रंग माझा वेगळा

Submitted by Meghvalli on 19 February, 2026 - 09:56

लोक आपला रंग बिंबवू दुसऱ्यांवर पाहतात,
नाहक दुसऱ्या रंगात आपला रंग ठसवू पाहतात।

माझा मात्र रंग वेगळा,नितळ पाण्या सारखा,
कशातही मिसळले मला, होतो मीच तया सारखा।

जरी वेगळा मी,तरी सर्वांत मी आहे,
सांग वेड्या ती वस्तू ज्यात मी न आहे?

जाशिल कुठे पळून,लपशिल तू कोठे?
ह्या ब्रह्मांडातून साऱ्या चैतन्य माझेच वाहे।

पळून पळून थकशिल,शेवटी माझ्यातच विसावशील,
तू ना ओळखत मला तरी मी तुला ओळखून आहे ।

गुरुवार, १९/२/२६ , ८:२१ PM
अजय सरदेसाई -मेघ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद वाद
ही कविता सुरेश भट यांच्या याच नावाच्या गजली शी 'नावात' सांम्य राखते _/\_