebook privacy
https://www.bbc.com/news/articles/cx2jmledvr3o
IMPOSSIBLE STORIES II सकाळीच
IMPOSSIBLE STORIES II सकाळीच घेतलं आणि शोधलं होतं. पण
PART ONE उघडून पाहिल्यावर आता पुस्तक / कथा दिसली. फारच मोठी आहे. वाचेन.
IMPOSSIBLE STORIES I पूर्ण वाचलं. मजा आली. प्रवासातही वाचतो. छोट्या छोट्या कथा आहेत.
[ Books by Zoran Zivkovic and Complete Book Reviews _ https://www.publishersweekly.com/pw/authorpage/zoran-zivkovic.html
इथे सापडली माहिती .]
धन्यवाद केशवकूल.
__________________________
मनोहर माळगावकरांचं कान्होजी आंग्रे संपवलं. चांगलं आहे. पण कान्होजीच्या मृत्यूपर्यंत कथानक नाही. अजून कान्होजीवरची दुसरी पुस्तकं वाचायला लागतील.
आश्चर्य म्हणा किंवा विचार करण्याची गोष्ट म्हणजे १६८० पासून १९०० पर्यंत इतकी सारी ( ३००- ४०० ) शिडाची जहाजे कोकण किनाऱ्यावर ( सुरत ते कालिकत फिरत होती पण १९५० नंतर एकही नाही. इंग्रज,डच, पोर्तुगीज,आंग्रे यांची युद्धनौका, प्रवासी आणि माल नेणारी गलबते. १९५४ पर्यंत रामदास, तुकाराम वगैरे चारी बुडली. नंतर १९८० च्या काळात थोडी होती. आता m2m किंवा Cordelia ही लक्षरी प्रकारची महागडी उरली आहेत. परवडत नाही?
पुस्तकाची ओळख करून देताना
पुस्तकाची ओळख करून देताना कोणत्या प्रकारातले आहे हे कृपया लिहावे.
त्यानंतर जमल्यास थोडक्यात कथानक. यातल्या अनेक प्रकारात रस नसलेल्यांसाठी नेमके पुस्तक शोधायला मदत होईल.
धन्यवाद.
इपुस्तकालय
इपुस्तकालय
archive dot org मधून कॉपीराइट संपलेली पुस्तके शोधण्यापेक्षा
इपुस्तकालय मध्ये शोधून >> view eBook source >> डाउनलोड बाणाने डाउनलोड करणे सोपे पडते.
https://epustakalay.com/list-of-all-marathi-books/
[ कॉपीराइट मुक्त झालेली जुनी पुस्तके शोधण्याच्या साईट्स आहेत.]
यातून मला हवे असलेले पुस्तक " माझा प्रवास - अथवा सन१८५७ च्या बंडाची हकिगत"- लेखक विष्णभट गोडसे, पुनर्लेखन चि.वि.जोशी ( मुंबई विद्यापीठ).
लेखक विष्णूभट राहणार वरसई, पेण येथून काशी यात्रेला निघतात. उद्देश यात्रा आणि थोडे द्रव्य मिळवून परत येणे. पण ते वाटेत असतानाच १८५७ च्या बंडाच्या ( हो त्यांनी बंडच म्हटले आहे. )रणधुमाळीत अडकतात. अगोदर झाशीच्या राणीची मुलाखत होते पुढे गंगावर्त, ग्वाल्हेर असे उलट सुलट फिरत चित्रकूट मार्गे काशीला पोहोचतात. काय काय अडचणी आल्या याचबरोबर लढायांची वर्णने केली आहेत. काशीला जाऊन येताना कावडीतून गंगा आणायचे ठरवतात. तेव्हाही त्रास होतोच. ते सर्व टिपण केलेले पन्नास वर्षांनी चि.वि.जोशी यांनी संशोधित करून १९०७ मध्ये छापले. हे पुस्तक वाचनालयात मिळाले नव्हते पण archive वर डिजिटल सापडले. आठ दहा पाने गायब आहेत परंतू काही न्यून वाटले नाही.
पुस्तकाचा प्रकार : निवेदन, इतिहास, समाजाच्या नोंदी.
अभिनंदन संप्रति, वेलकम टू माय
तुमच्या यादीतील "बर्निंग घाट" नोंदवलं.
@ माझा प्रवास / १८५७ च्या
@ माझा प्रवास / १८५७ च्या बंडाची हकिगत
हे वाचले आहे मी. (हिंदी अनुवादसुद्धा)
लेखकाच्या उपमा/ वाक्यरचना फार मजेदार होत्या. “दारिद्रय मागीलदारी पुढीलदारी फुगड्या घालत होते” किंवा “कर्ज जलोदरासारखे फुगू लागले” वगैरे 😀
सातपुड्याची, उज्जयनीची सुंदर निसर्ग वर्णने, धार संस्थानातील तेरवीनिमित्त दानधर्माचा प्रसंग, १८५७ उठावातील लढाया, फौजेची, शहरांची वर्णने… फार चित्रदर्शी.
वर “आपसात बंधुत्व चांगले होते, दारिद्रयाने त्यास दार्ट्य जास्ती आणिले” अशी भाषा. मजा आली वाचायला.
बंड नाय म्हणायचं,
बंड नाय म्हणायचं, स्वातंत्र्ययुद्ध म्हणा.
शब्दकोशाप्रमाणे आपल्याच
शब्दकोशाप्रमाणे आपल्याच मालकाविरुद्ध सैन्याने शस्त्र उभारणे हे बंड असते. लेखकाने बंड म्हटले आहे.
-----------
तर झाशीच्या राणीचे यजमान गंगाधरराव यांनी इंग्राजांची तैनाती फौज मान्य केली होती त्या बदल्यात अहमदाबादचा शहा, मांडवगडचा सुलतान आणि चांदेलाची राणी याविरुद्ध संरक्षण मिळवले होते. गंगाधररावांच्या मृत्यूनंतर पुत्रसंतान नव्हते ते राणीने दत्तक पुत्र घेऊन वारसा मिळवला. पण इंग्रज त्याला वारस मानायला तयार नव्हते. इंग्रजांनी झाशी संस्थान रद्दच केले व आपले अधिपत्य लादले. याविरोधात राणीने इंग्राजांविरुद्ध लढा दिला. ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी अगोदरच इंग्रजांची हुकमत स्विकारली होती.
झाशीच्या किल्ल्यात राहून लेखकाने केलेले वर्णन महत्त्वाचे आहे.
मीही गोडसे गुरुजींचे पुस्तक
मीही गोडसे गुरुजींचे पुस्तक वाचलंय पूर्वी. त्यात संकटा साठी संकष्ट शब्द वापरला आहे, त्यामुळे संकष्ट शब्द प्रचलित होता की काय पूर्वी असं वाटलं.
वाचनीय आहे पुस्तक, असं माझं मत. त्यांना अडचणी खूप येतात, लुटले जातात, दारिद्रय काही दूर होत नाही, कमावलेले गमावतात, याचं वाईट वाटतं. खूप आठवत नाहीये, झाशीच्या राणीबद्दल लिहिलंय, ते पुसट आठवतंय. राणी लढत राहिली आणि ग्वाल्हेर शिंदे यांनी मदत केली नाही ह्याबद्दल वाचलेलं आठवतंय, वाईट वाटलं.
माझा प्रवास अथवा १८५७ च्या
माझा प्रवास अथवा १८५७ च्या बंडाची हकीगत.
पुस्तकाची archive ची लिंक-
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.494985
पीडीएफ डाउनलोड लिंक-
https://dn790003.ca.archive.org/0/items/in.ernet.dli.2015.494985/2015.49...
(१३-१८ ही सात पाने नाहीत.)
जवळपास दहाव्या वेळी ॲलेक्स
जवळपास दहाव्या वेळी ॲलेक्स हेली चे द रुट्स वाचले. अप्रतिम पुस्तक आहे.
कुणी वाचले आहे काय? नंतर लिहितो जरा जास्त.
जवळपास दहाव्या वेळी ॲलेक्स
जवळपास दहाव्या वेळी ॲलेक्स हेली चे द रुट्स वाचले. अप्रतिम पुस्तक आहे.
>>>> रुट्स फार पूर्वी वाचले होते. पूर्ण गोष्ट लक्षात नाही पण गुलामांचा व्यापार सुरु झाला आणि आफ्रिकेतून सामान्य लोकांना उचलून जहाजांवर लादून नेऊ लागले तेव्हा तिथे कशी भीती पसरली होती याचे फार प्रत्ययकारी वर्णन आहे. पुस्तकातल्या मुख्य कॅरॅक्टरला जेव्हा पकडतात तेव्हा त्याला जाणीव होते की ही भूमी, ही माती परत कधी दिसणार नाही तेव्हाची त्याची तडफड अजूनही लक्षात आहे.
नंतर समजले की या पुस्तकावर वाङ्मय चौर्याचे आरोप आहेत तरीही अतिशय महत्वाचा दस्तावेज म्हणता येईल असे पुस्तक आहे.
ॲलेक्स हेली चे द रुट्स वाचले.
ॲलेक्स हेली चे द रुट्स वाचले. अप्रतिम पुस्तक आहे.>> मी वाचलेय खूप पूर्वी.
रूट्स मी एक दोनदा वाचायला
रूट्स मी एक दोनदा वाचायला घेतलेलं पण पाच दहा पानांतच सोडून दिलेलं. पूर्ण न वाचल्यामुळे काही मत व्यक्त करता येणार नाही. अर्थात, ह्याला पुलित्झर दिलंय म्हणजे काहीतरी असेलच.
तुम्ही विस्तारानं लिहा sharadg
अस्मिता, क्लब में हम थोडी देर से आए, लेकीन दुरूस्त आए.
ते व्हिस्पर्स ऑफ बर्निंग घाट मध्ये मणिकर्णिका घाट, जळणारी प्रेतं, आणि बनारसची शब्द-पेंटींग्ज वगैरे आहेत एका आर्टीस्टच्या नजरेतून.
हो, रूद्रचा प्रवास सुरू केला
हो, रूद्रचा प्रवास सुरू केला वाचायला. काल आलं माझं किंडल आणि लगेच डाऊनलोड केले. सगळ्यात अभद्र शीर्षक वाटल्याने मोह झाला. ते नमन शर्मा यांचेही The quite that watches ही केले. बाकी सगळे खास करून ouspensky दोन, दोन डॉलर मागत होते म्हणून केले नाही.
रूट्स बद्दल वाचायला आवडेल शरदजी!
ouspensky ची पुस्तकं फ्री
ouspensky ची पुस्तकं फ्री आहेत की किंडलवर.!
इन सर्च ऑफ द मिरॅक्युलस, द फोर्थ वे.
गुर्जिएफचं 'मिटींग्ज विथ रिमार्केबल मेन'
ते 'देअर इज नोबडी' पण बघा.
किंडल वरच्या पुस्तकांची एक सेपरेट यादीच आहे माझ्याकडे.
गुर्जीएफच्या 'रिमार्केबल मेन..' वर आधारित खालील यूट्यूब लिंकवर मुव्ही पण आहे. बेष्टंय.
https://m.youtube.com/watch?v=LjtLjA_Ipq4&pp=ygUPZ3VyZGppZWZmIG1vdmll0gc...
प्लीज मला यादी द्या. माझा
प्लीज मला यादी द्या. माझा वाचनातला रस शून्यवत झाला आहे. पण कुठे जुन्या अस्मिताचा अंश असेल तर किंवा वास्तवापासून दूर जाण्यासाठी म्हणून प्रयत्न चाललेत. आमच्याकडे दोन डॉलर आणि तुमच्याकडे म्हणजे भारतात included तर नाही? In search of miraculous सत्तर पैसे आणि The fourth way तीन डॉलरला आहे. Meetings with remarkable Men 99 cents. पैश्याचं काही नाही, एवढं तरी वाचते आधी, पुनरूज्जीवन झालेच की मग घेत सुटेन. स्वतःचा भरवसा नाही. पण सुचवणीसाठी मात्र आभार.
पण लिंक मधला सिनेमा बघेन. धन्यवाद.
@संप्रति तुमची पोस्ट वाचून
@संप्रति तुमची पोस्ट वाचून खरेच वाईट वाटले. तुम्ही ही 'अ'ध्यात्म / सत्यशोध / आत्मशोध प्रवास सोडून पुन्हा मनसोक्त वाचायला लागाल ही सदिच्छा व्यक्त करतो.
बाकी ती एव्हडी काट्याने काटा काढायची पुस्तके वाचून वेळ व्यर्थ दडवायची काय गरज होती. १०० रुपयाचा गांजा चिलीमीत भरून तीच नशा येते. किंवा कुठलाही बाबा महाराज पकडून किंवा एखादे आधीच परलोकात गेलेले आहेत त्यांचे स्मरण करून नामस्मरण/स्तोत्रे वगैरे अखंड म्हणायची. त्या नामस्मरणाच्या तंद्रीत नाहीतर गांजाच्या तारेत अधिक मजा आहे. ही एव्हडी पुस्तके वाचायची कशाला!
अध्यात्म किंवा साक्षात्कार
अध्यात्म किंवा साक्षात्कार वगैरे हे ठराविक लोकांनाच अनुभव येतात. मला तर काही दिसत नाही. एवढंच काय तर कोणार्क किंवा खजुराहोचे गाईडसुद्धा संभोग शिल्पांची कारण मिमांसा पर्यटकांना का समजावून सांगतात हे कळत नाही. ही देवळं आणि शिल्पं हजार वर्षं जुनी आहेत आणि का कोण जाणे ती कोणी भंगली नाहीत एवढं सांगितलं तरी पुरे. जवारी देवळाचे तोरण शिल्प जव धान्याच्या नक्षीचे आहे आणि समोरच्या शेतात जवाचे पीक होते हे पाहिल्यावर चांगलाच उजेड पडतो. पण दुर्देवाने हजार लोक लक्ष्मणा टेंपल पाहण्यास आले तर त्यातला एक इथे येतो.
अस्मिता, किंडल वाली यादी
अस्मिता, किंडल वाली यादी अपडेट करून देतो.
टवणे सर, फेजेस असतात

प्रॉब्लेम असा झाला होता की सायको झाल्यासारखी पुस्तकं गोळा करून आणायचो. त्याला काय एंडच नव्हता. ह्या सगळ्या कृती, प्रक्रिया, हालचाली, रिॲक्शन्स एवढ्या प्रेडिक्टेबल होऊन बसलेल्या की माझं मला ठामपणे माहीत असायचं की अमुक वारी अमुक संध्याकाळी अमुक वेळेला मी कुठं असणार. डोळ्यांत वेडाची झाक असलेली माणसं बघितलीएत का? तसलं काहीतरी.
आता काय करायचं? असा प्रश्न पडला आणि करायला काही नसलं की चाललो सॅक उचलून पुस्तकं आणायला. दुकानदारांवर, लायब्ररीवाल्यांवर, स्वतःवर किंवा कधीकधी सगळ्या जगावरही चिडायचो की हे मला चांगली (हवी ती) पुस्तकं ताबडतोब उपलब्ध करून देऊ शकत नाहीत.
आणि हे हास्यास्पद चाळे थांबवता पण येत नव्हते.
बरं, वाचून जो काही थोडाफार फरक पडलाय तो नॉलेजच्या पातळीवरच पडलाय, 'बिईंग'मध्ये काहीही बदल नाही एवढ्या सगळ्या वर्षांत. ते जसं होतं तसंच आहे. अंडरस्टॅंडिंग वाढायला पाहिजे ते जैसे थे च दिसते आहे. 'बिईंग' न बदलता नुसतं पोकळ थिओरेटिकल नॉलेजच साचत राहिल्यामुळे त्याचाही काही उपयोग होत नाही. तेही आतल्या आत डिस्टॉर्ट होऊन गेलेलंय बहुदा. मग उगाच एकांती अर्धकच्चं न पचलेलं उलटी करून टाकावं तसं मनातून बाहेर पडत राहतं. त्यात प्युअरली ओरिजनल असं काही नसतं.
त्यामुळे खरेदीचं हे कंपल्शन थांबलं, कुठल्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय थांबलं, आपोआप पडदा पडल्यासारखं थांबलं, याबद्दल रिलीफ ची च भावना आहे.
वाचन काय पूर्ण थांबलेलं नाही. ते पूर्ण थांबून, पूर्ण नि:शब्द होऊन बसता यावं, अशी इच्छा आहे, पण ते पुढं कधीतरी होईल तेव्हा बघावं म्हणतो. सध्या किंडल वरच चाललेलं आहे बऱ्यापैकी. आणि फोकसली फोकस्ड असं फक्त एकाच दिशेने चाललेलं आहे. एक मॅग्नेटीक सेंटर तयार झालेलाय.
ज्या पद्धतीचा मजकूर आवडतो आहे, तो सोडून इतर कुठल्याही मजकूराला हात लावायचीही इच्छा होत नाही. रिपल्शन येतं. सध्यातरी हे असं आहे. आणि हेच बरं आहे मोकळं मोकळं, असं वाटतंय.
संप्रति, तुमच्या नावाच्या
संप्रति, तुमच्या नावाच्या सम्राटाबद्दल वाचायला काही असेल तर सुचवा.
म्हणजे अशोकाचा नातू ना?
म्हणजे अशोकाचा नातू ना?
तो थेट अशोकाचा नातू होता कि
तो थेट अशोकाचा नातू होता कि गार्गी संहितेतल्या उल्लेखाप्रमाणे सम्राट अशोकाच्या नातवाला मारून अशोकाच्या भावाच्या नातवाने (संप्रति) राज्य केले याबद्दल नक्की सांगता येणार नाही. म्हणून पुस्तक असेल तर पाहीजे.
ज्याना कोणाला रुची असेल
ज्याना कोणाला रुची असेल त्यांनी
Colin Wilson लिखित Outsider पुस्तक अवश्य वाचावे.
Srd
Srd
जर तुमचे "compartment" वाचून झाले असेल तर मला समजाऊन सांगाल का?
सुरुवात नाही केली पण वाचेन.
सुरुवात नाही केली पण वाचेन. [सध्या इलन मस्कचे चरित्र ( walter issacsonने लिहिलेलं) वाचतोय. ]
मुळात zoran ची शैली आवडली आहे आणि impossible stories part 1 पूर्ण वाचला. जोडीला मराठी पुस्तके वाचनालयातू मिळालेली सुरू असतातच. वाचनालयाची फी महिना वीस रुपये आहे आणि महिन्याला वीस पुस्तके तरी वाचायला हवीत ना. राजू परूळेकर यांचं माणसं : भेटलेली न भेटलेली आजच वाचलं. काही दम नाही. उगाचच चार शिंतोडे पाणी चारी दिशांना उडवतात तसा प्रकार आहे. नाही आवडलं.
राज अज्ञानी,
राज अज्ञानी,
संप्रति मौर्य या सम्राटाबद्दल नाही माहिती काही.
(अशोकाचाच इतिहास इथं पुरा गायब करून टाकलाय तिथं त्याच्या नातवाचं काय.)
srd,
होय. तुम्ही म्हणता ते खरंय.
'माणसं भेटलेली न भेटलेली' मधले लेख अगदीच वर्तमानपत्रीय आहेत. फारच वरवरचं आहे. वीसेक वर्षांपूर्वीचं घाईघाईतलं लिखाण आहे. राहुल, वाजपेयी, विलासराव, मोदी, सावरकर , संघ यांच्या बद्दलची मते आता त्यांची उलटीपालटी झालेली दिसतायत. म्हणजे काळानुसार मतांत बदल होणं, ही काळाची चौकट परूळेकरांनाही लागू आहे. (भक्तांनी हे वाचलं तर त्यांना अर्बन नक्षल म्हणायचं बंद करतील कदाचित.)
परूळेकरांचे 'आयडियाज् आर डेंजरस' या पुस्तकातले लेख चांगले दीर्घ आहेत. विशेषत: 'शिवसेने'वरचा एक लेख आवडलेला. फारच इंटरेस्टिंग विश्लेषण आहे तात्कालिन शिवसेनेचं.
परूळेकरांनी २००९ साली 'सचिन (ग्लॅडिएटर) तेंडुलकर' म्हणून एक लेख लिहिलेला. उत्कृष्ट होता. आज बघितलं तर त्यांचं तेंडूलकरचं विश्लेषण अचूक होतं हे स्पष्टच दिसतं. त्या हिशेबाने 'काळाच्या पुढचा लेख' होता तो. ब्लॉग वर मिळेल त्यांच्या.
>>>>>माझा वाचनातला रस शून्यवत
>>>>>माझा वाचनातला रस शून्यवत झाला आहे.
फेजेस असतात. आपल्याला वाटतं आपण तसेच झालोय पण काही दिवसात वारं बदलतं. माझ्याबरोबर हे नेहमी होतं.
>>>>>>>एवढंच काय तर कोणार्क किंवा खजुराहोचे गाईडसुद्धा संभोग शिल्पांची कारण मिमांसा पर्यटकांना का समजावून सांगतात हे कळत नाही. ही देवळं आणि शिल्पं हजार वर्षं जुनी आहेत आणि का कोण जाणे ती कोणी भंगली नाहीत एवढं सांगितलं तरी पुरे.
अगदी अगदी!
कोणीतरी लिहीलेलं की म्हणे खजुराहो शिल्पे म्हणजे, देवळात जाण्यापूर्वी तुमच्या वासना, इच्छा सर्व बाहेर सोडून जा असे प्रतिकात्मक आहे ते. या ढुढ्ढाचार्याला काय तेव्हाच्या कारागिरांनी येउन कानात सांगीतलं का? काहीही स्वतःची प्रोजेक्शन्स लावत बसायचं.
Pages