Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
@रॉय - खरे आहे तुमचे म्हणणे.
@रॉय - खरे आहे तुमचे म्हणणे.
सत्वकथा या अंकाचे ज्यांनी संपादन केले त्यांना मी म्हटले की सत्यकथेचे सर्वच अंक वर्षानुसार किंवा दशकानुसार एकत्र करून प्रिन्ट करा व विका. आता नक्की विकले जातील किमान १०००-२००० तरी. बघू ते करतात का ते.
कोल्हापूर युनिवर्सिटीच्या ग्रंथालयात सत्यकथेचे सर्व अंक उपलब्ध आहेत म्हणे. बघा तुम्हाला ते स्कॅन करून टोरेंट वर आणायला जमते का ते
बाळकृष्ण प्रभुदेसाईंना जहाज या कथासंग्रहाला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला होता. सत्यकथा वाचकात ते तेव्हा प्रसिद्ध होते. पण अवघ्या चाळीसाव्या वर्षीच त्यांचा मृत्यु झाला. त्यांचा गंधर्व हा कथासंग्रह गेली १५-२० वर्षे उअपलब्ध होता. इथेच मायबोलीवर सर्च केलेत तर २०१० साली झालेल्या पुण्यातील साहित्य संमेलनादरम्यान मी त्याची जाहिरात करून अनेकांना मी तो घ्यायला लावला होता ते दिसेल.
आता बूकगंगावर त्यांचा नायक हा कथासंग्रह उपलब्ध दिसतो आहे. जहाज मात्र अजूनही उपलब्ध नाही.
>> कोल्हापूर युनिवर्सिटीच्या
>> कोल्हापूर युनिवर्सिटीच्या ग्रंथालयात सत्यकथेचे सर्व अंक उपलब्ध आहेत म्हणे. बघा तुम्हाला ते स्कॅन करून टोरेंट वर आणायला जमते का ते <<
लगेच.
या कामी कदाचित पाच दहा हजार रुपडे जाऊ शकतात (मिनिमम वेज
) पण बघू. इच्छा तेथे मार्ग.
रॉय, मी खर्च विभागून देईन.
रॉय, मी खर्च विभागून देईन. बघा मिळते का .
सुमित्रा जाधव म्हणून ग्रंथपाल होत्या ज्यांनी हे अंक पुर्वी वाचकांना उपलब्ध करुन दिले होते. त्या आता आहेत की नाही माहिती नाही.
>>'या पेक्षा' संपादक खूप काही
>>'या पेक्षा' संपादक खूप काही करतो असं म्हणायचं आहे. >> ते आहेच. त्याने वाचनानंद ओघळतो. पण मुख्य काम आक्षेपार्ह मजकूर असू नये हेच असते.
लेखकाची लेखनाची मांडणी चुकीची असेल, शैली कंटाळवाणी असेल तरीही तो त्याचा कलाआविष्कार असतो. त्यात दुरुस्ती नकोच किंवा नाही केल्याने काय होईल तर त्याची पुस्तके पुढे खपणार नाहीत. पण कायदेशीर अडचणी येऊ नयेत ही मुख्य बाब संपादकांची.
संपादक कुणीही होऊ शकतो.
पण त्याला सामाजिक भान हवे. बोलतांना लोक काहीही बोलत असतात पण पांढऱ्या वर काळे करताना सांभाळावे लागते.
इकडेच पाहा ना काही लेख उडवले जातात किंवा फोटो काढून टाकले जातात....का? अटीभंग होऊ नये. पण काही रटाळ लेखनही चालवले जाते. ते केवळ रटाळ आहे म्हणून काढत नाहीत. काहींना नाही येत चांगले शैलीदार लिहायला.
प्रकाशक त्यांच्या विश्वासाचे काही संपादक पदरी बाळगून असतो त्यांचे काम तेच असते. ते काही लेखकाची कृती संपूर्ण फिरवायला बसवलेले नसतात. फारतर ते लेखनच नाकातील. त्यांना वाटतं की यांचे हक्क विकत घेऊन पुस्तक छापणे परवडणार नाही.
आणखी एक उदाहरण... दुर्गा भागवतांचे कित्येक लेखन टाकावू होते का? नाही. पण प्रकाशक तिची पुस्तके छापत नव्हते. कारण ती खपणार नाहीत म्हणून. मग एक प्रकाशक पुढे आला ह. अ. भावे त्यांनी दुर्गाबाईंची पुस्तके छापली. साने गुरुजींचे समग्र लेखन( omnibus )छापले. तेरा हजार पानांचे.
उगाचच संपादकांना लेखकाच्या वरचढ बसवू नका.
बॉरं.
बॉरं.
<पण मुख्य काम आक्षेपार्ह मजकूर असू नये हेच असते.> हे तुम्हांला कसं कळलं?
तुम्ही फक्त आताच्या काळा
तुम्ही फक्त आताच्या काळा तल्या आणि तेही ऑनलाइन संपादकांचा विचार करताय. संपादकसुद्धा कायद्याशी दोन हात करायला तयार असतात. र धो कर्व्यांचं समाजस्वास्थ्य आणि भाऊ पाध्येंचं वासु नाका ही उदाहरणं आठवली. नाटकात घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर अशी काही आठवली. शोधली तर आणखी मिळतील.
कथा कादंबर्या लिहिणार्यांकडून राम पटवर्धनांसारखे संपादन अनेकदा पुनर्लेखन करून घेत.
ललिता प्रीती, लिहाच हो तुम्ही.
काही पुस्तकांच्या सुरुवातीला
काही पुस्तकांच्या सुरुवातीला चार शब्द प्रस्तावना असते त्यात लिहितात की आम्ही लेखकाला सांगतो की हा मजकूर गाळावा लागेल . तो सहमती दर्शवतो. परस्पर काटछाट करत नाही.
तर काही मुलाखतींमध्ये सांगितले आहे की दोन गोष्टींची अपेक्षा असते मराठी लेखकांकडून. व्याकरण शुद्धता. मान्यवर लेखकांकडून चुका होत नाहीत. पण काही नवोदित लेखक दुर्लक्ष करतात. मग आम्ही इतके काही व्याकरण सुधारत बसत नाही. दुसरी गोष्ट वर सांगितलेली. कधीकधी लेखक हट्टाला पेटतो की हा मजकूर मी मुद्दामहून लिहिला आहे. लोकांना कळायला हवे. परंतू आम्ही कोर्ट कचेऱ्यांत गुंतायला तयार नसतो. तिसरे एक लेखन म्हणजे वाचकांची पत्रे येतात पेपरासाठी, त्यातल्या एखाद्या प्रसिद्ध झालेल्या लेखाला प्रतिक्रिया म्हणून. लेखन लघू असते आणि त्यासाठी संपर्क करून बदलायला लावणे अशक्य. मग ते पत्र बाद करणे हेच सोपे असते.
एकूण न छापलेले किंवा का नाही छापलं फक्त लेखकालाच कळतं.
एक संपादक विशिष्ट विचारांच्या
एक संपादक विशिष्ट विचारांच्या विरोधातला मजकूर काढून टाकतात अशी फेसबुकवर साहित्यिक वर्तुळात टोमणेबाजी होत होती. नंतर ते प्रकरण पेटले. त्या संपादकांना टॅग करण्यात आले. त्यांनी मौन बाळगले होते.
वर्तमानपत्राचे संपादक
वर्तमानपत्राचे संपादक मालकाच्या विचारांना साजेसे लेख ठेवतात. म्हणजे नोकरी टिकते. चानेलच्या बाबतीतही हेच होते. पण मालकच बदलला की त्या सूत्रधारास चानेलच सोडावा लागतो. ...निखिल वागळे.
प्रकाशक किंवा मालक हेच अंतिम निर्णय घेणारे असतात. नैतर हकालपट्टी ठरलेली. जैन ग्रूपच्या ( बेनेट कोलमन कंपनी) weeklyच्या मुख्य संपादकपदावर खुशवंतसिंगांना बोलावून आणले होते. (त्यांच्या हिस्ट्री ओफ सिखिझम या दोन भागांतील पुस्तक लेखनामुळे). सिंग यांनी इलस्ट्रेटेड वीकलीचा खप वाढवून दिला. ( चार लाखांवर)पण नंतर ग्रूपशी त्यांचे फाटले. एवढे की पूर्व सूचना न देता एका सकाळी कार्यालयात गेले तेव्हा त्यांना कळले की पदावरून काढले आहे. ( M.V. Kamath नवे संपादक) शांतपणे त्यांनी आपली छत्री उचलली आणि घराकडे चालत ( हो ते चालतच जात) गेले.
वीकलीचा पहिला विस्तृत लेख "why are konkanastha Brahmins ugly" खप वाढवणारा ठरला. मग असेच काही सनसनाटी लेख येऊ लागले. ते स्वतः काही सदरे लिहीत. With little malice for everyone.
माझ्या एका लेखक मित्राने
माझ्या एका लेखक मित्राने अनुभव मासिकाच्या संपादकांचा एक अनुभव सांगितला होता की त्याच्या कथेत संपादकांनी स्वतःहून बदल करून सगळ्या कथेचा विचकाच केला होता.
>>>
कोण लेखक मित्र? कोणत्या साली घडलं हे? कोणतं अनुभव मासिक? कसा विचका केला होता?
वाटल्यास संपर्कातून कळवा, पण मला ही माहिती कोणत्याही परिस्थितीत हवीच आहे.
हे तपशील द्यायचे नसतील तर तुमचा मेसेज मागे घ्या.
लेखक मित्र : संतोष कुमार
लेखक मित्र : संतोष कुमार वर्मा
कथा : एट्टीट्यूड वाली लडकी
मासिक : अनुभव (वेब पत्रिका)
साल : जानेवारी २०२०
माध्यम किंवा ज्याला platform
माध्यम किंवा ज्याला platform म्हणू तिकडे लेखक गेला की मालक आणि संपादक आलेच. जो स्वतः ची काही प्रकाशित करतो त्यास मग कायदेशीर बाबी त्यालाच विस्ताराच्या लागतात.
आणि जर माध्यमाकडे गेला तर मग लेखनातील बदल माझ्या परवानगीशिवाय करू नये ही अट त्यांनी मान्य करायला हवी. किंवा माध्यम जो काही करार करतो तो वाचून समजून घ्यावा. नंतर वितंडवाद करण्यात काही अर्थ नाही.
इकडे आपण स्वप्रकाशन करतो पण नंतर ते लेखन योग्य न वाटल्यास कारण न देता उडवायचा अधिकार साईटने राखून ठेवलेला आहेच. ज्यांचा काही वाद झाला आणि तो फेसबुकवर मांडला ते काय आपल्याला काय करार लेखी/ तोंडी झाला हे सांगणार आहेत काय?
.
.
ॐ स्वामी यांचे पुस्तक. आवडले. श्रीसूक्ता मध्ये १६ श्लोक असून, प्रत्येक श्लोकाची निर्मीती कशी झाली त्या कथा यात आहेत. किंडलवरती शेवटी ऑडिओ स्निपेटस आहेत. देवी उपासना करायच्या सोप्या पद्धती दिलेल्या आहेत.
बहुतेक एस आर डी यांनी ओळख
बहुतेक एस आर डी यांनी ओळख करून दिली होती - खंडाळ्याच्या घाटासाठी पुस्तकाची. त्याच्या लेखिका शुभदा गोगटे यांचे निधन झाले.
अररर वाईट झाले.
अररर वाईट झाले.
मासिक : अनुभव (वेब पत्रिका)
मासिक : अनुभव (वेब पत्रिका)
>>>
हां! अब जा के स्याही फूटी...
या वेब-पत्रिका रुपातल्या अनुभव मासिकाशी माझा काही संबंध नाही, त्यामुळे तुमचं चालू द्या.
ललिता, मी वॉइस टाइपिंग वापरतो
ललिता, मी वॉइस टाइपिंग वापरतो म्हणून बरेच शब्द गळून जातात. तुमच्या अनुभवने मृद्गंधा दीक्षितला लिहायला दिले आहे, जोवर ती तिथे लिहीत आहे तोवर तुम्ही (म्हणजे संपादक) सेफ आहात माझ्यापासून.
https://www.esakal.com/pune
https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne24h78558-txt-p...
गुरूवारी २७ तारीख आणि रविवारी २८ ?
कुणी जाऊन आले असेल तर पुस्तकांबद्दल कळवावे ही विनंती. मी पण जाणार आहे.
२ ० २ ४ ची बातमी आहे ती.
२ ० २ ४ ची बातमी आहे ती.
काल संध्याकाळी पाच वाजता गेले
काल संध्याकाळी पाच वाजता गेले होते. तर प्रदर्शन वेळे आधीच संपलं होतं. रात्री ८ वाजेपर्यंत होतं. त्या आधीच सगळा शुकशुकाट आणि मंडप घेऊन जाणारी मंडळी काम करत होती. मी उद्याना बाहेरचा बॅनर बघून बातम्या चेक केल्या होत्या. जी बातमी सापडली ती इथे डकवली.
कुठेच काही जाहीरात न केल्याने कुणीच गेलं नसावं. सांस्कृतिक कार्यक्रम होते, भाषणे होती, पुस्तकांची माहीती होती. भरगच्च कार्यक्रम होते चार दिवस. मलाही इतक्या जवळ असून कल्पना आली नाही. मग बाकिच्यांची काय कथा ?
कन्नड लेखक भैरप्पांची मराठी
कन्नड लेखक भैरप्पांची मराठी अनुवादित ' वंशवृक्ष' कादंबरी वाचतेयं सध्या.. अर्धी वाचून झालीयं..!
वावे, तू इथेच कुठेतरी लिहिलयं वाटते त्याबद्दल.. तेव्हाच पुस्तकाचं डोक्यात नाव फिट्ट बसलं होतं.
छान कादंबरी आहे.. कादंबरीत जुना काळ असूनही पात्रांचे सामाजिक विचार फार वेगळे आणि पुढारलेले वाटले.
सध्या Philip K Dick चा
सध्या Philip K Dick चा "Electric Dreams" हा कथा संग्रह वाचतोय. ही २०१७ सालची TV सिरीज आहे. आता त्याचे पुस्तक बनवले गेले आहे. संग्रहात एकूण दहा कथा आहेत.
PKD च्या कथांवर जवळ जवळ चार पाच super hit सिनेमे आहेत ते बहुतेकांनी बघितले असणारच, त्यामुळे त्यांची ओळख अशी करून द्यायची गरज नाही.
एकेक कथेवर स्वतंत्रपणे लिहावे लागेल.
वेळ मिळाला कि लिहीन,
आज आलेला एक फॉर्वर्ड
आज आलेला एक फॉर्वर्ड
*...पंथी*
पंधरा-वीस वर्षे झाली. बरीच काही कामं करून घरी येत होतो.
दमलो होतो आणि डोक्यावर ऊन चांगलंच तापलं होतं.
घरी कधी एकदा पोचतो, असं वाटत होतं.
इतक्यात एक तरुण अगदी अचानक अक्षरशः आडवा आला. ओळखायला थोडा वेळ लागला. नंतर लक्षात आलं, हा एका प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये अधूनमधून दिसणारा. भर उकाड्यातही जाडजूड, ओबडधोबड, दहा पंधरा खिसे असलेलं जॅकेट, सर पे कफन. प्रायोगिक नाट्य चळवळ, पेठे, सुदर्शन... अशा पर्यावरणातला. वयाला न शोभणारा कायम अति गंभीर चेहरा. नाव तेव्हा आठवलं नाही; आता तर नाहीच नाही.
अगदी तोंडाजवळ तोंड आणून दबक्या आवाजात म्हणाला,
"येतेय बरं का !"
अगदी पहिल्या धारेची गुप्त वार्ता तो मला सांगत असावा असा एकूण आविर्भाव.
" कोण ? " अचानक असलं वाक्य आल्यावर माणूस गोंधळणार नाही तर काय ?
त्याला अगदी आतून वाईट वाटलं असणार. त्याच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल दाटून आलेली अति करुणा.
तरीही बिचारा प्रयासाने स्वतःवर ताबा मिळवत असल्यासारख्या समजुतीच्या स्वरात म्हणाला,
"सरांची !"
मला काय करावे सुचेना. एकतर वर एवढं ऊन, त्यात ह्याचं हे असलं कूट बोलणं. डोकं फिरायची वेळ. मी फक्त नकारार्थी मान हलवली.
" हिंदू येतेय !" एवढंच म्हणून माझ्याकडे एकदा तुच्छता दर्शक कटाक्ष टाकून लगेच तो सटकला.
"च्यायला !" मनातल्या मनात मी मोठ्यानं म्हणालो.
***
(ईश्वरसाक्ष हे सत्य कथन केले असे.)
*****************
हम होश खो बैठे उसके पहले कुछ
हम होश खो बैठे उसके पहले कुछ आ जा
पावसाआधीचा पाऊस ।शान्ता शेळके
पावसाआधीचा पाऊस ।शान्ता शेळके
शान्ताबाईंचं मी वाचलेलं हे दुसरं पुस्तक. पाहिलं “सांगावेसे वाटले म्हणून” वाचल्यानंतर त्यांच्या लिखाणाची शैली, संदर्भ-संपन्नता खूप आवडली होती.
“पावसाआधीचा पाऊस” वाचतानाचा अनुभव त्याही पलीकडचा वाटला. काही ठिकाणी इतकी अचंबित झाले आणि खात्री पटली, गद्य लिखाणही इतकं सुंदर आणि तरल जमायला त्यासाठी एखाद्या कसलेल्या कवयित्रीचंच मन हवं.
ललितलेखनाच्या या संग्रहात एकूण २७ लेख आहेत. अगदी वेगवेगळ्या विषयांवरचे. हे विषयही अगदी साधे - तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातल्या घटनांवर, विषयांवर बेतलेले. जसे की बसची रांग, बसचा थांबा, एखादं चित्र, एखादा पाहुणा, एखादी गृहिणी आणि तिचं विश्व, एखादं वादळ पहिल्यांदा अनुभवणारी छोटी मुलगी, दोन मित्रांमधील एखादा संवाद किंवा अगदी चोरबाजार! विशेषकरून मुंबईची पार्श्वभूमी असल्यामुळे ते प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात, ते विचार-भावना पूर्णपणे पोहोचतात.
पुस्तकाच्या प्रस्तावनेत ललितलेख, त्यांचे विषय कसे सुचतात. विचारवंत लेखकांची ललितलेखनाविषयीची मते आणि त्यापेक्षा वेगळं असलेलं शान्ताबाईंच मत, त्यांचा दृष्टिकोन वाचताना मौज वाटते. त्या निखळतेचा, सहजतेचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक लेखातून येत राहतो.
पाऊस येणार ह्या जाणिवेनेच मनातील मरगळ दूर होते. शिणवटा जातो. ते मनात उठणारे तरंग, ती अधिरता हा मनातला पाऊस ( शिडकावा ) म्हणजेच “पावसाआधीच पाऊस”. बालपण,तारुण्य आणि गृहस्थी या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जाणवलेला त्यांचा पाऊस अधिकाधिक तरल होत जातो. त्यावेळी एका इंग्रजी निबंधकाराच्या लेखाविषयी, “गद्यात लिहलेली कविताच वाटावी असा हा लेख “ असं त्या म्हणतात आणि ते आपल्यलाला त्यांच्याच “पावसा आधीचा पाऊस” हा लेख वाचताना म्हणावेसे वाटते. त्या म्हणतात की मला निसर्ग प्रिय आहे. मला जाणवले की जेव्हा लेखात पाऊस येतो तेव्हा, कालिदासाचे मेघदूत मराठीत आणलेल्या शान्ताबाई, अधिकच खुलतात. वाचताना ती आल्हाददायी ओली झुळूक आपल्यालाही जाणवत राहते.
हिरव्यागार पावसाआधी येणारा रुक्ष उन्हाळा, पण त्याचेही वर्णन त्या इतके सुरेख करतात. आपल्याला खात्री पटते, उन्हाळ्याच्या रखरखटात बहावा, पळस-पांगारे, गुलमोहोर, बोगनवेल, गुलबक्षी, सावरी एक सुखद किनार घेऊन येतात. त्या म्हणतात, उन्हाळ्यात वसंत ऋतू आपले सारे विभ्रम इमाने इतबारे प्रकट करतो. “पाऊस आला” मध्ये मुंबईतील असा देखणा उन्हाळा, जो सेकंद काट्यावर आयुष्य जगणाऱ्या मुंबईकराच्या नजरेआड असतो, तो त्या छान चित्रमय पद्धतीने अधोरेखित करतात.
“ओळख” मध्ये हाच पाऊस वादळ बनून एका छोटीच्या आयुष्यात अनपेक्षित धक्का होऊन येतो. तेव्हा तिची माणसाच्या अगतिकतेशी, अनपेक्षिततेशी झालेली पहिली ओळख सांगतानाचे तत्वज्ञान त्या अगदी सुलभपणे मांडतात.
“चोरबाजार” वाचताना, असंख्य नाना तऱ्हेच्या वस्तूंनी भरलेला तो बाजार आपल्या डोळ्यांसमोर उभा करतात. तर “ती” ची गोष्ट वाचताना आपल्या आत दडलेली दुसरी ती ( आपली सद्सद्विवेकबुद्धी ) आपल्या नकळत आपल्याला टोकून जाते.
“सहावे सुख” वाचताना आपणही अंतर्मुख होतो. संपत्ती, नावलौकिक, चांगला जॊडीदार, अपत्ये या सर्वांच्या पलीकडील हे सुख. तेही ज्याचं त्याला सापडेल, जाणवेल ते. शिवाय प्रत्येकाला ते गवसेलच असेही नाही. कदाचित एखाद्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीवही होणार नाही.
“शब्दांचे चेटूक” मध्ये त्यांचे शब्दावरील प्रेम, पकड, नवशब्द निर्मिती करायची उत्सुकता जाणवते. “चिमणचेटके चांदणे” हा यानाच्या वाचनात आलेला शब्द पहाटेच्या लक्ख चांदण्यात जेव्हा त्यांना भेटतो, ती अनुभूती अप्रतिम आहे. मला दोन्ही पुस्तकांत जाणवलेली एक सामायिक गोष्ट म्हणजे अनेक नवनवीन शब्द वाचायला मिळतात आणि आपल्याला शब्दसमृद्ध झाल्यासारखे वाटते.
बालपणीच्या आठवणीं ते रोजच्या घटना यांमधून अनेक छोट्या छोट्या जाणिवा, संवेदना जागृत करणारा, कुठलेही डोस न पाजता आपल्याला विचार करायला लावणारा, अंतर्मुख करणारा हा ललितलेख संग्रह, “ पावसा आधीचा पाऊस” मला तरी खूप आवडला. तुम्हालाही काही तरल, कसदार, भाषासमृद्ध करणारे ललितसाहित्य वाचन करायचे असल्यास “पावसाआधीचा पाऊस“ जरूर वाचा.
@ मीस्वच्छंदी ,
@ मीस्वच्छंदी ,
खूप सुंदर ओळख करून दिलीय पुस्तकाची.
म्हातारं नुसतीच हूल देऊन
म्हातारं नुसतीच हूल देऊन खपणार आहे. हाच त्याचा शेवटचा मास्टरस्ट्रोक.
अडगळ करून करून किती समृद्ध करणार?
मला कोसला नेहमीच बंडल अनओरिजनल वाटत आली आहे. हिंदू मात्र बेहद्द आवडली आहे.
सर्वांनी पंथ तयार करावेत. कारण हा ट्रेट अस्सल भारतीय आहे. हिंदू आहे. आणि समृद्ध अडगळी देखील आहे.
म्हातारं नुसतीच हूल देऊन
म्हातारं नुसतीच हूल देऊन खपणार आहे>>
असू द्या की वो,
घर भरल्यासारखं वाटतं.
धन्यवाद शर्मिला:)
धन्यवाद शर्मिला:)
मीस्वच्छंदी, छान ओळख. आवडली.
मीस्वच्छंदी, छान ओळख. आवडली.
Pages