अन हॅपीनेस ईंडेक्स

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 June, 2016 - 14:43

ऑफिसमध्ये आज कोणीतरी काहीतरी डिजाईन चुकवले. ज्याचा भुर्दंड आमच्या सर्व टीमला भोगावा लागणार होता. गेले पाचसहा दिवसांची मेहनत पाण्यात गेली होती. नव्याने तीन दिवस त्यातच वाया घालावे लागणार होते. साला ईथे ईंजिनिअरचे अर्धे अधिक आयुष्य रिवर्कमध्येच जाते. जर देवाने तुम्हाला शंभर वर्षाचे आयुष्य दिले असेल आणि तुम्ही चुकून ईंजिनीअर झालात तर टेक्निकली तुम्ही ८० वर्षच जगतात. कारण आयुष्याची २० वर्षे एकदा केलेले काम रीपीट करण्यातच जातात. तर ते एक सोडा. या गोंधळाचा सुगावा लागल्यानंतर काही त्रस्त जीव सुट्टा मारायला टपरीवर गेले. त्यातले काही जण चैतन्यकांडी अंगात थोडेफार चैतन्य भरेल या आशेने गेले, तर काही जण नव्या जोमाने पुन्हा काम करण्यासाठी ताजेतवाने होण्यास चहा प्यायला गेले.

मी एक त्रस्त जीव सुखाच्या शोधात गूगलमहाराजांना शरण गेलो. "हाऊ टू बीकम हॅपी" असे काहीतरी ईंग्रजीमध्ये शोधून सुखी होऊया म्हटले आणि हॅप्पी शब्द टाईपताच अलिबाबाची गुहा उघडून त्यातून "हॅपीनेस ईंडेक्स" नावाचे रत्न बाहेर आले. मी भारतीय असल्याचे गूगलने अचूक ओळखत भारतीयांच्या हॅपीनेस ईंडेक्सबद्दलची एक बातमी पहिल्याच पानावर झळकावली. आणि त्यावर क्लिक करताच.....
मला एक मनोरंजक, धक्कादायक, शरमेची आणि लांच्छनास्पद बातमी वाचायला मिळाली.

१) मनोरंजक अश्यासाठी की हॅपीनेस ईंडेक्स असा काहीसा प्रकार असतो ज्यात एखाद्या देशातील लोकांचे सुखसमाधान मोजले जाते हे मला पहिल्यांदाच समजले.

२) धक्कादायक यासाठी की त्या हॅपीनेस ईंडेक्समध्ये भारताचा आणि भारतीयांचा क्रमांक ११८ वा होता. आपण भले इथे अच्छे दिन आले आणि मेरा देश बदल रहा है असे कोकलत असलो तरी वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या 2-3 वर्षांत या हॅपीनेस ईण्डेक्स मधील आपली क्रमवारी घसरत ११३ वरून ११८ वर पोहोचली आहे.

३) शरमेची यासाठी की कामानिमित्त ज्या गोर्‍या लोकांशी माझे दररोज बोलणे होत असते आणि कॉल झाल्यावर ज्यांची आम्ही इथे यथेच्छ टिंगल उडवत असतो, ते तिथे टॉप टेनमध्ये नांदत होते. त्यामुळे ते जेव्हा हॅपीनेस इंडेक्स नावाचा प्रकार चेक करतील तेव्हा आपली किती टिंगल उडवतील या कल्पनेनेच माझे पाणीपाणी झाले.

आणि सरतेशेवटी,
४) लांच्छनास्पद यासाठी की पाकिस्तान सुद्धा आपल्या आधी ९२ व्या क्रमांकावर विराजमान आहे. एवढेच नव्हे तर आपण चक्क बांग्लादेशच्याही मागे आहोत. बस्स हे जेव्हा मला समजले त्या क्षणीच, फाळणीनंतर सीमेपलीकडच्या लोकांपेक्षा आपण जास्त खुश आहोत हा माझा भ्रम अगरबत्तीच्या राखेसारखा कोसळून पडला.

गंमत बघा, जेव्हा मी हि बातमी माझ्या सहकार्‍यांना दाखवली तेव्हा ते खळाळून हसू लागले. आणि ईथे मी विचारात पडलो कश्यावरही हसू शकणारी ही जमात आपली, मग हा हॅपीनेस ईंडेक्स नक्की कश्याच्या आधारावर ठरवला जातो..

बातमी चाळली, त्यातून खालील निकष सापडले..

1. real GDP per capita
2. social support
3. healthy life expectancy
4. freedom to make life choices
5. generosity
6. perceptions of corruption.

बघा जरा. ईंग्लिशमध्ये सापडलेय. कोणाला काही समजतेय तर. मलाही समजवा. खरेच अच्छे दिन यायला आणि आपला हॅपीनेस ईण्डेक्स वाढवायला नक्की काय करावे लागेल. ईथे यावरच चर्चा अपेक्षित आहे.

बाकी मला सापडलेलं, समजलेलं आणि पटलेलं कारण म्हणजे enequality.. विषमता. मग ती आर्थिक असो वा सामाजिक. आणि यातून निर्माण होणारा असंतुष्टपणा. जो कोणाला कधीच हॅपी ठेवू शकत नाही. आणि हा असंतुष्टपणा कायम राहील याची काळजी आपले मायबाप सरकार नेहमीच घेत असते. मग ते सरकार कोणतेही असो.

पण चूक आपलीही आहेच की.. आपल्या घरात आपले पोर उपाशी आहे याची चिंता न करता आपण शेजारच्या घरात बोकड शिजतेय की बैल यात रस घेऊ लागलो तर त्याचा फायदा उचलला जाणारच.. असो, उगाच विषय कुठून कुठे जायचा.. एंजॉय अनहॅपीनेस ईंडेक्स Happy

....

https://en.wikipedia.org/wiki/World_Happiness_Report
http://www.hindustantimes.com/india/india-ranked-118th-in-un-s-world-hap...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दरडोई उत्पन्न किंवा पैसा हे सुख मोजण्याचे परीमाण असू शकत नाही हे सर्वांकडे किमान गरजा भागवण्याईतका पुरेसा पैसा असल्यावर सुचणारी फिलॉसॉफी आहे. प्रॅक्टीकली तसे नसते.

भारताबद्दल बोलायचे झाल्यास यात आणखी एक मुद्दा म्हणजे आपल्याक्डे पैसा बघून त्यानुसार एखाद्याला सन्मानही मिळतो (याला जबाबदार वर नमूद केलेली आर्थिक विषमता आहे) त्यामुळे पुरेसा पैसा असणार्यांनाही तो आणखी हवा असतो.

ऋन्मेष तुझी पोस्ट बरोबर आहे, म्हणूनच मी म्हणतोय कि पैसा किंवा पैशाशी संबधित कोणतीही मापदंड सुख मोजण्यात वापरला जाऊ नये. तो किती असला म्हणजे पुरेसा हे कसे ठरविणार? ते सापेक्ष आहे.

प्रत्येक मनुष्याच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हायला हव्यात यात काही वाद नाहीच. आपण त्यापुढे बोलत आहोत ना?

येथे क्लिष्ट अर्थशास्त्रीय संज्ञा आलेल्या पाहून घाबरलो. उत्पन्नाचा सुखाशी संबंध लावणे योग्य वाटत नाही. दु:खाशी मात्र लावता येतो, अगदी मल्ल्याइतके (एकेकाळचे) उत्पन्न असले तरीही!

भूतानबाबत -

प्रदुषण अत्यल्प. लोकसंख्या कमी. निसर्गसौंदर्य अफाट. औद्योगिकीकरण अल्प. राहणीमानाबाबत चढाओढीची वृत्ती नाही. कायदे पाळण्याची वृत्ती. संसाधने पुरत असल्यामुळे किमान गरजा भागलेल्या. तणावमुक्त जीवनशैली. बहुतांशींना रोजगार उपलब्ध. उच्चनीच भेदभाव नाही. शिक्षणसंस्थांचा बाजार नसणे व शिक्षण ही स्पर्धा नसणे. रुग्णालयातील सेवा सवलतींमध्ये. स्मोकिंगला परवानगी नाही. राजाचे देशावर संपूर्ण नियंत्रण.

परिणामः

शांत, हसरे चेहरे. आपण बरे, आपले काम बरे अशी वृत्ती. पाश्चात्यांचे 'अंधानुकरण' नाही. स्वच्छता. नैसर्गीक संसाधने पोटभर.

(अवांतर - ह्या गोष्टीचा काही संबंध आहेच असे म्हणायचे नाही, पण मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे असे गाईडने सांगितले)

थोडक्यात, भारतात आपण सहन करतो त्यातले बहुतांशी ताण तेथे नगण्य असतात किंवा नसतातच. स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. बहुतेक स्त्रियांना कामे आहेत. हे एक वेगळे!

माझ्या माहितीनुसार 'वर्ल्ड बँक' पूर्वी देशाच्या विकासाची पातळी 'जीडीपी' वरूनच ठरवत असे. पण तें चूकीचं आहे हें लक्षात आल्यावर 'जीडीपी'शिवाय प्राथमिक सुविधा, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा, व्यक्ती स्वातंत्र्य इ.इ.च्या उपलब्धतेचे अनेक निकष आतां यासाठीं लावले जातात. 'जीडीपी' देशाचं केवळ 'ग्रॉस' उत्पन्न दाखवतो; त्याचंं न्याय्य वांटप व विनियोग होतोय का, हें नाही दाखवत. हें झालं विकासाची पातळी ठरवण्याबाबत. विकासाचं व 'हॅपिनेस'चं गणित मांडणं ही तर त्याच्याही पुढची पायरी.

(अवांतर - ह्या गोष्टीचा काही संबंध आहेच असे म्हणायचे नाही, पण मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे असे गाईडने सांगितले)
<<

अहो बेफिकीर साहेब,

India ranked 118th, down from 117th in 2015.

The report said that India was among the group of 10 countries witnessing the largest happiness declines along with Venezuela, Saudi Arabia, Egypt, Yemen and Botswana.

India comes below nations like Somalia (76), China (83), Pakistan (92), Iran (105), Palestinian Territories (108) and Bangladesh (110).

यात बोल्ड केलेले देश शुद्ध मुस्लिम देश आहेत. याला अर्थ आहे का काही? की उगंच कुठेही ओढून ताणून आपला हिंदुत्वप्रणित धर्मद्वेष दाखवतच फिरायचं?

Disgusting how people like you keep spreading communal hatred, under disguise of polite words.

तुम्ही 'जे काय आणि कोणी असाल ते',

ती गोष्ट मी 'अवांतर' ह्या सदरात लिहिलेली आहे. तसेच, त्याचा हिंदुत्वाशी नव्हे तर बौद्धधर्मियांनी घेतलेल्या निर्णयाशी संबंध आहे हे तुम्हाला 'सध्या' समजणे अवघड आहे ह्याची नम्र कल्पना आहे. तेव्हा, येऊद्यात अजून!

बरोबर.

जीडीपी सारख्या 'क्लिष्ट' अर्थशास्त्रीय संकल्पना पाहून घाबरण्याइतकीच तुमच्या बुद्धीमत्तेची झेप आहे, हे तुम्हीच कबूल केले आहे. प्लस, तुमच्या कल्पना व भाषा "नम्र" आहेत, हेसुद्धा मी आधीच लिहिलं आहे.

'सध्या' चालू द्या तुमचं.

प्रत्येक ठिकाणी 'विषयाला धरून लिहा' अशा नम्र विनंत्या करत फिरणारे तुम्ही मात्र असल्या अवांतरांचे पो(स्ट्स) ओढून ताणून टाकत फिरता, हे हास्यास्पद नाही का?

पण समजणेबल आहे. तिकडे सध्या 'वेळ' झाली असेल नाही? Wink

साहेब,

>>
(अवांतर - ह्या गोष्टीचा काही संबंध आहेच असे म्हणायचे नाही, पण मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे असे गाईडने सांगितले)

थोडक्यात, भारतात आपण सहन करतो त्यातले बहुतांशी ताण तेथे नगण्य असतात किंवा नसतातच.
<<

Rofl

आता हे लिहिणार्‍याला उद्देशून बोलू नको, तर कुणाला बोलू? तुमचा दूषीत दृष्टीकोण निदर्शनास आणणे = वैयक्तिक टीका, असे समिकरण आहे का?

चर्चा हॅपिनेस इंडेक्सची सुरू आहे. मधेच बीचमे मेरा चाँदभाई करत ही असली वाक्ये पेरायची. वरून मानभावीपणे 'अवांतर' आहे म्हणायचे.

यक्स!

भूतान प्रामुख्याने बौद्धधर्मीय देश आहे.

<<

आयला! कस्ला अभ्यासू प्रतिसाद! तुमच्या वाचन व अभ्यासाला दंडवत, व माहितीबद्दल धन्यवाद, बेफिकीरजी.

तिथले गाईड येताजाता सगळ्याच रँडम टुरिस्टांना विदाउट काँटेक्स्ट, 'इथे आम्ही मुसलमानांना सहसा नागरिकत्व देत नाही' असं सांगत फिरतात असं दिसतंय! हाऊ नाईस ऑफ देम. पर्फेक्टली लॉजिकल.

जौद्या. तुम्हाला 'सध्या' समजणार नाही. कधीतरी नंतर प्रयत्न करीन.

जाता जाता, तुम्हाला क्लिष्ट संज्ञांची भीती वाटते व लेखही इंग्रजीत आहे, पण जमलं तर वाचायचा प्रयत्न करा.
http://www.firstpost.com/world/the-ethnic-cleansing-hidden-behind-bhutan...

त्या लेखातून हे उर्धृत :

/quote

Vidhyapati Mishra is the managing editor of the Bhutan News Service. Mishra is a Bhutanese journalist who lives in Nepal, awaiting resettlement. In the latest account of the atrocities against the Lhotshampa in the early nineties, Mishra has written about his and his family’s expulsion from Bhutan in the New York Times. “My father was held for 91 days in a small, dank cell,” remembers Mishra. “They pressed him down with heavy logs, pierced his fingers with needles, served him urine instead of water…they burned dried chilies in his cell to make breathing unbearable. He agreed eventually to sign what were called voluntary migration forms and was given a week to leave the country our family had inhabited for four generations.”

/unquote

मजसारख्या अर्धशिक्क्षिताच्या मते, मिश्र/मिश्रा हे कॉमन मुस्लिम आडनांव आहे. बरोबर ना?

xx.jpg

बेफि,

चक्क शब्द फिरवलेत तुम्ही! क्या बात है. शाब्बास!!! :टाळ्या वाजवणारी व्हॉट्सॅप स्मायली:

The real appeal of Bhutan is that we feel human," says Tshewang Dendup, a graduate of the documentary film program at the University of California, Berkeley, who now works at the Bhutan Broadcasting Service. "Maybe we are somewhat isolated from the world, but we feel part of a living community that is not just connected by wires. That's why 95 percent of us exchange students return home. By and large, you would have to say people are happy here."

वरील लिंकेतून

But "one way or another, change is coming," King Wangchuck told the former New York Times South Asia correspondent Barbara Crossette a few years ago. "Being a small country, we do not have economic power. We do not have military muscle. We cannot play a dominant international role, because of our small size and population and because we are a landlocked country. The only factor we can fall back on . . . which can strengthen Bhutan's sovereignty and our different identity is the unique culture we have." And so the government has kept a tight grip on matters of culture, which have grown out of the Drukpa Kagyu lineage of Tantric Mahayana Buddhism. In 1999, only 7,000 foreign visitors were granted visas, and for 2000 the figure rose only to 7,559

वरील लिंकेतून Happy

We have a saying in Bhutan: 'If it is medicine, you should take it from an enemy. But if it is poison, you should refuse it from a friend.'"

>>>

मस्त

वर छान चर्चा चालू होती. मध्येच का सोडली. मला वाटलेले आता शतक करूनच थांबाल Happy

असो, खालील बातमी पहा.
ईथेही हॅपीनेस ईण्डेक्स घसरत असेलच ..
..

जीन्स घालणाऱ्या मुलींना कॉलेज प्रवेशापासून रोखले
http://dhunt.in/1gYVk
via NewsHunt.com

भूतानबाबत -

प्रदुषण अत्यल्प. लोकसंख्या कमी. निसर्गसौंदर्य अफाट. औद्योगिकीकरण अल्प. राहणीमानाबाबत चढाओढीची वृत्ती नाही. कायदे पाळण्याची वृत्ती. संसाधने पुरत असल्यामुळे किमान गरजा भागलेल्या. तणावमुक्त जीवनशैली. बहुतांशींना रोजगार उपलब्ध. उच्चनीच भेदभाव नाही. शिक्षणसंस्थांचा बाजार नसणे व शिक्षण ही स्पर्धा नसणे. रुग्णालयातील सेवा सवलतींमध्ये. स्मोकिंगला परवानगी नाही. राजाचे देशावर संपूर्ण नियंत्रण.>>>>>>>
स्मोकिंगला परवानगी नाही.??? आणि दारुला? कारण मी खरंच तिथे जाण्याचा विचार करत होतो ब्रेक साठी....

माझे चार पैसे

  • Happiness is highly subjective
  • अगदी एकाच व्यक्तिच्या आवडीनिवडी देखिल बदलत रहातात
  • The law of diminishing marginal utility is applicable to happiness
  • Happiness is a journey, not a destination
  • Happiness is more qualitative in nature than quantitative

म्हणुन मी अख्ख्या देशाचा हॅपीनेस ईंडेक्स मोजण्याबद्दल थोडा साशंक आहे

माझ्या मते काही अन्न, वस्त्र, आरोग्य इत्यादी मूलभूत गरजा भागल्या तरीही आणखी काही मुद्दे की जे आपल्या दैनंदिन जीवनातील समाधानावर परिणाम करतात. जसे की
१) जे माझे रोजचे काम आहे, त्यातून मला किती समाधान मिळते ?
२) माझ्या अपेक्षा/इच्छा पूर्ण होतील असे वातावरण आपल्या आजूबाजूस आहे का ?
३) कुठलाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि संधी मला उपलब्ध होतात का ?
४) माझ्या मुलाबाळांना सद्य परिस्थितीत वाढवावे, असे मला वाटते का ?

यादी अजूनही बरीच वाढवता येईल. मूलभूत गरजांबाबतीत बरी परिस्थिती असली तरी, वरील काही मुद्यांवर आपल्याकडे आनंदी आनंदच आहे.

माझ्या मते happiness index नुसार देशाची वर्गवारी करताना नागरिकांना वरील प्रश्न जरूर विचारले जात असावेत/जायला हवेत.

विलभ छान मुद्दे उचललेत..
सध्या बिजी असल्याने रुमाल

ऋन्मेष ने दिलेल्या https://en.wikipedia.org/wiki/World_Happiness_Report या लिंक वर काही मजेशीर गोष्टी कळल्या.

  1. सोमालिया दरडोई उत्पन्नात सगळ्यात तळाला आहे. पण फ्रीडम टू मेक लाईफ चॉईसेस मधे अकरावा नंबर आहे
  2. जनरॉसिटी मधे ग्रीस तळाला तर रशिया शेवटुन तिसरा आहे. म्यानमार, थायलंड आणि इंडोनेशिया हे देश जनरॉसिटी मधे टॉपला आहेत
  3. फ्रीडम टू मेक लाईफ चॉईसेस मधे ग्रीस शेवटुन चौथा आहे
  4. ट्रस्ट / भ्रष्टाचाराचा अभाव यामधे रवांडा पहील्या क्रमांकावर आहे
  5. गेल्या वर्षभरात happiness index सगळ्यात जास्त घसरणार्‍या देशांमधे भारत सातव्या क्रमांकावर आहे. या यादीत ग्रीसचा पहीला क्रमांक येतो.

टग्या, ईंटरेस्टींग शोधकाम केलेत.
भारतापुरते बोलायचे झाल्यास,

5.गेल्या वर्षभरात happiness index सगळ्यात जास्त घसरणार्‍या देशांमधे भारत सातव्या क्रमांकावर आहे.

हे का? म्हणजे नक्की यातल्या कुठल्या निकषात आपण गंडल्यामुळे झालेय हे बघायला हवे.
भले हे हॅपीनेसशी रिलेटेड आहे की नाही हा वेगळा मुद्दा झाला. पण त्यानिमित्ताने झालेल्या सर्वेक्षणाचे आकडे तर आपल्या हाती आहेत.

Pages