Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एकूण माझा गैरसमाज झाला होता
एकूण माझा गैरसमाज झाला होता तर. मला वाटत होत कि इथले लोक्ष केवळ तो ती त्याचा तिचा प्रियकर प्रेयसी आजी आजोबा वगैरे गोष्टी वाचतात. सायंस फिक्शन वाचतात बरका.
ठोस वैज्ञानिक तथ्यांवर आधारीत कथाच वाचतात.
आयला म्हणजे philip k Dick कटाप,
टवणे सर, धन्यवाद तुमच्या
टवणे सर, धन्यवाद तुमच्या रेको बद्दल.
@रानभूली, @टवणेसर
@रानभूली, @टवणेसर
Andy Weir ची पुस्तके ..नोंद घेतली आहे. ( खरंतर पुस्तकं घेतली आहेत. ....बघू किती वेळ लागतो वाचायला.)
>>>प्रोजेक्ट हेल मेरी (तसेच आर्टेमिस, मार्शियन) वगैरे अँडी वायरची पुस्तके ठोस वैज्ञानिक तथ्यांवर आधारीत आहेत>> पटतंय. पृथवीवर लढाया होऊन एक वेळ भूमीखाली टाक्यांत ( silo) मध्ये राहायची वेळ येणार हे नक्की.
>>आजचे जेफ बेझोस, एलॉन मस्कसारखे महाश्रीमंत, प्रचंड टेक्निकल ताकद असलेले ऑलिगार्क कदाचित या सायलोंमध्ये जे (वा सायलोत येण्यापुर्वी) जे झाले आहे तसे काहीतरी करतील असे मला खरेच वाटते. मस्कच्या मनात आले तर पृथ्वीवरला समाज सगळा उडवून, केवळ मोजके लोक अश्या सायलोंत भरेल.>> त्यांत कुणी राहायचे हेसुद्धा तेच ठरवतील. यावरून आठवलं .....
स्टीव जॉब्स चं walter Isaacson ने लिहिलेलं चरित्र दहा वर्षांपूर्वी वाचलं होतं. त्यानेच २०२३मध्ये Elon Musk चं चरित्र लिहिलंय ते घेतलंय वाचायला. पृथ्वीवर काही भूमीका झालं तर मंगळावर काही विशेष लोकांना नेऊन तिथे वस्ती करायचं त्याचं स्वप्न आहे.
@ केशवकूल, या वर्षी बघा चार पाच सायन्स फिक्शन रिव्ह्यू नक्की पडतील इथे. कदाचित "मी वाचलेलं पुस्तक - ४" यानेच सुरुवात होईल. पण या पुस्तकांची खरी गंमत उघड केली तर मजा जाईल कारण सायन्स फिक्शनचा आत्मा कोणत्यातरी पोपटात असतो.
वाईमध्ये वसंत व्याख्यानमाला
वाईमध्ये वसंत व्याख्यानमाला होते म्हणतात.
>>>>>पहिल्या भागात सायलोत
>>>>>पहिल्या भागात सायलोत राहणारे लोक, त्यांच्यातली सामाजिक उतरंड, राजकारण/सत्ताकारण हे येते. बाहेर काय आहे, याची उत्सुकता हा भाग टिकवतो. पुढले दोन भागांबद्दल काही लिहित नाही कारण मग सस्पेन्स निघून जाईल आणि वाचयला मजाच येणार नाही.
जबराट वाचन आहे तुमचं.
जमिनीखाली एका प्रचंड मोठ्या
जमिनीखाली एका प्रचंड मोठ्या सायलो (सिलिंडर, दंडगोल) मध्ये एक पूर्ण समाज राहत आहे. सगळ्यात वरचा मजल्यातून बाहेरचे जग दिसते>>> अरेरे. ही तर ढापलेली कल्पना आहे.
Metropolis is a 1927 German expressionist science-fiction silent film directed by Fritz Lang and written by Thea von Harbou अगदी हीच कल्पना आहे.
बघायची/ वाचायची इच्छा आणि वेळ असेल तर लिंक काढून देईन.ढ
कुठलेही काम करू शकणारा रोबोट वगैरे त्याच्या पुस्तकात नसतात. >>> अहो तर ही ठोस साय फाय कल्पना आहे. थोडी वर्षे थांबा तुम्ही पण असा रोबोट घर कामासाठी ठेवाल.
ही घ्या Metropolis ची लिंक. बघा आणि तुम्हीच ठरवा.
https://www.youtube.com/watch?v=kaCRX13kkfs
BTW
Metropolis ही नंबर एक ची साय फाय फिम आहे.
पण या पुस्तकांची खरी गंमत उघड
पण या पुस्तकांची खरी गंमत उघड केली तर मजा जाईल कारण सायन्स फिक्शनचा आत्मा कोणत्यातरी पोपटात असतो. >>> पटलं हे. माझ्याकडून काही उघड झालंय का एस आर डी ?
केशवकूल , मी पण मेट्रोपोलिस
केशवकूल , मी पण मेट्रोपोलिस च्या साम्याबद्दल सायलो वाचल्यानंतरच वाचले होते. एकूण इंटरनेटवरचे वाचून असे दिसते की केवळ संकल्पनेतच साधर्म्य आहे. मेट्रोपोलिस बघेन आणि मग कळवेन.
>>
कुठलेही काम करू शकणारा रोबोट वगैरे त्याच्या पुस्तकात नसतात. >>> अहो तर ही ठोस साय फाय कल्पना आहे. थोडी वर्षे थांबा तुम्ही पण असा रोबोट घर कामासाठी ठेवाल
>>
हाइनलाइन च्या द डोअर इन्टू समर या पुस्तकात आज जे रोबो वॅक्युम आहेत त्याचे जवळजवळ जसेच्या तसे वर्णन येते. एकच फरक आहे की त्यातला रोबो (ज्याचे ब्रँड नेम असते हायर्ड गर्ल) जमिनीवर पडलेल्या वस्तू पण उचलून ठेवतो (रोबोच्या डोक्यावर एक ट्रे असतो त्यात). फार मस्त आहे ते वर्णन.
टवणे सरांचं वाचन दांडगं आहे
टवणे सरांचं वाचन दांडगं आहे एकूणात. __/\__
ज्यांचं वाचन असं दांडगं आहे,
ज्यांचं वाचन असं दांडगं आहे, त्यांनी खरे तर माबोवरती लिहायलाच हवे. जबाबदारी आहे त्यांची
इतर न-वाचक उगाच पिळत बसतात. 
प्रोब्लेम काय आहे ना
प्रोब्लेम काय आहे ना विज्ञान कथा लेखक भविष्य काळात वावरतात. आधी ते लिहितात मग टेक्नोलोजी आकार घेते.
उदा ज्युल्स व्हर्न
star trek मधल्या काही कल्पना.
आर्थर सी क्लार्क
Arthur C. Clarke's geostationary satellite concept
https://blog.truegeometry.com/api/exploreHTML/25552e2bf9b035b84764487f39...
एकदा त्यांनी म्हटले होते
"अरेरे मी हा लेख ४५ डॉलर्स विकला. आज माझा कॉपी राईट असता तर मी आज बिलीअनर झालो असतो."
>>
>>
कुठलेही काम करू शकणारा रोबोट वगैरे त्याच्या पुस्तकात नसतात. >>> अहो तर ही ठोस साय फाय कल्पना आहे. थोडी वर्षे थांबा तुम्ही पण असा रोबोट घर कामासाठी ठेवाल
>>
केशवकूल - मी काही तुमच्यासारखा साय-फाय मधला पंडित नाही
त्यामुळे सगळे बारकावे काही समजत नाहीत, तसेच वाचनही चौफेर नाही.
कुठलेही काम करू शकणारा रोबो आज अस्तित्वात नाही. आजचे मेकॅनिकल बॉट हे एक प्रकारचे काम करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेप्रमाणे वन पर्पज ऑल मेकॅनिकल बॉट अजून नाहीत. ते का , काय मेकॅनिकल मर्यादा आहेत वगैरे मध्ये आत्ता जात नाही.
अँडी वाइरच्या पुस्तकात मला जे ठळक वैशिष्ट्य दिसले ते म्हणजे त्याची कादंबरी आज जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्या परिघात राहते. ही त्याने स्वतःला आखून घेतलेली मर्यादा असेल. इतर साय फाय लेखक नवीन तंत्रज्ञानाची कल्पना करून लिहितातच.
टवणे सर, सिनेमा बघून आलात कि
टवणे सर, सिनेमा बघून आलात कि तिकडे नक्की लिहा.
बाहेर पडत आलं असतं तर नक्की पाहिला असता.
केशवकूल - मी काही
केशवकूल - मी काही तुमच्यासारखा साय-फाय मधला पंडित नाही >>> हे हे हे म्हनजे शाल जोडीतले. चालेल.सवय झाली आहे.
टवणे सर
बदल्यात मी तुम्हाला एक छान रेको देतो.
वाचले नसेल तर निखिलेश चित्रे यांचे "गॉगल लावलेला घोडा" हे पुस्तक वाचा. ओरिजिनल तेको ललिता प्रीती ह्यांचा आहे.
माझा रेको.
माझा रेको.
"If Anyone BUILDS it, Everyone Dies."
by Eliezer Yudkowsky and Nate Soares
अत्यंत वाचनीय पुस्तक आहे,
>>>माझ्याकडून काही उघड झालंय
>>>माझ्याकडून काही उघड झालंय का एस आर डी ?>> नाही.
सायन्स फिक्शन समीक्षा करताना आपल्याला थोडक्यात सांगावं लागतं कारण इकडे शैली पेक्षा बारकावे लपवावे लागतात कारण गंमत निघून जाईल.
_________________
@ केशवकूल,
Metropolis film download केली आहे. मोठा अडीच तासांचा आहे विडिओ. थोडाथोडा पाहीन.
अजिता काळे यांचं पूर्वी बरंच
अजिता काळे यांचं पूर्वी बरंच वाचलंय. मला आवडायच्या. त्या या जगात नाहीत हे मला माहिती नव्हतं, वाईट वाटलं, धक्का बसला.
@अनु, फार वाईट वाटले वाचुन.
@अनु, फार वाईट वाटले वाचुन. त्यांची ट्रिटमेंट सुरू होती ती यशस्वी व्हायला हवी होती.
@ऋतुराज, तुम्हाला जर बुकगंगा किंवा इतर वेबसाईट वर अजिता काळेंची पुस्तके उपलब्ध दिसली तर मला नक्की सांगा, मला पण घ्यायची आहेत.
बाकी साय-फाय पुस्तकांबद्दल चर्चा एकदम इंटरेस्टिंग आहे.
Metropolis फिल्म पाहिली .
Metropolis फिल्म पाहिली . श्रीमंत माणूस ( आणि इतर तसेच लोक)शहराच्या वरच्या भागात राहतो.गरीब कामगार लोक खाली तळघरांतल्या मशिनांवर कामं करत राहतात. श्रीमंत माणसाचा मुलगा कामगारांच्या बाजूने असतो. पुढे असं काही होण्याची ही नांदी आहे. भावनांचा मसाला घालून, सायन्स फिक्शनची फोडणी देऊन,एक स्त्री पात्र आणून सिनेमा उगाचच वाढवला आहे. मजा आली नाही. सगळा गडबडगुंडा वाटला.
Srd
Srd
ठीकाय. जैसी जिसकी सोच.
मी १९२० १९३० च्या दशकातील एक दोन मूकपटांच्या लिन्क्स देतो. पण इथे नाही चिकवा वर.
केशवकूल, मला नाही आवडला पण
केशवकूल, मला नाही आवडला पण इतरांना आवडू शकेल. मूकपटांच्या लिन्क्स द्याच. पाहीन . धाग्यांचा उद्देश पुस्तकं आणि इतर माध्यमांची माहिती करून देणे हा आहे. कुणी ओळख करून दिली नाही तर वाचकांना समजणार कसं? आवडणे वगैरे सोडा. १९२० च्या काळात चित्रपट दिसतो याचंच कौतुक होतं. मग काही वर्षांनी अधिक चित्रपट आल्यावर लोक तुलना करू लागले असतील. Andy weir ची पुस्तके मी लगेच मिळवलीच. एक नवीन लेखक मला माहीत झाला. मोबाईलमध्येही ( mobi /epub files) वाचता येतात प्रवासात. काही नेटफ्लिक्स किंवा इतर ओटीटी माध्यमांचे मला पाहता येत नाहीत पण यूट्यूबवरचे पाहतो.
हल्ली काय वाचताहात/ पाहताहात?
SRD तुम्ही एव्हढी पुस्तकं
SRD तुम्ही एव्हढी पुस्तकं वाचता पण कुणी तरी सांगतं तेव्हांच येता सांगायला कि वाचलंय.
आमच्या सारख्या एकादशी पौर्णिमेला पुस्तक वाचणार्यांनाच खूप सांगावंसं वाटत असतं. उत्साह असतो ना?
रोज वाचे त्याला काय पडे?
तुम्ही तर अजून कुठल्या वेबसाईटवर जाऊन पुस्तकं वाचता ते ही सांगितलेलं नाही. माझ्यासारख्यांना भरपूर पक्वान्न समोर आली तर एकही जाणार नाही त्यामुळे दिली तरी काहीही फरक पडणार नाही.
एक प्रश्न आहे कुणीही सांगावे.
जे लोकप्रिय लेखक असतात, त्यातून बेस्टसेलर्स, ज्यांच्या कथांवर सिनेमे निघतात, त्यांचे पुस्तक वाचताना एखादा मोठ्या स्केलचा कमर्शियल सिनेमा बघतोय असे का वाटते? त्यांच्यावर कंपल्शन असते का बेस्टसेलर व्हावे याचे ?
एका पुस्तकात तर वर्णन होते कि "७० एम एम च्या पडद्यावर दरीचा क्लोज अप येत एकदम कॅमेर्याने तळ गाठावा तसे समोरचे दृश्य अंगावर आले" डॅब ब्राऊनची पुस्तकं तर ड्रामा, पाठलाग हे सर्व सिनेमा डोळ्यासमोर ठेवून लिहील्यासारखेच वाटते.
>>कुणी तरी सांगतं तेव्हांच
>>कुणी तरी सांगतं तेव्हांच येता सांगायला कि वाचलंय.>>
- नाही.
बरीच नवी पुस्तकं(मराठी) मला इथंच कळली ती नोंदवून ठेवतो आणि माझ्या नगरपालिका वाचनालयात दिसली की घेऊन वाचतो. मुख्य म्हणजे नवी मराठी पुस्तकं कोणत्याही {फुकट पुस्तक देणाऱ्या}साईटवर मिळत नाहीत. जिथे मिळतात त्या साईट्स सर्वांना माहीत आहेत. ,esahity_dot_com किंवा archive _ dot _org.
याअगोदर osmanabad university digital library >>oudl कडे बरीच होती ती त्यांनी archive कडे वर्ग केली आहेत. परंतू या तीन्ही ठिकाणी साठ वर्षे जुनी झालेलीच पुस्तके मिळतात. हल्लीच इथे दिलेल्या दोन साईट्स चांगल्या आहेत तिथून काही घेतली.
@धनश्री मायबोली.
१. http://45.248.66.173:8080/jspui/handle/123456789/1
@पाचपाटील मायबोली
२.http://archive.punenagarvachan.org/collection/10
आता प्रश्न राहिला इंग्रजी पुस्तकांचा.
>>तुम्ही तर अजून कुठल्या वेबसाईटवर जाऊन पुस्तकं वाचता ते ही सांगितलेलं नाही. >>
इथेच दोन महिन्यांपूर्वी Anna's archives बद्दल कुणीतरी सांगितलं होतं. तेव्हा ती साईट उघडून चार पुस्तकं डाउनलोड केली होती. ही साईट २०२२ साली सुरू झाली आणि इंटरनेटवर ज्या काही "shadow libraries" आहेत त्यांतून पुस्तक मिळवून देत असे. पण आता तीही बंद आहे. कारण प्रकाशक, लेखक तक्रारी करतात कॉपीराइटबद्दल आणि साईट बंद होते.
थोडक्यात सांगायचे तर shadow libraries हे सर्च केल्यावर जी नावं येतात त्यात माझ्या साईटचं नाव आहे. परंतू या साइटला पाच वर्षांत दहा वेळा सर्वर बदलावा लागला आहे. शोधा. Libgen होती ती कायमची बंद झाली. pdf download थोडी चालते. इथे थेट नाव द्यावं का नाही या विचारात आहे.
मला काही गुप्त वगैरे ठेवायचं नाही परंतू त्या साईटचा स्टुडंट्सनी खूप गैरवापर केला त्याची चर्चा रेडिटवर reddit एकदा झाली म्हणतात. कसा? तर पुस्तकांची पीडीएफ मिळाली की तिच्या फोटोकॉपीज( झेरॉक्स) काढायच्या. अरे बाबांनो तुम्हाला पुस्तक डिजिटल मिळालं ना? मग वाचा ना शंभर वेळा. कशाला प्रिंट्स काढताय? आणि हल्ली स्वस्त टॅबलेट्सही निघालेत, त्यावर वाचा. मनन करा. पुन्हा त्याचा सारांश काढायला notebookLLM वापरायचे.
असो. साईट सापडेल तुम्हाला.
ओह. हे एव्हढं मोठं प्रकरण
ओह. हे एव्हढं मोठं प्रकरण असेल माहीत नव्हतं.
तुम्ही सिरीयसली घेतलं. दिवा दिलेला ना.
CARELESS PEOPLE (Sarah Wynn
CARELESS PEOPLE (Sarah Wynn-Williams)
लेखिका फेसबुकमध्ये ७ वर्षं पब्लिक पॉलिसी डायरेक्टर होती.
ती मूळची न्यूझीलंडची. अमेरिकेत नोकरी करत असताना ख्राइस्टचर्चचा भूकंप झाला. त्यात तिचे घरचे सापडले. आई-वडिलांशी काही दिवसांत सम्पर्क झाला, पण बहीण बेपत्ता होती. पुढे बहिणीशीही संपर्क झाला तो फेसबुकच्या मदतीने.
तोपर्यंत लेखिकेला फेसबुकबद्दल फारसं माहिती नव्हतं. या निमित्ताने फेसबुकसारख्या माध्यमाची ताकद तिला समजली.
आपण इथे नोकरी करायलाच हवी असं तिच्या मनाने घेतलं.
तोवर ती डिप्लोमॅटिक क्षेत्राशी संबंधितच काम करत होती. तिच्या स्किल्सचा, 'पब्लिक पॉलिसी' या गोष्टीचा फेसबुकमध्ये काय उपयोग, मुळात गरजच काय, असं फेसबुकच्या टॉप ब्रासचं मत होतं.
पण आपल्या अनुभवाचा फेसबुकला उपयोग होईल हे तिने त्यांच्या गळी उतरवलं. त्यांच्या खनपटीला बसून तिच्यासाठी वेगळी पोस्ट निर्माण करायला लावली.
हा सगळा भाग रंजक, क्रिस्प आहे. तिच्या द्रष्टेपणाचं कौतुक वाटतं.
झुकरबर्गने आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संबंध वाढवायला हवेत हा विचार तिने पहिल्यांदा फेसबुकमध्ये मांडला. त्यासाठी जमेल तो सगळा आटापिटा केला. या टप्प्यावर पुस्तक अधूनमधून रटाळ व्हायला सुरुवात झाली. काही ठिकाणी नरेशन भरकटतं. तरी आपण पुढे वाचत राहतो.
झुकरबर्ग दावोसला जातो तेव्हा महत्वाच्या नेत्यांशी बोलता यावं, किमान शेजारी/जवळ बसून जेवता यावं यासाठी जमेल त्या /वाट्टेल त्या बारीकसारीक नाना खटपटी, लटपटी केल्या जातात. त्याचं भाषण/talk अमुक नेत्यांच्या आगेमागे ठेवावं यासाठी आर्जंवं/विनंत्या केल्या जातात. कधी त्या यशस्वी होतात, कधी नाही.
ते वाचणं म्हणजे करमणूक आहे.
आणि फेसबुकच्या दृष्टीने 'किंमत' नसणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना कशा प्रकारे डावललं जातं ते वाचून अचंबा वाटतो.
पुढे फेसबुकी नेत्यांचा दुटप्पीपणा, स्त्रीद्वेष्टेपण अशा अनेक गोष्टी येतात. बारीकसारीक तपशील, संवाद, इमेल्स, समज-गैरसमज, त्यातून लेखिकेला नोकरी सोडावी कशी लागली त्याचं वर्णन.
हा सगळा भाग नीट संपादित करून द्यायला हवा होता असं वाचताना वाटलं.
एकूण पुस्तकाचं Content चांगलं आहे. पण जरा रटाळ, पाल्हाळीक आहे.
अनेक fb posts एकत्र केल्या असाव्यात असं वाटतं.
हे पुस्तक प्रकाशित होऊ नये म्हणून फेसबुकने खूप आटापिटा चालवला होता. लेखिकेला पुस्तकाचं प्रमोशन करण्यावरही बंदी घातली होती. इतकं भयंकर काही पुस्तकात लिहिलेलं नाही. जे लिहिलंय ते सगळ्याच गब्बर माजखोर कंपन्या करतच असतात.
इंटरेस्टिंग वाटतंय पुस्तक,
इंटरेस्टिंग वाटतंय पुस्तक, प्रीति.
मला नेमकं कारण सांगता येणार नाही, पण मला फेसबुक या कंपनीबद्दल किंवा मार्क झकरबर्गबद्दल काहीच 'आदर' वाटत नाही, जसा उदाहरणार्थ गूगल आणि सर्जी ब्रिन-लॅरी पेज यांच्याबद्दल वाटतो. कदाचित सगळेच कमीअधिक प्रमाणात एकाच माळेचे मणी असतील, याची कल्पना असूनही असं वाटतं हे खरं.
फेसबुकच्या प्रायव्हेट
फेसबुकच्या प्रायव्हेट पॉलिसीला होकार देऊन आपण खाते सुरू करतो. त्यात बरंच काही आहे. दोनच पर्याय आहेत- फेसबुक चालू ठेवून शाबासक्या मिळवणे किंवा बाहेर पडणे. पण तसं होत नाही. गळ्यात माळा घालून घ्यायला कुणाला आवडत नाही? फेसबुक आलं आणि ऑर्कुट बंद पडलं.
आपण जे अव्याहत अनकॉन्शस
आपण जे अव्याहत अनकॉन्शस अनियंत्रित रितीने पुस्तकं खरेदी करून आणत होतो, ते आठवलं की मंद मंद हसू येतं. ही पोकळी पुस्तकांचे भारे आणून भरून निघणारच नव्हती. तर तो वेडेपणा अखेरीस एकदाचा थांबला. ते कंपल्शन आता उरलेलं नाही.
'सतत नवनवीन पुस्तकं कळतच राहतात. मग ह्यातली अमुकेक पुस्तकं आपल्याकडे पाहिजेतच. पाहिजे म्हणजे पाहिजेतच. आय वॉंट इट मीन्स आय वॉंट इट.! मिळेपर्यंत धोसरा काढत राहणं.' ही जी शब्द गोळा करत बसण्याची खूंखार वखवख होती, ही जी अंतहीन धडपड चाललेली होती, त्यातला फोलपणा लक्षात येतो.
पुस्तकांच्या अड्ड्यांच्या परिसरातून जाताना निरीच्छ मनानं जाऊ शकतो. आता आत जाऊ वाटत नाही. इच्छाच होत नाही. शेवटचं पुस्तक खरेदी केलं त्याला तीनेक महिने उलटून गेले. लायब्ररीत शेवटचं गेलो त्यालाही तितकेच महिने झाले. सव्वीस सत्तावीस वर्षांत बहुदा पहिल्यांदाच असं झालं की सलग तीनचार महिने मला माझं शरीर कुठल्याही लायब्ररीच्या पायऱ्या चढताना आढळलेलं नाही. ह्या सगळ्या वर्षांत बऱ्याचशा लायब्रऱ्या, सांगोला पंढरपूर कराड सातारा मुंबई पुणे, अशा वेगवेगळ्या गावच्या लायब्रऱ्या खंगाळून झाल्यानंतर आता ही सिद्धावस्था प्राप्त झालेली आहे. सोपं नव्हतं हे. पण तरीही एकाअर्थी फारच सोपं होतं.! फक्त आत एक आकस्मिक कॉग्निटीव्ह शिफ्ट घडून येतो. आणि पुस्तकांमध्ये रेफ्युज शोधण्याच्या प्रक्रियेतला बालिशपणा स्वच्छ समजून येतो. लाईक ए गिफ्ट. लाईक ए ग्रेस.
तर पुस्तकांवर डिपेंडन्सी उरली नाही. सत्याचा, फक्त एखाद्या क्षणभराचाही का होईना, रोकडा अनुभव हजारो पुस्तकांहून प्रभावी असतो, हे समजतं. अनुभवातून समजतं. आणि हे बरं असतं, असं ज्याचं त्याला आपापलं समजलेलंच बरं असतं. एरव्ही इतर कुणी सांगितलं असतं तर मी मच्छरासारखं उडवून लावलं असतं.
बाकी, कुणाला ही अवस्था प्राप्त करून घ्यायची असल्यास काही पुस्तकं (पुस्तकंच! काट्याने काटा काढण्यासाठी
) रेकमेंड करण्यात येत आहेत. (किंडलवर वाचली.
खरेदी आता मी काही करेनसं वाटत नाही, हे वरती सांगून झालेलंच आहे. )
१.There Is Nobody-- Manoj Kandhari
२.The Quiet That Watches--Naman Sharma
३. Soft Style Conscious Awakening-- Gary Crowley
४. No One Knows Anything --Shreyans Kanswa
५. Words Out of Silence-- Bok
६. The End of You -- Rich M
७. The Simulated World -- Rajesh Gaud
८. Satori Shadow Work-- Maya Astraya
९. Living Without Labels -- Dinesh
१०. In Search of the Miraculous -- P D Ouspensky
११. The Fouth Way-- P D Ouspensky
१२. The Whole Truth -- Paul Hughes
१३. Whispers On The Burning Ghat-- S. Deepanshu
१४. Why Cats Are Better Than Zen-- Yuliya Kovalenko
Compartments by Zoran
Compartments by Zoran Živković
ही कथा वाचली नाही समजली.
कुणी वाच्गली आहे का,
नाही. Impossible stories
नाही वाचली.
Pages