आउटडोअर सायकलिंग ( खेळ/ व्यायाम /छंद ) व संबंधित फिटनेस अ‍ॅप्स इत्यादी

Submitted by रानभुली on 12 May, 2025 - 10:27

आउटडोअर सायकलिंग हे निव्वळ व्यायामापेक्षा वेगळेच प्रकरण आहे. म्हणून हा धागा.

कॉलनीतल्या कॉलनीत सायकलिंग , परीसरातले सायकलिंग, शहराच्या आजूबाजूच्या सायकलिंगच्या ट्रीप्स आणि लांब अंतराच्या सायकलच्या ट्रीप्स असे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या सायकलची वेगवेगळी जॉमेट्री, त्यातून घडणारा व्यायाम, आनंद, वेग याची गोडी लागलेल्या सर्वांना इथे चर्चा करण्याचे नम्र आवाहन.

सायकल सोबत वेगवेगळे सेन्सर्स, सायक्लोमीटर्स (काँप्युटर्स) वापरत असाल तर त्याची आणि सायकलिंगशी संबंधित अ‍ॅप्सची चर्चा करण्यासाठी धागा.

गुगल मॅप्स मधे आपल्याकडे तरी सायकलिंग हा ऑप्शन दिसत नसल्याने स्ट्राव्हा आणि इतर अ‍ॅप्स वर अवलंबून रहावे लागते. जीपीएस आणि नेव्हीगेशन वाले सायक्लोमीटर्स असतात त्यातही मॅप्स असतात. ते अचूक असतात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोकलत काय भारी फोटो आलेत. शेवटचा फोटो युरोप, स्वित्झर्लंडचा वाटतोय.
कुठं आलं हे मलंगगड ? एव्हढं जवळ असून कधी गेलो नाही. वर जायची पायवाट डेंजर आहे. पाय घसरला तर थेट खाली.

बदलापूर अंबरनाथ रोडवर नेवाळी नाक्यातून आत जायला लागतं ७-८ km. कुशीवली गावच्या पुढे आहे. रोपवे लवकरच सुरू होणार आहे.

वाव ! बोकलत , सुंदर आहेत प्रचि. अजून फोटोज असतील तर टाका ना.
चांगला स्पॉट सुचवल्याबद्दल धन्यवाद. २००+ किमी अंतर आहे माझ्याकडून.

बदलापूर अंबरनाथ रोडवर>> बदलापूर कटाई नाका रोड
रानभुली आज जास्त फोटो नाही काढले. पुढच्या ट्रिपचे टाकतो नक्की.

आज उशिरा सिंहगड सर केला. पण..
एक खोच आहे. सायकल खाली लावली आणि ट्रेकिंगच्या रस्त्याने वर चढले. तीन तास लागले. उतरताना पण 45 मिनिटे लागली. फोटो घरी पोहोचल्यावर टाकेन.

Screenshot_20260119_195834_Gallery.jpgकाल राहूनच गेलं.
अंग एव्हढं ठणकत होतं कि घरी आल्यावर गादी काढून ठेवून बॅटनवर मॅट आणि गोधडी अंथरून झोपून घेतलं. नंतर म्हटलं कि सिंहगडाचं अप्रूप कुणाला असणार ? कैक वेळा पाहिला असेल. फोटो फक्त वरपर्यंंत पोहोचल्याचा पुरावा म्हणून.

पण काय मस्त दिवस होता कालचा. स़काळी निघायचं ते ११ वाजून गेले तरी कामं संपेचनात. त्यातच टिव्ही बंद पडलेला. मग मेकॅनिक पकडून आणुन ते मार्गी लावेपर्यंत १२ वाजले. सिंहगडाच्या पायथ्याला १ वाजला.

वर पायी चढून जाताना असंख्य थांबे घेतले. एकदा ताक घेतलं. सवय गेली होती. तीन तास लागले म्हणजे फिटनेस बद्दल डाऊट आहे. हे अंतर जास्तीत जास्त सव्वा तासात चढता आलं तर फिट समजायचं. शेवटी एकदाचे पाय गडावरच्या पुणे दरवाजाच्या पायर्‍यांना लागले. समोरच गावरान मेवा घेऊन बसलेले होते. मका, उकडलेल्या शेंगा घेतल्या. महाग झालंय सगळं. एव्हढासा मका सत्तर रूपये.

चन्या मन्या बोरं होती, पण एव्हढी चांगली वाटली नाहीत. बाकीचे म्हणाले आता थंड वातावरण आहे , बोरं नकोत, आंबट असतील ही.
हवा एव्हढी शुद्ध आणि थंड होती कि कडाडून भूक लागली. वर गाडीने आलेले लोक होते त्यांनाही भूक लागत होती. वातावरणाचा परिणाम. आम्ही आधीच्या सवयीने पार्किंगकडे गेलो तर तिथे आता एकही स्टॉल नाही. आता परत उलटं जाऊन गडावर शोधायचे त्राणही नव्हते आणि सर्वांनी दुकान बंद करायला सुरूवात केलेली.

मग पुन्हा खालचा रस्ता धरला अंधार पडायला आला होता. बिबटे महाराजांचं दर्शन व्हायच्या आधी खाली वस्तीत जायचं होतं. पण उतरायची सुद्धा सवय गेल्याने पाऊण तास लागला. बहुतेक जास्तच लागला असावा.

खाली मग पिठलं भाकरी, भजी पोटात कुठल्या कोपर्‍यात गेली समजलं पण नाही. दोन तीनदा चढून वर गेलं तर सायकल वर पर्यंत सहज नेता येईल .
( फोटो टाकू का कि कसं कळत नाही. मोबाईल वरूनच अपलोड करावे लागणार. एकदा एडिट तर होईलच पोस्ट. Happy )Screenshot_20260119_195855_Gallery.jpgScreenshot_20260119_195924_Gallery.jpgScreenshot_20260119_195944_Gallery.jpgScreenshot_20260119_200011_Gallery.jpg

तीन चार ठिकाणी वाचलं म्हणून. हा धागा वर आल्याने कुणाला त्रास झाला असेल तर क्षमस्व ! कृपया इग्नोर करा किंवा हातात सायकल घ्या आणि आपला अनुभव लिहा. ते छान होईल , नाही का ?
जर सायकलिंग बद्दल कुणी लिहीणार असेल तर आनंद होईल. नाहीतर माझ्याच पोस्टस येत राहणार. थेट सांगितलं तर नाही अपडेट करणार.

आज पानशेत वेल्हे रस्त्याने पाबे खिंडीपर्यंत सोलो राईड केली. काल रात्री एका समारंभासाठी आंबेगाव इथे मुक्काम होता. सकाळी लवकर निघायचं होतं पण रात्रीच्या जागरणाने सकाळी उशीर झाला. सकाळी नऊ वाजता राईड सुरू केली. खानापूरच्या पुढे डावीकडे वेल्हे फाटा आहे. तिथून वळण घेतलं. लगेचच घाट आला. तिथे एक देऊळ आहे. रामशिवारबाबा म्हणून देव आहेत. इथे काहीही चोरीला जात नाही अशी श्रद्धा आहे. एक बाबा देवळाची व्यवस्था बघतात. त्यांनी देवाच्या उरूसाचं आमंत्रण दिलं. चैतपूनव म्हणजे चैत्रातली पौर्णिमा असणार.

पुढे चढण थांबेचना. एकदाचं एकदम टॉपला पोहोचल्यानंतर तीव्र उतार सुरू झाला. मागून गाड्या येत होत्या. दाट जंगल आहे. पुढे एक इच्छा पूर्ण करणारं देऊळ आहे. कुणाच्या काही इच्छा असतील तर नक्की भेट द्या.

पुढे अजून तीव्र चढणीचा पाबे घाट सुरू झाला. थोडा चढल्यावर काही गांवकरी म्हणाले "सोबत कुणी नाही का ? काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसला "
भित्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात तसं हे ऐकल्याबरोबर एकदम १८० च्या कोनातून सायकल वळवली. जे अंतर चढायला तास दीड तास लागला ते पंधरा मिनिटात कापलं.

खाली मग एका रिसॉर्ट मधे फोटो काढले. टाईमपास केल्यानंतर आधी गेलेले लोक परत आले. मग इथेच मजा केली. दिवस छान गेला.
या वर्षीचा संकल्प फक्त १०० किमी वर आहे. २४ ०० किमी अंतर झाले आज.

Screenshot_20260124_184559_Gallery.jpgScreenshot_20260124_161214_Gallery.jpgScreenshot_20260124_161156_Gallery.jpgScreenshot_20260124_161156_Gallery_0.jpgScreenshot_20260124_161135_Gallery.jpgScreenshot_20260124_161059_Gallery.jpgScreenshot_20260124_161040_Gallery.jpgScreenshot_20260124_161016_Gallery.jpgScreenshot_20260124_160955_Gallery.jpgScreenshot_20260124_160929_Gallery.jpgScreenshot_20260124_160912_Gallery.jpgScreenshot_20260124_160847_Gallery.jpgScreenshot_20260124_160831_Gallery.jpgScreenshot_20260124_160654_Gallery_0.jpgScreenshot_20260124_160630_Gallery.jpgScreenshot_20260124_160558_Gallery.jpgScreenshot_20260124_143925_OnelapFit.jpgScreenshot_20260124_143700_OnelapFit.jpgScreenshot_20260124_143550_OnelapFit.jpgScreenshot_20260124_143356_OnelapFit.jpg

काल २१ तारखेला पहिली शंभर किलोमीटरची सायकल ट्रीप पूर्ण केली. एका बाजूने ४४ किमी, येताना ४६ किमी.
घरी आल्यावर १० किलोमीटर लूप मधे असे १०० किमी पूर्ण झाले. ट्रक्स मुळे ५० किमीचं टार्गेट पूर्ण नाही केलं.
तळेगावच्या पुढे एमआयडीसी फाट्याकडून आत मधे वळण घेतलं. तिथे मग मावशीच्या फ्लॅटवर थोडा वेळ विश्रांती घेतली.

Screenshot_20260222_195312_OnelapFit.jpg

हा फेब्रुवारीचा तिसरा आठवडा आहे. १०० किमीचं एक लक्ष्य पूर्ण झालं.
या महीन्यात एकूण ८०० किमी पूर्ण करायचं ठरवलेलं आहे.
कालचं धरून ६७३.४९ किमी झाले आहेत. पुढच्या आठवड्यात १२६.५१ किमी पूर्ण करायचेत. पूर्ण होतंय का हे लक्ष्य बघू. सोबत जे रेकॉर्ड आहे ते चार आठवड्यांचं आहे. म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्याचा काही हिस्सा यात आला आहे.

Screenshot_20260222_195511_OnelapFit.jpg

आजपर्यंत एकून ३००० + किमी पूर्ण झाले. एकूण इलेव्हेशन या महीन्यात ३००० मीटरपेक्षा जास्त झाले.
पुढच्या महीन्यात चार ते पाच आठवडे आहेत. पण ऊन असेल. त्यामुळं विचार करून लक्ष्य ठेवावे लागेल.
आज पूर्ण आराम केला. Happy

Screenshot_20260222_195447_OnelapFit.jpg

काल मोबाईल बघायला वेळही नाही मिळाला आणि इच्छाही नाही झाली. रात्री एव्हढी झोप आलेली पण १०० किमीची कामगिरी कळवाविशी वाटली म्हणून झोप आवरून किल्लीच्या धाग्यावर अपडेट केलं.

पावर चे टॅब ऑफ आहेत. काही दिवसांनी पुन्हा कमाई सुरू झाली कि कॅडेन्स सेन्सर घ्यायचा आहे.

आता सिंहगड पण सर होईल. सायकल पळतच नव्हती. ब्रेक्स लागून राहत होते. सर्विसिंगला सेटींग्ज केले. परवा ब्रेक पॅडस बदलले. आता जोरात पळतेय. चढावर ३० किमीचा वेग गाठला. उतरावर तर ५१ किमी वेग गाठला. या वेगात ब्रेक्स लागले. आता सर झाला कि मग फिटनेस टेस्ट पास झाल्याचं समाधान मिळेल. पावसाळ्या आधी जास्तीत जास्त लक्ष्य गाठायचं. पावसाळ्यात खड्ड्यात भंबेरी उडते. म्हणून बंदच ठेवणार.

आला का हा धागा वर ? Lol
फॅटी लिवर बद्दल डॉ सरीन यांची लल्लनटॉपने मुलाखत घेतली. या दीर्घ मुलाखतीत सरीन सरांनी अनेक उपयोगी टिप्स दिल्या आहेत. ज्यांनी अद्याप ही मुलाखत पाहिलेली नाही, त्यांनी अजिबात चुकवू नये. संपूर्ण मुलाखतीची लिंक दिली आहे. वेळ नसेल तर त्याच्या बाजूलाच या मुलाखतीच्या क्लिप्स दिसतील. त्या बघायला सुरूवात करू शकता. एकामागोमाग एक आपोआप उघडत राहतील. जिथपर्यंत बघायची तिथपर्यंत बघा.

त्यांची मुलाखत कधीच कंटाळवाणी नसते. शेरो शायरी, नर्म विनोद आणि हसमुख चेहरा यामुळे त्यांची मुलाखत माहितीपूर्ण असण्याबरोबरच रंजकही असते.
https://www.youtube.com/watch?v=slnfJUimqyE

ही मुलाखत तर नाही, त्यांचा स्टँड अप शो म्हणा.
https://www.youtube.com/watch?v=H5grsRLhE5Q

मी ही सायकल बदलणार आहे.
सध्या माझ्याकडे तीन सायकल्स आहेत. यातल्या दोन सात गिअर्सच्या आहेत तर एक २१ गिअरची आहे.

पहिली फँटमची (अमेरिकन) आहे ती घेतली तेव्हां बुटकी असल्याने आवडायची. पण त्या वेळी सोसायटीतल्या सोसायटीत फिरवणे असल्याने त्रास वाटला नाही. नंतर हायब्रिड आली ती २१ गिअर्सची आहे. ती थोडी उंच, व्हील साईज २८, फ्रेम साईज ४५ असल्याने चढताना उतरताना सुरूवातीला त्रासदायक गेलं.

नंतर मीडीयम सेग्मेण्ट मधली एक अ‍ॅल्युमिनियम एमटीबी आली. पूर्वी एमटीबी बद्दल खराब मत होतं.

या तिन्ही सायकल्स वापरल्यानंतर लक्षात आलं कि तिन्ही मधे शेवटची सायकल फास्टेस्ट आहे. सीटची उंची, हँडल बारची उंची अ‍ॅडजस्ट केल्यानंतर आता हीच सायकल जास्त वापरात आहे.

२१ गिअरच्या सायकल मधे २१ गिअर्स कधीच वापरले जात नाहीत. पुढे तीन गिअर्स असतात. त्यातला शेवटचा क्वचितच पडतो. पहिल्या दोन ते तीन गिअर्ससाठी पुढचा पहिला. नंतरच्या ४ ते ६ पर्यंत दुसरा आणि ६ किंवा सात वर सायकलचा आर पी एम जास्त असताना शेवटचा पडतो. एव्हढा आर पी एम पुण्यात किंवा आजूबाजूला मिळत नाही.

तसेच हायब्रीड सायकल हलकी असूनही सिंहगड चढत नाही. सात गिअरच्या सायकलचा सर्वात लहान गिअर ( आकाराने मोठा ) हा जास्त मोठा असल्याने ती चढून जाते. समजा हिमालयीन अ‍ॅडव्हेंचर करायचे असेल तर अजून ग्रॅनी गिअर्स आवश्यक आहेत. १०, ११, १२ ची कॅसेट असेल तर पुढचे गिअर्स गरजेचे नाहीत.

त्यामुळं शिमानोचे मेडीयम रेंज मधले (डिऑर) गिअर्स असलेली सायकल घेणार आहे.

पुण्यात मला कुठेही उतरण्यासाठी रस्त्याच्या कडेला फूटपाथ, कट्टा, पायरी मिळतेच. पण लांब गेल्यावर ती मिळत नाही. उलट रस्त्याच्या कडेला खड्डा असतो. लेव्हल खाली असते. अशा वेळी टांग मारणे अवघड होते. सायकल अंगावर घेऊन उतरणे जमत नाही. म्हणून स्टेप थ्रू किंवा लो ट्यूब सायकल घेणार आहे.

ब्रेक्स पुण्यात व्ही ब्रेक्स ठीक आहेत. पण उतारावर किमान डिस्क ब्रेक्स लागतात. हायड्रॉलिक ब्रेक्स जास्त चांगले पण त्याचा मेन्टेनन्स कसा आहे याबद्दल साशंक आहे. समजा दूरची टूर आखली तर छोट्या गावात सुद्धा काम करून मिळेल असे पार्टस असावेत. या दृष्टीने डिस्क ब्रेक्सच छान आहेत. फक्त एकदा त्याचे ब्रेक पॅडस बदलायचे समजले कि झालं.

सीट मधे ड्युएल मूव्हिंग स्प्लिट सॅडल सीट आले आहेत. लाँग डिस्टंसला ते चांगले आहेत. पण महाग आहेत. एक १०० किलोमीटरची राईड केली. पण त्यामधे पन्नास किमी झाल्यानंतर मोठा ब्रेक घेतला. जेवण आणि आराम असा. आपण टूर काढली तर पहाटे उठून बारा , एक वाजेपर्यंत सायकल चालवणार. मधे दोन तास ब्रेक मधे जातील. नंतर तीन वाजेपर्यंत जेवण वगैरे करून पुन्हा दोन तीन तास चालवणे होईल.

म्हणजे एकूण मूव्हींग टाईम ७ ते आठ तास होईल. एव्हढ्या प्रवासाला सध्याचं सीट कसं आहे याची टेस्ट झाली. त्रास झाला नाही. पण अशी सातत्याने दहा दिवस चालवून पाहिली तरच ते समजेल.

हँडल बार सध्या फ्लॅट आहे. स्टेम रेजर मुळे पाठ दुखी थांबली आहे. पण क्लासिक हँडल बार टाकायचा विचार आहे. बघूयात. सध्याच्या सायकलला सात वरून दहा चं अपग्रेड होणार नाही. नाहीतर तेच केलं असतं.

100 किलोमीटरची राईड केलीत…जबरदस्त. मी जास्त चालवली की डोकं दुखतं मला पाण्यात इलेक्ट्रोलाईट्स टाकायला लागतात.

सायकल सोबत जी पाण्याची बाटली असते त्यात लिंबू, मीठ (गरज असल्यस साखर) मिसळून राईड दरम्यान ते पीत रहा. बघा फरक पडतो का ?
नाहीतर डॉक्टरांना वेळेत सांगा.

आज पुन्हा सिंहगड चढायचा अयशस्वी प्रयत्न. आज तर फक्त तीन किमी चढण शक्य झाली.

आज सकाळपासूनच निरुत्साह, त्यात सायकल अजिबात प़ळत नाहीये असं वाटत होतं. पहाटे चारला उठूनही निघायला आठ वाजले, त्यामुळे झालेली चीडचीड. शेवटी घाटात तीन किमी चढल्यावर अगदीच उत्साह शिल्लक राहिला नाही.
उलटं वारं आणि उन्हंही होती आज. कारणं नाहीत ही. कारण इगो असा नाहीये. जमलं तर जमलं नाहीतर पुढच्या वेळी असं ठरवूनच दर वेळी प्रयत्न केला आहे. पण असतो असाही एकेक दिवस हेच खरं.

आज लोणावळा जाऊन येऊन दोन्ही साईडने सोलो सायकलिंग केलं. लोणावळ्याच्या अलिकडे एक ओळखीचे सायकलिस्ट भेटले. ५५+ आहेत. पाय भरून आले म्हणताना त्यांची रोड बाईक ( आपण रेसर म्हणतो ती ) मला दिली. त्यांनी माझी जड बाईक घेतली. हवेवर चालल्यासारखं वाटलं. विशेष करून जड बाईक चालवल्यावर.

स्टार्टिंग पॉईण्टपासून ७४ किमी वर झिरो माईल स्टोन आहे. लोणावळ्यात फक्त जेवण केलं आणि परत फिरले. जेवणानंतर पुन्हा ते सायकलिस्ट भेटले. पण त्यांनी पुण्यापर्यंत मला त्यांची हलकी सायकल चालवू दिली. देहूरोडला मग पुन्हा सायकली एक्सचेंज झाल्या, नंतर मग सायकल चालवणे कठीण झाले. पुढे तर टेंपोत टाकून आणावी असा मोह अनेकदा झाला. पण झाली पूर्ण राईड.

आज घरातून बाहेर पडल्यानंतर काही किमी झाल्यावर लक्षात आलं कि सायक्लोमीटर (जीपीएस कॉम्युटर ) चालूच केलेला नाही. लोणावळ्यात जेवायला जाताना माझा सायक्लोमीटर माझ्याच बाईकला होता. काकांनी सायकल लाच ठेवलेला. नशीब चोरीला गेले नाही. ते दुसर्‍या हॉटेलला गेले होते. कुणीतरी पॉझ केला होता. काय आहे म्हणून बघितलं असेल. कार्ल्याच्या पुढे आल्यानंतर मला समजलं कि रीडिंग तेच आहे. ट्रायल अ‍ॅण्ड एररने एकदाचा चालू झाला. त्यामुळं रेकॉर्ड मधून दहा किमी वजा झाले. एव्हढ्या मोठ्या राईडमधे त्याचं काहीच नाही.
पण सायक्लोमीटर चालू नसताना राईड वाया गेली असं जे वाटलं त्याचं नंतर आश्चर्य वाटलं..
म्हणजे रेकॉर्ड नाही म्हणून वाया गेली असा विचार का आला याचं. आपण किती कनेक्टेड असण्याचे गुलाम झालोत..

रेकॉर्डस टाकायचे होते. पण इतरांना प्रत्येक ट्रीपचे रेकॉर्डस इथे टाकलेले पाहणे विचित्र वाटत असेल ना ? तसं तो जिथे जायचा तिथे जातच असतो.

झिरो माईल स्टोन हा सायकलिस्टचा देव आहे. गावात म्हसोबा असतो तसंच झालंय. सगळे तिथे फोटो काढतात म्हणून मी ही आज काढला. हळू हळू या प्रथा अंगवळणी पडत चालल्या आहेत. भारी वाटतंय Happy

मस्त आहे हा धागा रानभूली .आधीपासून वाचत होते.आज परत वाचला. तू आणि बोकलत यांनीही काढलेले फोटो मस्त.

थँक्स सिमरन, तुझ्यामुळे आणि बोकलत यांच्या मुळे पुन्हा उत्साह आला. लांबच्या अंतरात खूप वेळा थांबून फोटो घ्यायचं जिवावर येतं. तरीही काही फोटो घेतले आहेत. शुक्रवारी सायकल सर्विसिंगसाठी दिली होती. त्याने सकाळी सात वाजता सायकल द्यायचं कबूल केलं होतं. त्याप्रमाणे त्याने सकाळी वडगावात भावाकडे सायकल दिली. मलासायकल ताब्यात घेऊन निघेपर्यंत आठ वाजले. इथून लो़णावळा सत्तर पेक्षा थोडं जास्त आहे. पण दोन किमी गेल्यावर कॉम्पुटर सुरू केलेला. येताना किती किमी रेकॉर्ड झाले नाहीत हे खाली लूप मधे समजतंय.

आम्हाला टोल माफ आहे.
Screenshot_20260308_171722_Gallery.jpg

हा पाणी आणि लिंबू सरबत ब्रेक. झाडाखाली सावलीत किती बरं वाटलं.
Screenshot_20260308_171902_Gallery.jpg
सायक्लोमीटर झूम केलात का ? झाडाची पानं दिसतात बघा. उन्हात रीडिंग्ज वाचणं अवघड झालं होतं.

मा़झ्या तुमच्या जुळता तारा ..
कामशेतच्या घाटातून उतरताना मा़झ्या तुमच्या जुळता तारा .. पॉइण्टला शताब्दी सारखी चकचकीत लाल ट्रेन गेली. सगळे डबे एसी, बहुतेक शताब्दीच असावी. इथे उतारावर वेग मी पाहिलं तेव्हाम ४८ होता. म्हणजे आधी जास्त होता. या वेगात थांबून फोटो काढणे अशक्यच. शिवाय तोपर्यंत ट्रेन गेलीच असती. गंमत म्हणजे येतानाही या पॉइण्टला मला ट्रेन दिसली. उतारावरचा हा वेग किमान सहा सात किलोमीटर पुरला पायडल न मारता आरामात जाता आलं.

पुढे पाय अगदी गळून गेलेले तेव्हां किंचित मागे ब्रेक घेतला होता. माघारी फिरायचे विचार मनात येत होते. ढाबे , हॉटेल्स खूप होती. जेवणाच्या निमित्ताने आराम करावा आणि बास झालं आजचं असा गद्दार विचार मनात येतच होता, इतक्यात समोर हा बोर्ड दिसला. लोणावळा सहा किमी. आणि एक ओळखीचे सायकलिस्ट भेटले. मग उत्साह आला.
Screenshot_20260308_172555_Gallery.jpg

सायकलिस्टचं दैवत. इथे दगडाला शेंदूर नाही फासलेला.

Screenshot_20260308_173217_Gallery.jpg

झिरो स्टोनच्या विरूद्ध बाजूला फळ विक्रेता . एक केळ, एक संत्री घेतली. त्याच्या आधीच्या हॉल्टला एक संत्रं पन्नास रूपये, शहाळं १०० रूपयाला एक असे भाव सांगितले होते. पेरू सत्तर रूपयांना. मग याच्याकडे एक केळ दहा रूपयांना आणि संत्रं वीस रूपयांना स्वस्त वाटलं.

Screenshot_20260308_172300_Gallery.jpg

जेवणासाठी ते गृहस्थ अन्नपूर्णामधे गेले. मी पायीच मॉम्स होमली फूड, लीलाज होमली फूड अजून एका होमली फूड अशा ठिकाणी चौकशी केली, रेट पाहून पुन्हा अन्नपुर्णा गाठलं. दालपालक आणि एक चपाती एव्हढचं चिमणीचं खाणं होतं, पण दाल पालक साठी छोटी बकेटच आली. एव्हढं वाया जाताना बघून काळीज गलबललं. मग अशा वेळी आपल्यातला उदार स्वभाव जागा होतो, तसं त्या काकांना आग्रह केला, पण ते आधीच जेवलेले होते. एव्हढ्या लांब पार्सल नेण्यात पण अर्थ नव्हता. मग जड अंतःकरणाने वेटरला घेऊन जायला सांगितलं. अजून ती दाल पालक डोळ्यासमोर येतेय.
Screenshot_20260308_172321_Gallery.jpg

ऑर्डर देतानाच कलिंङड ज्यूस आहे का असे विचारले होते. त्याने तीच ऑर्डर समजून उठताना आणून दिला. बजेट च्या बाहेर खर्च झाला.
Screenshot_20260309_082953_OnelapFit.jpgScreenshot_20260309_083018_OnelapFit.jpgScreenshot_20260309_083040_OnelapFit.jpg

आमच्या अपार्टमेंटमधील आम्ही 3 idiots आज सकाळी साइकलिंगला निघालो. आउटर रिंगरोडच्या सर्विसरोडवर त्यामानाने तुरळक रहदारी असते. तिथे भटकंती केली. साडेसहाला निघून साडेनऊपर्यंत घरी पर्यंत आलो. एकूण २५ किमी फेरी झाली. येताना अर्थातच चहा नाश्ता झाला.

दर आठवड्याला एकदातरी जायचा निश्चय केलाय. पुढच्या शनिवारी अजून दोघा-तिघांनी यायची तयारी दाखविलीय.

सायकल १सायकल २

पहिल्याच दिवशी २५ किमी !
क्या बात है... अभिनंदन. असेच सुरू राहू द्यात. खूप आवडला हा उपक्रम.
सायकल्सच्या सीट हाईट आणि हँडल अ‍ॅडजस्ट करून घ्या. अंग भरून आलं तर उत्साहावर परिणाम होऊ नये.

तीन दिवस सुटी घेतली. १४० किमी च्या राईड नंतर घेतलीच नव्हती. रनिंग सुरू केलंय.
पावसाळ्यात सायकल बंद झाली तर अल्टरनेटिव्ह. ३- १ -३ च्या फॉर्म्म्युल्याने सध्या सुरू केलंय. पहिल्या दिवशी १५ मिनिट. दुसर्‍या दिवशी २० काल २५ मिनिटे.

आज पुन्हा सायकल झिंदाबाद.

व्वा बोकलत. सर्वच सायकलप्रेमींना मनापासून शुभेच्छा !
तुम्ही नकळत कार्बन फूटप्रिंट कमी करताय याबद्दल निसर्ग पण थँक्यू म्हणत असेल. इतकंच काय आपलं शरीर सुद्धा थँक्यू म्हणतं.

आज सिंहगड + पानशेत अशी ६२ किमीची राईड झाली. उन्हाचा तडाखा बसल्याने घरी आल्यावर झोप काढली. आता लॅब मधे ब्लड चेक केल्याचे रिपोर्टस मिळाले तर शुगर ६२ झालेली. तरी तांदळाच्या भाकर्‍या, दोन ग्लास उसाचा रस घेतलेला. येताना ऊन्ह भयंकर कडक होतं. फोटो घेतलेत पण झोप झाल्याने त्याची साईज कमी करण्याचं राहून गेलंय.

मी स्वच्छंदी, तुमची आधीची पोस्ट दिसलीच नव्हती. आय अ‍ॅम एक्स्टॄमली सॉरी.
तुम्ही पहिल्यापासून खूप सपोर्ट दिलाय. त्याबद्दल मनापासून आभारी आहे. अशा सपोर्टर्स मुळे नवीन नवीन आव्हानं पार पाडण्याचा उत्साह कायम राहिला.

एकच चॅलेंज पूर्ण होत नाहीये ते म्हणजे सिंहगड.

आज पहाटे चारला सायकल राईड सुरू केली. पाच दहा मिनिटे इकडे तिकडे. आठ वाजता परत. अंधार असल्याने मुंबई पुणे हायवेच धरला. ( या रस्त्याला पहाटे जंगली जनावरं नसतात. पहाटे बिबळ्यापासून हरणाचा एक प्रकार आहे ते सिंहगड पानशेत वेल्हे भागात असतात) .

तळेगाव (जुने) आणि परत. अंदाजे साठ सत्तर किमी झाले असेल. आज पहाटे अंधारात सायक्लोकॉम्प्युटर घेता नाही आला. आजचं रीडींग गेलं. मोबाईलवर पण सोय होती, पण सवय नसल्याने ते ही राहीलं. Sad आज ग्रुपसोबत गेल्याने जोरदार झालं सायकलिंग. पूर्वी ग्रुप पुढे गेला कि फार एकटं वाटायचं. त्यातून मग सोलो सुरू केलं होतं. दहा महीन्यात आता चांगलीच ताकद आली आहे. Happy

आता घरी आल्यावर पाहिले. दहा महीन्यात माझे चार हजार किमी पूर्ण झाले. या महिन्यात सहाशेच्या वर झाले.
Screenshot_20260321_090505_OnelapFit.jpg

या आधी एक चायनीज सायक्लोकॉम्प्युटर होता.
https://www.amazon.in/Leosportz-Cycle-Speed-Meter-Cyclocomputers/dp/B09T...

त्यात सुद्धा अनेक फंक्शन होते. पण त्यातले रेकॉर्डस डिजिटली सेव्ह /ट्रान्फर होत नाहीत. स्वस्त आहे पण आजच्या जगात डिजिटल रेकॉर्ड नाही तर त्या कामाला अर्थ नाही. आधीच्या त्या डिव्हाईस मधे अकराशे वगैरे किमी झाले होते. टोटल लिहून ठेवावी लागते. त्याचा आणखी एक दोष म्हणजे वर्षभराने बॅटरी बदलली कि डेटा गायब होतो. तो रिकव्हर होत नाही.

तसेही त्या वेळच्या सायकलिंगला काहीच अर्थ नव्हता. इथल्या इथे गोल गोल फिरणे एव्हढेच होते. त्याने ना व्यायाम होत होता ना काही. पण वाया काहीच जात नाही म्हणतात ना. तसं गोडी निर्माण झाली. पोश्चर ठरवायला मदत झाली. ग्रुप बरोबर राहण्याने मात्र बरंच शिकता आलं. ज्यांना सुरू करायचेय त्यांनी एकदा तरी जवळच्य ग्रुपशी बट्टी करून घ्या. शिकून घ्या. मग पुन्हा सोलो राईड करा.

Pages