Submitted by रानभुली on 12 May, 2025 - 10:27

आउटडोअर सायकलिंग हे निव्वळ व्यायामापेक्षा वेगळेच प्रकरण आहे. म्हणून हा धागा.
कॉलनीतल्या कॉलनीत सायकलिंग , परीसरातले सायकलिंग, शहराच्या आजूबाजूच्या सायकलिंगच्या ट्रीप्स आणि लांब अंतराच्या सायकलच्या ट्रीप्स असे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या सायकलची वेगवेगळी जॉमेट्री, त्यातून घडणारा व्यायाम, आनंद, वेग याची गोडी लागलेल्या सर्वांना इथे चर्चा करण्याचे नम्र आवाहन.
सायकल सोबत वेगवेगळे सेन्सर्स, सायक्लोमीटर्स (काँप्युटर्स) वापरत असाल तर त्याची आणि सायकलिंगशी संबंधित अॅप्सची चर्चा करण्यासाठी धागा.
गुगल मॅप्स मधे आपल्याकडे तरी सायकलिंग हा ऑप्शन दिसत नसल्याने स्ट्राव्हा आणि इतर अॅप्स वर अवलंबून रहावे लागते. जीपीएस आणि नेव्हीगेशन वाले सायक्लोमीटर्स असतात त्यातही मॅप्स असतात. ते अचूक असतात.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज सिंहगड चढण्याचा अयशस्वी
आज सिंहगड चढण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. जिथे नसरापूरवरून रस्ता येतो, तिथपर्यंत कशी बशी सायकल नेली. नंतर हातात धरून चालवत नेली. पण मग सोड्डून दिला प्रयत्न. सोलो असल्याने मॉरल बूस्ट करायला कुणीही नव्हतं.
पुन्हा खाली आले. इथेच आता बसून आईसक्रीम खात खात अपडेट करतेय.
आजचा दिवसच वाईट. सकाळी कमण्यापासून सगळंच बिनसत गेलं. तरीही बाहेर पडू म्हणून ठरवलं पण काही न काही कारणाने सकाळ अशीच गेली. दुपारी थोडं उन होतं पण लगेच ढगाळ हवा झाल्याने मग सिंहगडचा सोलो राईडचा अॅटेंप्ट केला. आता पुन्हा केव्हां तरी.
उद्याचा प्रोग्रॅम ठरल्याप्रमाणे झाला तर वीकएण्ड सार्थकी लागेल नाहीतर मग दिवस पुन्हा खराब जाणार.
आज पुनावळे ते लोणावळा पूर्ण
आज पुनावळे ते लोणावळा पूर्ण केले.



किवळ्यातून सकाळी उलटं यावं लागलं. इथे सर्वांचा एकत्र येण्याचा वटचा हॉल्ट होता. जाताना लोकल ट्रेन मधे सायकल अलाऊड केली तर देहूरोड पर्यंत येता येईल.
मस्त राईड झाली. तरी
मस्त राईड झाली. तरी इतरांपेक्षा माझं अंतर कमीच भरलं. जे पुण्यातून स्टार्ट पॉईण्ट पासून निघाले त्यांना सत्तर ते ऐंशी किमी ची राईड मिळाली.
तरी सुसाट होते सगळे. मधल्या एका टप्प्यात हे सगळे पुढे निघून गेले. मागचा एक ग्रुपही मला ओव्हरटेक करून गेला.
मग थोडं पाणी पिऊन ३४ पर्यंत स्पीड वाढवला तरी मला ओव्हरटेक करून सायकलिस्ट पुढे जातच होते. रोड बाईक ( रोड सायकल्स बहुतेक ४० च्या पुढेच स्पीड घेत असाव्यात).
मळवली त हायड्रेशन ब्रेकच्या वेळी मग सगळे एकत्र आलो. आता एव्हढं सायकलिंग करून यातले निम्मे पुन्हा माघारी सुद्धा निघाले.
१०.१० ची लोकल मिळाली. सायकलसहीत आत गेले. आकुर्डीला १०.५४ ला उतरले. आकुर्डी वरून किवळे फार अंतर नाही.
दोन्ही स्टेशनवर कुणी अडवले नाही.
>>> १०.१० ची लोकल मिळाली.
>>> १०.१० ची लोकल मिळाली. सायकलसहीत आत गेले. आकुर्डीला १०.५४ ला उतरले. आकुर्डी वरून किवळे फार अंतर नाही.
दोन्ही स्टेशनवर कुणी अडवले नाही.>>>
हे फार भारी
मस्त! चांगल्याच राईडस करताय!!
मस्त! चांगल्याच राईडस करताय!!! ट्रेनमध्ये सायकल नेलीत म्हणजे सायकलवरचं प्रेम खूप वाढलंय ह्याची पावती आहे ही! छानच.
अनुभवाचे बोल- वेगाच्या आकड्याकडे बघूच नका. रॅदर सध्या गूगल मॅप किंवा ठरलेले ए <-> बी बिंदू व्यतिरिक्त अन्य काही बघूच नका. वेळही फक्त ठरवाल तेवढा बघा की एक तास राईड का दीड तास वगैरे. बाकी आकड्यांमध्ये अडकू नका!
सिंहगड तसा मोठाच घाट आहे. काही महिन्यांचा सातत्याचा सराव त्याला लागेल. आधी फ्लाय ओव्हर्स किंवा तुमच्या जवळ असलेले चढ- घाट पाहा. तुमच्यासाठी किवळे ते औंध खूप सुंदर रस्ता आहे. औंधला असताना मी तिथे खूप राईडस एंजॉय केल्यात. त्यावर फ्लाय ओव्हर्स चढाच्या प्रॅक्टीससाठी चांगले आहेत. आणि हो, पहाटे अंधारात खूप रिस्क असते. श्वान असतात! तेव्हा उजेड झाल्यावरच सुरू करा. टिपिकल टारगेट/ ऑब्जेक्टीव्हच्या उद्देशाने शक्यतो नका करू. आनंद घेत, मजा घेत कसोटी क्रिकेटसारखं करा! वेग, आकडे, सगळं पाठोपाठ येणारच आहे. धन्यवाद.
मार्गी, हा प्रतिसाद सुद्धा
मार्गी, हा प्रतिसाद सुद्धा एकच नंबर.
सगळे मुद्दे पटले. काळजीने सांगितले आहे. भापो.
सध्या पाऊस असला तरी मे महिना असल्याने पहाटेची वेळ ठरली आहे. कुत्री भुंकतात पण माझ्याशी त्यांची लगेच दोस्ती होते. घरात पेट असेल तर त्यांना लगेच वास येतो.
माझ्या बॅगेत बिस्किटे असतात. त्यांना द्यायला आवडतं. ग्रुप असल्याने कुत्री अंगावर येत नाहीत. शहर, गाव सोडलं कि मग एकही दिसत नाही हायवेवर. सकाळ होऊन गेली कि वाहनांची गर्दी पण वाढते. असं मला वाटतं.
सिंहगड आणि प्रॅक्टीस हे खूप पटलं.
आकड्यांमुळे डिमोटिवेट होणार नाही याची काळजी घेतेय. खरं तर हे डिवाइस असल्याने मजा येते. आपोआपच रेकॉर्ड जनरेट होतं. काहीही लक्षात ठेवायची गरज पडत नाही. या डिवाईस सोबत जे होल्डर येतं ते हॅंडलला किंवा स्टेमवर घट्ट बसतं. मोबाइल पडतो किंवा घसरतो. याचा क्लॅंप मजबूत आहे. नेवीगेशन पण अचूक आहे. शिवाय मोबाईल फ्री राहतो. बॅटरी खर्च होत नाही. असे खूप फायदे आहेत.
माझा कडे गुगल मॅप भधे सायकल हा ऑप्शन बंद आहे. तो चालू होत नाही. तुम्हाला कुणाला असा प्रॉब्लेम येतोय का?
काल आराम केला. पाऊस येईल
काल आराम केला. पाऊस येईल म्हणून गाडी वापरली.
आज तळेगाव पासून आत 24 किमी राईड पूर्ण.
कॉलेज / अकॅडमी पर्यंत सायकलवर च जा ये सुरू केली.
चढ असून सरासरी १६+ वेग सहज शक्य होतोय. 630 Cal खर्च झाल्याचं दाखववतोयय. जाताना पुन्हा तेवढे झाले तर लवकर वजन उतरेल.
आज कॉम्प्युटर चालू करेपर्यंत 3 किमी अंतर पुढे आले होते. मार्गी म्हणतात तसं त्याने फरक नको पडायला.
बहुतेक 10 दिवसांनी जीपीएस चे पैसे मागेल हे डिव्हाईसचे App.
>>>>>>>>>माझ्या बॅगेत
>>>>>>>>>माझ्या बॅगेत बिस्किटे असतात. त्यांना द्यायला आवडतं.
होय भटक्या कुत्र्यांना घालायची बिस्किटं. मग अंगावर येत नाहीत.
जोरदार सुरू आहे! कॉलेजमध्ये व
जोरदार सुरू आहे! कॉलेजमध्ये व एकेडमीमध्ये सायकल, मस्तच!
गूगल मॅपवर सायकलचा पर्याय भारतात तरी उपलब्ध नाहीय. पण तुम्हांला एलेव्हेशन/ चढ उतार किंवा किती मोठे घाट आहेत हे बघायचं असेल तर ही खूप उपयोगी साईट आहे- https://www.mapmyride.com/ तिथे तुम्ही रूट प्लॉट करून अंदाज घेऊ शकता. मोठ्या राईडसला ह्याचा उपयोग होतो. तुम्हांला सहज जमणारे, कठीण जाणारे चढ काय तीव्रतेचे आहेत व सिंहगड काय तीव्रतेचा आहे हे त्यावरून कळेल. लागेल तशी ही साईट वापरू शकता.
पूर्वी मी स्ट्राव्हा ऍप वापरायचो नाही तेव्हा नोंदी ठेवायचो. आपल्याला नंतर बघायला सोपं पडतं की आपण आधी किती अंतर किती वेळात जायचो, महिन्यात किती दिवस जायचो वगैरे. स्ट्राव्हा वापरलंत तर ते सर्व सोपं करून दाखवतं. मी स्ट्राव्हावर आहे- https://www.strava.com/athletes/7234170
मार्गी, साईटचा पत्ता इथे
मार्गी, साईटचा पत्ता इथे दिल्याबद्दल आभार. ही वापरून पाहीन.
बहुतेक जीपीएस सॅटेलाईट सुरूवातीला काहीच दिवस फ्री होतं. काय होतंय बघेन.
ही हायब्रिड सायकल जी पळत नव्हती. हा पहाटे पाचचा डी आय ए टी च्या इथला फोटो. ग्रुप पुढे गेल्यावर दोन भू भू सोबतीला आले. त्यांना बिस्किटे चारली.

आणि ही ड्रीम बाईक. कधी घेणार माहिती नाही

पावसामुळे सायकल बंद होती तर
पावसामुळे सायकल बंद होती तर अस्वस्थता आली होती. जेवण जात नाही अशा वेळी. घरातली व्यायामाची जुनी सायकल पुसून वापरली पण एका जागी सायकलिंगचा कंटाळा येतो.
शेवटी आज रेनकोट वगैरे बंदोबस्त करून सायकलवर कामाला आले. आईला व्हिडिओ कॉल करून दाखवलं पण तिचं म्हणणं अजिबात पावसात सायकलवर जायचं नाही.


आज चारच दिवसांच्या गॅपने सुरूवातीला दमायला झाले. पण नंतर आपोआप बॉडी ट्यून झाली. आज २२ किमी अंतराला १ तास १२ मिनिटे लागली.
गेल्या आठवडय़ात स्कूटरला १ तास ५० मिनिटे लागली होती.
दोन दिवस सायकल न चालवल्याने
दोन दिवस सायकल न चालवल्याने अस्वस्थ वाटत होतं ते. पचनाचे प्रॉब्लेम्स, झोप नीट न होणे यामुळे आज रेनकोट वगैरे घेऊन सायकलवर आले. बॅगा करिअरला बांधून त्यालाही रेनकवर घातले. रेनकोट ने गरम होत. पण इलाज नाही.
रस्त्याने पाणी उडलं पण कडेकोट बंदोबस्त असल्याने काही फरक पडला नाही. कपड्यांचा एक सेट कॅरी केला तो उपयोगी पडला.
या धाग्यावर कदाचित अस्थानी
या धाग्यावर कदाचित अस्थानी होईल पण भटक्या कुत्र्यांना बिस्कीटं वगैरे घालायची सवय लावू नका. सर्वच दुचाकी चालवणारे बिस्कीटं घेऊन फिरत नाहीत.
अस्थानी नाही. विचार करीन
अस्थानी नाही. विचार करीन नक्की.
>>>>>>या धाग्यावर कदाचित
>>>>>>या धाग्यावर कदाचित अस्थानी होईल पण भटक्या कुत्र्यांना बिस्कीटं वगैरे घालायची सवय लावू नका.
पॉइन्ट आहे खरा.
राभु व्यायामाची सवय असेल आणि स्किप केला तर मूड फार डार्क होतो. मूड डिसॉर्डरमुळे, माझा जास्तच. सध्या व्यायामाची सवय गेलीये.
हो मूड तर अगदीच.
हो मूड तर अगदीच.
खरं तर पाऊस अचानक सुरू झाला आणि थांबेचना, त्यामुळं एकदम सेट झालेलं नवं रूटीन परत बदलता आलं नाही. आता ना धड उन्हाळा ना पावसाळा. सकाळी रेनकोट नेला. येताना चांगलं भाजून निघालं अंग रेनकोट मधे. असह्य झाले तेव्हा उतरून रेनकोट उतरवला मागे कॅरियर ला लावला. आता या अशा सीजन साठी डाएट + व्यायाम काय घ्यावा हा विचार चालू आहे तर पाऊस गायब?
माझी डायरी असल्याचं स्वरूप
माझी डायरी असल्याचं स्वरूप येतंय धाग्याला
येऊ द्या ना सर्वांच्या activities.
सुरुवात असेल तर एक किमी पण चालेल. पाच मिनिट चालवली हे पण चालेल. पण प्लीज या इथे. नोंदवा. बघा कसा प्रोग्रेस होतो ते.
दिवाळीपर्यंत माझं मेटाबोलिजम शून्यवत झालेलं. वजन 66 पर्यंत गेलं होतं सगळे अहो जाहो करायचे. मग सुरूच केलं
300 मीटर पहिल्या दिवशीचा रिझल्ट होता.
वाट बघतेय कोण कोण जॉईन करतंय.
सायकलिंग व्यायामापेक्षा जास्त आहे. मजा येते.
>>>>>पाच मिनिट चालवली हे पण
>>>>>पाच मिनिट चालवली हे पण चालेल. पण प्लीज या इथे. नोंदवा. बघा कसा प्रोग्रेस होतो ते.
मग ठीक आहे. मी नोंदवत जाइन. वीकेंडला माझ्या १५०००-२०००० स्टेप्स होतात आम्ही सेन्ट्रल पार्क/ न्यु यॉर्क वॉटर फ्रन्ट, हाय लाईन वगैरेवर चालतो. मुलीला चालल्यावाचून करमतच नाही.
दिवाळीपर्यंत माझं मेटाबोलिजम
दिवाळीपर्यंत माझं मेटाबोलिजम शून्यवत झालेलं. वजन ... >>> धागा आल्यापासून नुसता वाचला जात होता. वाढत्या वयानुसार आकारमान ही वाढत चालले आहे. पचन समस्या, तब्येतीच्या तक्रारी , औषधांचे प्रमाण वाढत चालले आहे. एक दिवस उत्साहाने काहीतरी व्यायाम होतो. पुढे दहा दिवस होत नाहीये. वरचा प्रतिसाद वाचून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. निदान आठवड्यातून तीन दिवस तरी जमावे अशी इच्छा आहे.

सामो खूपच छान व्यायाम आहे.
सामो खूपच छान व्यायाम आहे.
नोबिता अभिनंदन तुमचे. चांगली 8 किमी सुरूवातीलाच चालवलीय सायकल. वाढत जाईल नक्की.
चलाते रहो!
ज्यांना सहभागी होणै शक्य असेल
ज्यांना सहभागी होणै शक्य असेल त्यांच्या साठी
अरे वा!!
अरे वा!!
गुड डे. आजची राईड सुरू.
गुड डे. आजची राईड सुरू.
गुड डे!!
गुड डे!! जपून जा.
यावरुन एक जोक आठवला -
नातू - आजी मी मॅरॅथॉन पळणार अहे
आजी - जपून, हळू पळ रे बाळा!
मस्त जोक आहे.
मस्त जोक आहे.
आज पायात त्राण नसल्याने मधूनच राईड बंद केली. दहा किमी फक्त जाऊन येऊन. काल क्रोसिन घेतलेली. सकाळी घ्यायची राहिली.
गेले काही वर्षे असे व्हिडीओज
गेले काही वर्षे असे व्हिडीओज बघण्यात वेळ जातो. पिक्चर, वेबसिरीज बघायला वेळच मिळत नाही.
सध्या हा व्हिडीओ चालू केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=83fibMPb13E
या लोकांमुळे घरातून बाहेर पडून थोडं तरी का होईना सायकलिंग सुरू झालं.
असं काही तरी हातून घडावं ही खूप इच्छा आहे.
या फ्रेंच इसमाने संपूर्ण
या फ्रेंच इसमाने संपूर्ण आफ्रिका खंड त्याच्या अजब सायकलवरून पार केला. त्याचे अनुभव जगावेगळे आहेत.
मध्य आशियातही जाऊन आलेला आहे.
https://www.youtube.com/watch?v=H7QGNjzmAIY
आणखी एक बाई जगभरात सायकलवरून फिरतेय. पाकिस्तान नंतर सध्या भारताच्या वाटेवर आहे.
(माझी मजल आता तिच्या भारत दौर्यापर्यंत आली आहे. तिची राईड पूर्वेला केव्हांच पोहोचली)
https://www.youtube.com/watch?v=R9nazLgfzUY
आजची राईड | आज नवीन शब्द
आजची राईड | आज नवीन शब्द समजला.
आज लेझी राईड होती. पावसाने सर्वांच्या सरावात खंड पडल्याने आज निवांत जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत पाहीजे तसं जायचं असं ठरलं होतं. पावसाचे दिवस असल्याने आता पहाटे उठून जायची गरज नाही. जाताना चांगलं ऊन पडलं होतं.
आज सातारा रोडने टोल नाक्याच्या पुढे जाऊन माघारी आलो. आंबेगाव बोगद्यापर्यंत सतत चढ आहे. स्वामीनारायण मंदीरच्या जवळ जमायचे असल्याने तो ही चढ कस बघणाराच आहे. आंबेगावच्या बोगद्यापर्यंतच नको नको झालं.
बोगद्यात मात्र प्रचंड भीती वाटली.
वाहनांचे हॉर्नचे आवाज, टायर घासताना घुमणारा आवाज आणि डाव्या बाजूला रस्त्यावरून वाहणार्या नद्या यामुळं मधल्या ट्रॅक मधे यावं लागत होतंं. पावसाळ्यात कुठल्याही बोगद्यात आता जाणार नाही.
बोगदा पार केल्यावर मात्र रोलर कोस्टर राईड सुरू झाली. पुढे अजिबात मेहनत घ्यावी लागली नाही.
काही दिवस लांबची राईड न केल्याने चढावर अगदी छोट्या गिअर वर घेणाची चूक महागात पडली.
नंतर मात्र ती सुधारल्याने मोमेंटम मिळाला. एमटीबीचं हेच असतं.एकदा मोमेंटम मिळाला कि मग चांगला स्पीड येतो. पुढे अजिबात कष्ट न घेता फ्लायओव्हर आरामात चढून गेली सायकल.
येताना मात्र अजिबात मोमेण्टम मिळाला नाही. ट्ववर्डस हिल जो चढ असतो त्याने आणि पावसाने गाठल्याने तारांबळ उडाली.
डाव्या बाजूला पाणी साठलेलं. पण एकदा आंबेगावचा बोगदा लागला आणि जो भयानक स्पीड मिळाला. साठ च्या वर नक्कीच होता.
बोगद्यात जीपीएस कनेक्शन गेलं. पण बोगद्याच्या बाहेर पण पन्नासचा स्पीड होता.
पुढे स्पीडब्रेकर जे लावलेत त्यावर सायकल उडत होती. आता दाणकन आपटणार असं वाटत असताना कशी बशी सावरली.
दरीपूलावर पुन्हा पन्नासचा स्पीड गाठला आणि पुढ्यात ट्रक ..
येताना ब्रेक्स आणि पायातले शूज यावर स्पीड कमी करत कशी बशी स्वामीनारायण मंदीरापाशी राईड एण्ड केली.
लेझी राईड म्हणताना चांगलीच फास्ट झाली राईड.
>>>>>>>आता दाणकन आपटणार असं
>>>>>>>आता दाणकन आपटणार असं वाटत असताना कशी बशी सावरली.
दरीपूलावर पुन्हा पन्नासचा स्पीड गाठला आणि पुढ्यात ट्रक ..
काळजी घेणे .. प्ली़ज!!!
>>>>>लेझी राईड म्हणताना चांगलीच फास्ट झाली राईड.

सकाळची राईड
सकाळची राईड





Pages