Submitted by रानभुली on 12 May, 2025 - 10:27

आउटडोअर सायकलिंग हे निव्वळ व्यायामापेक्षा वेगळेच प्रकरण आहे. म्हणून हा धागा.
कॉलनीतल्या कॉलनीत सायकलिंग , परीसरातले सायकलिंग, शहराच्या आजूबाजूच्या सायकलिंगच्या ट्रीप्स आणि लांब अंतराच्या सायकलच्या ट्रीप्स असे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या सायकलची वेगवेगळी जॉमेट्री, त्यातून घडणारा व्यायाम, आनंद, वेग याची गोडी लागलेल्या सर्वांना इथे चर्चा करण्याचे नम्र आवाहन.
सायकल सोबत वेगवेगळे सेन्सर्स, सायक्लोमीटर्स (काँप्युटर्स) वापरत असाल तर त्याची आणि सायकलिंगशी संबंधित अॅप्सची चर्चा करण्यासाठी धागा.
गुगल मॅप्स मधे आपल्याकडे तरी सायकलिंग हा ऑप्शन दिसत नसल्याने स्ट्राव्हा आणि इतर अॅप्स वर अवलंबून रहावे लागते. जीपीएस आणि नेव्हीगेशन वाले सायक्लोमीटर्स असतात त्यातही मॅप्स असतात. ते अचूक असतात.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सायक्लोकाॅम्प्युटर ऐवजी
सायक्लोकाॅम्प्युटर ऐवजी तुम्ही स्मार्ट वाॅच कां नाही वापरत? गार्मिन किंवा कोरोस सारखी घड्याळे महाग आहेत परंतू सगळं सोपं होतं. डेटा व्यवस्थित मिळतो. सायक्लोकाॅम्प्युटर सांभाळत बसायचा त्रास वाचतो. शिवाय घड्याळाचा डेटा स्ट्रावासारख्या apps ना सिंक पण करता येतो.
स्मार्ट वॉच का नाही याचं कारण
स्मार्ट वॉच का नाही याचं कारण काही नाही. माझ्या कडे आधी स्मार्ट वॉच होतं पण त्याचा डेटा कधीच रेकॉर्ड झाला नाही. बॅटरी जास्त वेळ पुरत नाही. स्ट्राव्हा किंवा इतर app शी कनेक्टिव्हिटी नव्हती.
नवे स्मार्टवॉच आले असतील तर कल्पना नाही. तुम्ही वापरत असाल तर माहिती द्यावी. इतर कुणाला फायदा होईल.
आज पहाटे राईड ला जायच्या आधी
आज पहाटे राईड ला जायच्या आधी वजन पाहिले तर चक्क डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. 30 जानेवारीपासून आज तब्बल 4.5 किलो कमी झाले. 56 किलो झाले. 55 टार्गेट आहे पण ती अचिव्हमेंट झाली कि मग त्या पेक्षा कमी नको आणि जास्त तर मुळीच नको ही सर्कस करत बसावी लागेल.
गेल्या वर्षी चार महिन्यांत नऊ किलो कमी झाले पण नंतर साईड इफेक्ट्स पदरी पडले. असे नको. सक्तीची विश्रांती झाली की वजन भराभरा वाढते. ते सांगायचं जिवावर आलंय
सायकलिगने वजन कमी करण्यावर लेख लिहिता येईल पण भीती वाटते. मेडिकल बॅकग्राऊंड नाही. तेव्हा तो विचार नको.
काल जोरदार अपघात झाला.
काल जोरदार अपघात झाला. सायकलही फुल स्पीड मधे होती आणि आडवे आलेले कुत्रेही.
जोरदार आपटी खाल्ली. तोंडावर पडल्याने भरपूर लागले. गुडख्याला दुखापत झाली.
आज घरीच एकामागोमाग एक सिनेमे बघणं नशिबी आलंय. जोडीला पुस्तकं.
रानभूली
रानभूली
Updates इथे लिहिता ते आवडलं
एक रेकॉर्ड तयार होतोय
सेफ्टी संपूर्णपणे महत्वाची आहे
ग्रुपसोबत असेल तर सपोर्ट मिळेल असे मला वाटते
छान सायकलिंग सुरुय
शेवटचा update वाचला,
काळजी वाटली
लवकर रिकव्हर होउन नव्या जोमाने सुरू होऊ दे सायकलिंग.
खाण्यात प्रोटीन आणि ride वेळी hydration हे manage करत असालच.

सकाळी मात्र मस्त वॉक झाला.
सकाळी मात्र मस्त वॉक झाला. 'लेट देम थिअरी' हे मेल रॉबिन्स्चे माझे आवडते पुस्तक ऐकत ८५०० पावले चालले. आता अजुन संध्याकाळी रखडायचय. नवरा व मुलगी फ्रेश असतील मी मात्र आता दमलेय.
मी बसेन कुठेतरी.
झकासराव, खूप बरं वाटलं वाचून.
झकासराव, खूप बरं वाटलं वाचून. खूप खूप धन्यवाद.
प्रोटीन्स जास्त आहेत, कार्ब्ज कमी आहेत. लाँग राईडमधे मात्र केळी किंवा कार्ब्ज घ्यावे लागतात नाहीतर शुगर लो होण्याची शक्यता असते.
आता रिकव्हर झाल्यावर पुन्हा सुरू करेन सायकल.
रानभुली काळजी घ्या, लौकर बरे
रानभुली काळजी घ्या, लौकर बरे होण्या शुभेच्छा.
हा धागा वाचत असतो अधूनमधून. इंस्पायरिंग आहे.
मानवदा , आभारी आहे. बरं
मानवदा , आभारी आहे. बरं वाटतं हे वाचून.
धनश्री, कंटीन्यू करणे महत्वाचे आहे. थांबू नये असे वाटते.
मी माझे अनुभव खाली देत आहे.
मी माझे अनुभव खाली देत आहे. हे वैद्यकीय दावे नाहीत, हे माझे अनुभव, माझे क्लेम्स आहेत.
१. मी आधी व्यायाम न करता वजन मेन्टेन करणे,कमी करणे हे प्रकार केले होते. पण ते पाच सहा किलो वाढलेले वजन कमी करण्याकरता होते.
२. गेल्या वर्षी दहा किलो वजन वाढल्यावर ते कमी करण्यासाठी डाएट प्लानचा सहारा घेतला. पण त्यात पोषण नव्हते. निव्वळ प्रोटीन्सचा मारा करून चालत नाही. व्हिटॅमिन्स मिळाले नाहीत तर गंभीर प्रकरण होते. एक तर व्हेज , त्यातून स्किनच्या कालजीने उन्हाचा संपर्क टाळणे यातून कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात.
३. भराभर वजन कमी होतं तेव्हां मसल्स मधले पाणी कमी होते. पायाचे स्नायू हा आणखी एक अदृश्य पंप असतो. थोडक्यात ते एक हार्टच समजा. जर मसल्सचे पोषण झाले नाही तर प्रॉब्लेम्स होतात. ज्येष्ठांनी जर बिनाव्यायाम प्रकरण करताना निव्वळ प्रोटीन्सचा आधार घेतला तर बॅलन्स जाऊ शकतो.
४. व्हिटॅमिन्स कमी झाले कि (शाकाहारी असल्यास खूप काळजी ) तर हातात झिणझिण्या येणे वगैरे प्रकार होतात.
५. विना व्यायाम प्रकरणात जर पाणी कमी झाले तर मात्र ती व्यक्ती आजारी असल्यासारखी दिसते. ज्येष्ठात चेहर्याला सुरकुत्या पडतात.
यासाठी व्यायामाला पर्याय नाही. डॉ सरीन यांच्या मते चालणे वयाच्या ऐंशी नंतर. त्या आधी धावणे, पोहणे, सायकल, बॅडमिंटन असे व्यायाम आवश्यक आहेत. प्रत्येक व्यायामासाठी नियमित डॉक्टरांची भेट हे महत्वाचे आहे. त्यांनी दिलेल्या किंवा सुचवलेल्याच न्युट्रिशिएन कडून आहार लिहून घ्यावा. थोडे बदल आपण करू शकतो पण त्यामागचं शास्त्र समजून घेऊन.
शाकाहारी लोकांनी हाडाच्या बळकटी साठी चीज घ्यावे. हिमोग्लोबिन साठी आयर्न असलेल्या भाज्या घ्याव्यात. पालक भरपूर खा. शेवग्याच्या शेंगा खाव्यात. सायकलिंग करत असाल तर मोठ्या राईडमधे केळ खा. शुगर असली तरी खा. काही होणार नाही. मसल्स साठी मस्त ते. आणखीही काही भाज्या आहेत.
गहू कमीच करा. तांदूळ सणावारी घ्या. समुद्रकिनार्याच्या पट्ट्यात तांदूळ खाल्लेला चालतो, पण तशी जीवनशैली असावी. बैठ्या जीवनशैलीच्या लोकांनी तांदळाशी कट्टीच घ्यावी. गव्हामधे सोयाबीन मिसळावे हा डॉक्टरांचा सल्ला आहे.
हिवाळ्यात बाजरी आणि उन्हाळ्यात नाचणी , अधून मधून गव्हाच्या चपात्या असा आहार.
आपल्या आहारात कार्ब्जजचं प्रमाण अनावश्यकरित्या जास्त आहे. त्या साठी दिवसातून एक चपाती एव्हढेच टार्गेट ठेवा. भाज्या नुसत्या खा. पण भाजी उरली म्हणून चपाती घेऊ नये. पोट भरल्यासारखे वाटले नाही तर फळं खा.
शुगर असेल तर कलिंगड खाऊ नका सांगतात. पण तसे करू नका. ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असली तरी कलिंगडाचा ग्लायसेमिक लोड खूप कमी आहे. म्हणजे कलिंगडात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याने ग्लायसेमिक लोड कमी असतो. त्यामुळे तीन चार फोडी खाल्ल्याने काही होत नाही. जर व्यायाम असेल तर काळजीचे कारण नाही.
नॉन मधुमेहींनी हे सांगणे चुकीचे आहे हे कबूल. पण आईला पण मधूमेह आहे. तिचा कंट्रोल मधे आलाय. तिला घरातल्या सायकलने फरक पडतो. नाही चालवली कि शुगर वाढते.
जीवनशैली संदर्भात :
अगदीच गरज पडली तरच बसून रहा. बसण्यापेक्षा सरळ आडवे व्हा. आपले शरीर खुर्चीत बसण्यासाठी डिझाईन केलेले नाही. प्रत्येक जीवाची रचना ही अन्नाचा शोध घेण्यासाठी आहे. त्यामुळे हालचाल महत्वाची. माणुस मूळचा शिकारीच आहे. त्यामुळे धावणे गरजेचे आहे. धावणे सायकलिंग पेक्षा श्रेष्ठ आहे. पण त्यात पायाला इजा होण्याची शक्यता जास्त ( मधेच चालू केल्याने).
अनेक स्टेटस सिंबल प्रमाणेच विद्वत्ता ही आधुनिक युगात स्टेटस सिंबल बनतेय. जर या स्टेटस सिंबल्स मुले आरोग्याला फटका बसत असेल तर ज्याने त्याने कशाला प्राधान्य द्यायचे हे ठरवायचे. आमच्या घराच्या मागेच एक विद्वान व्यक्ती होते. सतत वाचन आणि लिखाण. फक्त सकाळी चालायला जायचे. त्यांचा मधूमेह नियंत्रणात नव्हता. त्यामुळे त्यांचं निधन झालं तेव्हां त्यांना तर झालाच पण कुटुंबालाही खूप त्रास झाला. अशा विद्वत्तेचा काय उपयोग ?
मनोरंजन - कधी तरी आनंद देतं. सतत त्यासाठी तीन तास बसून राहणे हे नुकसान कारक आहे का याचे उत्तर अवघड नाही.
वाहनाचा उपयोग - खरंच गरजेचा असतो तेव्हांच करावा. घराजवळ भाजी आणायला. वाचनालयात जायला, शेजार्यांकडे जायला कशाला पाहीजे ? चालत जाता येते किंवा सायकलवर जाता येते.
लिफ्ट - किमान पहिला मजला चढून जावा.
थोडक्यात आधुनिक सोयी आपल्यासाठी आहेत, आपण त्यांच्यासाठी नाही हा थंबरूल आहे.
Pages