एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकार द्रौपदीची थाळी लाँच करणार आहे.>>>म्हणजे ते कृष्णा सारखं, त्या थाळीला चिकटलेलं पान खाऊनच ढेकर द्यायची वेळ येणार बहुतेक... Rofl

Press Trust of India
@PTI_News
Coronavirus is not a health emergency: officials
5:31 PM · Mar 13, 2020

बघा. मी म्हटलं नव्हतं.

Press Trust of India
@PTI_News
I have full confidence in 140 crore Indians that just like Covid time, we'll overcome this crisis too: PM Modi on West Asia war

Dr. S. Jaishankar
@DrSJaishankar
Had another conversation with Iranian FM
@araghchi
yesterday night.

Discussed bilateral matters as also BRICS related issues.

पण फादरलँड आणि ग्रँडफादरलँडला विचारलं ना रे बाबा?

मोदींनी इस्रायलला आपला फादरलँड म्हटलं. याला मानववंशशास्त्रात काही आधार नसावा. ते इस्रायल किंवा बिविला आपला बाप मानत असावेत.

माझ्या मुलाच्या हॉस्टेल मध्ये कालपासून चपाती ऐवजी ब्रेड देत आहेत. जेवणात नेहमीपेक्षा कमी पदार्थ ठेवले आहेत. भेळ, सॅन्डविच असे पदार्थ नाश्ता, संध्याकाळचे खाणे ठेवले आहे. गोडाऐवजी केळं.

हॉस्टेल मेस, कॅन्टीन अशा ठिकाणी परिणाम दिसायला सुरू झाला आहे. शिवाय कष्टकरी वर्ग ज्यांच्याकडे स्वतःच्या नावावर गॅस कनेक्शन नाही ( आधीच काळया बाजारातून महाग सिलेंडर घ्यावे लागते असे) यांचे अजूनच हाल व्हायला लागले आहेत. नोटबंदी आणि कोविड काळात पण आपल्या सारख्या मध्यमवर्गीयांवर फारसा परिणाम नव्हता झाला. सगळ्यात जास्त याच लोकांना त्रास होतो. त्यावेळी सुद्धा विद्यार्थांना त्रास झाला होता, आता पण होतोय.

आज सकाळी पुतण्याशी बोलणे झाले - त्याची जेवणाची मेस बंद झाली आहे. बाहेर जेवण मिळते आहे, महाग पडत असेल, पण मिळत आहे.

येथे माझ्या पुतण्याला त्रास होत आहेच पण मेस बंद करणार्‍या व्यक्तीने अगदी नाईलाज आहे म्हणूनच तसा निर्णय घेतला आहे. घरगुती व्यावसाय करणार्‍याचा एक आर्थिक स्त्रोत बंद झाला आहे. Sad

राहुल गांधी यांचे संसदेतले Energy crisis भाषण झोंबणारे आहे.

एनडीए सरकार आणि विनोद
हा मथळा इतक्या लवकर खरा ठरेल अशी कल्पना नव्हती. भारताचे परराष्ट्र खाते किती बोगस आहे? हे समजून घ्यायचे असेल तर प्रेम पणिक्कर ह्यांचा हा ब्लॉग वाचा.
Iran Plays Hardball With India's Hormuz Requests
https://www.rediff.com/news/special/iran-plays-hardball-with-indias-horm...

कोविड जेव्हा संपायला आला तेव्हाच मी बोललो होतो की हा प्रसंग पुन्हा येईल. त्यावेळी भविष्यातील धोका ओळखून मी गॅस सिलिंडर जमवायला सुरवात केली. गावाला शेतात मस्त घर बांधलंय त्याच्या भोवती भिंत बांधून त्यात काचा लावल्यात. दहा एक सिलिंडर जमा केलेत सोबत तांदूळ, चपाती पिठाची पोती भरलेत, बाजूलाच भाज्यांची बाग केले, कोंबड्या पाळल्यात, मीठ मसाले वेगवेगळ्या प्रकारची पीठं भरलेत. प्रसंग उद्भवला तर तिथे जाऊन राहणार आहे. पाच एक वर्षे आरामात राहू शकतो अशी सोय केले.

काल पुण्यात शिकायला राहणाऱ्या माझ्या पुतणी शी बोलले. तिच्या मेस मध्ये मार्च महिन्याचे 1200 रुपये एक्स्ट्रॉ घेत आहेत सिलेंडर प्रश्नामुळे.

राहुल गांधी यांचे संसदेतले Energy crisis भाषण झोंबणारे आहे.
राहुल गांधीची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरत असल्याने त्याला संसदेत बोलू दिले जात नाही. प्रसार माध्यमेही त्याला प्रसिद्धी देत नाहीत.

करोनाकाळात आपल्याकडे कसं सगळं छान आहे, असा देखावा सुरू होता. इतर देशांशी सिलेक्टिव्ह आकडेवारीची तुलना व्हायची. तेच आताही सुरू आहे. भाजपने इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे पेट्रोलच्या किंमती गेल्या काही दिवसांत स्थिर आहेत असं ट्वीट केलं आहे.
करोना वाढायला विरोधी पक्षांची सरकारं असलेली राज्य जबाबदार. आता तिथे गॅस सिलिंडर्सची साठेबाजी , काळाबाजार होतोय.

मायबोलीकर मयुरेशने चार पाच महिन्यांपूर्वी क्लाउड किचन सुरू केलंय. त्याने कोळ शाच्या शेगड्या आणि इंडक्शन घेतलंय. तरीही मेन्यु मधले ५०% पदार्थ कमी केलेत. ग्रिल, मायक्रोवेव्ह आधीपासून आहे.
पेट्रोल डिझेल संपलं की रायडर्सही मिळणार नाहीत. सगळ्यांना सायकली पटकन मिळणार नाहीत. शिवाय डिलिव्हरी एरिया चार किलोमीटरपर्यंत मर्यादित राहील.

गॅसचा तुटवडा नाही, असं सांगण्यापेक्षा जपून वापरा असं म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं?

करोना वाढायला विरोधी पक्षांची सरकारं असलेली राज्य जबाबदार. आता तिथे गॅस सिलिंडर्सची साठेबाजी , काळाबाजार होतोय.>>> दिल्लीत पण चालू आहे की काळा बाजार. आता तर इथे भाजपाचेच सरकार आहे की.

गॅसचा तुटवडा नाही, असं सांगण्यापेक्षा जपून वापरा असं म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं?>> असं म्हणणं म्हणजे सरकारचे अपयश मान्य केल्यासारखे नाही का होणार?

राहुल गांधीची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरत असल्याने त्याला संसदेत बोलू दिले जात नाही.>>>राहुल गांधी हे आधुनिक युगाचे नॉन्स्ट्राडेमस आहेत. त्यांना स्वप्नात भविष्यात घडणाऱ्या गोष्टी दिसतात आणि ते सकाळी संसदेत येऊन त्या गोष्टी बोलतात. आलू डालो सोना निकालो हा भविष्यात लागलेला एक शोध आहे. एक वेगळीच दुनिया एक वेगळीच दुनियादारी.

<< आलू डालो सोना निकालो हा भविष्यात लागलेला एक शोध आहे. >>
------- या स्वप्नाचे ओरिजिनल मालक मोदी आहेत. Happy

इतकी टंचाई खरंच आहे? का आपल्या चॅनलवाल्यांनी नेहेमीप्रमाणे उगा पॅनिक निर्माण केली आहे?

>>>>
माझं Indane Gas (Indian Oil) च कनेक्शन आहे. परवा संध्याकाळपासून ऑनलाईन बुकिंग साठी फोन करतोय तर ही सेवा बंद आहे असा रिप्लाय येतोय.

कंपनीमधील कॅन्टीन मॅनेजरला commercial सिलेंडर पुरवठाबाबत विचारले तर त्याने सिलेंडर मिळण्यात खूप अडचणी येत आहेत असं सांगितलं.

केटरर्स यजमानांना पाहुण्यांची संख्या कमी करा किंवा तुम्हीच सिलेंडरची व्यवस्था करा अस सांगत आहेत.

सारे दिन दिया गल्लां बेहके दस्सा मैन तेनु
तू मेनु भुल्ले न कदे मैन न भुल्लां तेनु
आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या..
मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झूला..

गेल्या दीड महिन्यात हा प्रकार तीनदा झाला.
एखादी गोष्टी महान मोदींमुळे घडून आली असं भाजप आयटी सेल, पक्ष, मंत्री यांनी सांगायचं. मग असं काही झालंच नाहीए असं आपणच किंवा तिसर्‍याच कोणी सांगायचं.
१. अमेरिकेशी ट्रेड डील.
२ अमेरिकेकडून रशियन तेल आयात करायला ३० दिवसांची परवानगी.
३ इराणकडून भारतात तेल नेणार्‍या जहाजांना होर्मूझ मधून जाऊ द्यायला परवानगी.

चौथी ठळक गोष्ट म्हणजे अमेरिका इस्रायलने इराणवर हल्ला केला, त्यांच्या सर्वोच्च धार्मिक गुरूला मारलं याबद्दल अवाक्षरही नाही. मुलींच्या शाळेवर हल्ला केला त्यावरही नाही. पण इराणने शेजारी देशांतील अमेरिकी तळांवर हल्ला केल्यावर टिवटिव.
मग आठ दिवसांनी परराष्ट्र सचिवांनी दूतावासात जाऊन दुखवट्याचा संदेश लिहिणं आणि मग जयशंकर आणि स्वतः मोदींची इराणी नेत्यांना फोनाफोनी.
आणि इराण वर हल्ल्याच्या दोन दिवस आधी यांचं इस्रायलला जाणं.

नेहरूं च्या काळात भारत अर्थव्यवस्था, लष्करी बळ यांवर कोणाच्या खिजगणतीतही नव्हता. पण नेहरूंसारख्या नेत्यामुळे तिसर्‍या जगाचं , अलिप्त देशांचं नेतृत्व भारताकडे आलं.
After World War II, Japan was initially isolated due to the Allied occupation (SCAP) and post-war devastation. However, Prime Minister Jawaharlal Nehru actively worked to break this isolation and foster friendly, non-political relations with Japan, which was crucial to Japan's post-war rehabilitation

पहिले आशियाई खेळ भारतात १९५२ साली झाले.

नेहरूंनी मित्र देश असलेल्या रशियासमोर कधी लोटांगण घातलं नाही.

दक्षिण आफ्रिकेच्या वंश भेदाविरुद्धच्या लढ्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पुढाकार घेतला. बहिष्काराचं शस्त्र उचललं. पुढे द. आफ्रिकेत स्थानिकांची सत्ता आली तेव्हा तिथल्या क्रिकेट संघाचा पहिला दौरा भारतातच झाला.

इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या भूमीवरून आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. बांग्लादेश निर्मितीबद्दल पुन्हा लिहायला नको.

भारताने पॅलेस्टाइनच्या लढ्यालाही कायम पाठिंबा दिला.

मोदींनी भारताचं नाव वंशविच्छेदाला पाठिंबा देणार्‍या देशांच्या यादीत घातलं.

Delhi: Iran’s Ambassador to India Mohammad Fathali, at the International Quds Day Conference, says, “Finally, I would like to express my gratitude to the people of India for the manner in which they conveyed their condolences and sympathies regarding the martyrdom of our leader. I am deeply thankful to all of you. Such messages and expressions from you serve as a testament to the depth of the historical and cultural ties that have long existed between India and Iran; the true extent of this profound bond can be gauged by the sentiments expressed by the people here.”

भारतीय लोकांनी म्हटलंय.

आखातातील युद्धामुळे देशात क्रायसिस आहे आणि मोदी नेहमीप्रमाणे गायब म्हणजे केरळ, तमिळनाडू, प. बंगाल आसामात प्रचार करत आहेत. म्हणजे पंतप्रधानाच्या जबाबदारीतून सुटीवर.
ते जेवढा वेळ पक्ष प्रचारात असतात, तेवढा वेळ त्यांनी पंतप्र धानपदावरून सुटी घेतलेली असते. या हिशेबाने त्यांनी १२ वर्षांत ६ वर्षे तरी पंतप्रधानाचे काम केले असेल का?

इंडिया टुडेने त्यांच्या कार्यक्रमाला लॉरा लूमर -an American far-right political activist, conspiracy theorist, and internet personality ला बोलावले. याआधी तिने भारताबद्दल अतिशय गलिच्छ मतं ट्वीट केली होती. भारतात येतेय म्हटल्यावर तिने त्या ट्वीट्स उडवल्या. आणि माझी मतं बदलली असं लिहिलं.
पण इंडिया टुडेने तिला बोलावलं ते तिच्या इस्लामोफोबियासाठी. आणि आपल्या उजव्यांनाही भारताच्या सन्मानापेक्षा तोच महत्त्वाचा . तेही तिची पाठराखण करतात. यांच्या नेशन फर्स्ट, नॅशनलिझमचा अर्थ हाच आहे.
तर राजदीप सरदेसाईने तिचा त्या कार्यक्रमात निषेध केला. तिला अगदी नम्रपणे पण स्पष्ट शब्दांत सुनावले. तो मुळातच इथल्या उजव्यांचा नावडता. त्याला शिव्या द्यायला आणखी निमित्त मिळालं.
पण अमेरिकेतल्या विशिष्ट लोकांमध्ये तो हीरो झाला.
अशी गंमत.

Pages