अन हॅपीनेस ईंडेक्स

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 June, 2016 - 14:43

ऑफिसमध्ये आज कोणीतरी काहीतरी डिजाईन चुकवले. ज्याचा भुर्दंड आमच्या सर्व टीमला भोगावा लागणार होता. गेले पाचसहा दिवसांची मेहनत पाण्यात गेली होती. नव्याने तीन दिवस त्यातच वाया घालावे लागणार होते. साला ईथे ईंजिनिअरचे अर्धे अधिक आयुष्य रिवर्कमध्येच जाते. जर देवाने तुम्हाला शंभर वर्षाचे आयुष्य दिले असेल आणि तुम्ही चुकून ईंजिनीअर झालात तर टेक्निकली तुम्ही ८० वर्षच जगतात. कारण आयुष्याची २० वर्षे एकदा केलेले काम रीपीट करण्यातच जातात. तर ते एक सोडा. या गोंधळाचा सुगावा लागल्यानंतर काही त्रस्त जीव सुट्टा मारायला टपरीवर गेले. त्यातले काही जण चैतन्यकांडी अंगात थोडेफार चैतन्य भरेल या आशेने गेले, तर काही जण नव्या जोमाने पुन्हा काम करण्यासाठी ताजेतवाने होण्यास चहा प्यायला गेले.

मी एक त्रस्त जीव सुखाच्या शोधात गूगलमहाराजांना शरण गेलो. "हाऊ टू बीकम हॅपी" असे काहीतरी ईंग्रजीमध्ये शोधून सुखी होऊया म्हटले आणि हॅप्पी शब्द टाईपताच अलिबाबाची गुहा उघडून त्यातून "हॅपीनेस ईंडेक्स" नावाचे रत्न बाहेर आले. मी भारतीय असल्याचे गूगलने अचूक ओळखत भारतीयांच्या हॅपीनेस ईंडेक्सबद्दलची एक बातमी पहिल्याच पानावर झळकावली. आणि त्यावर क्लिक करताच.....
मला एक मनोरंजक, धक्कादायक, शरमेची आणि लांच्छनास्पद बातमी वाचायला मिळाली.

१) मनोरंजक अश्यासाठी की हॅपीनेस ईंडेक्स असा काहीसा प्रकार असतो ज्यात एखाद्या देशातील लोकांचे सुखसमाधान मोजले जाते हे मला पहिल्यांदाच समजले.

२) धक्कादायक यासाठी की त्या हॅपीनेस ईंडेक्समध्ये भारताचा आणि भारतीयांचा क्रमांक ११८ वा होता. आपण भले इथे अच्छे दिन आले आणि मेरा देश बदल रहा है असे कोकलत असलो तरी वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या 2-3 वर्षांत या हॅपीनेस ईण्डेक्स मधील आपली क्रमवारी घसरत ११३ वरून ११८ वर पोहोचली आहे.

३) शरमेची यासाठी की कामानिमित्त ज्या गोर्‍या लोकांशी माझे दररोज बोलणे होत असते आणि कॉल झाल्यावर ज्यांची आम्ही इथे यथेच्छ टिंगल उडवत असतो, ते तिथे टॉप टेनमध्ये नांदत होते. त्यामुळे ते जेव्हा हॅपीनेस इंडेक्स नावाचा प्रकार चेक करतील तेव्हा आपली किती टिंगल उडवतील या कल्पनेनेच माझे पाणीपाणी झाले.

आणि सरतेशेवटी,
४) लांच्छनास्पद यासाठी की पाकिस्तान सुद्धा आपल्या आधी ९२ व्या क्रमांकावर विराजमान आहे. एवढेच नव्हे तर आपण चक्क बांग्लादेशच्याही मागे आहोत. बस्स हे जेव्हा मला समजले त्या क्षणीच, फाळणीनंतर सीमेपलीकडच्या लोकांपेक्षा आपण जास्त खुश आहोत हा माझा भ्रम अगरबत्तीच्या राखेसारखा कोसळून पडला.

गंमत बघा, जेव्हा मी हि बातमी माझ्या सहकार्‍यांना दाखवली तेव्हा ते खळाळून हसू लागले. आणि ईथे मी विचारात पडलो कश्यावरही हसू शकणारी ही जमात आपली, मग हा हॅपीनेस ईंडेक्स नक्की कश्याच्या आधारावर ठरवला जातो..

बातमी चाळली, त्यातून खालील निकष सापडले..

1. real GDP per capita
2. social support
3. healthy life expectancy
4. freedom to make life choices
5. generosity
6. perceptions of corruption.

बघा जरा. ईंग्लिशमध्ये सापडलेय. कोणाला काही समजतेय तर. मलाही समजवा. खरेच अच्छे दिन यायला आणि आपला हॅपीनेस ईण्डेक्स वाढवायला नक्की काय करावे लागेल. ईथे यावरच चर्चा अपेक्षित आहे.

बाकी मला सापडलेलं, समजलेलं आणि पटलेलं कारण म्हणजे enequality.. विषमता. मग ती आर्थिक असो वा सामाजिक. आणि यातून निर्माण होणारा असंतुष्टपणा. जो कोणाला कधीच हॅपी ठेवू शकत नाही. आणि हा असंतुष्टपणा कायम राहील याची काळजी आपले मायबाप सरकार नेहमीच घेत असते. मग ते सरकार कोणतेही असो.

पण चूक आपलीही आहेच की.. आपल्या घरात आपले पोर उपाशी आहे याची चिंता न करता आपण शेजारच्या घरात बोकड शिजतेय की बैल यात रस घेऊ लागलो तर त्याचा फायदा उचलला जाणारच.. असो, उगाच विषय कुठून कुठे जायचा.. एंजॉय अनहॅपीनेस ईंडेक्स Happy

....

https://en.wikipedia.org/wiki/World_Happiness_Report
http://www.hindustantimes.com/india/india-ranked-118th-in-un-s-world-hap...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासा, छान चर्चा .. परत सुरु करावी हि विनंति.

ऋन्मेऽऽष,

बाकिच्या देशांबद्दल माहित नाही पण रवांडा बद्दलची विधाने मला खरी वाटत नाहीत. माझा या देशाशी रोजचा संबंध येतो. त्यामूळे एकंदर या माहितीच्या विश्वासार्हतेबद्दल शंका येतेय. मूळात असे निष्कर्श काढताना, किती व्यापक आणि खोलवर अभ्यास केला जातो, त्या बद्दल तरी कोण खात्रीने सांगू शकेल ?

अर्थात हे सगळ्याच बाबतीत खरे आहे रे, म्हणजे हे बघ एखादी मुलगी विश्व सुंदरी ठरवली जाते, त्यावेळी त्या वर्षी, त्या स्पर्धेत भाग घेतलेल्यांपैकी, त्या स्पर्धेच्या परिक्षकांच्या मते.... वगैरे असते ना, तसेच हे.

आजच हे खालचं व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड वाचलं आणि मायबोलीवरच्या हिंदीत्ववादी चिकटबुक पंडिता जपानी ताईंची आठवण झाली. जपानबद्दलची ही रोचक (खखोदेजा) माहिती आपणही वाचा आणि त्यावरुन जपानच्या हॅपीनेक्स इंडेक्स मधील ५३ व्या स्थानाची सांगड घाला.

आज हम जापान से जुड़े,कुछ रोचक तथ्य बताएंगे !! जो शायद आप न जानते हों! !।

  1. आज हम जापान से जुड़े,कुछ रोचक तथ्य बताएंगे !! जो शायद आप न जानते हों! !।
  2. जापान में हर साल लगभग 1500 भुकंम्प आते हैं! !मतलब कि हर दिन चार !!
  3. मुसलमानों को “नागरिकता” न देने वाला,"जापान"अकेला राष्ट्र है।
  4. यहाँ तक कि,"मुसलमानों"को जापान में,किराए पर मकान भी नहीं मिलता।
  5. जापान के किसी "विश्वविद्यालय"में"अरबी"या अन्य कोई"इस्लामी भाषा",नहीं सिखाई जाती।!!
  6. कुत्ता पालने वाला,प्रत्येक जापानी नागरिक,उसे घुमाते समय, अपने साथ एक विशेष बैग रखता है !! जिसमें वह उसका मल,"एकत्रित" कर लेता है।!
  7. जापान में,10 साल की उम्र होने तक, बच्चों को, कोई"परीक्षा" नहीं देनी पड़ती।
  8. जापान में "बच्चे,"और "अध्यापक"एक साथbhule र, Classroom को साफ करते हैं ।
  9. जापान के लोगों की,औसत आयु दुनियां में सबसे ज्यादा है !! (82 साल).
  10. जापान में,100 साल से ज्यादा उम्र के,50,000 लोग हैं! !।
  11. जापान के पास,किसी प्रकार के"प्राकृतिक संसाधन"नहीं हैं! !
  12. और वे प्रतिवर्ष,"सैंकड़ों भूकंप" भी, झेलते हैं !! किन्तु उसके बाद भी, "जापान दुनिया" की दूसरी सबसे बड़ी,"आर्थिक शक्ति" है!!।
  13. “Sumo” जापान की,सबसे "लोकप्रिय"खेल है !!इसके इलावा बेसबाल भी, काफी लोकप्रिय है !!
  14. जापान में,सबसे ज्यादा लोग पढ़े लिखे हैं! !जहां साक्षरता दर,100% है !!
  15. जहां,अखबारों और न्युज चैनलों में,भारत की तरह,दुर्घटना, राजनीति, वाद-विवाद, फिल्मी मसालों,आदि पर,खबरे नहीँ छपती !!
  16. यहां पर,अखबारों में,आधुनिक जानकारी और आवश्क खबरें ही छपती हैं !!!
  17. जापान में,जो किताबें प्रकाशित होती हैं !! उन में से 20% Comic Books होती हैं !!
  18. जापान में,नववर्ष का स्वागत,"मंदिर"में 108 घंटियाँ बजा कर,किया जाता है।!!
  19. जापानी,समय के बहुत पक्के हैं! ! यहां तो ट्रेने भी,"ज्यादा से ज्यादा" "18 सैकेंड"लेट होती हैं! !।
  20. “Vending Machine”, वह मशीन होती है !! जिसमें सिक्का डालने से,कोई चीज आदि,निकल आती है !! जेसे कि, noodles,अंडे, केले,आदि !!
  21. जब आप,जापान में होगे तो, इन मशीनों को हर जगह,पाएँगे !!यह हर सड़क पर होती हैं !!जापान में लगभग "55 लाख वेंडिंग मशीन" हैं! !।
  22. जापान में, देर रात,तक "नाचना"मना है।
  23. जापान में, एक ऐसी बिल्डिंग भी है,जिसके बीच से"हाइवे", गुजरता है।
  24. जापान चारों और से,"समुंदर"से घिरा होने के बावजूद, भी 27 प्रतीशत मछलियां,दूसरे देशों से मंगवाता है !!
  25. "काली बिल्ली"को,जापान में,"भाग्यशाली"माना जाता है।
  26. जापान में, 90% “Mobile WaterProof” हैं! !क्योकिं,ये लोग नहाते समय भी,फोन यूज करते हैं! !।
  27. जापान में,70 तरह की “fanta” मिलती हैं! !।
  28. जापान में,सबसे ज्यादा सड़के ऐसी हैं, जिनका कोई नाम नहीं है।
  29. जापानियो के पास, “Sorry” कहने के,20 से ज्यादा तरीके हैं ।
  30. जापान,दुनिया का सबसे बड़ा,"आॅटोमोबाइल"निर्माता है।
  31. साल 2011 में,जापान में जो "भूकंप"आया था !! वह आज तक का,सबसे तेज भूकंप था।
  32. इस भूकंप से,पृथ्वी के “घूमने की गति” में, 1.8 microseconds की वृद्धि हुई थी।
  33. जापान,दुनिया का केवल एकलौता देश है!! जिस पर “परमाणु बमों” का हमला हुआ है !!
  34. जैसा कि,आप जानते ही हैं कि, अमेरिका ने,6 और 9 अगस्त 1945 में,"हीरोशिमा और नागाशाकी"पर, बम फेंके थे !!
  35. इन बमों को,"little-boy"और "Fat-man"नाम दिया गया था !!
  36. "जापान में इस्लाम पंथ"नहीं होने के कारण,वहाँ"स्लीपर सेल"नहीं हैं !! और वहाँ एक भी,"आतंकी वारदात"नहीं हुई है।!!

हॅप्पी इन्डेक्स...मला वाटतं ज्या देशांतील लोक वर्कोहोलीक असतात त्यांचा हॅप्पी इन्डेक्स जास्त असेल. आणि भारतात जो तो आपले काम टाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि भारत हॅप्पी जेव्हा होईल तेव्हा होईल. देशातील प्रत्येक माणसाने ठरवले आपण हॅप्पी रहायचे तर आपोआपच देश हॅप्पी होईल. आणि कोणताही माणूस २४ तास १२ महीने हॅप्पी राहू शकत नाही. त्यामुळं डिप्रेशन सुद्धा कधी कधी गरजेचं असत

हॅप्पी इन्डेक्स...मला वाटतं ज्या देशांतील लोक वर्कोहोलीक असतात त्यांचा हॅप्पी इन्डेक्स जास्त असेल. आणि भारतात जो तो आपले काम टाळण्याचा प्रयत्न करत असतो. आणि भारत हॅप्पी जेव्हा होईल तेव्हा होईल. देशातील प्रत्येक माणसाने ठरवले आपण हॅप्पी रहायचे तर आपोआपच देश हॅप्पी होईल. आणि कोणताही माणूस २४ तास १२ महीने हॅप्पी राहू शकत नाही. त्यामुळं डिप्रेशन सुद्धा कधी कधी गरजेचं असत

आणि याचा संदर्भ मोदी सरकारशी जोडल्या जाण्याचा प्रश्नच नाही. रस्त्यावरचा भिकारी आज दहा रुपये जास्त मिळाले म्हणून हॅप्पी असू शकतो तर एखादा कोट्यवधी संपत्ती असलेला उद्योजक दहा कोटींची डील गेली म्हणून अन हेपी असेल. त्यामुळं पैसा हा हॅप्पीनेस मोजण्याचे परिमाण नाही. आणि हा सर्वे कोणी केला ? सर्वे करताना ते हॅप्पी होते का ? हे पडताळणी करण गरजेचं आहे.

आणि याचा संदर्भ मोदी सरकारशी जोडल्या जाण्याचा प्रश्नच नाही. >> खरंच?

नुकताच आलेली आकडेवारी पहा. भारत क्रमवारीत थेट ११२ व्या स्थानावर घसरलाय. चीन अन पाकिस्तान तिकडे सुखाने ७९-८० व्या स्थानावर पाठशिवणी खेळताहेत. भारतात नसले तरी आकडेवारीनुसार पाकिस्तानात "अच्छे दिन" मात्र नक्कीच आलेले दिसताहेत.

थांबा लव्करच मोदी सरकार स्वतःच्या अ‍ॅप्लिकेशन वरुन जनमत संग्रहित करेल आणि निष्कर्ष जगापुढे ठेवतील. तोच खरा निष्कर्ष.

छान चर्चा झाली आहे इथे
आज ही पोस्ट वाचली आणि हा धागा आठवला
..........

*The World Happiness Report 2026*,
released on March 20, 2026, marks Finland as the world's happiest country for the ninth consecutive year, followed by Iceland, Denmark, and Costa Rica.

*India ranked 116th out of 147 countries*,
a slight improvement from 118th in 2025, with Afghanistan remaining the least happy.

*Top 10 Happiest Nations*: 1. Finland, 2. Iceland, 3. Denmark, 4. Costa Rica, 5. Sweden, 6. Norway, 7. Netherlands, 8. Israel, 9. Luxembourg, 10. Switzerland.

*India's Position:* India ranked 116th with a life evaluation score of 4.536, trailing neighbors like Nepal (99th) and Pakistan (104th).

*Key Factors:* The report analyzes six factors—GDP per capita, social support, healthy life expectancy, freedom to make life choices, generosity, and perceptions of corruption.

*Key Themes:* The 2026 report particularly highlights the impact of social media on youth well-being and a decline in happiness among young people in Western nations.

*Bottom Countries:* Afghanistan ranks last (147th), followed by Sierra Leone, Malawi, and Zimbabwe.

Pages