
दोन ऋतूंमधला बदल हा बेमालूमपणे होत असावा असा माझा समज होता. गेल्या आठवड्यात आलेल्या अनुभवांनी, तो चुकीचा आहे असे वाटायला लागले आहे. खटका दाबावा तसा ऋतू बदलला.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, पक्ष्यांचे आवाज record करत असताना, वाऱ्याची थोडी जोरकस अशी झुळूक आली. परिणामी, सागाची सुकलेली पाने गळू लागली. सागाची पाने तशी मोठ्ठाली असतात. चार-पाच मिनिटे तरी इतका आवाज होत होता की तो record करण्याचा मोह मला आवरला नाही. Machine learning साठी noise data collect केला.
दोन दिवसानंतर दयाळ पक्षी, जे आत्तापर्यंत शांत होते, ते अचानक सकाळी गाऊ लागले. Breeding season पूर्वी आपली territory establish करायची ही सुरुवात.
आणि लगेच दोन-तीन दिवसांनी cicada (झींगुर) ह्या किड्याचे आवाज येऊ लागले, जे आत्तापर्यंत येत नव्हते. हे किडे जमिनीमध्ये दबलेले असतात. गर्मी वाढली की बाहेर येतात. झाडाच्या खोडावर बेमालूमपणे बसलेले असतात. त्यांच्या पोटाच्या बाजूला असलेल्या विशिष्ट अवयवाने आवाज करतात आणि त्यांच्या रिकाम्या पोटाचा उपयोग तंबोऱ्याच्या भोपळ्यासारखा होतो, ज्याने आवाज जास्ती पसरतो. फक्त नरालाच हा अवयव असतो आणि मादीला आकर्षित करण्यासाठी तो, ही किरकिर, सतत करीत असतो. आपले कान ह्या आवाजाशी लगेच व सहजच समरूप होतात आणि त्याची जाणीव कमी होऊ लागते. पक्षाचा आवाज record करायसाठी recorder सुरू केला आणि लगेच level indicator ने सर्वोच्च पातळी गाठली. पक्षी तर गात नव्हता, मग level ला काय झाले? काहीतरी बिघाड झाला की काय म्हणून मी recorder restart केला. पुन्हा तेच. नंतर कळले की सिकाड्यांचा आवाज होता तो !
आणि गेल्या आठवड्यापासूनच रात्री कधी कधी असह्य होऊन एसी लावायची वेळ येत आहे.
ह्या आठवड्यात रेकॉर्डिंग करायचा मूडच गेला. अर्धा स्पेक्टोग्राम ह्या सिकाड्यांच्या आवाजांनी भरलेला असतो. पण ऋतुचक्रातल्या अश्या ह्या खटक्यांची जाणीव स्पष्टपणे व्हायला लागली आहे. कदाचित ज्ञानेंद्रियांच्या संवेदना जरा जास्तीच जागृत झाल्यात.... आणि बालपणासारखी, का? कधी? कुठे?, असे प्रश्न विचारायची आणि उत्तरे शोधायचा प्रयत्न करण्याची जिज्ञासा !
Jungle owlets ची जोडी (breeding pair) आता Territory Duet गाऊ लागली आहे. ते पहायला, ऐकायला आणि record करायला मिळते ही मोठी पर्वणीच !
(No subject)
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
फार सुंदर व प्रामाणिक लिहीले
फार सुंदर व प्रामाणिक लिहीले आहे.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
फोटो खूप आवडला.
सिकाडा पटकन दिसत नाही, त्यासाठी नजर तयार व्हावी लागते.
जपानी संस्कृतीत सिकाडा आणि त्याच्या आवाजाला फार महत्व आहे. अनेक हायकू मधे त्याचा उल्लेख आहे.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
एक कुतूहल म्हणून विचारते- पक्ष्यांचे, नॉईजचे आवाज कशासाठी रेकॉर्ड करता? कुठला डेटाबेस तयार करण्यासाठी का?
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
छान
छान
छान लिहिलंय.फोटो सुंदर.
छान लिहिलंय.फोटो सुंदर.
कुठे करत आहात हे रकॉर्डींग?
एक कुतूहल म्हणून विचारते-
एक कुतूहल म्हणून विचारते- पक्ष्यांचे, नॉईजचे आवाज कशासाठी रेकॉर्ड करता? कुठला डेटाबेस तयार करण्यासाठी का?>>>>>> मलाही हा प्रश्न आहे.
रच्याकने ,
Jungle owlets चा उल्लेख आणि तुमच्या धाग्यातील फोटो पाहून ते तानसा अभयारण्य तर नाही ना असे वाटले.
छान लिहिलंय. एवढं नोटीस करणं
छान लिहिलंय. एवढं नोटीस करणं कमाल…
निभा, मस्तच..! प्रांजळ आणि
निभा, मस्तच..! प्रांजळ आणि सुंदर..! किती बारकावे टिपले आहेत.
मलाही प्रश्न आहे, रेकॉर्डिंग कशासाठी करता?!
sneha1, धनश्री, सामी, Sparkle
sneha1, धनश्री, सामी, Sparkle, माझेमन: धन्यवाद.
ऋतुराज: जपानी संस्कृती आणि सिकाडा ह्यांची माहिती नव्यानेच कळली. धन्यवाद. तानसा अभयारण्यातील विशेष owlet म्हणजे Forest owlet, जे फारच कमी ठिकाणी आढळते. १८८४ मध्ये विलुप्त झाले असे मानले गेले होते. ११३ वर्षानंतर American ornithologist Dr. Pamela Rasmussen ह्यांना ते परत सापडले.
Jungle owlet तसे दुर्मिळ नाही आणि छायाचित्र हे ai निर्मित आहे.
वावे, निर्लेप, ऋतुराज, : धन्यवाद. छंद म्हणून Bioacostics चा अभ्यास करत आहे. मुख्यतः पक्षांचे आवाज जमा करतो, ज्याचा उपयोग मशीन लर्निंग चे मॉडेल (आवाजावरून पक्षी ओळखणे) ट्रेन करण्यासाठी होतो. मॉडेल चांगले ट्रेन होण्यासाठी बॅकग्राऊंड नॉईस / anthropogenic आवाज हे उपयुक्त ठरतात.
निर्लेप: तुमच्यासारख्या निष्णात पक्षी निरीक्षकांकडून खूप शिकायला मिळतं.
मानव पृथ्वीकर: धन्यवाद. विरार शहरात एक धरण आहे. त्याबाजूचे जंगल अजून शिल्लक आहे. ह्या लेखात त्याचा संदर्भ आहे.
कोणाचा उल्लेख अनवधानाने राहून गेला असेल तर क्षमस्व आणि प्रोत्साहनाबद्दल सर्वांना धन्यवाद.