Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>> असू द्या की वो,
>> असू द्या की वो,
घर भरल्यासारखं वाटतं. <<
म्हणजे तुम्ही देखील त्यांना समृद्ध अडगळच मानता तर. आवाजाचा इको येऊन नये म्हणून जरूरीपुरती अडगळ ठीक आहे पण हे समृद्ध वगैरे नको बाबा.
>>> आवाजाचा इको येऊन नये
>>> आवाजाचा इको येऊन नये म्हणून जरूरीपुरती अडगळ ठीक आहे
हे आवडण्यात आलेलं आहे, लक्षात राहील!
हेमा वेलणकर म्हणजेच
हेमा वेलणकर म्हणजेच मायबोलीच्या मनीमोहर यांचं मोहर हे पुस्तक वाचनालयात मिळालं.
महेश केळुस्करांची प्रस्तावना बी ए च्या पाठ्यपुस्तकासाठी लिहिल्यासारखी आहे.
यातले काही लेख मी मायबोलीवर आणि काही लोकसत्ता वास्तुरंग पुरवणीत वाचले होते. तरीही पुन्हा आणि सलग वाचताना मजा आली. प्रस्तावनेत मायबोलीचा उल्लेख अपेक्षितच होता. वास्तुरंग पुरवणीही नियमित वाचल्याने पुस्तकाशी दुहेरी कनेक्शन जुळलं.
सुरुवातीच्या लेखांत नवखेपणा जाणवतो. पण पुढचे लेख वाचकाशी संवाद साधल्यासारखे, त्याला आपले घर - परिसर दाखवत फिरत असल्यासारखे उतरले आहेत. मनीमोहर यांना भेटलो असल्याने पुढचे लेख वाचताना तर मला लेखिका तिथे वावरताना दिसू लागली.
हे पुस्तक वाचत असतानाच माझं आजोळचं घर नव्याने बांधण्यासाठी पाडल्याची माहिती फोटोसह मिळाली. मी एक वर्षाचा असताना आईने तिथे नेलं होतं. त्यानंतर २०२३ च्या डिसेंबरमध्ये घर नव्याने बांधायचं प्लानिंग सुरू झालं तेव्हा ते पाहायला म्हणून मी गेलो होतो. त्यातल्या आमच्या वाट्याच्या खोल्या रिकाम्याच होत्या. त्यामुळे हे पुस्तक वाचताना एक वेगळीच भावना मनात होती.
यात माणसांची , समाजव्यवहाराची वर्णनं फार थोडी आलीत. ती आणखी आवडली असती. एक सामाजिक दस्तावेज तयार झाला असता. चित्र पूर्ण वाटलं असतं.
श्रेयनामावलीत मुद्रितशोधकाचं नाव आहे. पण पुस्तकात मायबोलीवर वापरलेल्या
इमोजीच्या जागी (स्मित) आलं आहे.
ऋतुराजने या पुस्तकाच्या प्रती घेऊन आपल्या परिचितांत वाटल्याचं ठाणे गटगमध्ये म्हटलं होतं. मलाही , त्याच्याइतक्या नाही तरी एकदोन प्रती वाटाव्याशा वाटत आहेत. त्याला कारण अर्थात मी कधीच न राहिलेलं माझं आजोळचं घर. माझ्या मामेमावस भावंडांपैकीही कोणी तिथे राहिलेलं नाही. आणि ते घर मनीमोहर यांच्या घरापेक्षा वेगळं आहे. त्यांच्यासारख्या सहा पिढ्या नांदणं दूर. एकच वृद्ध जोडपं तिथे राहतं. पण गणपती, स्वामींची पुण्यतिथी या वेळी तिथे गजबज असते. तो माहौल अनुभवण्यासाठी तिथे जायला हवं असं वाटतं.
छान लिहिलंय, भरत.
छान लिहिलंय, भरत.
ललिता- प्रीती धन्यवाद!
ललिता- प्रीती धन्यवाद!
मनीमोहोर यांच्या मोहोर पुस्तकाची ओळख आवडली
त्यांचे कोकणातील घरावरचे लेख आवडले होते.
मी स्वच्छंदी अतिशय सुरेख
मी स्वच्छंदी अतिशय सुरेख परिचय करून दिलाय 'पावसाआधीचा पाऊस'चा, ओघवती पोस्ट.
मी स्वच्छंदी अतिशय सुरेख
मी स्वच्छंदी अतिशय सुरेख परिचय करून दिलाय 'पावसाआधीचा पाऊस'चा, ओघवती पोस्ट........+१
अन्जु आणि देवकी धन्यवाद!
अन्जु आणि देवकी धन्यवाद!
'पावसाआधीचा पाऊस' चा परिचय
'पावसाआधीचा पाऊस' चा परिचय फार आवडला. पुस्तक वाचावेसे वाटतेय. मिळवावं लागेल.
मनीमोहोरांनी लिहीलेलं छापिल पुस्तक आहे, माहिती नव्हतं. मस्त!
मी द्विधा मनस्थितीत आहे. बुक
मी द्विधा मनस्थितीत आहे. बुक गंगा वरती मी पंधरा एक पुस्तके कार्ट मध्ये टाकून ठेवली आहेत. ती घेऊ की नको घेऊ की नको घेऊ की नको असे होत आहे. संप्रती समजा एक रागीट डेमी गॉड असला असता तर तो माझ्यावर कोपला असता.
या पुस्तकांमध्ये मेघना पेठेचे बिन देअर डन दॅट हे पुस्तक देखील आहे. मेघनाच्या नाकातली चमचमती चांदणी पाहून हे पुस्तक घ्यावे असे वाटते. मात्र मला माझे हे पुस्तक पूर्ण वाचून होणार नाही अशी भीती देखील वाटते.
या यादीमध्ये पपायरसची दहा पुस्तके आहेत. माझे फेसबुक वरचे काही मित्र या पुस्तकांचे फोटो मी टाकले तर खूप खुश होतील. आणि मला त्यांना तसे खुश होऊ द्यायचे नाही त्यामुळे मी ही पुस्तके विकत घेणार नाही.
मनीमोहोर यांचे अभिनंदन.
मनीमोहोर यांचे अभिनंदन. माहिती नव्हतं त्यांचे पुस्तक आहे. +१
खूप नवीन प्रतिसादांचा आकडा
रहे ना रहे हम, महका करेंगे या नावाचे एक आत्मचरित्र वाचायला घेतले आहे. डॉ किरण दिघे_ कारानी यांचे आहे. ठाण्यात बरेच आयुष्य गेलेल्या किरण यांनी '५० त्या दशकातील ठाण्याचे वर्णन केले आहे सुरुवातीला. पुढे त्या डेंटिस्ट झाल्या . तकलाशी कारानी यांच्याशी प्रेमविवाह. मुख्य म्हणजे २७० पानांच्या पुस्तकात भरपूर रंगीत फोटो दिले आहेत. वाचायला मजा येते आहे. कुणी वाचले आहे का?
१९५० मधील. ठाणे.. बघायला
१९५० मधील. ठाणे.. बघायला आवडेल
रायगड जरूर वाचा!
मागच्या आठवड्यात z factor,
मागच्या आठवड्यात z factor, सुभाष चंद्रा, शब्दांकन प्रांजल शर्मा हे पुस्तक मराठी अनुवाद वाचले. हिंदी आणि इंग्रजी आवृत्त्याही आहेत. सुभाष चंद्रा यांचं आत्मकथन आहे . २०१७चे प्रकाशन आहे पण २०११ पर्यंतचा प्रवास आहे. Zee tv channel, essel group यांच्यामुळे बऱ्याच जणांना सुभाष चंद्रा माहीत असतीलच पण त्यांनी बालपणापासूनची माहिती सांगितली आहे ती वाचायला आवडते. डाळी आणि धान्याचा व्यापार त्यांच्या कुटुंबात चालतच होता तो त्यांनी वीस वयापर्यंत बराच वाढवला. नंतर पहिला प्रायवेट टीव्ही चानेल कसा चालू केला ती माहिती रंजक आहे. मुंबई जवळचे मनोरंजन केंद्र एस्सेलवल्ड असे उभारले हेसुद्धा समजले. त्यात असणारे विपश्यना केंद्र आणि त्याची पार्श्वभूमी समजली. एकूण पुस्तक चांगलं आहे.
जैन, मारवाडी, गुजराती, पारशी हे लोक व्यापार करतात. बरेच यशस्वी होतात पण लिहिणारे कमीच आहेत. तर सुभाषचंद्रासारख्यांनी ते उघड केल्यावर आपल्याला ( मराठी लोकांना) आतील गंमती जमती कळतात. व्यावसायिक शिक्षणाचे बाळकडू लहानपणीच कसे मिळते हे कळते. पैसा उभा करणे आणि धंद्यात नवीन कल्पना आणून राबवणे या दोन गोष्टी फारच मार्गदर्शक ठरतात. नवीन क्षेत्रात प्रथम उडी घ्यायची हे तत्त्व सुभाषनी कायम अमलात आणले.
मीस्वच्छंदी, पावसाआधीचा
मीस्वच्छंदी, पावसाआधीचा पाऊसवरचा अभिप्राय आवडला. हे पुस्तक मी कॉलेजात असताना वाचलं होतं. मग पुढे विकत घेऊनही वाचलं. चिमणचेटके चांदणे, चोरबाजार हे लेख आठवले.
--
वाचनालयातून गणेश मतकरींचा इन्स्टॉलेशन्स हा कथासंग्रह आणला. वाचायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की आधी वाचलाय. तरीही पुन्हा पूर्ण वाचला. कारण करायला दुसरं फार काही नव्हतं. आणखी एक म्हणजे कथांचा प्लॉट आठवला तरी सगळे तपशील, शेवट असलाच तर तो असं काही आठवत नव्हतं. त्यामुळे वाचायला मजा आली.
याबद्दल मी आधीही लिहिलं असेन. या कथांमधील पात्रांच्या तोंडी भरपूर इंग्रजी शब्द, वाक्ये आहेत. कारण त्यांचं बॅकग्राउंडच तसं आहे. त्यामुळे वाचताना अजिबात खटकलं नाही. उलट याबद्दलचं माझं मत बदललं. ही या पिढीची भाषा. तीही स्वीकारली पाहिजे.
आणखी एक म्हणजे वाचताना सगळ्याच कथा कळल्या आहेत, असं वाटत नव्हतं. शेवट असाच का ? म्हणजे नक्की काय झालं. इत्यादि. मग अचानक तीनचार दिवसांनी यातल्या काही कथा गूढकथा आहेत, हे लक्षात आलं आणि कोडं सुटलं. गंमत ते गूढ रचण्यात आणि वाचकाला त्यात खिळवून ठेवण्यात आहे.
शेवटी सगळे धागे जुळवून , गूढ उलगडून दाखवायला काही त्या गोष्टी नाहीत.
रहे ना रहे हम, महका करेंगे
रहे ना रहे हम, महका करेंगे पुस्तक शेवटी रडवते.
खिडक्या अर्ध्या उघड्या या
खिडक्या अर्ध्या उघड्या या कथासन्ग्रहात पण गणेश मतकरी इन्ग्रजी मराठी वापरतात. त्यांनी ती आजच्या पिढिची भाषा म्हणून स्विकारलेली दिसते.
टवणे सर,
टवणे सर,
कधी कधी आपण सिम्पल सिम्पल शब्दांना देखील डिफीकल्ट डिफीकल्ट इंग्लिश शब्द युज करतो हे मला खटकते.
भरत, तुम्ही आवर्जून माझ्या
भरत, तुम्ही आवर्जून माझ्या पुस्तकाबद्दल लिहिलंत म्हणून खूप छान वाटलं. धन्यवाद.
माझ्या पुस्तकातले सगळे लेख इथे मायबोलीवर आधी प्रकाशित झाले होते त्यामुळे माबो कराना त्यात नवीन असं काही नाही, तरी ही तुम्ही लिहिलत हे विशेष. आपल्याच घरात आपली दखल घेतली जातेय, थोडं कौतुक होतंय असं फिलिंग आलं वाचताना.
मी काही फार प्रतिभावान लेखिका नाही, किंबहुना मला लेखिका म्हणणं ही थोडं धारिष्ट्यच आहे.
कोकणातल्या घर, परिसरावर सगळा मिळून एक लेख होईल एवढाच त्याचा जीव असताना एक संपूर्ण पुस्तक होऊ शकेल एवढं माझ्या सारखीने लिहिणं ही परमेश्वरी कृपाच म्हणावी लागेल. पण हे पुस्तक म्हणजे मी आयुष्यभर पाहिलेलं एक स्वप्न आहे आणि ते पूर्ण झालं ह्याचा आनंद, समाधान आहे. असो.
पुन्हा एकदा धन्यवाद.
पण हे पुस्तक म्हणजे मी
पण हे पुस्तक म्हणजे मी आयुष्यभर पाहिलेलं एक स्वप्न आहे आणि ते पूर्ण झालं ह्याचा आनंद, समाधान आहे.>> किती छान!
पण हे पुस्तक म्हणजे मी
पण हे पुस्तक म्हणजे मी आयुष्यभर पाहिलेलं एक स्वप्न आहे आणि ते पूर्ण झालं ह्याचा आनंद, समाधान आहे.>> छान
अभिनंदन, ममो.
अभिनंदन, ममो.
गणेश मतकरींच्या कथांची मी फॅन
गणेश मतकरींच्या कथांची मी फॅन आहे.
तरी नुकतंच '(कदाचित) इमॅजिनरी' वाचायला घेतलं, त्यातल्या कथा मला जरा लांबवलेल्या, रटाळ, पाणी घातलेल्या वाटल्या. अजून पूर्ण वाचून व्हायचं आहे. पण गेल्या वर्षी वाचलेले त्यांचे 'तडा', 'फ्री फॉल' हे दोन कथासंग्रह आवडले होते. '(कदाचित)इमॅजिनरी' त्याआधी आलेलं आहे. माझं वाचायचं राहिलं होतं. तेच बरं झालं असं वाटतंय, नाहीतर त्या कथा रटाळ वाटल्या म्हणून मी पुढची पुस्तकं वाचण्याच्या फंदात कदाचित पडले नसते.
सध्या 'मोसाद ' वाचायला घेतलंय
सध्या 'मोसाद ' वाचायला घेतलंय. वाचनीय आहे. प्रत्यक्ष घटनांवरच पुस्तक आहे हे. ह्यातल्या काही वर चित्रपट पण निघालेले आहेत.
मोसाद ची कार्यपद्धती, त्या अनुषंगानी येणारं रशिया, जर्मनी, इराण... वाचायला मिळतंय.
शांता शेळकेंच्या पुस्तक रेको
शांता शेळकेंच्या पुस्तक रेको साठी धन्यवाद! लगेच किंडल वर घेतलं विकत.
त्यांचं सांगावेसे वाटले
त्यांचं सांगावेसे वाटले म्हणून पण ललितलेखांचं पुस्तक आहे. तेही छान आहे. इथेच कोणी लिहिलेलं का आठवत नाही. दोन्ही किंडलवर आहेत.
ही पुस्तकेही वाचनीय आहेत.
ही सगळीच पुस्तके वाचनीय आहेत.
धुळपाटी हे त्यांचं आत्मचरित्र
धुळपाटी हे त्यांचं आत्मचरित्र आहे ना ?
बाकी कवितांची आहेत की ललित लेखनाची ?
धन्यवाद अंजली_१२.
धन्यवाद अंजली_१२.
सांगावेसे वाटले म्हणून हे शान्ता बाईंचं पहिलं पुस्तक वाचलं . ते खूप आवडलं म्हणून हे.
हे अजूनच तरल आहे.
भरत सुचविलेल्या यादीकरता धन्यवाद!
'आतला आनंद ' वाचायला सुरुवात केली आहे.
यातील लेख त्या जाण्याआधीच्या अगदीच आदल्या वर्षातील आहेत(२००१).
वयामुळे बदललेला दृष्टिकोन पहिल्या लेखापासून जाणवला.
खूप छोटे छोटे लेख आहेत.. पण मार्मिक! माझे अगदीच थोडे वाचून झालं आहेत.
धुळपाटी आणि वडीलधारी माणसे विषयी ऐकले आहे.
शब्दव्रती पण चांगलच असेल.. मला दोन्ही पुस्तकांत जाणवलं ते त्यांचं शब्दावरील प्रेम !
धूळपाटी आत्मचरित्र नाही. पण
धूळपाटी आत्मचरित्र नाही. पण आत्मकथनपर आहे.
वरच्या फोटोतली सगळी गद्य आहेत.
Pages